Monday, 29 January 2024

धन्य धान्य, जय maharashtra

 ये वीडियो देखिए और  सोचिए एक  बार  कि आपको आजतक जिस बजरंग दल और VHP के बारे में बताया गया और ये जो लोग हैं वो उस छवि से मैच करते हैं क्या   और ऐसी तस्वीरें आप तक कभी क्यूँ नहीं पहुंचाई गई🧐🧐🚩🙏🚩


हळू हळू एक एक शब्द वाचा. प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.*

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


*हळू हळू एक एक शब्द वाचा. प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.*


*_¶ "अश्रु" सांगून जातात, "दुःख" किती आहे ?*


*._¶ "विश्वास" सांगून जातो, "जोडीदार" कसा आहे ?*


*._¶ "गर्व" सांगून जातो, "पैशाचा माज" किती आहे ?*


*._¶ "संस्कार" सांगून जातात, "परिवार" कसा आहे ?*


*._¶ "वाचा" सांगून जाते, "माणूस" कसा आहे ?*

  

*._¶ "संवाद" सांगून जातात, "ज्ञान" किती आहे ?*


*._¶ "ठेच" सांगून जाते, "लक्ष" कुठे आहे ?*


*._¶ "डोळे" सांगून जातात, "व्यक्ती" कशी आहे ?*


*._¶ "स्पर्श" सांगून जातो, "मनात" काय आहे ?*


*._¶  आणि "वेळ" दाखवते, "नातेवाईक" कसे आहेत.*


*._¶  भावकीतली चार माणसं "एका दिशेने" तेव्हाच चालत असतात. जेव्हा पाचवा खांद्यावर असतो.*

 

*._¶  संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो. की "लोक काय म्हणतील" ? आणि शेवटी हेच लोक म्हणत असतात. की" "राम नाम सत्य है "..*


*._¶  माणसाची "कदर" करायची असेल. तर 'जिवंतपणीच' करा. कारण 'तिरडी' उचलण्याच्या वेळी 'तिरस्कार' करणारे सुद्धा 'रडतात.'*


*._¶  मेल्यावर माणूस चांगला होता. असं म्हणण्याची 'प्रथा' आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही. हीच खरी 'व्यथा' आहे.*

 

*._¶  म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ..*


*._¶ चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा.जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते.*


*_¶  आपल्या सोबत असलेली सर्व संम्बंधातील माणसे मनापासून ओळखा आणि सर्वांशी प्रेमाने व आदराने वागा. हा जन्म पुन्हा नाही.हरी ॐ.* 🌹

किला प्रतापगढ के संवर्धन में सरकार की ओर से कोई कमी नहीं रहेगी

  

किला प्रतापगढ के संवर्धन में सरकार की ओर से कोई कमी नहीं रहेगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            सातारा दि. 28 : छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा और उर्जा लेकर राज्य सरकार काम कर रही है। प्रतापगढ यह  महाराज के शौर्य का प्रतीक है। किला प्रतापगढ के संवर्धन के लिए 100 करोड़ रुपए का प्रारूप बनाया गया है और उसमें से 13 करोड़ रुपए उपलब्ध  कराएं गए है। प्रतापगढ के संवर्धन के लिए सरकार की ओर से कमी नहीं होगीयह ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दी। 

            दुर्ग रायेश्वर से प्रतापगड दुर्ग अभियान का समापन त. महाबळेश्वर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की प्रमुख उपस्थिति में  संपन्न हुआइस अवसर पर वें बोल रहे थे। इस अवसर पर सांसद  डॉ. श्रीकांत शिंदेविधायक मकरंद पाटीलविधायक महेश लांडगेविधायक नितेश राणेसंभाजी भिडे (गुरुजी),  समेत मान्यवर उपस्थित थे।

            मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि  रायरेश्वर में छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य की शपथ लेने से इस मंदिर को एक अलग महत्त्व प्राप्त हुआ है। यह हमारा सौभाग्य है कि छत्रपति शिवाजी महाराज के स्पर्श से पावन इस भूमि में हमने जन्म लिया है। इसकी महत्तताविरासत युवा पीढ़ी को समझेवें इससे परिचित होंइस दृष्टि से ऐसी गढकोट अभियान महत्वपूर्ण होने की बात कहते हुए उन्होंने इस अभियान को शुभकामनाएं दी। इस दौरान उन्होंने गढ़कोट किलेपुरातन मंदिर के संरक्षण और संवर्धन को  केंद्र और राज्य सरकार की प्राथमिकता होने की बात उन्होंने कही। इस दौरान उन्होंने

 रायगढ पर सुवर्ण सिंहासन बनाने के संभाजी भिडे गुरुजीं का संकल्प हम सभी मिलकर साकार करेंगेयह आवाहन भी उन्होंने इस अवसर पर किया।

            इस दौरान संभाजी भिडे ने रायगढ पर सुवर्ण सिंहासन बनाने के लिए सभी ने सहयोग करने का आवाहन किया।

            इस दौरान प्रदीप बाफना ने अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम का रावसाहेब देसाई ने प्रास्ताविक किया और संजय जठार ने उपस्थित के प्रति आभार प्रकट किया।

            इस दौरान जिलाधिकारी जितेंद्र डुडीपुलिस अधीक्षक समीर शेखप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुलेअप्पर पुलिस अधिक्षक आंचल दलालउद्योजक भावेश भाटियाशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान के अध्यक्ष रावसाहेब देसाई की प्रमुख उपस्थित समेत अभियान में सहभागी युवापदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे।

 

0000

 

Government will not fall short in the conservation of Fort Pratapgad


महाराष्ट्र एनसीसी'ला सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान

 'महाराष्ट्र एनसीसी'ला सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान

            मुंबईदि. 28 :- प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मानाचा प्रधानमंत्री बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आले 'महाराष्ट्र एनसीसी'ला सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे याबद्दल क्रीडा मंत्री संजय बनसोडे  यांनी महाराष्ट्र एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.

            राष्ट्र छात्रसेना अर्थात एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाने सलग तिसऱ्यांदा सर्वोत्तम येण्याची कामगिरी बजावली आहे. प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित संचलनाच्या विशेष शिबिरात महाराष्ट्र संचालनालयाला प्रतिष्ठेचा 'पंतप्रधान ध्वज'  प्रदान करण्यात आला.

            देशभरात एनसीसीची 17 संचालनालये आहेत. या सर्व संचालनालयांमधील निवडक छात्रसैनिकांचे प्रजासत्ताक दिन शिबीर दिल्लीत होते. या शिबिराचा समारोप वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या व एकूणच शिबिरातील विविध स्पर्धांमध्ये चांगले कार्य केलेल्या संचालनालयाला मानाचा ध्वज व चषक प्रदान सोहळ्याद्वारे होतो. हा सोहळा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यामध्ये महाराष्ट्र संचालनालयाला ध्वज व चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र संचालनालयाने या आधी 18 वेळा हा ध्वज पटकावला. 2002 ते 2013 या दरम्यान सलग 12 वेळा महाराष्ट्र संचालनालय विजेते होते. 20202021 मध्ये ते उपविजते ठरले. 20222023 व 2024, असे सलग तीन वर्षे संचालनालयाने ध्वज मिळवला आहे.

oooo

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट


            सातारा दि.28 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.

            याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुलेपोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती देऊन येथे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

            विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे आई भवानी मातेची पूजा केली.

किल्ले प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही

 किल्ले प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही

                                                                                       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            सातारा दि. 28 : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन राज्य शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 13 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            दुर्ग रायेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ पार ता. महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदेआ. मकरंद पाटीलआ. महेश लांडगेआ. नितेश राणेसंभाजी भिडे गुरुजीउद्योजक भावेश भाटियाजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेखप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुलेअप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलालशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेरायेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने या मंदिराला वेगळे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत आपण जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. त्यांचा दैदिप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा यादृष्टीने अशा गडकोट मोहीमा महत्वाच्या आहेतअसे सांगून त्यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गडकोट किल्लेजुनी मंदिरे जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनाने प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रदीप बाफना यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रावसाहेब देसाई यांनी प्रास्ताविक केले. संजय जठार यांनी आभार मानले. मोहिमेमध्ये सहभागी करून पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांचा सहभाग आवश्यक

 

लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांचा सहभाग आवश्यक

 राज्यपाल रमेश बैस

 

            विकसित भारताच्या संकल्प पूर्ततेसाठी अमृतकाळ हा देशवासीयांसाठी  मनापासून काम करण्याचा कर्तव्यकाळ आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. प्रत्येक राज्याच्या विधिमंडळाकडून युवकांच्या खूप अपेक्षा आहेत. युवकांच्या मनात लोकशाही बद्दल विश्वास निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले, संसद आणि कायदेमंडळ हे आपल्या संसदीय व्यवस्थेचे दोन खांब असून, देशाच्या भविष्यासाठी उत्तम काम करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. गेल्या काही दशकात सामान्य लोकांच्या अपेक्षा, इच्छा आणि जागृती यात वाढ झालेली आहे. संसद आणि लोकप्रतिनिधींची भूमिका आणि जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे. लोकशाही बळकट करणाऱ्या स्थानिक संस्था अधिक प्रभावीकार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध करण्याची गरज आहे. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. महाराष्ट्राला संसदीय लोकशाहीची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातील पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा दर्जा निश्चितच वाढवला आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची गणना देशातील आदर्श विधानमंडळांमध्ये होते असेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.

 


Featured post

Lakshvedhi