Wednesday, 28 February 2024

माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

  माध्यमातून अलीकडच्या काळातील

मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन

प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संदेशनगर आणि क्रांतीनगर येथील ९६१ निवासी सदनिकांचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

            मुंबई दि. २७ - प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीहे जनतेचे सरकार आहे. या भूमिकेतून शासन सर्वसामान्य नागरिकांचे रोटीकपडामकानआरोग्य या गरजा प्राधान्याने पूर्ण करत आहे. याच प्रयत्नातून आज संदेशनगर आणि क्रांतीनगर मधील नागरिकांना हक्काच्या घराचा अधिकार मिळाला आहे. सुमारे १२०० हून अधिक प्रकल्पबाधित जनतेला घरे देण्यात आली आहेतअसे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले,मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. येत्या काळात सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार असल्यामुळे शहर खड्डेमुक्त होणार आहोत. शहर सुशोभित करून आणि सर्व रखडलेले प्रकल्प हे एमएमआरडीए सारख्या यंत्रणांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत. आज मेट्रोची सर्व कामे फास्टट्रॅकवर आहेत. त्यासोबतच कोस्टल रोडअटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे शहर वाहतूक कोंडीमुक्त होत आहे.

            एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले कीमुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्प उभारताना त्याचा प्रकल्पबाधितांना विहित मुदतीत त्यांच्या हक्काची घर वेळेत देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. संदेशनगर आणि क्रांतीनगर येथील विमानतळ प्रकल्पबधितांचे पुनर्वसन करण्याची आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही प्राधान्याने पार पाडत आहोत. या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करताना अलीकडच्या काळातील मोठे पुनर्वसन करण्याचा आम्हाला आनंद होत आहे.

            मुंबई शहरातील अलीकडच्या काळातील होणारे सर्वात मोठे पुनर्वसन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला. आहे. ज्यामध्ये कुर्ला प्रीमियर येथील इमारत क्रमांक २ मध्ये क्रांतीनगर मधील ४०६ प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार आहे. तर इमारत क्रमांक ३ मध्ये क्रांतीनगर मधील १६१ आणि संदेशनगर मधील ३९४ प्रकल्प बाधितांना घर मिळणार आहेत.

            विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई येथील जागेवरील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनाबाबतमहाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयक संस्था म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार या सर्व प्रकल्पबाधितांचे कुर्ला प्रिमीयर येथील ३० इमारतींमधील १८ हजार ०८४ निवासी आणि अनिवासी सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. यापूर्वी काढलेल्या सोडतीमध्ये क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील १२७ प्रकल्प बाधितांना सदनिका वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन करण्यात येणाऱ्या बाधितांची संख्या पाहता हे मुंबई शहरातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठे पुनर्वसन ठरणार असल्याची माहिती एमएमआरडीए यांच्याकडून देण्यात आली.

0000


Tuesday, 27 February 2024

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण

 सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण

 

            मुंबईदि. २७ : सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम२०२४, २६ फेब्रुवारी २०२४ पासून अंमलात आला आहे.

            या अधिनियमान्वये  "सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग" असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला असूनमराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

            सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी यापुढे होणाऱ्या नोकर भरतीप्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे.

            यासाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुधारीत बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम२०२४. संदर्भात राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट (Caveat) दाखल करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

0000

मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार बदल आवश्यक

 मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार

बदल आवश्यक

- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

            मुंबई दि. 27 : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या असून 2011 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये बदलत्या काळानुसार बदल करणे आवश्यक असल्यानेशासन निर्णयात वेळोवेळी सुधारणा सोडविण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. माजी राज्यमंत्री अविनाश महातेकरसामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरियासामाजिक न्याय विभागाचे अधिकारीविद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले कीराज्यात सामाजिक न्याय विभागाच्या ४४३ वसतिगृहात ४१ हजार विद्यार्थी आहेत.  त्यांना शिष्यवृत्तीनिर्वाह भत्ता २०११ च्या नियमानुसार देण्यात येतात. दर पाच वर्षांनी शासकीय निर्णयात सुधारणा करण्याचा शासन निर्णय असल्याने यामध्ये सुधारणा करूनआधुनिक काळानुसार विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात याव्यात. तसेचवसतिगृहांच्या इमारतींची डागडुजी करण्यात यावी. सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी  घेण्यात यावी. कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच,  या समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            दरम्यानडॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचारी यांच्यासाठीच्या मालकी हक्काच्या गृह योजनेचा आढावा यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी घेतला.

सौर ऊर्जा निर्मितीतून मोफत वीज देणार

            महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंतर्गत महाप्रीतच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनसौर ऊर्जाप्रधानमंत्री सुर्योदय योजनाअपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या माध्यमातून मागासवर्गीयांना रोजगार निर्मिती व सौर ऊर्जा कनेक्शन केंद्र शासन देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समाजातील सर्वस्तरातील नागरिकांना सोलार ऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मागासवर्गातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकी देण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती करण्यास आणि मोफत वीज निर्मिती करण्यास मदत होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. ज्या खाजगी कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करतात. अशा कंपन्यांसोबत करार करून केंद्र सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून राज्यात योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे

 माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा

            मुंबई, दि. 27 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2024 रोजी 133 वी जयंती असून चैत्यभूमीदादर आणि दीक्षाभूमीनागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीला माजी राज्यमंत्री अविनाश महातेकरसामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरियाअपर पोलीस आयुक्त अनिल बारसकरमनपाचे उपायुक्त प्रशांत सपकाळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, यांच्यासह प्रवीण मोरेरेल्वेजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारीसमितीचे सदस्य उपस्थित होते.

            केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले कीसामाजिक न्यायगृह विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत सर्व विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर समन्वय करतात. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देतात. समन्वय समितीनागरिकांकडून नव्याने आलेल्या सूचनांचाही सुविधांमध्ये समावेश करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाहीयाची दक्षता संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून घ्यावी. पाण्याचीशौचालयाची व्यवस्था चोख करावी. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथील स्तुपाची रंगरंगोटीसजावट आणि रोषणाईच्या चांगल्या सुविधा द्याव्यात. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. स्मशानभूमीच्या चिमणीची स्तूपावरील काळवटपणा जाण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या.

अनुयायाच्या मागणीनुसार पाणीलाडूंची संख्या वाढवावी

            देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच अनुयायींची मागणी असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने लाडूंची संख्याही वाढवावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण

            दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शनफेसबुक याशिवाय विविध समाजमाध्यमाद्वारे होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून घरी असणाऱ्या अनुयायींनासुद्धा डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेता येईल. शिवाय राज्यभरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विविध स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांवर परिसंवादविविध स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहनही श्री. आठवले यांनी केले. फिरते शौचालयसाफसफाईसुशोभीकरणावर भर द्यावाअशा सूचनाही त्यांनी केल्या.

पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थाकायदासुव्यवस्थेवर भर द्यावा

            लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून यासाठी रांगेची चोख व्यवस्था करावी. शिवाय वाहतूक व्यवस्थादिशादर्शक फलककायदा सुव्यवस्था चोख ठेवावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            माटुंगा येथे पंचशील कमान उभारण्यासाठी संबंधित विभागाकडे परवानगी मागितली असून प्रस्ताव सादर केल्याची माहिती नागसेन कांबळे यांनी दिली.

समन्वय समितीच्या सूचना

            वॉटरप्रुफ मंडपाची व्यवस्थादिवसभर प्रसिद्ध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. इंदू मिल स्मारकाबाबत होर्डिंग्ज१५ मिनिटांचा लघुपट दाखविण्यात यावे. चेंबूरच्या उद्यानात अखंड भीमज्योत उभारण्यात यावी. जयंती काळात दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करावेचैत्यभूमी परिसरातील मद्य दुकानेबियरबार बंद ठेवावे. रेल्वेने मेगा ब्लॉक टाळावाशिवाय रात्री उशिरापर्यंत लोकल ट्रेन सुरू ठेवावी. समाजभूषण पुरस्कार द्यावेत. विधानभवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

             बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अशोक स्तंभभीमज्योतींची सजावटडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेजर शोदुर्मिळ फोटोंचे प्रदर्शनउद्यानाचे सुशोभिकरण24 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्थादोन स्पीड बोटीस्वच्छतेसाठी पाच पाळ्यात 290 कर्मचारीवैद्यकीय सुविधांची माहिती उपायुक्त श्री. सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या उपाययोजनाकामांची माहिती सादरीकरणातून दिली.

0000

विकासोन्मुख, दिशादर्शक व सर्व समावेशक अंतरिम अर्थसंकल्प - ललित गांधी* *व्यवसाय कर व बाजार समिती कर रद्द करण्याची महाराष्ट्र चेंबरची पुन्हा मागणी*

 विकासोन्मुख, दिशादर्शक व सर्व समावेशक अंतरिम अर्थसंकल्प - ललित गांधी*

*व्यवसाय कर व बाजार समिती कर रद्द करण्याची महाराष्ट्र चेंबरची पुन्हा मागणी* 

-----------------------------

मुंबई:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अंतरिम असल्याने फार मोठ्या बदलांची अपेक्षा नव्हती. परंतू या अर्थसंकल्पाची दिशा नक्कीच विकासोन्मुख आहे. फार मोठा भर रेल्वे, बंदरे, रस्ते, विमानतळे, पाच निर्यात पार्कस्,मेक इन महाराष्ट्रासाठी तरतूद, यावरुन हे दिसून येते. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली.


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्यात ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती, कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, जालना, जळगाव, नांदेड, बिदर अशा रेल्वे मार्गांसाठी आर्थिक सहभाग, वाढवण बंदराचा विकास आणि मुंबईला रेडिओ क्लब येथे २३० कोटी रुपयांचे जेट्टीचे काम, भगवती बंदर, सागरी दुर्ग जंजिरा, एलिफन्टा आणि मुंबई बंदर यासाठी तरतूद अशा महत्वाच्या बाबी आहेत. त्यासाठी परिवहने, बंदरे, या विभागाला ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये १८ लघु वस्त्रोउद्योग संकुले, निर्यात प्रोत्साहनासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमाला ४०० कोटी रुपये आणि ५ इंडस्ट्रियल पार्क हि तरतूदही महत्वाची आहे. नवे एमएसएमई नवे धोरण आणि पर्यटनासाठी प्राधान्य हे स्वागतार्ह आहे. कौशल्य विकासासाठी खास केंद्रे व आजपर्यंतची सर्वाधिक तरतूद, सौर ऊर्जासाठी प्रोत्साहन याचाही उल्लेख करावा लागेल.

एमएसएमई धोरण व विकासासंदर्भात महाराष्ट्र चेंबरने वेळोवेळी अनेक सूचना केलेल्या आहेत. या सूचनांचा समावेश नव्या एमएसएमई धोरणात होईल अशी अपेक्षा आहे. नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर संपूर्ण देशात आहे हे लक्षात घेता या कार्यासाठी विशेष अशी आर्थिक तरतूद आणि केंद्रे व्हावीत. कौशल्य विकासामध्ये केवळ इंजीनीरिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक अशा ठराविक कौशल्यांचा विचार न करता हल्लीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचाही प्राधान्याने विचार झाला पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली. *व्यवसाय कर रद्द व्हावा* गेली अनेक वर्षे सर्व सामान्य नागरिकांसकट सर्व व्यवसायकही दरवर्षी व्यवसाय कर भरतात. हा कर भारभूत झाला असून तो रद्द करण्याची मागणी सर्व स्तरांवरून केली जाते. हा कर येत्या आर्थिक वर्षापासून रद्द होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय बाजार हि एक महत्वाची संकल्पना आहे. त्यादृष्टीने कृषी मालावर प्रत्येक बाजार समितीत जो मार्केट सेस अनेकदा घेतला जातो हि पद्धत व नियम लगेच रद्द व्हावी अशी मागणी असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.


राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

 राज्याच्या शाश्वतपर्यावरणपूरकसर्वसमावेशक विकासाला गती

देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

 

·       राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी

आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी

·       राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला

अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर

 

            मुंबईदि. 27 :- राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तरराजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

            उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपयेरोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपयेमराठी विभागासाठी 71 कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 18 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना 1 लाख 92 हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 15 हजार 893 कोटी रुपयेआदिवासी विकास उपयोजनेसाठी 15 हजार 360 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

            राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनीशेतकरीकष्टकरीमहिलाविद्यार्थीयुवकमागासवर्गीयआदिवासीअल्पसंख्याकउद्योजकव्यापारीव्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री श्री.पवार यांनी शाश्वतपर्यावरणपूरकसर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे.

            राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूकनागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा  प्रयत्न अर्थमंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पातून केला आहे. 

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-    

          मौजे वडजतालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय

          युवकमहिलागरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी

          स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंतविलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत

          विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरिता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटी 

          पुणे चक्राकार वळण मार्गाकरिता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी

          जालना-नांदेड द्रुतगती  महामार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 886 कोटी रुपये

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला 10 हजार 629 कोटी रुपये

          सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला 19 हजार 936 कोटी रुपये नियतव्यय

          महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे

          मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मधील 7 हजार 600 कोटी रुपये खर्चून 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती

          कल्याण-मुरबाडपुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु

          फलटण-पंढरपूरकांपा-चिमूर-वरोराजालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

          जालना-खामगावआदिलाबाद-माहूर-वाशिमनांदेड-हिंगोलीमूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

          वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26 टक्के सहभाग- एकूण किंमत 76 हजार 220 कोटी रुपये

          सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे229 कोटी 27 लाख रुपये  किंमतीचे बांधकाम

          भगवती बंदररत्नागिरी-३०० कोटी रुपयेसागरी दुर्ग जंजिरारायगड-१११ कोटी रुपयेएलिफंटामुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे

          मिरकरवाडारत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा

          छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला 9 हजार 280 कोटी रुपये

          गृह-परिवहनबंदरे विभागाला 4 हजार 94 कोटी रुपये

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता माहिती तंत्रज्ञान विभागास 920 कोटी रुपये, माहिती व जनसंपर्क विभाग, विधानमंडळ सचिवालयास प्रत्येकी 547 कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागास 71 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.

          उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिकइलेक्ट्रॉनिक्सअवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्मलघू व मध्यम उपक्रम धोरण

          18 लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती

          एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप

          निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात 450 कोटी

          निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये

          निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क

          सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी

          मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25 हजार उद्योग घटक -30 टक्के महिला उद्योजक -सुमारे 50 हजार नवीन रोजगार

          थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक  गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 20 हजार रोजगार निर्मिती

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला 1 हजार 21 कोटी रुपये

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागाला 1 हजार 952 कोटी रुपये

          अमृत 2.0  अभियानांतर्गत 145 शहरांमधील 28 हजार 315 कोटीचे 312 प्रकल्प मंजूर

          महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन 2030 पर्यंत राबविण्यात येणार

          महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या 50 ते 95 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 3 हजार 875 कोटी रुपये नियतव्यय

          दरवर्षी सुमारे 25 हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड

          अटल बांबू समृध्दी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड

          जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 700 गावांमधील 1 लाख 59 हजार 886  कामांना मंजूरी

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 245 कोटी रुपये

          वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये

          मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये

          शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट 

          शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषि पंप ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप

          राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण

          सुमारे 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच.

          डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान 

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ऊर्जा विभागाला 11 हजार 934 कोटी रुपये

          नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये

          नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या 6 हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास 3 हजार 650 कोटी रुपयेपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास 555 कोटी रुपये फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये नियतव्यय

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत व पुर्नवसन विभागाला 638 कोटी रुपये नियतव्यय

          39 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन 2 लाख 34 हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार

          बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प  पूर्ण  झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार

          कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित 3 हजार 200 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प

          विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद

          वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाव्दारे 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

          सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन वीज निर्मितीचे खाजगी सहभागातून उदंचन जलविद्युत प्रकल्प

          खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत 113 कोटी रुपयांची तरतूद

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता जलसंपदा विभागाला 16 हजार 456 कोटी रुपये नियतव्यय

          मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख  महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

          राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु

          कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु 

          दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा

          कार्यक्रम खर्चाकरिता महिला व बालविकास विभागास 3 हजार 107 कोटी रुपये

          वाशिम,जालना,हिंगोली,अमरावतीभंडारागडचिरोलीवर्धाबुलढाणापालघरनाशिक तसेच ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसंलग्नित 430 खाटांचे रुग्णालय

          जळगावलातूरबारामतीनंदूरबारगोंदियाकोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय

          नागपूर एम्सच्या धर्तीवर औंधपुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

          ऊसतोड कामगारांकरिता अपघात विमा योजना

          सर्व जिल्ह्यांमध्‍ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर

          234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र

          रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका

          कार्यक्रम खर्चाकरिता वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास 2 हजार 574 कोटी रुपयेसार्वजनिक आरोग्य विभागास 3 हजार 827 कोटी रुपये नियतव्यय

          स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनातृतीयपंथी घटकांतील लाभार्थ्यांसाठी बीजभांडवल योजनामातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांसाठी पुरेसा निधी

          संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे लेदर पार्ककोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र ,प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्रांची स्थापनागोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी

          मातंग समाजासाठी आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना

          कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18 हजार 816 कोटी रुपये

          कार्यक्रम खर्चाकरिता आदिवासी उपयोजनेकरिता 15 हजार 360 कोटी रुपये नियतव्यय

          बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ

          मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फतचे मुदत कर्जडॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सुक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये

          दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर -नवीन घरकुल योजना - 34 हजार 400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ

          श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही आनंदाचा शिधा वाटप करणार

          कार्यक्रम खर्चाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि   अल्पसंख्याक विकास विभागाला 5 हजार 180 कोटी रुपयेगृहनिर्माण विभागाला 1 हजार 347 कोटी रुपयेकामगार विभागाला 171 कोटी रुपये नियतव्यय

          मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत राज्यस्तरावर उच्च कामगिरी केंद्रविभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा

          नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा

          कार्यक्रम खर्चाकरिता क्रीडा विभागाला 537 कोटी रुपये नियतव्यय

          महाराष्ट्र ड्रोन मिशन साठी 5 वर्षासाठी 238 कोटी 63 लाख रुपये

          वरळीमुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य  विकास भवन

          कार्यक्रम खर्चाकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 2 हजार 98 कोटी रुपयेशालेय शिक्षण विभागाला 2 हजार 959 कोटी रुपये नियतव्यय

          जागतिक बँक सहाय्यित  मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास(दक्ष) या 2 हजार 307 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजूरी

          राज्यात नवीन 2 हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे

          प्रत्येक महसुली विभागामध्ये  आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी

          कार्यक्रम खर्चाकरिता कौशल्य,नाविन्यता,रोजगार व उद्योजकता विकास विभागाला 807 कोटी रुपये नियतव्यय

          कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे  नूतनीकरण व संवर्धन

          पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण

          50 नवीन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी थीम पार्कॲडव्हेंचर स्पोर्टस्शॉपिंग मॉलवॉटर पार्क आणि निवास व्यवस्था

          शिवसागर- कोयना जिल्हा सातारागोसीखुर्द जलाशयजिल्हा भंडारा तसेच वाघुर जलाशयजिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प

          लोणारजिल्हा बुलढाणाअजिंठा-वेरुळजिल्हा छत्रपती संभाजीनगरकळसुबाई - भंडारदराजिल्हा अहमदनगरत्र्यंबकेश्वरजिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा

          लोणावळाजिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- 333 कोटी 56 लाख किंमत

          श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन - 77 कोटी रुपयांची तरतूद

          महाविस्टा-मंत्रालयपरिसरातील शासकीय इमारती आणि त्यांच्या परिसराचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास

          कार्यक्रम खर्चाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाला 1 हजार 186 कोटी रुपयेपर्यटन विभागाला 1 हजार 973 कोटी रुपये नियतव्ययसार्वजनिक बांधकाम (इमारती) विभागास 1 हजार 367 कोटी रुपयेमहसूल विभागास 474 कोटी रुपये

          कार्यक्रम खर्चाकरिता गृह (पोलिस) विभागाला 2 हजार 237 कोटी रुपये नियतव्ययगृह (उत्पादन शुल्क) विभागास 153 कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागास 759 कोटी रुपये नियतव्यय

          वस्तु व सेवाकर विभागाची पुनर्रचना- कर प्रशिक्षण अकादमीची स्थापना

          कार्यक्रम खर्चाकरिता वित्त विभागाला 208 कोटी रुपये नियतव्यय

          स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूरता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुरजिल्हा पुणे येथील स्मारक- 270 कोटी रुपये किमतीचा आराखडाकाम सुरु

          12 ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली,साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड जिल्हा नांदेडएकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तृतीय जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम - 20 कोटी रुपये निधी

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरेबारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी 53 कोटी रुपये

          धाराशीव जिल्हयात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी

          प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा

          संगमवाडी,पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक

          अंमळनेर जिल्हा जळगाव येथे सानेगुरुजींचे स्मारक

          हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयांचा आराखडा

          श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गडता. कळवण स्थळाच्या 81 कोटी 86 लाख रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

          मंगेश पाडगांवकर कवितेचे गाव उपक्रम- वेंगुर्लाजिल्हा सिंधुदुर्ग

          कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपयेरोहयो प्रभागासाठी 2 हजार 205 कोटी रुपये मराठी विभागास 71 कोटी रुपये नियतव्यय

          सन 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 18 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद

          वार्षिक योजना एक लाख 92 हजार कोटी रुपयेअनुसुचीत जाती उपयोजना 15 हजार 893 कोटी रुपयेआदिवासी विकास उपयोजना 15 हजार 360 कोटी रुपये

          सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटींची तरतूद

          सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये व महसुली खर्च 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये,  महसुली तूट- 9 हजार 734 कोटी रुपयेराजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपये

०००००

नीलेश तायडे/विसंअ


 


अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार

 अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या

शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 27 : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या भागातील शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार शासन मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

            विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

Featured post

Lakshvedhi