Monday, 29 January 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट


            सातारा दि.28 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.

            याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुलेपोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती देऊन येथे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

            विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे आई भवानी मातेची पूजा केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi