Wednesday, 18 October 2023

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार "भाऊबीज भेट"

 अंगणवाडी सेविकामदतनीस, मिनी अंगणवाडी

सेविकांना मिळणार "भाऊबीज भेट"

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि.१८ : बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी  घेणाऱ्या अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीशून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषणस्तनदा मातागरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणेत्यांना मार्गदर्शन करणेशासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत  सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविकाअंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना "भाऊबीज भेट" वितरित करण्यात येणार आहे.  भाऊबीज भेट साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

*****

संध्या गरवारे/विसंअ/

वृत्त क्र. 3478

 

राज्य कृषी मूल्य 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi