Wednesday, 29 November 2023

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते १

 मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते १ डिसेंबर रोजी उदघाटन

 

            मुंबई,दि.२९: मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव येथे सकाळी १०.३० आणि वरळी येथे सकाळी ११.३० वाजता कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

              मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेववरळीनायगावकलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल. आयटीगारमेंटब्युटी ॲण्ड वेलनेसऑटोमोटिव्ह ॲण्ड फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. यामध्ये पोलिस आणि पोलिसांच्या कुटुंबातील सदस्य याचा लाभ घेऊ शकतील. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासांचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिलापुरुष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतील. या प्रशिक्षणासाठी एन.आय.सी च्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने प्रशिक्षणार्थींची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारास सरकारतर्फे (NSQF) एनएसक्यूएफ स्टॅण्डर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीला रोजगार संधीशिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध असतील. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईलसरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यावयाचे याचे देखील मार्गदर्शन प्रशिक्षणादरम्यान करण्यात येईल.

        १ डिसेंबर रोजी ताडदेव पोलीस वसाहत मैदानवसंतराव नाईक मार्गताडदेव मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता आणि मुंबई पोलीस कौन्सिलिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर एल विभाग ३वरळी येथे सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन होईल. या कार्यक्रमाला कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकरआयुक्त डॉ.रामास्वामी एन.सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंहपोलिस सह आयुक्त एस.जयकुमारमुख्यालयाच्या पोलीस उपआयुक्त डॉ. महेश्वर रेड्डी या उपस्थित राहतील.


सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक

- मंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई, दि. 29 : राज्यातील सफाई कामगारांच्या सुविधांसाठी राज्य शासनाने लाड-पागे समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत विविध संघटनांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनातील मागण्यानुसार  सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सफाई कामगारांच्या विविध मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

               आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सफाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या लाड पागे समिती शिफारशींबाबत बैठक घेण्यात आली.

 

            मंत्री श्री. देसाई म्हणाले कीसफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वारसा हक्काबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून एकत्रित नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. सफाई कामगारांना लाड - पागे समितीच्या शिफारशीबाबत न्यायालयाच्या स्थगितीबाबत सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करून शासनाची बाजू मांडावीअशा सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. समन्वय समितीने आंदोलन करू नयेअसे आवाहन मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.

              या बैठकीस समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरियानगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकरसामाजिक न्याय विभागाचे उपसचिव र.शि.गोरवे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी,समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे

 धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. २९ :- पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी’ साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला आज दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामकाजाचा आढावा मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतला. या बैठकीस खासदार सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, गृह (बंदरे) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड उपस्थित होते.


            रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला गती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, या महामार्गाचे काम गेल्या चार दशकांहून अधिक काळ रखडले आहे. महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी मार्च २०२२ मध्ये प्रकल्पाच्या अंतिम आखणीस शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेवस ते कारंजा खाडीदरम्यानच्या धरमतर खाडी पुलासाठी ३ हजार ५७ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या बांधकामास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, मेरिटाईम बोर्डामार्फत नौकावहनासाठी आवश्यक असणाऱ्या गाळ्याची उंची व रुंदीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने या पुलाच्या निविदेबाबतची पुढील कार्यवाही करता आली नाही. त्यामुळे धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाचे काम तत्काळ सुरु होण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने आवश्यक बाबींची पूर्तता करून गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.


            महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या किनारपट्टीवर १४ लहान बंदरे व २ प्रमुख बंदरे आहेत. पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रेवस ते रेड्डी महामार्गाची नव्याने आखणी करण्याचे ठरले आहे. त्यानुसार सर्व्हेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


---

----०००------


शिल्पी राज के गाने 'मेहरी के सारा सुख चाही' में माही श्रीवास्तव ने उड़ाया गर्दा

 



सर्वेश सिंह, शिल्पी राज के गाने 'मेहरी के सारा सुख चाही' में माही श्रीवास्तव ने उड़ाया गर्दा








भोजपुरी म्यूजिक वर्ल्ड में सिंगर सर्वेश सिंह और शिल्पी राज का जुगलबंदी में एक और नया भोजपुरी सांग 'मेहरी के सारा सुख चाही' आडियंस के बीच आ गया है। इस गाने के वीडियो में पॉपुलर अदाकारा माही श्रीवास्तव ने गजब का ठुमका लगाकर गर्दा उड़ा दिया है। यह मजेदार गाना वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरी के ऑफिसियल यूट्यूब चैनल पर रिलीज किया गया है। जिसका रिच लेबल पर पिक्चराइजेशन किया गया है। लोकेशन और कॉस्ट्यूम पर भी काफी ध्यान दिया गया है। 

इस गाने के वीडियो में माही श्रीवास्तव की शादी सर्वेश सिंह से तय होती है लेकिन किसी कारणवश शादी टूट जाती है। फिर सर्वेश की शादी कहीं और तय होने लगती है तो माही श्रीवास्तव हीरो पुक मोटर बाईक से पिंक कलर के लहंगा चोली पहने अक्ट्रेक्टिव लुक में एंट्री करती हुई दिख रही हैं, उनके पीछे सहेलियों की फौज भी आ रही है। वह सर्वेश के पास आती है और  कहती है कि 'ठुकरा के देखवनी ना छोड़ा, बनल रिश्ता के जनि अब तोड़ा, कवन कमी बा हमरा में बालम, बिन बतवले मुँहवा ना मोड़ा... चाहत ताड़s खुश रहल जिनगी में दुख चाही... तो सर्वेश सिंह कहते हैं कि 'फर्ज में ना कवनो चूक चाही, मेहरी के सारा सुख चाही...'


इस गाने को अपनी सुरीली आवाज में वायरल सिंगर सर्वेश सिंह और शिल्पी राज ने मधुर आवाज गाया है, जोकि सुनने में बड़ा प्यार लग रहा है। वहीं एक्ट्रेस माही श्रीवास्तव ने गजब का ठुमका लगाया है। यह गाना हर किसी के दिल को छू लेने वाला है।
वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स प्रस्तुत भोजपुरी सांग 'मेहरी के सारा सुख चाही' के निर्माता रत्नाकर कुमार हैं। सिंगर खुशबू तिवारी केटी ने इस गाने के गीतकार पवन राजा हैं। संगीतकार राज गाजीपुरी हैं। वीडियो निर्देशक विझेल, कोरियोग्राफर गोल्डी जायसवाल, डीओपी राजन वर्मा हैं। इस गाने का आल राइट्स वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के पास है।


Mahi Srivastava makes waves in Sarvesh Singh, Shilpi Raj's song 'Mehri Ke Sara Sukh Chahi'


In Bhojpuri music world, another new Bhojpuri song 'Mehri Ke Sara Sukh Chahi' has reached the audience in the jugalbandi of singer Sarvesh Singh and Shilpi Raj. In the video of this song, popular actress Mahi Srivastava has created a stir with her amazing dance. This funny song has been released on the official YouTube channel of Worldwide Records Bhojpuri. Which has been picturized on Rich Label. A lot of attention has also been paid to location and costume.

In the video of this song, Mahi Srivastava's marriage is fixed with Sarvesh Singh but due to some reason the marriage gets broken. Then when Sarvesh's marriage gets fixed somewhere else, Mahi Srivastava is seen entering Hero Puk motor bike in an attractive look wearing a pink colored lehenga choli, an army of friends is also coming behind her. She comes to Sarvesh and says 'Thukra ke dekhwani na chhoda, banal rishta ke jani ab toda, kawan kami ba hamara mein balam, bin batwale muhva na moda... Chahat taad khush rahal zingi mein sadh chahi... So Sarvesh Singh says that 'I did not want any mistake in duty, I wanted all the happiness of marriage...'


This song has been sung melodiously by viral singers Sarvesh Singh and Shilpi Raj in their melodious voices, which sounds very loving. Actress Mahi Srivastava has done an amazing dance. This song is going to touch everyone's heart.
Ratnakar Kumar is the producer of Bhojpuri song 'Mehri Ke Sara Sukh Chahi' presented by Worldwide Records. Singer Khushboo Tiwari KT has written this song and the lyricist is Pawan Raja. The music director is Raj Ghazipuri. Video director is Vijhel, choreographer is Goldie Jaiswal, DOP is Rajan Verma. All rights of this song are with Worldwide Records.

 राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

 

            मुंबई दि. २९ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

            विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी  नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. 

            या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारविविध विभागाचे मंत्रीदोन्ही सभागृहाचे सदस्यविधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

            हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असूनयामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवसतर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

0000

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार



 


 

वृत्त 

महिला सक्षमीकरणासाठी राज्यात 'पिंक रिक्षा' ही योजना लवकरच सुरू करणार

 महिला सक्षमीकरणासाठी राज्यात 'पिंक रिक्षा' ही योजना लवकरच सुरू करणार


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


 


               मुंबई, दि. 28 : महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्वाच्या शहरात पिंक रिक्षा ही योजना लवकरच सुरू करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.


           मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, सह आयुक्त राहुल मोरे यावेळी उपस्थित होते.


            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही सुरू करण्याचा मानस आहे.


                   महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवड निकष तपासून ही देखील योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी. महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालये, गरीब व गरजू लाभार्थी महिला निवड यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून शेवटच्या घटकातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्याबाबत चोखपणे योजना राबवावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा

 राज्य शासनातर्फे लातूरबुलढाणासांगलीत होणार क्रीडा स्पर्धा

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. २८ : राज्यात शासनातर्फे सन २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूर येथेछत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाणा येथेखाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर येथे आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली आहे.

            मंत्रालयातील दालनात विविध विषयांवर आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीमहाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढीकरीता राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेतील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळावी म्हणून स्पर्धाच्या आयोजनाकरिता शासनाने प्रति खेळ ७५ लाख रुपये एवढी तरतूद केली आहे. प्रतिखेळ ७५ लाख निधीमधून खेळाडूमार्गदर्शकव्यवस्थापकपंच तथा तांत्रिक पदाधिकारी  यांच्यासह खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

            स्थानिक आयोजन समितीस या स्पर्धाच्या आयोजनासाठी प्रति खेळ रु.७५.०० लाख उपलब्ध करुन देण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त अधिक निधीची आवश्यकता भासल्यास आयोजन समितीस  निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. सर्वसाधारण धोरण ठरविणेसनियंत्रण करणेस्पर्धास्थळ निश्चित करणे तसेच स्पर्धेसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आलेले आहे.

            या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आयोजन समिती गठित करण्यात आली असूनसंबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्याध्यक्षसंबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक हे कोशाध्यक्षसंबंधित खेळाच्या राज्य संघटनेचे सचिव हे आयोजन समितीचे सचिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हे संयुक्त सचिव म्हणून काम पाहणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी  सांगितले.

Featured post

Lakshvedhi