Tuesday, 17 October 2023

गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

 गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी

माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

 

            नवी दिल्ली16 : गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या ‘इफ्फी’च्या 54 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून 18 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दिली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन तसेच  क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा सोहळा असणार आहे.

            ‘इफ्फी-54’ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्मातेअभिनेतेतंत्रज्ञसमीक्षकबु्द्धिजीवी आणि जागतिक चित्रपट रसिकांपैकी एक होण्याचा बहुमान मिळणार आहे.

            माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि प्रिंटइलेक्ट्रॉनिकडिजिटल किंवा ऑनलाइन मीडिया संस्थेशी संबंधित कार्य असणे आवश्यक असण्याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांनाही (फ्री लान्सर्स)


नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा 

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नमो ११ कलमी कार्यक्रमात सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार

विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबईदि. १६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास  राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या कार्यक्रमातील समाविष्ट कामेउद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  सर्व विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो ११ कलमी’ कार्यक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली होतीत्याअनुषंगाने या कार्यक्रमाचा वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आज आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव मनोज सौनिक यांचेसह विविध शासकीय विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.

नमो महिला सशक्तीकरण अभियानातून २ कोटी महिलांचा बचतगटांमध्ये समावेश करा

            नमो ११ कलमी’ कार्यक्रमाच्या नमो महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या राज्यातील ६० लाख महिला बचतगटांशी जोडल्या गेल्या असून ही संख्या २ कोटी करण्यासाठी ग्रामविकासमहिला व बालविकास विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. राज्य सरकारने यापूर्वीच बचतगटांच्या सीआरपींच्या मानधनात तसेच खेळत्या भांडवलात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बचतगटांच्या उत्पादनांचे ब्रॅण्डिग आणि विपणन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. महानगरपालिकानगरपालिकेच्या विविध ७२ बाजारपेठांमध्ये महिला उद्योग केंद्रांसाठी जागा दिली जाणार असून इतरही शहरांमध्ये अशा प्रकारची जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. मॉलमध्ये देखील बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व्हावीत्यातून त्यांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच

            देशाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान करण्यासाठी नमो कामगार कल्याण’ अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तीन महिन्यांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

७३०० शेततळ्यांची उभारणी

            नमो शेततळी अभियानातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी ७३०० शेततळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन दिला जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

७३ आत्मनिर्भर गावे विकसित होणार

            या अभियानातून राज्यातील ७३ गावे आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार असून त्यासाठी पक्की घरेशौचालयांची बांधणी व त्याचा वापररस्त्यांचे जाळेमहिला सक्षमीकरणगावातच रोजगाराची उपलब्धतासौर ऊर्जेचा वापर आदी बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातून विकास

            गरीब आणि मागासवर्गीय वस्त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हे अभियान राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधून देण्यासाठी विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावाया घर-वस्त्यांमध्ये वीज पुरवठारस्तेसमाजमंदिराची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी

            सर्व आधुनिक सुविधांयुक्त ग्रामपंचायत कार्यालयांच्या उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार असून विभागाने प्राधान्याने ग्रामसचिवालयांची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

७३ आदिवासी शाळा होणार स्मार्ट

            राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ३० प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारितील ४९७ आश्रमशाळांपैकी ७३ शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन इतरांसाठी आदर्शवत होतीलअशा शाळांची उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

दिव्यांगांसाठी ७३ पुनर्वसन केंद्रे

            राज्यात ७३ ठिकाणी दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येणार असून यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना देऊन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या केंद्रांमधूनदिव्यांगांचे सर्वेक्षणओळखदिव्यांगांना आवश्यक साहित्याची उपलब्धताविविध योजनांचा लाभ आदी सुविधा पुरविण्याच्याही सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

७३ गावांमध्ये मुलांसाठी क्रीडा मैदाने

            तालुक्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ७३ गावांमध्ये मुलांसाठी क्रीडा मैदाने विकसित करण्याची कार्यवाही सुरु कराही मैदाने सगळ्यांना उपलब्ध होतील यादृष्टीने ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

७३ शहर सौंदर्यीकरणाचा शासन निर्णय जारी

            नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून राज्यातील २५ महानगरपालिका आणि ४८ नगरपालिकांमध्ये सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

७३ मंदिरांच्या विकासासाठी तांत्रिक मान्यतेची कार्यवाही

            राज्यातील मंदिरांच्या विकासासाठी ७३ मंदिरे निश्चित करण्यात आले असून तांत्रिक मान्यतेची कार्यवाही  सुरु आहे. जिल्हा विकास योजनास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राज्य अर्थसंकल्पातून या मंदीर विकासाचा खर्च करण्यात येणार असून या कामांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

०००००


 

राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार

 राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार

 

  • वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले निर्देश

 

  • राज्य वन्य जीव मंडळाची २२ वी  बैठक संपन्न३१ प्रस्तावांना मान्यता

 

 

मुंबईदि. १६ :

            राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे दृष्टीने बीएनएचएस या संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करावी तसेच जंगली म्हैस आणि लांडगा यांचेही संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा असे निर्देश राज्य वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्षवनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

 

            सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे  राज्य वन्यजीव मंडळाची 22 वी बैठक सोमवारी पार पाडली. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. शैलेश टेंभुरर्णीकरवन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. महीप गुप्ताआदी यावेळी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार यांनी आभासी पद्धतीने बैठकीला उपस्थित राहून प्रत्येक विषयावर सदस्यांसोबत चर्चा केली व आवश्यक सूचना केल्या.

सदर बैठकीत पाणी पुरवठ्याचे प्रस्तावभुमिगत OFC,  मेाबईल टॉवर उभारण्याचे  प्रस्तावराष्ट्रीय महामार्गाचे प्रस्तावभुयारी मार्गाचा प्रस्तावमंदीर पायऱ्या दुरुस्तीचा प्रस्तावविज वाहिनीचे प्रस्ताव,  नैसर्गिक गॅस पाईप लाईनचा प्रस्ताव,  पाटबंधारे नुतनीकरणाचा प्रस्ताव,  खाणीचे प्रस्ताव अश्या  31 विकास प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात आली.

वन्यजीव मान्यतेची प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यासाठी  उपाध्यक्ष तथा मंत्री (वने) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची स्थायी समिती स्थापन करण्यास मंडळाने मान्यता प्रदान केली. यामुळे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्यास मदत होणार आहे.

 

              जिल्हा नागपूरता. पारशिवनी येथिल मौजे सालेघाट,  या गावाचा अंतर्भाव करुन  मानसिंग देव विस्तारीत अभयारण्य घोषित करण्याबाबत मंडळाने मान्यता दिली आहे. राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने बीएनएचएस या संस्थेच्या सहकार्याने योजना तयार करणेजंगली म्हैस आणि लांडगा यांची संवर्धन करण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी मंडळाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

अग्रसेन समाजाने संस्कारांची कास सोडली नाही

 अग्रसेन समाजाने संस्कारांची कास सोडली नाही

 

वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार

 

चंद्रपूर अग्रसेन समाजातर्फे श्री अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन

 

चंद्रपूरदि.१६- अग्रसेन समाज कायम आपल्या विचारांच्या मार्गावर चालत आला आहे आणि पुढच्या पिढीमध्ये त्या विचारांची प्रेरणा समाजातील लोकांनी निर्माण केली आहे. अग्रसेन समाज भारतीय संस्कृतीउत्सवऐतिहासिक वारशाबद्दल आग्रही राहिला आहे. आज जग कितीही बदलले असले तरीही अग्रसेन समाजाने संस्कारांची कास सोडलेली नाहीअसे गौरवोद्गार राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

 

चंद्रपूर अग्रसेन समाजातर्फे आयोजित महाराजा श्री अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री रामदासजी अग्रवाल नागपूरचंद्रपूर अग्रवाल समाजाचे अध्यक्ष वेदप्रकाशजी अग्रवालमहानगरपालिकेचे आयुक्त विपीनजी पालीवालसतपालजी जैनशैलेशजी बागलामहिला अध्यक्ष कुसुमताई रुंगठामहिला उपाध्यक्ष मायादेवी अग्रवाल यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारीसदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ना. श्री. मुनगंटीवार यांनी सुरुवातीला महाराजा श्री अग्रसेन यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘अशा प्रसंगांना समाजातील सर्व लोक एकत्र येतात तेव्हा आनंद होतो. कारण याठिकाणी संवादाच्या माध्यमातून विचारांचे आदान प्रदान होत असते. ‘मॅन इज ए सोशल एनिमल ते मॅन इज ए सेल्फीश एनिमल’ असा मनुष्याचा प्रवास झाला आहे. त्यामुळे या काळात एकत्र येऊन संवाद साधणे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे आज अग्रसेन समाजातील बांधव एकत्र आलेत याचा विशेष आनंद आहे.’ ‘पूर्वी तंत्रज्ञानाचा अभाव होता पण सुखाचा प्रभाव होता. आता मोबाईल हाती आला आहे. कुटुंबातील लोक एकत्र आले तरीही मोबाईलमुळे लांब असल्यासारखे वाटतात. आज तंत्रज्ञानाचाविज्ञानाचा प्रभाव आहेपण आनंदाचासुखाचा आणि आपलेपणाचा अभाव आहे. अशा कार्यक्रमांतून हा आपलेपणा वाढतो,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढलाती वाघनखे भारतात आणण्यासाठी करार करण्याकरिता मी लंडनला गेलो होतो. तेथील भारतीय लोकांना भेटल्यावर मला एका गोष्टीचे फार आश्चर्य वाटले. आपण भारतात राहून आपल्या भारतीय संस्कारांची जेवढी चर्चा करत नाहीत्यापेक्षा जास्त पटींनी तेथील भारतीय आपल्या संस्कारांच्या बाबतीत आग्रही आहेत. त्यानंतर जपानमध्ये कोबे शहरात गेलो होतो. तिथे दिडशे वर्षांपूर्वी भारतीय नागरिक मोत्यांचा व्यापार करायला आले. त्यांच्यातील आजच्या तरुण पिढीला भेटलोतर भगवद्गीतेतील श्लोक त्यांना अतिशय सहजतेने म्हणताना बघितले. जपान आणि लंडनमध्ये राहून तेथील भारतीय संस्कारांबद्दल आग्रही आहेतयाचा अभिमान वाटतो,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

 

अग्रसेन भवन ही फक्त इमारत नाही’

अग्रसेन भवनाबद्दल बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘अग्रसेन भवन फक्त विटा आणि सिमेंटने उभी झालेली एक साधी इमारत नाही. हे समाजाचेसंस्कारांचे भवन आहे. याठिकाणी समाजातील तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सारे एकत्र येऊन समाजाच्या कल्याणाचा विचार करणार आहेत. याठिकाणी आपलेपणाचाप्रेमाचा भाव निर्माण होणार आहे.’

 




राज्य में प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्र का गुरुवार को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा किया जाएगा उद्घाटन

 राज्य में प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्र का

गुरुवार को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा किया जाएगा उद्घाटन

महाराष्ट्र की अभिनव संकल्पनामुख्यमंत्री ने तैयारियों को लेकर की समीक्षा

देश भी संज्ञान लेगाऐसी है योजना

             मुंबईदि. 16 अक्टूबर :- प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्र की  संकल्पना  राज्य के युवाओं को रोजगार के अवसर मुहैया कराने और ग्रामीण भागों के विकास को बढ़ावा देने वाली है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ग्रामीण भागों में युवाओं को रोजगार उपलब्ध कराने के अवसर और उन्हें आत्मनिर्भर बनाने को प्राथमिकता दी है। महाराष्ट्र की इस अभिनव संकल्पना का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा उद्घाटन किया जाना भी गर्व की बात है। इसलिएइस कार्यक्रम को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाने के लिए योजना बनाएऐसा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज यहां पर दिया है।

             प्रधानमंत्री श्री मोदी के करमकलों द्वारा गुरुवार 19 अक्टूबर 2023 को शाम 4 बजे राज्य में 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केन्द्रों का ऑनलाइन पद्धति से उद्घाटन किया जाएगा। इस कार्यक्रम की पूर्व तैयारी को लेकर मुख्यमंत्री श्री शिंदे की अध्यक्षता में कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढ़ाउद्योग मंत्री उदय सामंत की उपस्थिति में राज्य के विभागीय आयुक्तोंजिला अधिकारियों और जिला परिषदों के मुख्य कार्यकारी अधिकारियों (सीईओ) के साथ ऑडियो विजुअल संचार प्रणाली  के माध्यम (ऑनलाइन) से बैठक आयोजित की गई। इस बैठक में मुख्य सचिव मनोज सौनिकराजस्व एवं वन विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव राजगपोल देवरानगर विकास विभाग के प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज,  ग्रामीण विकास विभाग के प्रमुख सचिव एकनाथ डवलेसूचना एवं जनसंपर्क महानिदेशक जयश्री भोज और आदि उपस्थित थे। इस बैठक में कौशल विकास आयुक्त डॉ. ए. रामास्वामी ने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केन्द्रों की संकल्पना और उद्घाटन समारोह की तैयारियों के बारे में जानकारी दी।

             यह उद्घाटन समारोह प्रधानमंत्री श्री. मोदी के सबसे पंसदीदा विषयों से संबंधित हैऐसा बताते हुए मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि युवाओं के लिए रोजगार के अवसरों और ग्रामीण भागों के विकास को बढ़ावा देने के लिए यह एक महत्वपूर्ण कदम है। प्रधानमंत्री श्री. मोदी ने इस कार्यक्रम के लिए अपना समय देकर इस योजना को ताकत दी है। इस उद्घाटन समारोह के माध्यम से इन केंद्रों की जानकारी लोगों तक पहुंचाने का मौका मिला गया है। इस कार्यक्रम का राष्ट्रीय स्तर पर पहचान मिलने वाला है। इसलिए सभी यंत्रणा (सिस्टम) तैयार रहने चाहिए। इसमें कौशल विकासउद्योगराजस्वग्रामीण विकास के साथ-साथ महिला एवं बाल विकास विभाग भी हिस्सा लें। इस तरह से योजना बनाई जाए कि महाविद्यालय एवं विश्वविद्यालय भी इसमें भाग ले सकें। यह एक शुरुआत है और आगे चलकर इन केंद्रों की संख्या को बढ़ाया जाएगा। इसलिए पहले चरण में यह केंद्र जिन-जिन गांवों में शुरू किया जाने वाला हैउन गांवों के आस-पास के गांवों के नागरिकजन प्रतिनिधि एवं विभिन्न घटकों को इसमें कैसे शामिल किया जा सकता हैइसकी भी योजना बनायेंऐसा भी मुख्यमंत्री ने कहा है।

             मुख्यमंत्री ने इस कार्यक्रम की योजना के लिए जिला स्तर पर जिला अधिकारी के नेतृत्व में एक समन्वय समिति नियुक्त करने के भी निर्देश दिया है। इसके साथ ही सभी अधिकारियों को अपने-अपने परिसर के केंद्र पर उपस्थित रहकर इस उद्घाटन समारोह में शामिल होंऐसा भी आवाह्न  श्री. शिंदे ने किया है।

             इस अवसर पर मुख्यमंत्री ने उद्घाटन समारोह स्थल अगर मैदान है तो वहां मंडप लगानेपीने के पानी की व्यवस्था करनेइंटरनेट की सुविधास्क्रीन लगानेविद्युत की आपूर्ति सुचारु रुप करने की व्यवस्था के बारे में भी निर्देश दिये है।

             इस कौशल विकास केंद्र के उद्घाटन समारोह में ग्राम पंचायत सदस्यों से लेकर जिला परिषद के सदस्यपंचायत समिति के सदस्यविधायकसांसदआशा और आंगनबाडी सेविकाओं आदि को भी हिस्सा लेने का निर्देश दिया गया है। इस कार्यक्रम में विश्वकर्मा योजना से जुड़े लाभार्थियों और इसी तरह से बलुतेदार घटकों को भी शामिल किया जाएगा।

0000

PM Narendra Modi to inaugurate Pramod Mahajan Rural Skill Development Centers in State

Innovative concept of Maharashtra; CM takes stock of preparations

A novel scheme of which the country should take cognizance of

 

      Mumbai, Oct. 16: Pramod Mahajan Rural Skill Development Center is a concept that envisages giving impetus to employment generation for the youth in the state besides encouraging rural development. Prime Minister Narendra Modi has accorded priority to provide job opportunities for rural youth and to make them self-reliant. It is a matter of great honor for the state that Prime Minister Narendra Modi himself has consented to inaugurate this innovative and novel scheme of Maharashtra. We must make arrangements to take the message of this program to the maximum number of people, directed Chief Minister Eknath Shinde here today.

      Prime Minister Narendra Modi will inaugurate the 511 Pramod Mahajan Rural Skill Development Centers in the state on Thursday, October 192023, at 4 p.m. online. Chief Minister Shinde was addressing a meeting held to review the preparations for this program. Skill Development Minister Mangal Prabhat Lodha and Industry Minister Uday Samant were prominently present at the meeting. All the Divisional Commissioners, district Collectors, and Zilla Parishad CEOs were connected to this meeting through the videoconferencing system. On this occasion Chief Secretary Manoj Saunik, Additional Principal Secretary of Revenue and Forest Departments Rajgopal Deora, Principal Secretary of Urban Development Department Dr. K. H. Govindraj, Principal Secretary of Rural Development Department Eknath Dawale, Director General of Information and Public Relations Department Jayashri Bhoj were present. Skill Development Commissioner Dr. A. Ramaswami presented information about the concept of the Pramod Mahajan Rural Skill Development Center and its inauguration function.

      Since this inauguration function is related to the subject dear to Prime Minister Narendra Modi it should be held with grandeur and stature, said Chief Minister Shinde and added that this is an important step forward to give an impetus to employment opportunities for the youth and development of rural areas. We have this opportunity to take the message of this scheme to maximum people through this inauguration function. This program will be such that its cognizance will be taken at the national level. Therefore, all the agencies should get ready to make this program a grand success, Shinde said. He said that we have to include the Women and Child Development department in this program along with Skill Development, Industry, Revenue, and Rural Development. Planning should be done in such a way that colleges and universities can also participate in this program. This is just the beginning and the number of centers will be increased in the future. Hence we should make efforts to seek maximum participation of people, public representatives, and other constituents of the villages, where these centers will be started in the first phase and from their surroundings, the Chief Minister said.

      The Chief Minister also directed to set up a coordination committee at the district level under the leadership of the district collector for the planning of this program. Besides, he also appealed to all the officers to remain present at their centers in their jurisdiction and participate in this function.

      Chief Minister Shinde gave instructions for making arrangements for a pandal at the inauguration venue in case it is held in the open ground, drinking water, internet facility, screen, uninterrupted electricity supply, etc. at the program venue.

      Instructions have been issued to include gram panchayat members, ZP, Panchayat Samiti members, MLAs, MPs, and AASHA and Anganwadi workers in this inauguration program of the Skill Development Centers. Besides beneficiaries of the Vishwakarma scheme and Balutedars will also be included in this program.

0000


राज्यपालांच्या हस्ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

 राज्यपालांच्या हस्ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी

ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

 

            मुंबई, दि. 16 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीत शिकणाऱ्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहविज्ञान व शरीरशास्त्र या विषयावरील एका सामायिक क्रमिक पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे सोमवारी (दि. १६) प्रकाशन करण्यात आले.

            दहावीच्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना विज्ञान भाग १ व २ या विषयांची प्रॅक्टिकल करताना अडचणी होत असल्यामुळे उपरोक्त दोन विषयांची पुस्तके तयार करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट या संस्थेच्या पुढाकाराने ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व मिल्टन कंपनीच्या सहकार्याने शाळांमध्ये मोफत वितरणासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

            दिव्यांग व्यक्तींचे विधेयक तयार करणाऱ्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो. दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको, तर सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्यपालांनी सांगितले. शासनाकडून दिव्यांग व्यक्तींना विविध ऑर्थोपेडिक उपकरणे तसेच श्रवणासाठी कॉक्लिअर इम्प्लांटसाठी देखील मदत केली जाते. रोटरी क्लबने केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तयार करून न थांबता पुढील वर्गांसाठी लागणारी ब्रेल लिपीतील क्रमिक पुस्तके देखील तयार करून घ्यावीअशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

            कृत्रिम प्रज्ञा आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानामुळे  विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतिकारक बदल घडत आहेत. या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे दृष्टिहीन विद्यार्थी अधिक कार्यक्षम पद्धतीने माहिती मिळवू शकतात. दृष्टिहीन तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे तसेच त्यांच्या कौशल्य विकासाला चालना देणे गरजेचे आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी माजी खासदार संजीव नाईकरोटरी जिल्हा ३१४२ चे गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी व रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटचे अध्यक्ष सुकुमारन नायर यांची भाषणे झाली. यावेळी उपस्थित दृष्टीबाधित विद्यार्थ्याने ब्रेल लिपीतील पुस्तकातील परिच्छेद वाचून दाखवला.

            या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला चेतना सिंहब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे अरुण पारसकरप्रकल्पप्रमुख पियूष नागदाबलजिंदरसिंग कुमारअजित चव्हाणधनंजय सिंहमिल्टन कंपनीचे अधिकारी तसेच बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.  

 

जागतिक सागरी शिखर परिषदेस मंगळवारपासून मुंबईत प्रारंभ

 जागतिक सागरी शिखर परिषदेस मंगळवारपासून मुंबईत प्रारंभ

महाराष्ट्रातील बंदर विकासासंदर्भातही विशेष चर्चासत्र

            मुंबई, दि. 16 : जागतिक सागरी शिखर परिषद 17 ते 19 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत मुंबई येथे होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंगळवारी सकाळी 9-30 वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या परिषदेचे उद्घाटन करणार असून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्याचे बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर ही परिषद होत आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील बंदरे विकासासंदर्भातही विशेष चर्चासत्र होणार आहे.


            मुंबईत होणारी ही जागतिक सागरी शिखर परिषद राज्यातील सागरी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई बंदरास 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, देशाच्या सागरी विकासाला चालना देणाऱ्या धोरणा संदर्भातील पुस्तकाचे प्रकाशन याशिवाय प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्धाटन यावेळी करण्यात येणार आहे.


राज्याच्या बंदर विकासासंदर्भात चर्चासत्र


            राज्यातील बंदरे विकास, परिवहन, उद्योग, पर्यटन क्षेत्रातील वाटचालीसंदर्भात मंगळवारी दुपारी 2 ते 3-30 या दरम्यान चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री श्री. बनसोडे हे यामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, उद्योग व खनिकर्म विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय, बंदरे विकास आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचाही यामध्ये सहभाग असणार आहे.


महाराष्ट्राचे विशेष पॅव्हेलियन


            राज्यातील बंदरांचा विकास, पर्यटन क्षेत्रातील संधी आणि उद्योग क्षेत्राची भरारी यासंदर्भातील माहिती देणारे विशेष पॅव्हेलियन या सागरी शिखर परिषदेत असणार आहे.


                                                                        00000

Featured post

Lakshvedhi