Saturday, 24 February 2024

कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार

 कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या

सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार

                                                           - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाबळेश्वर येथे विभागीय नाट्यसंमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

            सातारा दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत.  यामध्ये 52 नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण असावी यासाठी अकरा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहेअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            रंगभूमी मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे शंभरावे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य नगरी या ठिकाणी संपन्न होत आहे. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.  यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटीलसंमेलन अध्यक्ष जब्बार पटेलमाजी संमेलन अध्यक्ष मोहन जोशीनाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप रंगभूमीने अनेक बदल स्वीकारले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

            अनेक अडचणींवर मात करत सध्या मराठी रंगभूमी पुढे जात आहे. अशावेळी नाट्यसंमेलनांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतातअसे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेअशा नाट्यसंमेलनांमधून नवकलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते. यातूनच स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध होतो. महाबळेश्वर येथे होत असलेल्या विभागीय नाट्यसंमेलनाप्रमाणेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये नाट्य संमेलने होत आहेत. यातून गौरवशाली नाट्य संस्कृतीचा विस्तार दिग्गज कलाकार करत आहेत. नाट्यकलेमध्ये कार्य करणारे कलाकार हे सेवाभाव घेऊन नाट्य संस्कृती जोपासत असतात. कलेला जेंव्हा रसिक दाद देतात तेव्हांच कलाकार कला समृद्ध करू शकतो. यावेळी त्यांनी जेष्ठ कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र शासनाने गौरव केल्याचेही सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमहाबळेश्वर येथे दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह असून ते सध्या बंद स्थितीत आहे. हे नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई येथील फिल्म सिटी बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणालेही फिल्म सिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात येणार आहे. मराठी भाषा व नाट्य चळवळ यांना बळ देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल म्हणालेकला आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट आहे. विविध कलांसाठी सर्वांगीण आणि एकात्मिकपरिपूर्ण असे व्यासपीठ असले पाहिजे. त्यासाठी विचारवंतकलावंतआणि रसिक यांची समिती स्थापन करून कलेच्या उत्थापनासाठी कार्य व्हावे.

            यावेळी प्रशांत दामले यांनी महाबळेश्वर येथे सध्या बंद स्थितीत असलेले नाट्यगृह सोयी सुविधा उपलब्ध करून पुन्हा सुरू करण्यात यावेअसे सांगितले. तसेच उत्तम नाट्यगृहांची संकल्पना साकारण्यासाठी आचारसंहितेपूर्वीसमिती नेमण्यात यावी,  असेही आवाहन केले.

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीअप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,  नरेश गडेकरभाऊसाहेब भोईरअजित भुरेसतीश लोटके यांच्यासह विविध दिग्गज मान्यवरकलाकारनाट्य परिषदेचे पदाधिकारीरसिक आदी उपस्थित होते.

००००

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी

 संपर्क साधण्याचे आवाहन

            मुंबईदि.२३ : मुंबई शहर जिल्ह्यात इतर मागास वर्गविमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता १०० मुलींची क्षमता आणि १०० मुलांची क्षमता असलेले वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दहा हजार चौ. फुट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर यांनी केले आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील स्वतंत्र मुला-मुलींच्या वसतिगृहाकरीता दहा हजार  चौ. फुट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या खाजगी इमारतीच्या मालकांना शासनाच्या प्रचलित नियमांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग भाडे निश्चित करुन देईल. त्या भाडेकरारावर देण्यास तयार असलेल्या  मुंबई शहर जिल्ह्यातील खाजगी इमारतीच्या मालकांनी सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभागमुंबई शहरप्रशासकीय इमारतभाग-१चौथा मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई ४०००७१. या कार्यालयाशी दि. १ मार्च २०२४ पर्यंत संपर्क साधावा.

००००

रविदास महाराज जयंतीनिमित्त

  रविदास महाराज जयंतीनिमित्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

            ठाणेदि.24(जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

        यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूतनायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000

मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

        मुंबईदि. 23 :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी नितिन राणे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा

 आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा

                                                               - राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ

            मुंबई, दि.23 : देशात कर्करोगरक्तवाहिन्यांसंबंधीचे आजारमधुमेह अशाप्रकारच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर अधिक भर देणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारेबेळगांवचे के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगनेमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त)विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगालपरीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडूडी लिट पदवी प्राप्त डॉ. ख्रिस्तोफर डिसुझा यांच्यासह विशेष अतिथीविद्यापीठाच्या विविध शाखांचे अधिष्ठाताप्रशासकीय परिषद सदस्यप्राध्यापकमहाविद्यालयाचे प्राचार्यसुवर्णपदक विजेतेपदव्युत्तर आणि पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. बैस म्हणालेजुन्या आजारांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आहे. भारताने जगाला योगविद्या बहाल केली असून रोगांपासून बचाव करण्यासाठी योगशक्ती वापरण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात रोगनिदान व आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशल इंटेलिजन्स) आरोग्य सेवेमध्ये परिवर्तनाची भूमिका बजावणार असल्याने यामुळे रोगांचे निदान करणे सोपे होणार आहे. त्यामुळे आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होणारी उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे आधुनिक आरोग्य सुविधांनी मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच लाखो गरीब आणि गरजूंची सेवा करण्यासाठी तत्पर डॉक्टरांची देखील आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व गोष्टींचे महत्व लक्षात घेवून वैद्यकीय शिक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याअनुषंगाने गेल्या 10 वर्षांत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 145 वरून 260 झाली आहे. भारतात डॉक्टर-रुग्णांच्या सरासरी प्रमाणातील तफावत कमी करून डॉक्टरांची संख्या वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री यांनी हिंदीमराठी आणि इतर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचेही आवाहन केले आहे. याचधर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीत होईल. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार असून त्यांच्यासाठी संधींची अनेक दारे खुली होणार आहेतअसा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

            आयुर्वेद आणि युनानीसिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या आयुषच्या इतर शाखांमध्ये आमचे वेगळे फायदे आहेत. भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देशात डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून विशेष वृद्धापकाळ काळजी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. औषधशस्त्रक्रियाआयुर्वेदहोमिओपॅथीयुनानी आणि सिद्ध या क्षेत्रातील शिक्षक आणि संशोधक या नात्यानेया विद्यापीठाकडे दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. पदवी प्राप्त करणारे तरुण हे सत्यशुद्धतानिःस्वार्थी आणि अतिशय जबाबदार आणि सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर म्हणून आरोग्य सेवा देतीलअशी अपेक्षा व्यक्त करत राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व पदवीधरांना रुग्णांशी विनम्रपणे संवाद साधण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

विद्यार्थी हे भविष्यातील प्रगतीचा केंद्रबिंदू : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            विविध क्षेत्रात प्रगती करतांना विद्यार्थी हे केंद्रबिंदू असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत स्किल लॅब व डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. तसेच आंतरवासिता व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील आहेअसे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्रति-कुलपति हसन मुश्रीफ यांनी केले.

            प्रधानमंत्री यांना अभिप्रेत असलेल्या विकसित भारताच्या प्रत्येक नागरिकास उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेले उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळ व वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री व साधनसामग्री उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागामार्फत आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सामान्य व गरजू नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या वर्षामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयअतिविशेषोपचार रुग्णालयशासकीय आयुर्वेद महाविद्यालयशासकीय दंत महाविद्यालयांच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अध्यापक व टीसीएस द्वारे पात्र तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया राबवून बहुतांश पदावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहेअसेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणालेराज्यातील कार्यरत शासकीय महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून नव्याने प्रस्तावित शासकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आशियाई विकास बँक संस्थेकडून साधारण चार हजार कोटी रुपयांचे कर्ज शासनास मंजूर झाले आहे. या निधीच्या माध्यमातून वैद्यकीय संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या संस्थांबरोबर आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याने विद्यापीठाला शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाहीअशी ग्वाही देखील त्‍यांनी दिली. विद्यापीठाचा विद्यार्थी हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांची जोडला जावात्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळावेविद्यापीठाचा संशोधनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा व्हावा यासाठी उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संस्थाशी सामंजस्य करार करण्यात येत आहेतज्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन बाबींची तसेच प्रगत वातावरणामधील तंत्रज्ञान व आरोग्य शास्त्र विषयक अद्ययावत प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            दीक्षांत कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या परंपरेप्रमाणे मानदंड मिरवणूक करून त्याद्वारे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. बैस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ई-प्रबोधिनीचा शुभारंभ आणि बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 25 वर्षात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासोबतच आगामी वर्षभरात विद्यापीठामार्फत करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतअसे कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी यावेळी सांगितले.

सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या कोनशीलेचे अनावरण

            दीक्षांत समारंभ कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे सेंटर ऑफ एक्सेलन्स उपक्रमाचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रास्ताविकात विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी सेंटर ऑफ एक्सेलन्स बाबत माहिती दिली.

दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पीएच.डीपदवी प्रदान....

            दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविकापदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12 हजार 486 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदकएका विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.

            दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551दंत विद्याशाखा पदवीचे 2195आयुर्वेद विद्याशाखेचे 871युनानी विद्याशाखेचे 99होमिओपॅथी विद्याशाखेचे 1217बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 2464पीबी बी.एस्सी. नर्सिंग 366बी.पी.टी.एच. 254पॅरामेडिकल विद्याशाखेचे 637पदवी ऑप्टोमेट्री 52ऑक्युपेशनल थेरपी पदवी अभ्यासक्रमाचे 17बी.पी.ओ.विद्याशाखेचे 04 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये पी.जी. मेडिकल 2 हजार 864पी. जी. दंत 497पी.जी. आयुर्वेद 63पी.जी. होमिओपॅथी 18पी.जी. एम.ए.एस.एल.पी. 02डिप्लोमा मेडिकल विद्याशाखेचे 02 , पी.जी. एम.पी.ओ. 02पी.जी नर्सिंग 92पी.जी. ऑक्युपेशनल थेरपीचे 29पी.जी. फिजिओथेरपी 15पी.जी. डि.एम.एल.टी. 87डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविकापदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

00000000

पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

 पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता

हवामान तज्ज्ञांचा अंदाज

          मुंबईदि.२३ : पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

          रविवार२५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोलीचंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारानागपूरवर्धायवतमाळनांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावीअसे आवाहनही करण्यात आले आहे.

राजू धोत्रे/विसंअ

मुनावळे जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी

        -उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

          मुंबईदि. 23 : सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. येथील पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे आकर्षिक करता येईल. जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या तीरावर जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यासाठी तातडीने कार्यवाही पूर्ण करावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

            मंत्रालयीन दालनात आज आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक जयश्री भोजजलसंपदा विभागाचे अधिकारी  उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीकृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

            जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा. या कराराचा मसुदा तयार करावा.  बोटींगस्कूबा डायव्हींगहाऊस बोटबोट क्लबजेटस्की आदी अत्याधुनिक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात. यासाठी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी सातारापर्यटन विकास महामंडळ यांनी समन्वयाने कार्यवाही करावीअसे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी दिले. बैठकीला विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi