Monday, 26 February 2024

सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करत आहे

 सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करत आहे                                                            -देवेंद्र फडणवीस


            यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात विकासाची कामे वेगात सुरू आहेत दुष्काळ, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्यासाठी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो बोनस घोषित झाला आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आहे.हे सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करते आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.


राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये


                                                            -अजित पवार


            याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले,

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल परंतु येत्या चार महिन्यांसाठी चा खर्चास मान्यता घेण्यासाठी अधिवेशनात सादर केले जातील. महानंद प्रकल्प राज्याचा असून गोरेगाव येथे मुख्यालय आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे देशपातळीवर कार्य करणारी संस्था असून यापूर्वी देखील जळगाव जिल्हा दूध संघाचे त्यांच्याकडे हस्तांतर केले होते परंतु त्या दूध संघाची आर्थिक सुधारणा झाल्याने सुस्थिती आलेला दूध संघ जळगाव जिल्हा कडे हस्तांतरित करण्यात आला. दूध उत्पादकांसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.


            ते पुढे म्हणाले, ड्रग्जच्या गुन्ह्याचे तपास करताना पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पंजाब व परदेशापर्यंत धागेदोरे शोधले आहेत या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 25 लाखाचे रोख पारितोषिक देखील जाहीर केले आहे. मराठा आरक्षण बाबत शासनाने मार्ग काढण्याचे धोरण स्वीकारून ते पूर्ण केले आहे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देण्यासाठी कार्यवाही झाली होती . बिहारचे 50% पेक्षा अधिक आरक्षण मध्ये मर्यादा असून राज्यांमध्ये त्याच धर्तीवर 50% पेक्षा अधिक आरक्षण झाले आहे. ते टिकणारे असून या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था चांगली रहावी हे गरजेचे आहे सर्वसामान्यांसाठी सरकार काम करीत आहे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.


            सन 2024 चे राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची दिनांक 23 फेब्रुवारी 2024 पर्यंतची यादी


1. सयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक-06


2. प्रस्तावित विधेयके-05


00000000



 

Sunday, 25 February 2024

सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

 सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

 

        सातारा दि.24 : ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे.

            या जलरथांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाईकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

            ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने व लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा करणेप्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे 55 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणेगावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयघनकचरा सांडपाणी व प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनतसेच गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या या जलरथाचा शुभारंभ मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या  हस्ते  हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

            ग्रामस्थांचा पाणीपुरवठा योजना चालवणेपाण्याचे स्त्रोत बळकट करणे या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात जलरथांद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

            गावात जलरथांच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्सगावात पोस्टर्स लावण्यात येणार आहे, ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत. तसेच नियुक्त केलेल्या समन्वयक मार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोततलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंचग्रामसेवकग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल. या शुभारंभ कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटेकार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गौरव चक्केकार्यकारी अभियंता (म.जी.प्रा.) पल्लवी चौगुलेजिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


सुट्ट्यांमध्ये चलो हिमालय !

 सुट्ट्यांमध्ये चलो हिमालय !

- मुलांसाठी ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि बर्फाच्छादित शिखरे

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे वेध लागलेत. परीक्षा संपल्या की काय करायचं, असे प्लॅन तयार होऊ लागलेत. इतर काही ठरवण्याआधी हे पहा आणि "भवताल - निसर्ग जागर"  सोबत हिमालयात यायचा प्लॅन करा. ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि बर्फांनी झाकलेली हिमशिखरं. मजा, मस्ती आणि निसर्गाची अनेक रहस्य उलगडणं...  तारखा राखून ठेवा आणि लगेचच आपलं नाव नोंदवा.

12 वर्षांपुढील मुला-मुलींसाठी स्पेशल समर कॅम्प,
चलो हिमालय

विशेष आकर्षण:
• बर्फातील ट्रेकिंग आणि हिमनद्या @हामता खिंड

• बर्फाच्या कुशीतील पर्वतरांगा  @रोहतांग खिंड

• उंचीवरील सर्वांधिक लांबीचा बोगदा @अटल टनेल

• हिमालयातील सर्वांगसुंदर ठिकाण @जिस्पा गाव

• गरम पाण्याची कुंडं / प्राचीन मंदिरे @मनाली

• राफ्टिंग / पॅराग्लायडिंग/ अॅडव्हेंचर @कुलू

कालावधी:
17 - 25 एप्रिल 2024

मार्गदर्शक:
• नॅचरॅलिस्ट श्री. अभिजित घोरपडे
• पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

संपर्क:
9545350862 / 9922414822

--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com



Saturday, 24 February 2024

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्रज साहित्य जागर...

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात

कुसुमाग्रज साहित्य जागर...

 

            मुंबईदि. २४ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी२०२४ रोजी "कुसुमाग्रज साहित्य जागर" मांडला जाईल.

            कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दिनांक २७ फेब्रुवारी२०२४ रोजी दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत "कुसुमाग्रज साहित्य जागर" या कार्यक्रमाचे संयोजन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.

            या कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकरसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलविरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.

            "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्यविधानमंडळाचे अधिकारीकर्मचारी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार हे कुसुमाग्रजांची एक आवडती कविता किंवा त्यांच्या साहित्यांतील लेखाचा सारांशनाट्यसंवाद यापैकी एक आणि एक स्वरचित कविता सादर करणार आहेत. "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

***

 

 


 


 

कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार

 कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या

सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार

                                                           - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाबळेश्वर येथे विभागीय नाट्यसंमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

            सातारा दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत.  यामध्ये 52 नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण असावी यासाठी अकरा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहेअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            रंगभूमी मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे शंभरावे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य नगरी या ठिकाणी संपन्न होत आहे. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.  यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटीलसंमेलन अध्यक्ष जब्बार पटेलमाजी संमेलन अध्यक्ष मोहन जोशीनाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप रंगभूमीने अनेक बदल स्वीकारले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

            अनेक अडचणींवर मात करत सध्या मराठी रंगभूमी पुढे जात आहे. अशावेळी नाट्यसंमेलनांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतातअसे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेअशा नाट्यसंमेलनांमधून नवकलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते. यातूनच स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध होतो. महाबळेश्वर येथे होत असलेल्या विभागीय नाट्यसंमेलनाप्रमाणेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये नाट्य संमेलने होत आहेत. यातून गौरवशाली नाट्य संस्कृतीचा विस्तार दिग्गज कलाकार करत आहेत. नाट्यकलेमध्ये कार्य करणारे कलाकार हे सेवाभाव घेऊन नाट्य संस्कृती जोपासत असतात. कलेला जेंव्हा रसिक दाद देतात तेव्हांच कलाकार कला समृद्ध करू शकतो. यावेळी त्यांनी जेष्ठ कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र शासनाने गौरव केल्याचेही सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमहाबळेश्वर येथे दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह असून ते सध्या बंद स्थितीत आहे. हे नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई येथील फिल्म सिटी बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणालेही फिल्म सिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात येणार आहे. मराठी भाषा व नाट्य चळवळ यांना बळ देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

            नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल म्हणालेकला आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट आहे. विविध कलांसाठी सर्वांगीण आणि एकात्मिकपरिपूर्ण असे व्यासपीठ असले पाहिजे. त्यासाठी विचारवंतकलावंतआणि रसिक यांची समिती स्थापन करून कलेच्या उत्थापनासाठी कार्य व्हावे.

            यावेळी प्रशांत दामले यांनी महाबळेश्वर येथे सध्या बंद स्थितीत असलेले नाट्यगृह सोयी सुविधा उपलब्ध करून पुन्हा सुरू करण्यात यावेअसे सांगितले. तसेच उत्तम नाट्यगृहांची संकल्पना साकारण्यासाठी आचारसंहितेपूर्वीसमिती नेमण्यात यावी,  असेही आवाहन केले.

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीअप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,  नरेश गडेकरभाऊसाहेब भोईरअजित भुरेसतीश लोटके यांच्यासह विविध दिग्गज मान्यवरकलाकारनाट्य परिषदेचे पदाधिकारीरसिक आदी उपस्थित होते.

००००


शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी

 संपर्क साधण्याचे आवाहन

 

            मुंबईदि.२३ : मुंबई शहर जिल्ह्यात इतर मागास वर्गविमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता १०० मुलींची क्षमता आणि १०० मुलांची क्षमता असलेले वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दहा हजार चौ. फुट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर यांनी केले आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील स्वतंत्र मुला-मुलींच्या वसतिगृहाकरीता दहा हजार  चौ. फुट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या खाजगी इमारतीच्या मालकांना शासनाच्या प्रचलित नियमांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग भाडे निश्चित करुन देईल. त्या भाडेकरारावर देण्यास तयार असलेल्या  मुंबई शहर जिल्ह्यातील खाजगी इमारतीच्या मालकांनी सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभागमुंबई शहरप्रशासकीय इमारतभाग-१चौथा मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई ४०००७१. या कार्यालयाशी दि. १ मार्च २०२४ पर्यंत संपर्क साधावा.

००००

रविदास महाराज जयंतीनिमित्त

  रविदास महाराज जयंतीनिमित्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

 

            ठाणेदि.24(जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

        यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूतनायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000



मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

        मुंबईदि. 23 :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी नितिन राणे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

Featured post

Lakshvedhi