Thursday, 19 October 2023

बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्व‍ितेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

 बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्व‍ितेसाठी

नागरिकांचा सहभाग महत्वाचा

- मंत्री छगन भुजबळ

बोधीवृक्ष महोत्सवाचे 24 ऑक्टोबरला आयोजन

            नाशिकदि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात 24 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून मान्यवर व उपासक येणार आहेत. त्यादृष्टीने कार्यक्रमाच्या यशस्व‍ितेसाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

            शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे 24 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर बोधीवृक्षाच्या या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी नाशिक येथे मंत्री श्री. भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदंत सुगत थेरोभदंत संघरत्नसमिती सदस्य आनंद सोनवणेबाळासाहेब कर्डकरंजन ठाकरेबॉबी काळेबाळासाहेब शिंदेदिलीप साळवेश्री.भालेराव आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, या महोत्सवास श्रीलंकाथायलंडकोरियाम्यानमारमलेशियाजपानतैवानव्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती, भन्ते व उपासक उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्थायेणाऱ्या बौद्ध उपासकांची निवासभोजन व्यवस्थासुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी शासनाकडून 18 कोटी 4 लाख 67 हजार रुपयांचा निधी

प्राथमिक दूध संकलन केंद्राचा तपासणी अहवाल सादर करावा

 प्राथमिक दूध संकलन केंद्राचा तपासणी अहवाल सादर करावा

- मंत्री छगन भुजबळ

 

            मुंबई, दि. 18 : दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्राथमिक दूध संकलन केंद्रावर फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा सहकारी दूध संस्थावैधमापन शास्त्र अधिकारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्षात वजन मापासंदर्भात पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

            यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

            मंत्री श्री. भुजबळ म्हणाले कीफॅट व एस.एन.एफ. तपासणीच्या मशीनवर तफावत आढळत असल्याने प्राथमिकस्तरावर दूध संकलन केंद्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे व अन्य साधने वापरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

             त्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर दुधाचे घनफळ व वजन दोन्ही मोजमाप होऊन त्यांची नोंद शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या पावतीवर होण्यासंदर्भातही तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

            यावेळी सचिव सुमंत भांगेवैध मापन शास्त्रचे सह नियंत्रक विलास पवारकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटीलरूपेश पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

कोकण विभागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी

 कोकण विभागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबई, दि. 18 : कोकण विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला आहे. या योजनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

                 कोकण विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडेकोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

              मंत्री श्री पाटील म्हणाले कीहर घर जल प्रमाणित गावे 26 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावी. मंजूर कामांना कार्यारंभ आदेश तत्काळ देण्यात यावा. त्रयस्थ तपासणी संस्थांनी पाणीपुरवठा योजनांच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी. तपासणी अहवाल हा दर 15 दिवसांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर करावा.

            कोकण विभागातील जलजीवन अंतर्गत कामाची भौतिक प्रगतीप्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थांच्या कामाची सद्य:स्थितीनेमण्यात आलेल्या त्रयस्थ तपासणी संस्थांच्या कामाची सद्य:स्थितीजिल्हानिहाय योजनांच्या खर्चाचा तपशीलपाणीपुरवठा योजनांची सद्य:स्थिती याबाबत यावेळी चर्चा झाली.


प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे

 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे

गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबई, दि. १८ : राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी  ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता राज्यातील ५११ ग्रामपंचातींमध्ये ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी  उद्या सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

             कौशल्य विकास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या संकल्पनेनुसार ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

            रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नयेत्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकासउद्योग यांच्याबरोबरच महसूलग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे. लोकप्रतिनिधींसह आशा व अंगणवाडी सेविका आदीं या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभागी होणार आहेत. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अन्य घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.


Wednesday, 18 October 2023

हागणदारीमुक्त गावांचा आलेख उंचावणे गरजेचे

 हागणदारीमुक्त गावांचा आलेख उंचावणे गरजेचे

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

            मुंबई, दि. 18 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत सुरु असलेल्या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकामसार्वजनिक शौचालय बांधकाम या घटकांसोबतच घनकचरा व्यवस्थापनसांडपाणी व्यवस्थापनमैला गाळ व्यवस्थापनगोबरधन प्रकल्पप्लास्टिक कचरा व्यवस्थापन या घटकांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.  या अभियानाला गतिमानता प्राप्त करुन माहे मार्च 2024 अखेरीस राज्य हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  यांनी दिले.

            स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अतंर्गत विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील आढावा बैठक  सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेराज्य पाणी व स्वच्छता मिशन अभियान संचालक तथा सहसचिव शेखर रौंदळकार्यकारी अभियंता अपूर्वा पाटीलअवर सचिव चंद्रकांत मोरे,  अवर सचिव स्मिता राणे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीस्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत विविध उपांगांना गतिमानता प्राप्त होण्यासाठी प्रकल्‍प संचालक जल जीवन मिशन या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरुन अभियानाचा आलेख उंचविण्यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सन 2024-25 या वर्षात राज्य हागणदारीमुक्त प्लस घोषित करावयाचे असले, तरी मार्च 2024 अखेरीस राज्य हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित करावे. माहे डिसेंबर 2023 अखेरीस 50 टक्के गावे मॉडेल म्हणून घोषित करण्यात यावे.

                 इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याचा मॉडेल गावे घोषित करण्याचा आलेख वाढविणे गरजेचा आहे. त्यामुळे विहित कालावधीमध्ये राज्य हागणदारीमुक्त प्लस घोषित करण्यासाठी सर्व उपांगाची कामे पूर्ण करुन केद्र शासनाच्या संकेत स्थळावर नोंदित करावीत. तसेच अभियान गतिमान करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीपर्यंत लोकचळवळ उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

 राज्य कृषी मूल्य आयोगाच्या

अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

 

            मुंबई, दि. 18 : शेतकरी नेते सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

            श्री. पटेल हे या पूर्वीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार  म्हणून त्यांची ओळख आहे.

            श्री. पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवडबांबूवरील संशोधन तसेच बांबूपासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प पारदर्शी आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून श्री. पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतीलअसा विश्वासही मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार "भाऊबीज भेट"

 अंगणवाडी सेविकामदतनीस, मिनी अंगणवाडी

सेविकांना मिळणार "भाऊबीज भेट"

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि.१८ : बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी  घेणाऱ्या अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीशून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषणस्तनदा मातागरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणेत्यांना मार्गदर्शन करणेशासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत  सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविकाअंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना "भाऊबीज भेट" वितरित करण्यात येणार आहे.  भाऊबीज भेट साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

*****

संध्या गरवारे/विसंअ/

वृत्त क्र. 3478

 

राज्य कृषी मूल्य 

Featured post

Lakshvedhi