Tuesday, 21 November 2023

कर्माचा - सिद्धांत 👇जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥

 कर्माचा - सिद्धांत 👇*

                

*कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.*

काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! ....

अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...

जसे की  

1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,...

2) अपमानास्पद वागणुक,...

3) कोणांचे मन दुखावले असू शकते,...                     

4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,...

5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,.....

6) *छळ केलेला असेल,.....*

7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल.....

8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल......

9) शारिरीक दुखापत केलेली असेल, .......

10)  विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल......                                       

11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.....


त्रासाचे कुठलेही कारण असो...

वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी  होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते , 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, 

 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा  देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते,  मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.*

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे,  घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,....

*आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व 

*आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.*

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, 

*तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,*

 चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,

मी एका पुस्तकात वाचले होते,

राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले,


*तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?*


 माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे? 

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.

धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.             धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.*


*कर्म हे फळ देऊनच शांत होते.*

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, 

चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ  मागे-पुढे होऊ शकते.

हाच कर्माचा सिध्दांत आहे.

आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे.

*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥*

*क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".*

😊😊🙏🙏🙏

*👇 कर्माचा - सिद्धांत 👇* *कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.* काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! .... अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ... जसे की 1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,... 2) अपमानास्पद वागणुक,... 3) कोणांचे मन दुखावले असू शकते,... 4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,... 5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,..... 6) *छळ केलेला असेल,.....* 7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल..... 8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल...... 9) शारिरीक दुखापत केलेली असेल, ....... 10) विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल...... 11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल..... त्रासाचे कुठलेही कारण असो... वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते , जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते, मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.* मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,.... *आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व *आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.* समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, *तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,* चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो, मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले, *तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?* माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही, की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.* *कर्म हे फळ देऊनच शांत होते.* प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे-पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिध्दांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे. *"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥* *क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".* 😊😊🙏🙏🙏

 *👇 कर्माचा - सिद्धांत 👇*

                

*कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.*

काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! ....

अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...

जसे की  

1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,...

2) अपमानास्पद वागणुक,...

3) कोणांचे मन दुखावले असू शकते,...                     

4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,...

5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,.....

6) *छळ केलेला असेल,.....*

7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल.....

8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल......

9) शारिरीक दुखापत केलेली असेल, .......

10)  विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल......                                       

11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.....


त्रासाचे कुठलेही कारण असो...

वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी  होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते , 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, 

 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा  देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते,  मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.*

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे,  घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,....

*आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व 

*आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.*

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, 

*तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,*

 चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,

मी एका पुस्तकात वाचले होते,

राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले,


*तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?*


 माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे? 

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.

धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.             धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.*


*कर्म हे फळ देऊनच शांत होते.*

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, 

चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ  मागे-पुढे होऊ शकते.

हाच कर्माचा सिध्दांत आहे.

आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे.

*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥*

*क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".*

😊😊🙏🙏🙏

Monday, 20 November 2023

कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक

 कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक

- विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने

            मुंबई, दि. 20 : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मुंबई शहरमुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये कीटकनाशके साठा व विक्री व घरगुती कीटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक असल्याची माहिती, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

            श्री. माने यांनी म्हटले आहे की, विक्रेते घरगुती कीटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्सकिराणा दुकानेसुपर मार्केटबझार इत्यादी) विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. केंद्र सरकारच्या कीटकनाशके कायदा 1968 कीटकनाशके नियम 1971 अन्वये कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ) घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. घरगुती कीटकनाशके साठा व विक्रीचे परवाने कीटकनाशक नियमानुसार कायमस्वरुपी देण्यात येतात. या परवान्यांमधील उगम प्रमाणपत्रे व्यपगत झाल्यास परवान्यामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधित कीटकनाशके (Restricted Insecticides) वापरासाठी (Fumigation service) परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करणं कीटकनाशके अधिनियम 1971 चा नियम 10 चे उल्लंघन आहे.

            विनापरवाना किटकनाशकेघरगुती वापरासाठीची (उदा. झुरळउंदीरढेकूणमच्छरडासमुंग्या इत्यादी नियंत्रण) कीटकनाशकांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ)घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाने त्वरीत घ्यावेत व पुढील कायदेशीर कारवाई टाळावीअसे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. माने यांनी केले आहे.

        अधिक माहितीसाठी रोड नं. १६. झेड लेनबागळे इस्टेटठाणे (पश्चिम) ४००६०४, संपर्क क्रमांक – ८६९१०५८०९४ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात कामा रुग्णालयाचे डॉ.तुषार पालवे यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात कामा रुग्णालयाचे


डॉ.तुषार पालवे यांची मुलाखत


            मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' या विषयावर कामा रुग्णालयाचे अधीक्षक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


            आजची बालके हे उद्याचे भविष्य आहेत. बालकांचे आरोग्य सुदृढ असावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य हा कार्यक्रम काय आहे, राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे, राज्यातील किती मुलांची या कार्यक्रमांतर्गत तपासणी आणि उपचार करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती डॉ. पालवे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ.पालवे यांची मुलाखत मंगळवार दि. 21, बुधवार दि. 22, गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

विदर्भात 222 धान खरेदी केंद्रे सुरू

 विदर्भात 222 धान खरेदी केंद्रे सुरू

           

            मुंबई, दि. 20 : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत 51 तर आदिवासी विकास महामंडळाची 171 अशी एकूण 222 धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

            किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते. आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहीत केलेल्या दर्जाच्या धानाची तसेच भरडधान्याची (ज्वारीबाजरीमका व रागी खरेदी करण्यात येते.

            महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची "नोडल एजन्सी" म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहतेतर भारतीय अन्न महामंडळाच्यावतीने राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघमुंबई (बिगर आदिवासी क्षेत्रात) व  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळनाशिक (आदिवासी क्षेत्रात) या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत करण्यात येते.

            पणन हंगाम २०२३-२४ मधील धान तसेच भरडधान्य यांची खरेदी करण्याबाबत दि.०९ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार दि.०९ नोव्हेंबर २०२३ पासून धान खरेदी करण्याच्या तसेच दि.०१ डिसेंबर २०२३ पासून भरडधान्य खरेदी करण्याच्या सूचना आहेत.

            धान खरेदीकरिता विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांचा अभिकर्ता संस्थानिहाय तपशील पुढीलप्रमाणे  आहे-

            यामध्ये गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे 31, तर आदिवासी विकास महामंडळाची 36 खरेदी केंद्रे आहेत. भंडारा मध्ये मार्केटिंग फेडरेशनचे 20गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची 90, तर चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची 35 आणि नागपूरमध्ये 2, तर अमरावती जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची 8 अशा प्रकारे विदर्भात प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत एकूण 51, तर आदिवासी विकास महामंडळाची एकूण 171 अशी  विदर्भात एकूण 222 धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करणार

 नागपूर हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करणार

मुख्यमंत्र्यांची ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात घोषणा

            भंडारादि. 20 : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करण्यात येईलअशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

            ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदानभंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी ही घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारपालकमंत्री डॉ. विजयकुमार गावितखासदार सुनील मेंढेआमदार नरेंद्र भोंडेकरआमदार राजू कारेमोरेमाजी मंत्री परिणय फुकेमाजी खासदार शिशुपाल पटले,  मधुकर कुकडेमाजी आमदार नानाभाऊ पंचबुद्धेचरण वाघमारेविशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजेजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरमुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटीपोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

            धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावाअशी विनंती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केली होती. त्यानुसार नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

            सध्या शेत ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता यावीत्यासाठी भंडारा जिल्ह्यात पीक पाहणीच्या कार्यक्रमास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली. समृध्दी महामार्गाचा भंडारागोंदियागडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या मार्गाच्या डीपीआरचे काम गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            भंडारा जिल्हा नैसर्गिक वैविध्यता लाभलेला जिल्हा आहे. पर्यटनवाढीला या जिल्ह्यात मोठी संधी आहे. जिल्ह्यात पितळ उद्योग क्लस्टर उभारण्याची मागणी होत आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या बाबी करण्यास शासन कटीबद्ध आहे. सर्वसामान्य गरीब लाभार्थ्यांना त्यांच्या दारी जावून योजना बहाल करण्याचा हा कार्यक्रम असून राज्यात 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना कार्यक्रमाने थेट लाभ मिळवून दिला आहे.

            सर्वसामान्य शेतकरीकष्टकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली जात आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण केवळ एक रुपया भरून पीकविम्याचा लाभ देण्याची योजना सुरु केली. लाखो शेतकऱ्यांच्या पिकाला या योजनेने संरक्षण दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरु केली. केंद्र शासनाने 6 हजार आणि राज्य शासनाच्या योजनेचे 6 हजार असे 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जात आहेत. अशा प्रकारची योजना राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्तांना चांगली मदत देता यावी म्हणून एनडीआरएफचे नियम बाजूला ठेऊन अधिक मदत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. पूरबाधित कुटुंबांना 10 हजार रुपये भरपाई देण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान आपण नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणले. सर्वसामान्य गरीब कुटुंबांना शस्त्रक्रियाउपचारांसाठी दिलासा देण्याकरीता महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

            राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपुर्ण मोफत प्रवास असे विविध जनकल्याणकारी निर्णय घेतले. येत्या काळात सर्वसामान्य नागरिकलाभार्थ्यांना आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयात जावे लागणार नाही. घरबसल्या सर्व सुविधा त्यांना मिळतीलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसाला 12 तास वीज देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            कृषी पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. आगामी काळात कृषी फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहेअसे यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. भंडारा हा तलावजंगलवने तसेच धानाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्याने शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया भरून सुरु केलेल्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेत पहिल्याच वर्षी 1 कोटी 66 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारी ही योजना ठरली आहे.

             शासनाने अंगणवाडी सेविकाआशा स्वयंसेविकामदतनिसांचे मानधन वाढविले. पोलिस पाटलांच्या मानधन वाढीचा देखील विचार सुरु आहे. शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम वाढविली. ओबीसी घटकांकरीता मोदी आवास योजना सुरु केली असून ओबीसीसाठी 10 लाख, तर अनुसूचित जातीजमातीसाठी 5 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वसामान्यांना घर मिळाले पाहिजेअशी शासनाची भूमिका आहे.   

            भंडारा जिल्ह्यात अंभोरा येथे 352 कोटी रुपयांचा  जल पर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनासह रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. गोसीखुर्द राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र शासनाने देखील या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला आहे. 2024 च्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊअसे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले. 

एक हजार 954 कोटींच्या अग्रिमाचे वाटप – उपमुख्यमंत्री अजित पवार

            यावर्षीपासून महत्वाकांक्षी सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरु केली. योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रक्कमेचे वाटप केले जात आहे. नुकसान भरपाईसाठी 47 लाख 63 हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली असून आतापर्यंत 1 हजार 954 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी पहिल्यांदाच 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

            शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शून्य टक्के व्याजाने पीककर्जपूरग्रस्तांना दुपटीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांनी धानासोबतच नगदी पिके देखील घेतली पाहिजेत. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावेअशी मागणी होतीती पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढून महाविद्यालयाचे बांधकाम सुरु केले जाईलअसे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

            पालकमंत्री डॉ. गावित यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के लाभार्थ्यांना प्रत्यक्षअप्रत्यक्ष लाभ देण्यात आला असल्याचे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटनवाढीला संधी आहे. त्याला गती मिळणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती मिळावीअसे ते म्हणाले.

            जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी प्रास्ताविक केले. ‘शासन आपल्या दारी’ अभियान कालावधीत जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 756 लाभार्थ्यांना विविध विभागांच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 304 कोटी रुपये एवढी आहे. एकट्या महसूल विभागाने या कालावधीत 99 हजार दाखल्यांचे वितरण केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॅा.अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची भूमिका व फलनिष्पत्ती याबाबत माहिती दिली.

            सुरुवातीस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रिमोटची कळ दाबून शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विविध योजनेच्या 27 लाभार्थ्यांना विविध लाभांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील 168 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध नामांकित कंपन्यांच्यावतीने त्यांच्याकडील रिक्त 1 हजार 500 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या निवडक उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

            कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागाचे स्टॅाल लावण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना निवेदनतक्रारम्हणणे सादर करता यावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने स्वतंत्र दालन लावण्यात आले. रोजगार मेळाव्यात अनेक युवकांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांना नाश्तापाणीभोजन व प्रवासाची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने विनामूल्य करण्यात आली होती. कार्यक्रमास आलेल्या लाभार्थ्यांना प्रदर्शनस्थळी विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुर्तकोटी यांनी आभार मानले.


गंध फुलांचा गेला सांगून

 माझ्या भगिनी सौ स्नेहा भागवत, चिपळूण यांनी लिहिलेला उत्कृष्ट लेख, गंध आठवणीतले!

(चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या "स्नेहबंध" या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख)

माझे गंध - विश्व

सुवासाच आणि माणसाचं एक अतूट नातं आहे.. जशा आपल्या जाणीवा काळाच्या ओघात विकसित होत जातात तसा त्या त्या वेळच्या सुगंधातले भावार्थ आपल्या मनात दरवळून निघतात. आठवणी गणिक कधीही मनसोक्त हुंगावेत...

रंग,चव ,स्पर्श,नाद  आणि गंध. रंग  हे दीर्घकाळ फोटोत कैद राहतात.चवही काही काळ मनात रेंगाळते.स्पर्श काहीसे  पुसट होत जातात ,नाद मनात काही काळ गुंजन करतात ...पण गंध मनाच्या खोल कप्प्यात दडून बसतात..आपले श्र्वसनेंद्रिय सुमारे  ५०००० प्रकारचे गंध /वास लक्षात ठेवू शकत,हे विज्ञानाने शोधून काढलय. ह्या वाक्याचा मागोवा घेताना  माझं मन अर्थातच भूतकाळात रमलं... तिथे ठाण मांडून  बसले आहेत काही ठळक गंध ..अगदी लहानपणापासून नकळत्या वयात भावलेला वास म्हणजे ओल्या गवताचा वास. बालपणी अनुभवलेला ओलसर रानवट  वास रानगंध अजूनही मनात भरून राहिला आहे.माझी प्राथमिक शाळा आमच्या घरापासून दूर होती..चालत जावं लागे.मैत्रिणीचा चिमुकला हात हातात घेऊन रमत गमत शाळेत जाताना नकळत पणे आमचं निसर्ग वाचन सुरू असायचं.जून महिन्याच्या सुरवातीला कुठेतरी दूर पडलेला पाऊस आम्हाला कळे तो खरपुस मृद्गंध दरवळल्यावरच...पहिल्या पावसाच्या त्या अनुपम गंधाची सर कुठल्याच 

गंधाला नाही.तरीही या विश्र्वातील प्रत्येक गंध मला खुणावतो..आमच्या शाळेच्या गेट वर प्राजक्ताच झाड होत..सकाळची शाळा, तो हवेतला मिश्र नैसर्गिक पानाफुलांचा वास आणि त्यात मिसळलेला तो प्राजक्त फुलांचा स्वर्गीय वास..आजच्या घडीला पुन्हा ते सुख आपण घेऊ शकत नाही...कारण काळ खूप पुढे गेला..आयुष्यात असच होत काहीसं..काही गंध तसेच हवेत विरून जातात... छोट्या च असतात गोष्टी कधीकधी .अगदीच नगण्य.पण विसाव्याच्या क्षणी नेमक्या आठवतात..आम्ही मैत्रिणी १२ वी ते bsc  ला असताना हॉस्टेल ला राहायचो. तेव्हा दुपारी दोन वाजता प्रॅक्टिकल सुटायच फॉर्मलिन, असिटोन, सल्फरडाय ओक्साईड असे भयंकर वास घेऊनच . रूम वर येऊन आम्ही त्या बंद खोलीचा वास घालवायचो ते पानडी नावाची उदबत्ती लावून.त्याच ब्रँड ची उडबत्ती हवी असा आमचा आग्रह असायचा. मग गरम गरम मॅगी करायचो. तीव्र भुकेच्या वेळी सुद्धा त्याचा तो मिश्र गंध आजही मनात दरवळतो.. आता तर त्या मैत्रिणींची भेट्सुद्धा होत नाही..गंध मनात ठेवून चिमण्या चार दिशांना आपापल्या घरट्यात उडून गेल्या. 

आई रव्याचे- बेसनाचे लाडू करून द्यायची.पण बस मधून येताना त्याला एक वेगळाच  वास लागायचा.आम्ही त्या वासाला *प्रवासी वास* अस नाव ठेवलं होत.

गणेश चतुर्थीच्यादरम्याने भात पिकाला  फूलं येत असत..खूप दिवस मला ते फुल कधी दिसलच नाही..कारण ते आकाराने  खूप लहान असत..मग त्या वासाचा शोध घेता घेता त्या नाजूक फुलाचा शोध मला लागला.दिवाळीतील  पदार्थांचा खमंग गोडसर तळणीचा वास त्याची चव चाखण्यापूर्वीच नाकात शिरलेला असायचा .उटण्याचा, सुगंधी तेलाचा, मोती साबणाचा तो मोहक गंध दिवाळीची रंगत वाढवायचा..फटाके फोडल्यावरचा तो जळका वासही मनात ठाण मांडून बसला आहे..

गंध कोऱ्या पुस्तकाचा,पुस्तकात ठेवलेल्या बकुळीच्या गजऱ्याचा. अगदी उकळत असणाऱ्या चहाचा हवाहवासा गंध,कधी उदास सायंकाळी कॉफीचा दरवळ जीव मोहरतो नुसता... ..हा गंधवेडा जीव कुठे कुठे अडकतो.!! 

ब्रुट नावाचं एक अत्तर आहे .ते लेडीज की जेंट्स या फंदात न पडता मी आवडलं म्हणून  बिनधास्त वापरलेलं आहे.आता समजत की अत्तर सुद्धा वेगवेगळ असत..पण अजून कधी तो ब्रुट चा वास आला तर मन अलगद मागे रमून जात. 

नव्या कोऱ्या साडीचा वास असो.की कॉस्मेटिक्स चा वास!! मनभावन गंध आहेत

श्रावण महिन्यातील धूप, कापूर उदबत्तीचे सात्विक वास,हळदीच्या पानातील उकडीच्या  सुबक मोदकांचा दरवळ,

मार्गशीर्ष महिन्यात पडलेल्या दवाचा गंध. बागेतील फुलझाडावरची देवासाठी खुडून आणलेली फुल माझ्या हातावर वास ठेवून खुशाल देवाच्या चरणी रूजू व्हायची..

 होळीच्या दरम्याने पेटलेल्या होमांचे वास,

चैत्र गौरी हळदी - कुंकू समारंभाच्या वेळचा जाई जुई मोगरा  यांचा सुवास मनात अजूनही दरवळतो.

आंब्याच्या बागेतला -मोहोराचा वास,त्याच ऋतूत जंगलात कुठेतरी फुललेला सुवासिक करा (जंगली झाड)..किती दुरून  मोकळ्या माळराना वरूनसुंगध

यायचा तो!!वाऱ्याच्या मंद झुळूकीना सुगंधाचं कोंदण!..समुद्राचा खारा वास.ताज्या मासळीचा वास, पेट्रोलचा वास ..हे सुद्धा आठवणीत रुतून बसलेत.. सगळ्या सुगंधी फुलांप्रमाणे निशिगंधाची आणि सोनचाफ्याची फुल मला खूपच आवडतात..

पुढे मी ठरवलं होत की माझ्या लग्नात निशिगंधाच्या फुलांचा हार असावा..त्या गंधाच्या साक्षीने जीवनातील महत्वाचा संस्कार पूर्ण करावा..पण प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची ती आई- वडील नातेवाईकांची लगीन घाई,सगळ्यांचे मोलाचे सल्ले,नवीन नवीन चेहरे, सासरच्या माणसांचे औत्सुक्य, आनंदाचे संवाद. आणि भटजींनी केलेली घाई. होमाचा डोळ्यात शिरणारा धूर, यात मी तो गंध नाकभरून घ्यायचं विसरूनच गेले.

नंतर पुढे काही काळ नव्या संसाराच्या नव्या जबाबदाऱ्या सांभाळताना गंध हे प्रकरणच विसरून गेले.बाळाच्या चाहुलींमधे तर काही वासांचा अक्षरशः त्रास होऊ लागला. नंतर मात्र धूप ,धुरीचा , बेबी पावडरचा, वेखंड पावडर चा असे काही नवेच गंध मला मोहवू लागले..

कधी इतरांच्या लग्नसमारंभात माळलेला मोगऱ्याचा गजरा हवाहवासा वाटू लागला.. स्री चं संपूर्ण आयुष्य हे गंधाने व्याप्त आहे .खाली गोव्याकडे , दक्षिण भारतात गेलो तर सगळ्या स्त्रियांच्या डोक्यात फुल माळलेली दिसणारच..खर तर सुगंध हे वाण आहे त्याची लूट करण म्हणजेच आनंदाची अनुभूती घेणं..आता मुलाबाळांच्या पुष्कळशा जबाबदाऱ्या कमी झाल्याने पुन्हा नव्याने मी माझं हे गंधवेड जोपासायच ठरवलं आहे..तर लेख लिहिण्याच कारण अस की परवा घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच विंध्यवासिनीच्या मंदिरात गेले होते.मला एकदम

सोनचाफ्याची फुल घ्यावी अस वाटल.पण सोनचाफ्याची फुल अशी कुठे मिळणार अचानक ?

देवळात गेले..एक काकू विंध्यावासिनीच स्तवन गात होत्या .. सकाळी लवकर गेल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती.मी डोळे मिटून स्तवन  ऐकत होते..एवढ्यात मागून कुणीतरी आल..त्यांना गडबड असावी बहुतेक ..त्यांनी त्यांच्या हातातली भेट पुजाऱ्याकडे दिली ..देताना त्यातली दोन फुल माझ्या ओटीच्या ताटात पडली..ती चक्क 

सोनचाफ्याची ताजी  टपोरी सुवासिक फुल होती..मी देवीकडे भारावलेल्या डोळ्यांनी बघितल फक्त..

आणि पुन्हा एकदा नतमस्तक झाले..

©स्नेहा भागवत

Featured post

Lakshvedhi