Friday, 22 September 2023

प्रत्येक आई वडीलांनी आपल्या मुलांना हे सत्य सांगावे.* 👇

 *प्रत्येक आई वडीलांनी आपल्या मुलांना हे सत्य सांगावे.* 👇

दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध 27 वर्षाचा फुटबॉल खेळाडू 

*सादिओ माने सेनेगल* 

याची भारतीय चलनानुसार पाहायला गेले तर एका आठवड्याची कमाई 1 करोड 40 लाख रूपये आहे. ह्या खेळाडूला अनेक वेळा लोकांनी त्याला हातात तुटलेल्या फोन सह पाहिलेले आहे. 

एक मुलाखती दरम्यान शेवटी मुलाखत घेणा-यांने त्याला डिवचलेच की, 

तुमचा फोन तुटला आहे,....!!! 

तर त्यांनी सहजपणे पत्रकाराला 

उत्तर दिले की, "मी ठीक करून घेईल." 

परंतु पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही म्हणून त्याने सेनेगलला दुसरा प्रश्न विचारला की, 

तुम्ही नवीन फोन का घेत नाही....??? 

त्यावर सेनेगल बोलले की, 

असे हजार फोन मी घेवू शकतो,

 10 फेरारी घेवू शकतो. 

2 जेट विमान खरेदी करू शकतो.

 डायमंडची घड्याळे खरेदी करू शकतो. 

परंतु ह्या सर्वांची मला गरज काय आहे....??? 

मी गरीब घरातूनच आलेलो आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. 

परंतु शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी शाळा, कॉलेजेस बांधले आहेत. 


माझ्या जवळ चांगले बुट नव्हते, तेव्हा मी विना शुज सह खेळत होतो. अंगावर घालण्यासाठी चांगली कपडे नव्हती. एक वेळच्या जेवणाची चिंता आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाणी पिऊन आम्ही झोपायचो आणि आज सर्व काही मला मिळत आहे तर त्याचा देखावा करण्याऐवजी मी माझी संपत्ती माझ्या लोकांसाठी खर्च करतो ज्यामुळे मला त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहून मानसिक समाधान मिळते.


किती मोठ्या मनाचा, किती उदात्त विचार,

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा*

🙏🌹

ह्या जन्मावर हया जगण्यावर शतदा प्रेम करावे

 *जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय* 

*पटलं तर असे karun paha* 


१) जिथे राहता त्या कॉलनीत 

     चार तरी कुटुंब जोडा,

     अहंकार जर असेल तर

     खरंच लवकर सोडा ।।


२) जाणं येणं वाढलं की 

     आपोआप प्रेम वाढेल, 

      गप्पांच्या मैफिलीत

      दुःखाचा विसर पडेल ।।


३) महिन्यातून एखाद्या दिवशी 

     अंगत-पंगत केली पाहिजे,

     पक्वान्नाची गरजच नाही 

     पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।


४) ठेचा किंवा भुरका केल्यास 

     बघायचंच काम नाही,

     मग बघा चार घास

     जास्तीचे जातात का नाही ।।


५) सुख असो दुःख असो 

     एकमेकांकडे गेलं पाहिजे,

     सगळ्यांच चांगलं होऊ दे 

     असं देवाला म्हटलं पाहिजे ।।


६) एखाद्या दिवशी सर्वांनी 

     सिनेमा पहावा मिळून, 

     रहात जावं सर्वांशी 

     नेहमी हसून खेळून ।।


७) काही काही सणांना 

     आवर्जून एकत्र यावं,

     बैठकीत सतरंजीवर 

     गप्पा मारीत बसावं ।।


८) नवरा बायको दोन लेकरात 

     "दिवाळ सण" असतो का?,

      काहीही खायला दिलं तरी 

      माणूस मनातून हसतो का?


९) साबण आणि सुगंधी तेलात 

     कधीच आनंद नसतो,

     चार पाहुणे आल्यावरच 

     आकाश कंदील हासतो 


१०) सुख वास्तूत कधीच नसतं 

        माणसांची ये-जा पाहिजे,

        घराच्या उंबर्ठ्यालाही

        पायांचा स्पर्श पाहिजे ।।


११) दोन दिवसासाठी का होईना

       जरूर एकत्र यावं,

       जुने दिवस आठवताना

       पुन्हा लहान व्हावं ।।


१२) वर्षातून एखादी दुसरी 

       आवर्जून ट्रिप काढावी,

       "त्यांचं आमचं पटत नाही"

       ही ओळ खोडावी ।।


१३) आयुष्य खूप छोटं आहे 

       लवकर लवकर भेटून घ्या 

       काही धरा काही सोडा 

       सगळे वाद मिटवून घ्या


१४) पटलं तरच पुढे पाठवा 

       तसेच आपल्या ह्रदयातही साठवा,

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे

 शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन


            मुंबई दि. २१ :- ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राज्यातील शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे आणि नूतनीकरण केलेल्या मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन करण्यात आले.


             यावेळी आमदार यामिनी जाधव उपस्थित होत्या. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुश्रीफ यांनी रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष आणि मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृह हे रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा लाभ गरजू रुग्णांना नक्कीच होईल, असे सांगितले. जे. जे. रुग्णालयात येत्या काळात विविध उपकरणांनी सुसज्ज, अशा अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


            शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जे. जे. रुग्णालय, मुंबई, ससून रुग्णालय, पुणे, शासकीय रुग्णालय, छत्रपती संभाजी नगर, शासकीय रुग्णालय नागपूर येथे लवकरच मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण विभागाची सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व शासकीय रुग्णालय हे गरजू रुग्णांना अहोरात्र रुग्णसेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


            ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज.जी. समूह रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेले सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट हे ३४ अद्ययावत खाटांनी सुसज्ज असून त्यामध्ये वेगळा आयसोलेशन कक्ष, बायोमेडिकल वेस्ट कक्ष तथा निगेटिव्ह प्रेशर रुमची ही सोय असणार आहे. त्याचप्रमाणे नूतणीकरण करण्यात आलेली मॉड्यूलर शस्त्रक्रियागृह ही सर्व अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असून ऑटोमॅटिक पद्धतीने वापरण्याजोगी असेल. या शस्त्रक्रियागृहमधून वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना क्लासरुममध्ये बसून शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

पर्यावरणपूरकपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

 पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

घरच्या गणेशमूर्तीचे केले कृत्रिम तलावात विसर्जन

 

            ठाणे दि. 21 :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी स्वत: कृतीशील पुढाकार घेतला. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन मुख्यमंत्र्यांनी काल (20 सप्टेंबर 2023) रोजी कृत्रिम तलावात केले. त्यांच्या या पर्यावरणपूरक कृतीचे ठाणेकरांनीही मोठ्या प्रमाणात अनुकरण केले. 

        महानगरपालिका क्षेत्रात दीड दिवसाच्या १३ हजार ९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या पर्यायी गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २०२ गणेश मूर्तींचे तसेच ११ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. 

            ठाणे महानगरपालिकेचे  आयुक्त अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे  यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी शहरात दीड दिवसपाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेंतर्गत रायलादेवी येथे दोनआंबेघोसाळेउपवन पालायदेवीनिळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळेखारेगाव आदी ठिकाणी एकूण १५ कृत्रिम तलावांची व्यवस्था महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली आहे, तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मीठबंदरकळवागायमुख आदी सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबरमहानगरपालिका क्षेत्रात एकूण ४२ ठिकाणी विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

            ठाणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा व तेथे विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची संख्या पुढीलप्रमाणे - विसर्जन घाट (०७) - ११ हजार ९१० गणेश मूर्तीकृत्रिम तलाव (१५) - ९६८ गणेश मूर्तीविशेष टाकी व्यवस्था (४२) - १ हजार ७७ गणेश मूर्तीअशा एकूण १३ हजार ९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

00000

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून

 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून


अतिरिक्त निधी उभारणार प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करावीत


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. २१ : राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.


            सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘मित्र’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासह नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक शाहजी केव्ही, एलआयसीचे श्री. पांडे आणि एसबीआय कॅपिटलचे कार्यकारी उपाध्यक्ष राजन गुप्ता आदी उपस्थित होते.


            राज्यातील निवडक ८९ लघु सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत असून ते पूर्ण करण्याकरिता ७ हजार ३५१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे प्रकल्प एका वर्षात पूर्ण झाल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी उभारण्यासाठी वित्त, नियोजन, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास यांचे अपर मुख्य सचिव आणि ‘मित्र’ चे सीईओ यांनी एकत्रित निर्णय घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.


            ज्या प्रकल्पांसाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन झाले आणि ज्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद नाही, त्याच प्रकल्पांच्या कामांसाठी अतिरिक्त निधी उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेमधील आणि अमृत योजनेतील १४४ प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ हजार ६८६ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने देखील नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.


            महाराष्ट्र सिंचन आधुनिकीकरण कार्यक्रमातून कालव्यांची कामे केली, तर पैशांची बचत होण्याबरोबरच तातडीने कामे पूर्ण होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.


०००००

Thursday, 21 September 2023

पुणे येथे 22 सप्टेंबरपासून दुसरी खेलो इंडिया लीग

 पुणे येथे 22 सप्टेंबरपासून दुसरी खेलो इंडिया लीग


            नवी दिल्ली 21 : भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र, मुंबई यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने दुसरी खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीग (शहर/विभागस्तर) 2023 ही स्पर्धा पुणे येथे होणार असल्याची घोषणा केली आहे.


            ही स्पर्धा 22 सप्टेंबर 2023 पासून बाबूराव सणस मैदान, सारसबाग, पुणे, येथे होणार आहे. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट श्रेणींमध्ये) सहभागी होतील. एक खेळाडू जास्तीत जास्त 2 प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो.


            या लीगमध्ये होणा-या विविध क्रीडाप्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :


ट्रॅक आणि फील्ड: 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मीटर धावणे; लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक.


खेळाडूंनी आपली नावे खालील लिंकवर नोंदणी करावीत :


http://www.smrsports.in/athletic/registration/1694443132R1Fg1s5hIkqOzcm9fJYxbNhfgyKhtenM


            खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीगमध्ये महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील महिला खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. धावणे, उडी, थ्रो आणि रोड रेस यासह विविध ट्रॅक आणि फील्ड क्रीडा प्रकारात खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.


            खेलो इंडिया महिला लीगचा मुख्य उद्देश खेळाडूंना स्पर्धा करण्यासाठी आणि करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांचे पाऊल भक्कम करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.


* * *




जळगाव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कमदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी

 जळगाव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कमदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी


- कृषीमंत्री धनंजय मुंडे


 


            मुंबई दि. 21 : जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


            पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात सन 2022 - 23 या वर्षातील केळी व इतर खरीप पिकांच्या पीक विम्याबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुंडे बोलत होते. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते


            पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 2022-23 या वर्षांमध्ये 77,860 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले होते त्यामधून 81,510 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. त्यापैकी केवळ 46 हजार 949 अर्जांची तपासणी करण्यात आली होती. तसेच या कालावधीतील पीक परिस्थितीचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मागवून घेऊन फेर पडताळणी करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.


            यावेळी मंत्री श्री. पाटील व मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपेक्षा अधिक खंड दिला असल्याने पीक विम्याची 25 टक्के रक्कम अग्रीम देण्याची मागणी केली. यावर कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम रक्कम जमा होईल, असे सांगितले.


0000

Featured post

Lakshvedhi