Sunday, 26 November 2023

जलयुक्त शिवार भ्रष्टाचार प्रकरणी गुत्तेदारावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा ? ‌ वसंत मुंडे

 जलयुक्त शिवार भ्रष्टाचार प्रकरणी गुत्तेदारावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा ? ‌ वसंत मुंडे         

----------------------------------------------------------------------
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) परळी विधानसभा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यामुळे मा.लोक आयुक्त व उप लोक आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयाकडून शासनाला आदेश देऊनही कृषी विभागाकडून कायद्यानुसार नियमाप्रमाणे कारवाई केली जात नाही आरोप असा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला.विविध स्तरावर तीन टप्प्यांमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार जलयुक्त शिवार योजनेमध्ये उघडकीस आणून १६९ गुत्तेदार ठेकेदार सुशिक्षित बेकार अभियंते व मजूर सहकारी संस्थेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून आज तागायत एकाही गुत्तेदाराला अटक केलेली नाही. ३० अधिकारी निलंबित केले परंतु वसुलीची कारवाई शक्तीची केली नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेमध्ये राजकीय सहकार्य परळी विधानसभा मतदारसंघात मिळत असल्यामुळे माननीय तालुका कोर्ट परळी वैद्यनाथ, मा. उपजिल्हा न्यायालय आंबेजोगाई तसेच मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद  व मा.सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच लोकायुक्त कार्यालय मुंबई ,आर्थिक गुन्हे विभाग बीड, सामान्य प्रशासन विभागा मंत्रालय मुंबई मार्फत विविध स्तरावर कारवाई होऊनही आज तागायत एकही गुत्तेदारला अटक करण्यासंदर्भात कारवाई केली जात नाही असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. शासनाच्या व विविध न्यायालयाच्या तसेच लोकायुक्ताचे आदेशाचे पालन केले जात नसल्यामुळे मा. उप लोक आयुक्त मुंबई यांच्या आदेशावरून परळी विधानसभा मतदारसंघातील जलयुक्त शिवार योजनेमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुराव्यासहित निदर्शनात आणून दिल्यामुळे तात्काळ  दुसऱ्या टप्प्यातील ३० गुत्तेदारावर गुन्हे नोंद करून तात्काळ एकूण १६९ गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर अटक करण्यासंदर्भात कारवाई करा व त्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करून अहवाल सादर करण्यासंदर्भात मा. कृषी आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी बीड व पोलीस अधीक्षक बीड यांना आदेश पारित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली. भ्रष्टाचार ज्या अधिकाऱ्यांनी केला त्यामध्ये एकूण २४ अधिकारी यांच्यावर आरोप सिद्ध झाले असून सामान्य प्रशासन विभागा मंत्रालय मुंबई कडून २१,२२ ते २३नोव्हेंबर २०२३ पर्यंत  विभागीय चौकशी करण्याचे आदेश शासनाकडून दिलेले आहेत. अपचारी अधिकारी तसेच सनियंत्रक अधिकारी यांना चौकशीसाठी उपस्थित मंत्रालयात राहण्यासंदर्भात अवगत करण्यात आले असून सुनावणी सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन उपस्थित राहण्याची कारवाई शासन स्तरावर चालू असल्याची माहिती काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी दिली. त्रिमूर्ती सरकारमधील कृषी खात्याचे राजकीय सहकार्य असल्यामुळे गुत्तेदारांना व अधिकाऱ्यांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळे  पाच वर्षापासून अकार्यक्षम कृषी आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी बीड,पोलीस अधीक्षक बीड,परळी विधानसभा मतदारसंघातील जलयुक्त शिवार भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये त्रिमूर्ती शासनाकडून विलंब लागत असल्याचा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला आहे.

वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच ; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर आ. निकोले

 वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच ; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर आ. निकोले


मुंबई / डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, वाढवण बंदर विरोध का ? यांचे आमच्या कडे प्रामुख्याने एकूण 08 मुद्दे आहेत. त्यातील क्र. 01) प्रस्तावित बंदर क्षेत्र हे पर्यावरणीय दृष्टीने संरक्षित आहे का ? 02) या भागातील आर्थिक विकासाचा दर चांगला असून लोकं स्वयंरोजगाराने परिपूर्ण आहेत. येथे डायमेकिंग, शेती, वाडी, बागायतदारी, मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते त्यामुळे परकीय चलन देखील मिळत असते. या सर्वांवर आधारित पूरक उद्योग तसेच त्यावर आधारित आदिवासी मजूर वर्ग अशी साखळी आहे. ज्याची संख्या लाखोंच्या घरात आहे. जे या बंदरामुळे विस्कळीत व उध्वस्त होणार आहे. 03) येथील लोकसंख्येची घनता देखील जास्त आहे. ज्यावर सामाजिक प्रदूषणाचा अंमल होऊन हे बंदर त्रासदायक ठरणार आहे. 04) बंदरासाठी लागणारी नैसर्गिक खोली जी 20 मीटर सांगितली जाते. ती गुजरात राज्यातील जयगड तसेच नारगोळ मध्ये देखील उपलब्ध आहे व नारगोळ हे ठिकाण प्रस्तावित वाढवण बंदरापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटरवर असून तेथे बंदर घोषित झालेले असताना वर सांगितलेल्या तिन्ही मुद्द्यांच्या तुलनेत आमचा भाग सुजलाम सुफलाम आहे. 05) झाई ते मुंबई पर्यंत ज्या मच्छीमारांच्या हजारो बोटी या भागात मासेमारी करतात कारण, हा माश्यांसाठी गोल्डन बेल्ट आहे. व तेथे 05 हजार एकरांचा भराव टाकल्याने मत्स्यबीज केंद्र नष्ट होणार आहे. तसेच खाडी व किनाऱ्यावर जी हजारो लोक मासेमारी करतात तीही नष्ट होणार आहे. 06) थर्मल पॉवरमधून निघणाऱ्या फ्लाईंग हॅश मुळे येथे चिकू, नारळ अश्या फळबागांवर विपरीत परिणाम झालेला आहे व या बंदरामुळे येथे दिवसाला 35 हजार ट्रक्स व उभ्या असणाऱ्या बोटी यातून निर्माण होणार धूर यातून जे प्रदूषण होणार आहे ते येथील फळबागा, शेती तसेच मानवी आरोग्य हे संपुष्टात येणार आहे. 07) 5 हजार एकरांवर जो भराव असणार आहे त्यासाठी जरी दमण च्या समुद्रातुन माती आणणार असले तरी देखील मोठ्या प्रमाणावर डोंगर व जंगल उध्वस्त होणार आहे. 08) एका बाजूला अणुशक्ती केंद्र व त्याद्वारे होणारे प्रदूषण त्याच्याबाजूला असलेल्या एमआयडीसी मधून होणारे प्रदूषण तसेच थर्मल पॉवर मधून होणारे प्रदूषण या सर्वांच्या मध्ये हा आणखी विनाशकारी प्रकल्प म्हणजे स्थानिकांनी स्वतः उध्वस्त होऊन देशाचा विकास कसा साधायचा ? या प्रश्नाचे उत्तर मात्र सरकार देत नाही. त्यामुळेच स्थानिकांबरोबर आमचा देखील वाढवण बंदराला विरोध आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार विनोद निकोले म्हणाले.

दरम्यान उक्त बैठकीस माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे देखील उपस्थित होते. त्यांनी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांना गुजरात राज्यातील जिल्हा वलसाड येथील नारगोळ येथे देखील समुद्राची खोली 20 मीटर आहे तेथे बंदर करण्यास काय अडचण आहे ? असा प्रश्न उपस्थित केला असता बैठक सभागृहात सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. त्यामुळे उत्तर देताना सेठी यांनी अतिशय सावधगिरी बाळगत उत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्येशिकेचे सामुहिक वाचन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्येशिकेचे सामुहिक वाचन

 

         मुंबई दि. 26 : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारताच्या संविधान उद्येशिकेचे वाचन केले.

 

            संविधान उद्येशिकेच्या सामुहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

 


वृत्त क्र. 3859

संविधान दिन:  राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

 

        मुंबई, दि. 26: भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

 

            दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

 

            भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिकआर्थिक व राजनैतिक न्यायविचारअभिव्यक्तीविश्वासश्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्यदर्जाची व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये  व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रतीवर्धित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.  

 

Maharashtra Governor reads out Preamble on 'Constitution Day'

 

            The Governor of Maharashtra Ramesh Bais along with the staff and officers of Maharashtra Raj Bhavan read out the preamble of the Constitution of India on the occasion of Constitution Day on Sunday (26th Nov.)

 

            Officers and staff reiterated the resolve of the nation to constitute India into a Sovereign, Socialist, Secular Democratic Republic on the occasion.

000000





26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपालमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांची  मानवंदना

 

            मुंबई दि. 26 : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच  सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

                

            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,  मुख्य सचिव मनोज सौनिकगृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

            यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या.

               

अंजली कुल्थे: 20 मुलांची आई!,maa तुझे सलाम

 अंजली कुल्थे: 20 मुलांची आई!

14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला....26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी 'अजमल कसाब' त्याच्या एका सहकाऱ्यासोबत 'कामा हॉस्पिटल'च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला..

हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते...

'अंजली कुल्थे' नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती... 26/11 ला ती 'नाईट शिफ्ट'ला होती.. ती 'प्रसूती कक्षाची इन-चार्ज' होती.. तिच्या वॉर्ड मध्ये 20 गर्भवती महिला होत्या....

... हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..

सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या 'पॅन्ट्री'च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती...

कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते... ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, 'जखमी होऊन पडलेल्या नर्सला' कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..

इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..

हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी... नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली... "माझा 'युनिफॉर्म' घालून येण्याची परवानगी मिळावी!"..

'कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्म वर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..' असं तिचं म्हणणं होतं...

अंजली कुल्थे यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, 'ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या' वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील... त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या 'दोन जन्मदात्री' आहेत... त्यांना नऊ महिने पोटात वाढवून  प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई आणि  अंजली कुल्थे ... जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई! 

अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम!

🌹🌹🌹🌹🌹🌹

©️ धनंजय कुरणे

26/11/22

Saturday, 25 November 2023

जागतिक कौशल्य स्पर्धा - 2024’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

 जागतिक कौशल्य स्पर्धा - 2024’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन


 


            मुंबई, दि. 24 : जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी आयोजित होणारी ही स्पर्धा ‘जागतिक कौशल्य स्पर्धा - 2024’ यावेळी फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करण्यात येणार असून स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.


             23 वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ऑलिम्पिक खेळासारखीच ही स्पर्धा आहे. या स्पर्धा पुढील अभ्यासक्रमाकरिता / क्षेत्रा करिता आयोजित केली जाणार आहे : थ्री डी डीजिटल गेम आर्ट, ॲटो बॉडी रिपेअर, ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रिकलायींग, कॅबिनेट मेकिंग, कार पेंटींग, कार्पेंन्ट्री, सीएनसी मिलींग, सीएनसी टर्निंग, कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन वर्क, कूकिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॅड (CAD), मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाईल रोबोटिक्स, पेंटिंग ॲन्ड डेकोरेटिंग, पेस्ट्रिज ॲन्ड कन्फेक्शनरी, प्लास्टरिंग ॲन्ड ड्रायवॉल सिस्टिम, प्लंबिंग ॲन्ड हिटिंग, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप मॉडेलिंग, रिफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंन्डिशनिग, रिनिव्हिबल एनर्जी.


            या स्पर्धेसाठीचे पात्रता निकष - जागतिक कौशल्य स्पर्धा - 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठवण्यात आला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी उमेदवारांचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच ॲडिटीव्ह मॅनिफॅक्च्युरिंग, क्लाऊड कंम्प्युटिंग, सायबर सेक्युरिटी, डीजिटल कंन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रिअल डिजाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, मेकाट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इन्टीग्रेशन ॲन्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.


            फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, 175 श्रेयस चेंबर, 1 ला मजला, डॉ. डी.एन.रोड, फोर्ट मुंबई 400001 येथे प्रत्यक्ष अथवा (022) 22626303 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


00000


हेमंतकुमार चव्हाण/स.सं/

आरोग्य विभागातील ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी धोरण

 आरोग्य विभागातील सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी धोरण

-  आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

            मुंबईदि. 24 : आरोग्य विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र महत्वाचा वाटा उचलू शकते. त्यासाठी कॉर्पोरेट संस्थासुद्धा पाठिंबा देण्यास इच्छुक आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर क्रियाकलापांचे जलदपारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता धोरणात्मक संरचना तयार करण्यात येत आहे. सीएसआर निधीच्या विनियोगासाठी धोरण ठरविण्यात येणार आहेअशी माहिती, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

            सीएसआर निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून हे धोरण तयार करण्यात आले आहे. सीएसआर निधीचा आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपयोग व्हावाया करीता असे कुठलेही धोरण आतापर्यंत नव्हते.

             केंद्र शासनाच्या कंपनी कायद्यानुसारपात्र कॉर्पोरेट संस्था त्यांचा सीएसआरचा निधी आरोग्य विभागांतर्गत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणेपिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणेऔषध क्षेत्रातील इनक्युबेटर किंवा संशोधन आणि विकास प्रकल्पांसाठी योगदानआयुर्वेदयोग आणि निसर्गोपचारयुनानीसिद्ध आणि होमिओपॅथीमध्ये संशोधन करण्यास योगदानसार्वजनिक आरोग्य विभागाला दर्जेदारन्याय्य आणि किफायतशीर सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घेणे व्यवहार्य आहे.

            सीएसआर अंतर्गत उपक्रम हाती घेण्यासाठी धोरणात्मक आणि कायदेशीर चौकट विकसित करणेकॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक आरोग्याशी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणेकॉर्पोरेट भागीदारांच्या कौशल्याचा वापर करून आरोग्य सेवांचा दर्जा वाढवणेविभागाच्या आवश्यकतेनुसार कार्यशाळापरिषदाएक्सेंज प्रोग्रॅम आदी कार्यक्रम आयोजित करणेदुर्गम भागात असलेल्या आरोग्य सुविधांना सहकार्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य पातळीवर समन्वय साधणे ही या धोरणाची व्याप्ती आणि वैशिष्ट्ये आहेत. धोरणानुसारप्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठीसामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या गटांना भेडसावणाऱ्या समस्या कमीत कमी करून उपाययोजनेचे समर्थन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये तसेच त्यांच्या वितरणामध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

             राज्यात कॉर्पोरेट  सामाजिक जबाबदारी अंतर्गत आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियामक समितीविभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीआरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समितीसहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सीएसआर समन्वयक कक्षउपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील सीएसआर समितीजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील सीएसआर समिती असणार आहे. या समित्यांच्या कार्यपद्धती व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.  या धोरणामुळे राज्यात आरोग्य विभागात सीएसआरच्या निधीचा प्रभावी उपयोग होणार असून आरोग्य सेवासुविधा अधिक बळकट होतीलअसा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे. 

००००

निलेश तायडे/विसंअ

Featured post

Lakshvedhi