Monday, 16 October 2023

गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

 गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी

माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

 

            नवी दिल्ली16 : गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या ‘इफ्फी’च्या 54 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून 18 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दिली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन तसेच  क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा सोहळा असणार आहे.

            ‘इफ्फी-54’ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्मातेअभिनेतेतंत्रज्ञसमीक्षकबु्द्धिजीवी आणि जागतिक चित्रपट रसिकांपैकी एक होण्याचा बहुमान मिळणार आहे.

            माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि प्रिंटइलेक्ट्रॉनिकडिजिटल किंवा ऑनलाइन मीडिया संस्थेशी संबंधित कार्य असणे आवश्यक असण्याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांनाही (फ्री लान्सर्स) https://my.iffigoa.org/extranet/media/ येथे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

            'इफ्फी'ला यशस्वी करण्यासाठीचित्रपट निर्मिती कलेविषयी खऱ्या अर्थाने प्रेम जोपासण्यात माहिती आणि संवाद महत्वाची भूमिका बजावतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या महोत्सवासाठी नोंदणी करण्यासाठी आणि उपस्थित राहण्याच्या आमंत्रणाबरोबरच प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने इफ्फीच्या उत्सवात हातभार लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

            चित्रपटाचा निखळ आनंद आणि अनेक चित्रपटांनी विणलेल्या मनोरंजक कथात्यांच्या निर्मात्यांच्या आयुष्याचीस्वप्नांचीआकांक्षांची आणि संघर्षाची अनोखी झलक दाखवणारे हे प्रदर्शन 54 व्या इफ्फीत दाखवण्यात येणार आहे. चित्रपटांचा उत्सव केवळ पडद्यापुरता मर्यादित न राहता त्या पलिकडेही इफ्फी आणि इतर गाजलेल्या चित्रपट महोत्सवांचे सार स्पष्ट करणारे मास्टर क्लासेसपॅनेल चर्चासेमिनार आणि संभाषणांची मेजवानी देखील मिळणार आहे.

            अधिक मदतीसाठी पीआयबीशी ईमेलद्वारे pib.goa@gmail.com वर किंवा +91-832-2956418 या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत फोनलाइन सक्रिय असेल. नोंदणीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11:59:59 (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निश्चित करण्यात आली आहे.

            54 व्या इफ्फीच्या ताज्या घडामोडी व अधिक माहितीसाठीwww.iffigoa.org  येथे महोत्सवाच्या वेबसाइटला भेट द्या.

0000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi