Wednesday, 29 November 2023

 राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

 

            मुंबई दि. २९ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

            विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी  नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. 

            या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारविविध विभागाचे मंत्रीदोन्ही सभागृहाचे सदस्यविधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

            हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असूनयामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवसतर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

0000

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार



 


 

वृत्त 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi