Thursday, 28 September 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनईद-ए-मिलादच्या शुभेच्छा


            मुंबई, 27 सप्टेंबर : ईद-ए-मिलादनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबर यांची शांततेची शिकवण अंगीकारणे हेच महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “ईद-ए-मिलाद हा सण परस्परांमधील विश्वास आणि प्रेम वाढविणारा आहे. मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानव जातीच्या कल्याणाचा संदेश आपल्या आचारातून आणि विचारातून दिला आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जाताना संपूर्ण मानव जातीचा साकल्याने विचार केला पाहिजे. परस्परातील सामंजस्य आणि प्रेम वाढीस लागणे हे सर्वात महत्त्वाचे आहे”.

नाशिक जिल्हा बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठीसमिती गठित करून कृती आराखडा तयार करावा

 नाशिक जिल्हा बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठीसमिती गठित करून कृती आराखडा तयार करावा


- उपमुख्यमंत्री अजित पवार


            मुंबई, दि. 27 : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘नाबार्ड’कडून बँकिंग परवाना रद्द करण्याबाबतची अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पाया, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या या बँकेला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी बँकेची भांडवल पर्याप्तता वाढविण्यासह इतरही विविध उपाययोजना कराव्या लागतील. यासंदर्भात अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासह कृती आराखडा तयार करण्यासाठी समिती गठित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणींबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, सहकार आयुक्त अनिल कवडे (व्हीसीद्वारे), विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, ‘नाबार्ड’चे मुख्य महाव्यवस्थापक गोवर्धनसिंह रावत, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष (प्रशासक) विद्याधर अनास्कर (व्हीसीद्वारे), नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांसह शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नाशिक जिल्हा बँकेला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे बँकेची सद्य:स्थिती तपासून, विविध पर्यायांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासह त्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी. या समितीने नाबार्डकडून बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत आलेल्या नोटीस संदर्भात कृती आराखडा तयार करावा आणि सविस्तर प्रस्ताव नाबार्डला सादर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.


--------------०००००------------

भवताल इकोटूर्स... पर्यटनाचा वेगळा अंदाज !


 भवताल इकोटूर्स... पर्यटनाचा वेगळा अंदाज !

(आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त)


नागरिकांना असं काहीतरी वेगळं देता आलं पाहिजे, जे इतर कोणी दिलं नसेल... शिवाय त्यातून काहीतरी शिकायला अनुभवायला सुद्धा मिळायला हवं...


मग असं काय असू शकेल?

लोकांना खडक उलगडून दाखवले तर.. दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन व्यापारी मार्गावर फिरवले तर.. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या पाण्याच्या अफलातून व्यवस्थांची सफर घडवली तर.. मान्सूनसोबत फिरून वेगळा अनुभव देता आला तर..


‘भवताल इकोटूर्स’ या उपक्रमाचे मूळ आहे ते, असं वेगळं काहीतरी देण्याची पॅशन / प्रेरणा आणि लोकांना आपला निसर्ग-पर्यावरण-वारसा या व्यापक भवतालाशी जोडून घेण्याच्या धडपड, यामध्ये. त्यातूनच नवनव्या कल्पना निर्माण होत गेल्या, त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्यासुद्धा! दोन वर्षापूर्वी ज्या गोष्टी केवळ मनातील कल्पना होत्या - फॅन्टसी होत्या, त्या आज प्रत्यक्ष घडताना पाहताना कमालीचा आनंद होतो, उत्साहही वाढतो.


या उपक्रमातून नेमकं काय मिळतंय?.. कल्पना करा की, एखाद्या मुलाला / व्यक्तीला जीवाश्म (फॉसिल्स) पाहायचेत, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचेत. त्याला भूविज्ञानाची पार्श्वभूमी नाही आणि निसर्गाचा अभ्यासही नाही. अशा व्यक्तीला जीवाश्म पाहता येतील का - समजून घेता येतील का? त्याची ही इच्छा कशी पूर्ण होईल?


हे एक छोटंसं उदाहरण. निसर्गातील अशा कितीतरी गोष्टी मुलांना / लोकांना पाहायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत, समजूनही घ्यायच्या आहेत. त्यासाठी मार्ग कोणता? ते घडवून आणणारा मंच कोणता? आता माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आणि जग जवळ आल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. निसर्गातील विलक्षण गोष्टी, प्राचीन वारसा-संस्कृती, पुरातत्त्वीय गोष्टी, पाण्याच्या व्यवस्था, प्राचीन हवामान, त्या काळातील जीव-त्यांचे अवशेष... असं कितीतरी मोठं जग खुलं झालं आहे. त्यातूनच आपल्या अवतीभवतीच्या सुद्धा अशाच अद्भुत गोष्टींचा शोध घेण्याची, त्या पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. ही प्रेरणा, कुतूहल यांना योग्य दिशा देण्याची आणि वाट उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची भूमिका ‘भवताल इकोटूर्स’ हा उपक्रम बजावत आहे.


नागरिकांना अशा प्रकारे आगळावेगळा अनुभव देणे आणि तज्ज्ञांसोबत या गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे सारं. त्यातून मिळणारा आनंद, शमणारं कुतूहल, पुन्हा नव्या गोष्टींबद्दल निर्माण होणारी उत्सुकता... हे शब्दांत मांडता येणार नाही. या सर्वांच्या मुळाशी असलेला प्रमुख उद्देश म्हणजे- लोकांना व्यापक भवतालाशी जोडून घेणे. त्यातूनच त्याबद्दलची खरीखुरी जागरुकता निर्माण होईल आणि ‘भवताल’ या मंचाला अभिप्रेत असलेला पर्यावरणसजग समाजाच्या निर्मितीचा उद्देश काही प्रमाणात तरी साध्य होईल. त्यासाठीच हे प्रयत्न!


आताशी कुठं सुरूवात आहे, पुढे अख्खा महाराष्ट्र वेगवेगळ्या थीम्सद्वारे पालथा घालायचा आहे. त्यातील धमाल गोष्टी जगापुढं आणायच्या आहेत, त्यांचा अद्भुत अनुभव लोकांना द्यायचा आहे. महाराष्ट्रापाठोपाठ इतरही राज्ये आणि देश असं भलं मोठं दालन समोर आहे. त्यातलं जे आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, व्यापक पद्धतीने पोहोचलं नाही, ते पोहोचवायचं आहे... अर्थातच, तुमच्या सर्वांच्या साथीने!


‘भवताल इकोटूर्स’ तर्फे आतापर्यंत प्रत्यक्षात आलेल्या काही थीम्स:

• कलर्स ऑफ मान्सून

• लाईफ ऑन प्लॅटूज

• फ्लर्टिंग वुईथ द रॉक्स

• दोन हजार वर्षांच्या प्राचीन व्यापारी मार्गावर

• एक तरी वाडी अनुभवावी...

• अजिंठ्यातील रहस्यांचा शोध

• वंडर्स ऑफ जिऑलॉजी

• वसंतोत्सव

• भंडारदरा, सांधन आणि कळसुबाई (मुलांसाठी नेचर-कॅम्प)

• एक्सप्लोरिंग मान्सून @केरळ

• वर्ल्ड्स् हेविएस्ट रेन @चेरापुंजी

• ऐतिहासिक जलव्यवस्थांची सफर

• कातळशिल्पांच्या गूढ विश्वात (आगामी)

• जीवाश्मांसोबत पृथ्वीचा इतिहास @कच्छ (आगामी)


- अभिजित घोरपडे

संस्थापक, भवताल मंच

bhavatal@gmail.com


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and s

ustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

पोस्ट ऑफिस मध्ये मुदत बंद ठेवी असतील तर खबरदारी घा,हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेयर करा,


 

Wednesday, 27 September 2023

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी

 ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय


            मुंबई, दि. २७ : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.


            ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता. 


            अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात


            अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.


            गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.


            गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.


            उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.


मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा


            ‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


             ‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

गणपती उत्सव कोकणा प्रमाणे साजरा केला तर आपली कुटुंब संस्कृती अजून मजबूत बनेल...◆* 😌🙏🏻

 (अत्यंत वाचनीय आणि अनुकरणीय लेख...)


*◆गणपती उत्सव कोकणा प्रमाणे साजरा केला तर आपली कुटुंब संस्कृती अजून मजबूत बनेल...◆* 😌🙏🏻



कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई-वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई-

वडिलाच्या घरात राहतो फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.

    

नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. 


भावा-भावात कितीही भांडणे असले तरी या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा तिथला कडक नियम आहे.

   

असे गणपती मुळे एकत्र आल्याने कधी-कधी जुने भावां तील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. 


नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे मनाई असते नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.

    कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं.


 आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, भजने, दशावतार, शक्ती तुरा नाच, नमन भारुड,कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात  करतात आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात..! 

    

गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या-गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं... पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा-गावात, घरा-घरात पहायला मिळते.

     

योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व कोकणाच्या बाहेर  प्रेम, माया संपत चालली आहे. *एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. 


एका आई-वडिलाची मुले पण  द्वेष, मत्सर वाढत चाललाय. 


त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे.*

    दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. 


आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात. संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी,जमीनी साठी  भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा जागा मिळणार नाही...


   कोकणासारखे वागून बघावे कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही.


 तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी, नाहीतर कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास...

   


साधेपण जपावा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून  घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा. 


गौराई बसवतात तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात तसे आपल्याच  बहिणी काही नाही जमले तर कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे, जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल, ही भोळी अपेक्षा जरी असले तरी प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावांचे-बहिणींचे,भावा भावांचे  एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही...🙏 *गणपती बाप्पा मोरया*.🙏

घार आली पहा,

 

तनाया भोईर,Carmel school pen

Featured post

Lakshvedhi