Monday, 16 October 2023

साने गुरुजी, बहिणाबाईंच्या मातीतील साहित्य संमेलन दिशादर्शक ठरणार : डॉ. रविंद्र शोभणे

 साने गुरुजी, बहिणाबाईंच्या मातीतील साहित्य संमेलन दिशादर्शक ठरणार : डॉ. रविंद्र शोभणे


साने गुरूजी साहित्य नगरी, अमळनेर : पुज्य साने गुरुजी व बहिणाबाई चौधरी यांच्या मातीत होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या काळात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केला. बहिणाबाई चौधरींनी मराठी साहित्याला सोन्याचा हंडा दिला आहे. आजही बहिणाबाईंच्या कवितेच्या पलिकडे ग्रामीण कविता गेल्या नाही, हे अभिमानानं नमूद करावसं वाटतं, असंही ते म्हणाले. डॉ. रविंद्र शोभणे यांनी संमेलनाच्या तयारीचा पूर्व आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रताप महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देत महाविद्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी संमेलन अध्यक्षांना सविस्तर माहिती दिली. 


मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळेनर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी पुज्य साने गुरुजी स्मृती कक्षास भेट देवून सानेगुरुजींना वंदन केले. त्यानंतर संमेलन स्थळ सभागृह क्रमांक १ व २ येथे पाहणी करुन काही सुचना केल्या. त्यानंतर डॉ.शोभणे यांनी कवी कट्टा, साहित्य / पुस्तक प्रकाशन पॉईंट, बुकस्टॉल, निवास व्यवस्था पाहणी केली. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ते प्रत्यक्ष जागेवर जावून सर्व बाबी जाणून घेतल्या.


यानंतर बोलतांना डॉ.शोभणे म्हणाले की, आपण शेजारी शेजारी आहोत. विदर्भ संपला की खान्देश सुरु होतो. त्यामुळे विदर्भावर खान्देशाचं किती प्रेम आहे, याची प्रचिती मला येतेय. कुठं एक विदर्भातील माणूस खान्देशातील तेही साने गुरुजींच्या भूमीतील समेंलनाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होतोय, याबद्दल बोलण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत. बहिणाबाई चौधरींनी मराठी साहित्याला सोन्याचा हंडा दिला आहे. यामुळं हे साहित्य संमेलन यशस्वी होईल, याचा विश्वास आहे. जळगावकरांच्या प्रेमाने मी खरोखरचं भारावलो गेलो आहे, असंही ते म्हणाले. 


यावेळी खान्देश शिक्षण मंडळातर्फे डॉ.शोभणे यांना सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, सदस्य हरी वाणी, संदेश गुजराथी, कल्यार पाटील, विनोद पाटील, निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, प्रा.डॉ.ए.बी.जैन, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रविंद्र मोरे यांच्यासह मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा.डॉ.सुरेश महेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.


गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

 गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी

माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

 

            नवी दिल्ली16 : गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या ‘इफ्फी’च्या 54 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून 18 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दिली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन तसेच  क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा सोहळा असणार आहे.

            ‘इफ्फी-54’ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्मातेअभिनेतेतंत्रज्ञसमीक्षकबु्द्धिजीवी आणि जागतिक चित्रपट रसिकांपैकी एक होण्याचा बहुमान मिळणार आहे.

            माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि प्रिंटइलेक्ट्रॉनिकडिजिटल किंवा ऑनलाइन मीडिया संस्थेशी संबंधित कार्य असणे आवश्यक असण्याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांनाही (फ्री लान्सर्स) https://my.iffigoa.org/extranet/media/ येथे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

            'इफ्फी'ला यशस्वी करण्यासाठीचित्रपट निर्मिती कलेविषयी खऱ्या अर्थाने प्रेम जोपासण्यात माहिती आणि संवाद महत्वाची भूमिका बजावतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या महोत्सवासाठी नोंदणी करण्यासाठी आणि उपस्थित राहण्याच्या आमंत्रणाबरोबरच प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने इफ्फीच्या उत्सवात हातभार लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

            चित्रपटाचा निखळ आनंद आणि अनेक चित्रपटांनी विणलेल्या मनोरंजक कथात्यांच्या निर्मात्यांच्या आयुष्याचीस्वप्नांचीआकांक्षांची आणि संघर्षाची अनोखी झलक दाखवणारे हे प्रदर्शन 54 व्या इफ्फीत दाखवण्यात येणार आहे. चित्रपटांचा उत्सव केवळ पडद्यापुरता मर्यादित न राहता त्या पलिकडेही इफ्फी आणि इतर गाजलेल्या चित्रपट महोत्सवांचे सार स्पष्ट करणारे मास्टर क्लासेसपॅनेल चर्चासेमिनार आणि संभाषणांची मेजवानी देखील मिळणार आहे.

            अधिक मदतीसाठी पीआयबीशी ईमेलद्वारे pib.goa@gmail.com वर किंवा +91-832-2956418 या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत फोनलाइन सक्रिय असेल. नोंदणीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11:59:59 (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निश्चित करण्यात आली आहे.

            54 व्या इफ्फीच्या ताज्या घडामोडी व अधिक माहितीसाठीwww.iffigoa.org  येथे महोत्सवाच्या वेबसाइटला भेट द्या.

0000000

कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक

 कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक

- विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने

            मुंबई, दि. 16 : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मुंबई शहरमुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये कीटकनाशके साठा व विक्री व घरगुती कीटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक असल्याची माहिती, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

            श्री. माने यांनी म्हटले आहे की, विक्रेते घरगुती कीटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्सकिराणा दुकानेसुपर मार्केटबझार इत्यादी) विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. केंद्र सरकारच्या कीटकनाशके कायदा 1968 कीटकनाशके नियम 1971 अन्वये कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ) घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. घरगुती कीटकनाशके साठा व विक्रीचे परवाने कीटकनाशक नियमानुसार कायमस्वरुपी देण्यात येतात. या परवान्यांमधील उगम प्रमाणपत्रे व्यपगत झाल्यास परवान्यामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधित कीटकनाशके (Restricted Insecticides) वापरासाठी (Fumigation service) परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करणं कीटकनाशके अधिनियम 1971 चा नियम 10 चे उल्लंघन आहे.

            विनापरवाना किटकनाशकंघरगुती वापरासाठीची (उदा. झुरळउंदीरढेकूणमच्छरडासमुंग्या इत्यादी नियंत्रण) कीटकनाशकांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ)घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाने त्वरीत घ्यावेत व पुढील कायदेशीर कारवाई टाळावीअसे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. माने यांनी केले आहे.

        अधिक माहितीसाठी रोड नं. १६. झेड लेनबागळे इस्टेटठाणे (पश्चिम) ४००६०४, संपर्क क्रमांक – ८६९१०५८०९४ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे

 राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे

गुरूवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्राची अभिनव संकल्पनामुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा

देशाने दखल घ्यावी अशी योजना

            मुंबईदि. 16 :- प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा या महाराष्ट्राच्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणेही बाब देखील गौरवाची आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केद्रांचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाउद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्यातील विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून (ऑनलाइन) बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिकमहसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगापोल देवरानगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराजग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेमाहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक जयश्री भोज आदी उपस्थित होते. कौशल्य विकास आय़ुक्त डॉ. ए. रामास्वामी यांनी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या या संकल्पनेबाबत आणि उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची माहिती सादर केली.

            हा उद्घाटन सोहळा प्रधानमंत्री श्री. मोदीं यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी संबंधित असल्याने त्याच तोला-मोलाच व्हावा असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीतरुणांच्या रोजगार संधी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे हे महत्वाचे पाऊल आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या कार्यक्रमासाठी वेळ देऊन या योजनेला पाठबळ दिले आहे. त्यामुळे या केंद्रांची माहिती या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर दखल घेतला जाईल असा आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी सज्ज व्हावे. कौशल्य विकासउद्योग यांच्याबरोबरच महसूलग्रामविकास यांच्यासह आपल्या महिला व बालविकास विभागांनीही यामध्ये सहभाग द्यायचा आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांनाही यात सहभागी होता येईल, असे नियोजन करावे. ही एक सुरवात असून पुढे जाऊन या केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या- ज्या गावात हे केंद्र सुरु होणार आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकलोकप्रतिनिधी आणि विविध घटक यात कसे सहभागी होतीलयासाठीचे नियोजन करण्यात यावेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समिती नियुक्त करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच सर्वच अधिकाऱ्यांनी देखील आपआपल्या परिसरातील या केंद्रावर उपस्थित राहून या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मैदान असेल, तर मंडपाची उभारणीपिण्याच्या पाण्याचे नियोजनइंटरनेटची सुविधास्क्रीनची उभारणीवीज पुरवठा सुरळीत राहावी यासाठीची व्यवस्था याबाबतही सूचना दिल्या.

            ग्रामपंचायत सदस्यांपासून ते जिल्हा परिषदपंचायत समिती सदस्यआमदारखासदार यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका आदींनाही या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीराज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकासाची व्यवस्था नाही. हे लक्षात घेऊन आपण ही संकल्पना राबवत आहोत. हा विषय प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या प्राधान्य क्रमावरील विषय आहे. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. त्या दृष्टीने हा कौशल्य केंद्राची ही संकल्पना महत्वाची आहे. भविष्यात राज्यातील या केंद्राची संख्याही वाढवण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            यावेळी मुख्य सचिव श्री. सौनिक यांनीही महत्वपूर्ण सूचना केल्या. या कार्यक्रमांचे संनियंत्रण प्रधानमंत्री कार्यालयाकडूनही होणार आहे. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यभरात साडे सात लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहतीलअसे नियोजन करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

00000


ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग’ यांचे मुंबईत आगमन

 ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग’ यांचे मुंबईत आगमन

            मुंबई, दि. १६ :- ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग’ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज आगमन झाले.

            यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,  क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे यांनी ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  

            यावेळी लक्झेम्बर्गचे राजदूत पेगी प्रात्झझेन, राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेथून ग्रॅण्ड डच ऑफ लक्झेम्बर्ग हे मुंबईतील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.


नवरात्र special

 समिता समीर मालोदे, गवळीवाडी, अलिबाग


💐साबीर करीम शेख,धिप्पाड व्यक्तिमत्त्व, भरदार आवाज, स्पष्टवक्तेपणा व धाडसी वृत्ती, पुण्य स्मरण

 💐💐स्वर्गस्थ💐💐

                  आपल्या महाराष्ट्रात आज हजारोंच्या संख्येने गिर्यारोहण संस्था अस्तित्वात आहेत. या संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून गेली चार दशके अथकपणे सुरू आहे. या कार्यात प्रारंभीपासून सक्रिय राहून साथ देणारे अनेक जाणते गिर्यारोहक व संस्था-संघटना आजही त्याच उत्साहात कार्यरत आहेत. 

                  मात्र महासंघाची स्थापना करण्यात स्वर्गीय साबीर शेख यांचे  मोठे योगदान होते. 

                 सच्चे शिवप्रेमी गिर्यारोहक, आणि मंत्रीपद भूषविलेल्या साबीर भाईंबरोबर भटकंती करण्याची संधी मला वेळोवेळी मिळाली. साबीर भाईंचे आज पुण्यस्मरण करताना काही आठवणी जाग्या झाल्या आहेत………..


           💐साबीर करीम शेख💐

                  धिप्पाड व्यक्तिमत्त्व, भरदार आवाज, स्पष्टवक्तेपणा व धाडसी वृत्ती, ही साबीर भाईंची स्वभाव  वैशिष्ट्ये होती. मुळात हे राजकारणातले व्यक्तिमत्व. पण ते दूर्गवेडे होते. श्रीशिवरायांविषयी भाईंना विशेष आदर होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर त्यांची निष्ठा होती. बाळासाहेबांनीही भाईंच्या निष्ठेची जाण ठेवून त्यांना कल्याण-ठाणे परिसरातुन सेनेचा उमेदवार म्हणून विधानसभेवर जाण्याची संधी दिली. भाई  भरघोस मतांनी  निवडूनही आले. नंतर कामगार मंत्री म्हणून कार्यरत झाले. 

                 ही राजकीय कारकीर्द सोडली तर भाई हाडाचे गिर्यारोहक होते. गो. नी. दांडेकरांसमवेत भाई नेहेमी दुर्गभ्रमण करायचे. रायगडावर भाईंनी  कितीदा मुक्काम केला होता. गड- गावातील लहानथोर मंडळी, सरकारी सेवक, यांचेशी साबीर भाईंचे जिव्हाळ्याचे नाते होते. गडावर भाई आले की सर्वांना उत्साह यायचा. 

                 भाई स्वतः कीर्तन- प्रवचन करायचे, व्याख्यानही द्यायचे. शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा इतिहास त्यांना तारखेसह पाठ होता. ते भरदार आवाजात पोवाडा म्हणायचे. 

                पुण्याजवळील राजगड ही स्वराज्याची जुनी राजधानी. वाय. झेड. ट्रेकर्स या प्रसिध्द गिर्यारोहण संस्थेने १९८५ साली पहिल्यांदा राजगडावर ‘गड जागरण मोहीम’ आयोजीत केली. सर्वदूर महाराष्ट्रातील गिरिप्रेमीनी त्यात सहभाग घेऊन राजगड जागता ठेवला होता. 

                 या गड जागरण मोहिमेत ‘गोनीदां’ सह साबीर भाई सक्रीय सहभागी होते. राज्यभर हे गड जागरण गाजले. मुंबई दूरदर्शनने याची खास दखल घेऊन त्यांची टीम चित्रीकरणासाठी गडावर पाठविली होती. नंतर दूरदर्शनवर प्रसारित झालेला हा सोहोळा लाखो प्रेक्षकांनी पाहिला. 

                 राजगडावर त्या वेळी झालेल्या समारंभात साबीर भाईनी दमदार आवाजात म्हटलेला पोवाडा व त्याला आम्ही दिलेली ‘जी जी रं…...’ ची ललकारी आजही कानात रुंजत आहे. 

                 गढवाल हिमालयात १९८८ साली साद माऊंटेनिअर्सने रुदुगैरा या १९,०९० फूट उंचीच्या हिमशिखरावर चढाई मोहीम आखली. भाई या मोहिमेचे फिल्ड ऑफिसर होते. 

                 ही गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली तेव्हा महाराष्ट्र दिनी श्रीगंगोत्री मंदिर प्रांगणात विशेष सोहोळा संपन्न झाला. साबीर भाईंनी त्या दिवशी सर्वांना शिवमुद्रा प्रदान करून त्यांचा गौरव केला. त्या समयी भाईंनी खड्या आवाजात महाराष्ट्र गीत म्हटले होते.

                  साबीर भाईना दत्तक मुलगी होती. तीच्यावर भाईंचा भारी जीव. मंत्रीपदी असताना भाईंनी त्यांच्या मंत्रालया समोरील कौलारू बंगल्यावर साऱ्यांना मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने बोलाविले होते.

                 वाढदिवस कसा साजरा करावा याचा आदर्श वस्तुपाठ त्या दिवशी आम्हाला पाहायला मिळाला. भाईंनी आपल्या मुलीला मध्यभागी बसवले व तिच्या हस्ते सुबक पणती प्रज्वलित केली. जमलेल्या साऱ्यांनी पणतीमध्ये चमचाभर तेल ओतून मुलीला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन भाईंनी केले. किती छान कल्पना होती वाढदिवसाची ! आपण वाढदिवसाच्या दिवशी महागडा केक आणून त्यावर मेणबत्ती पेटवतो व ती नंतर विझवतो. केवढा विरोधाभास आहे हा !

                 दिलदार स्वभावाची ही व्यक्ती चित्रपट क्षेत्रात सुध्दा सक्रीय होती. स्वर्गीय दादा कोंडके व भाई परममित्र. पुण्याजवळील दादांच्या त्यावेळच्या स्टुडिओमध्ये दोघे खुपदा जायचे.

                  विखुरलेल्या दुर्गवेड्यांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न साबीर भाईंनी केले. दादरच्या सेना भवन सभागृहात या संदर्भात एकदा मोठी मिटींगही झाली होती. 

                   भारतीय एव्हरेस्ट मोहिमेच्या रौप्य महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने महासंघाने मुंबईत एका पदयात्रेचे आयोजन करून आमंत्रित टीम मेंबर्सना सन्मानित केले होते .                              

                   कल्याण जवळील दुर्गाडी-कोण परिसरात साबीर भाईंचे मोठे घर होते. भावाचा खाटीक व्यवसाय होता. धार्मिक सणाला भाईंचे आग्रहाचे आमंत्रण असायचे, त्या दिवशी बिर्याणी, शिरकुर्मा भाई सर्वांना प्रेमाने खाऊ घालायचे. आपल्या प्रत्येक भेटीत सुरक्षा यंत्रणेला बाजूस सारून सर्व सवंगड्यांशी मनसोक्त गप्पा मारण्याचा भाईंचा स्वभाव होता.

                   अशा या उमद्या व्यक्तीची अखेर मात्र दुःखद झाली. साबीर भाईंना आजारपणाने ग्रासले. शेवटी स्मृतीभंशही झाला. त्याच अवस्थेत १५ ऑक्टोबर २०१४  ला भाईंचे निधन झाले.

              आज महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राशी बांधिलकी मानणाऱ्या सर्वांना साबीर भाई, गोनीदा, बाबासाहेब या त्रिमूर्ती प्रेरणास्थानी राहिल्या आहेत. महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आता बऱ्याच अंशी स्थिरस्थावर झाला आहे. 

              महासंघाची पुढील वाटचाल करताना आम्हा दूर्गवेड्यांना या त्रिमूर्ती सदैव स्मरणात राहतील.

 || साबीर भाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ||

- मंगेश चौधरी

Featured post

Lakshvedhi