बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वितेसाठी
नागरिकांचा सहभाग महत्वाचा
- मंत्री छगन भुजबळ
बोधीवृक्ष महोत्सवाचे 24 ऑक्टोबरला आयोजन
नाशिक, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात 24 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून मान्यवर व उपासक येणार आहेत. त्यादृष्टीने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे 24 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर बोधीवृक्षाच्या या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी नाशिक येथे मंत्री श्री. भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदंत सुगत थेरो, भदंत संघरत्न, समिती सदस्य आनंद सोनवणे, बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे, बॉबी काळे, बाळासाहेब शिंदे, दिलीप साळवे, श्री.भालेराव आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, म्यानमार, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती, भन्ते व उपासक उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी शासनाकडून 18 कोटी 4 लाख 67 हजार रुपयांचा निधी
No comments:
Post a Comment