Saturday, 24 February 2024

पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

 पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता

हवामान तज्ज्ञांचा अंदाज

 

          मुंबईदि.२३ : पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

          रविवार२५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोलीचंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारानागपूरवर्धायवतमाळनांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावीअसे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi