रविदास महाराज जयंतीनिमित्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन
ठाणे, दि.24(जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूत, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000
मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. 23 :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी नितिन राणे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000
No comments:
Post a Comment