Sunday, 27 August 2023

बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’प्रदान सोहळा २८ ऑगस्ट रोजी

 बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’प्रदान सोहळा २८ ऑगस्ट रोजी


क्रीडा मंत्री संजय बनसोडे


            मुंबई, दि २७: क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे सायंकाळी पाच वाजता प्रदान करण्यात येणार आहेत.


 


            हा पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.


 


             मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, तसेच क्रिडापट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या सोहळयात तीन वर्षांचे एकूण ११९ पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार (सन २०१९-२० ) श्री. श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे) यांना, (सन २०२०-२१) श्री दिलीप बळवंत वेंगसरकर आणि (सन २०२१-२२) श्री.आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना प्रदान करण्यात येणार असून विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.


 


            उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


                                                   

         ००००


 


 


निर्माल्य" आपणास काय शिकवते ???? जरुर वाचण्या सारखे.

 "निर्माल्य" आपणास काय शिकवते ???? जरुर वाचण्या सारखे.


ताज्या फुलांचे आपल्याला गोड कौतुक असते आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो, फुलांचाही फुलण्याचा जन्म सफल होतो.


फुले घेताना ती 'माझी' असतात, पण देवाला वाहिली की 'त्याची ' होतात...... किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त


'ज्याचे होते त्याला दिले' फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.


काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो.


त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.


अगदी तसेच, आपली दुःखे 'त्याच्या' चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे, त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही.


गण गण गणात बोते...

क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

 क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे  योगदान आवश्यक

आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार

टिबी मुक्त पंचायत उपक्रमाचा रायगड  जिल्ह्यापासून शुभारंभ.

 

            मुंबईदि. २६ - राज्य क्षयरोगमुक्त करण्याचा आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर  काम करावे. राज्य क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावेअसे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त  धीरजकुमार यांनी केले.

             आरोग्य सेवा आयुक्तालय,  मुंबई  येथे आयोजित टीबी मुक्त पंचायत अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त  धीरज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी  ते बोलत होते. कार्यक्रमास राज्याच्या क्षयरोग निर्मूलन विभागाचे सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईतसहसंचालक (रुग्णालय) डॉ. विजय  कंदेवाडसहाय्यक संचालक डॉ. अशोक  रणदिवेजे एस डब्ल्यू फाउंडेशनचे आशिष  जैनयु एस ई ए संस्थेचे प्रबोध भाम्बलशंकर दापकेकरइंडिया हेल्थ फंडचे माधव जोशी व गुरुविंदरपी पी कन्सल्टंट डॉ. सायली शिलवंतकार्यक्रम अधिकारी डॉ. अंकिता अहिरे उपस्थित होते.

               रायगड जिल्ह्यातील दहा गावांमध्ये टीबीमुक्त पंचायत  अभियानाची सुरूवात करण्यात येत  असल्याचे सांगत  आयुक्त म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२५ सालापर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या या महत्त्वकांक्षी योजनेतंर्गत देशभरातील १००० पंचायतींना टीबी मुक्त करण्यात येणार  आहे. महाराष्ट्रातील टीबी मुक्त पंचायत अभियानाची सुरवात रायगड जिल्ह्यातून करण्यात येत  आहे. जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील दहा गावामधील सुमारे १०  हजार नागरिकांची तपासणी  करून टीबी रुग्णाचा शोध,  निदान,  उपचार व  निर्मुलन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अभियानाच्या यशानंतर राज्यभर टीबी मुक्त पंचायत अभियान राबवण्यात येणार आहे.   या अभियानाला द युनियन साऊथ इस्ट आशिया (USEA)  यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार असून,  जे एस डब्ल्यू फाउंडेशन सी एस आर मधून आर्थिक मदत देणार आहे.  या बैठकीत माय लॅबचे हँडी एक्स-रे मशीन तसेचखोकल्याच्या आवाजावरून टीबी निदान करणाऱ्या ॲपचे  प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

            याप्रसंगी ठाणेरायगडपालघर व  रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

फ्रँकफर्ट मधील अभ्यासभेटीचा लोकप्रतिनिधींना उपयोग

 फ्रँकफर्ट मधील अभ्यासभेटीचा लोकप्रतिनिधींना उपयोग


                                                               – डॉ.नीलम गोऱ्हे


 


        मुंबई दि.25 : भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध असून फ्रँकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय मराठी मंडळाच्या माध्यमातून हे मैत्रीसंबंध आणखी दृढ होत आहेत. जर्मनीने आधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम नेतृत्व या आधारे गाठलेला सर्व क्षेत्रातील प्रगतीचा टप्पा निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. भारताचे फ्रँकफर्ट येथील महावाणिज्यदूत श्री.अमित तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभ्यासभेटीमुळे उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषीउत्पादनप्रक्रिया व शाश्वत विकास उद्दिष्ट्ये यासंदर्भातील माहितीची आदान-प्रदान शक्य झाले. त्याचा अभ्यासभेटीवर असलेल्या लोकप्रतिनिधींना निश्चितच उपयोग होईल. या विषयांवर भारतीय प्रशांत विभागातील भारत व जर्मनी यांच्यामधील करारांबाबत पाठपुरावा आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. आज दिनांक 25 पासून महाराष्ट्र विधानमंडळाच्या 22 सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यासदौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व डॉ.नीलम गोऱ्हे करित आहेत. आजच्या फ्रँकफर्ट येथील अभ्यासभेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. महावाणिज्यदूत श्री.अमित तेलंग यांनी प्रारंभी सर्व शिष्टमंडळ सदस्यांचे स्वागत केले. या प्रसंगी उप सभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते त्यांचा तसेच अन्य मान्यवरांचा गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या अभ्यासभेटीतील चर्चेत माजी मंत्री श्रीमती विद्या ठाकूर, श्री.माणिकराव कोकाटे, श्री.अमित झनक, श्री.अभिजीत वंजारी, श्रीमती मनिषा चौधरी यांसह अनेक मा.सदस्यांनी भाग घेतला. आंतरराष्ट्रीय मराठी मंडळाचे पदाधिकारी श्रीमती शिल्पा मडगडे, श्रीमती प्रिती सोनईकर, श्रीमती भावना जोशी, डॉ.श्रुती कुलकर्णी श्री.ऋषीकेश कुलकर्णी, श्री.समीर मेस्त्री यांनी देखील आपले अनुभव यावेळी सांगितले.


                                                                     000000       



 



व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे : राज्यपाल रमेश बैस

 व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे : राज्यपाल रमेश बैस


            मुंबई दि.26 : जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. व्यापक समाज हितासाठी कार्य केल्यास ते 'लघुतेकडून प्रभुतेकडे' नेणारे मोठे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. 


            जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांच्या 'तेरापंथ प्रोफेशनल फोरम' या संस्थेतर्फे 'लघुतेकडून प्रभुतेकडे' या विषयावरील दोन दिवसांच्या 16 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत नंदनवन परिसर, ठाणे येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            उदघाटनाला जैन तेरापंथ समाजाचे अध्यात्मिक प्रमुख आचार्य महाश्रमण, साध्वी प्रमुखा विश्रुत विभा, मुनी महावीर कुमार, तेरापंथ प्रोफेशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल, विश्वस्त चंद्रेश बाफना, रायपूरचे माजी महापौर गजराज पगारिया, मदन तातेड तसेच फोरमचे सदस्य व भाविक उपस्थित होते.


            पशुपक्ष्यांना संकटात सापडलेल्या आपल्या इतर बांधवांना फारशी मदत करता येत नाही. मात्र, संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना तसेच मूक प्राण्यांना मदत करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे असे सांगून यशस्वी व्यावसायिकांनी आपली शक्ती व क्षमतेचा वापर करून, ग्रामीण, आदिवासी भागातील गरीब, दिव्यांग, अनाथ लोकांना तसेच कैदी बांधवांना मदत करावी असे राज्यपालांनी सांगितले.


            भगवान महावीरांच्या अध्यात्मिक शिकवणीला अनुसरुन जैन आचार्य तुलसी यांनी अणुव्रत आंदोलन सुरु केले व त्या माध्यमातून महिलांचे शोषण, हुंडा प्रथा, अस्पृश्यता इत्यादी सामाजिक कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला याचे स्मरण राज्यपालांनी दिले. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी मोठे अभियान सुरु करुन हजारो लोकांना व्यसनांपासून सोडवले. त्यांच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने छोटे-छोटे संकल्प करुन आत्मविकास, समाज विकास व राष्ट्र विकासाच्या कार्यात योगदान द्यावे, असे राज्यपालांनी सांगितले.     


            अहिंसा यात्रे'च्या माध्यमातून व्यसनमुक्ती, नैतिकता व सद्भावना निर्माण करण्याच्या आचार्य महाश्रमण यांच्या कार्याचा राज्यपालांनी गौरव केला.


सद्गुणांचा विकास केल्यास मनुष्याची देवत्वाकडे वाटचाल शक्य - आचार्य महाश्रमण


            यावेळी सर्व उपस्थित भाविक व व्यावसायिकांना संबोधित करताना आचार्य महाश्रमण यांनी दुर्गुणांचा त्याग व सद्गुणांचा विकास केल्यास मनुष्य देवत्वाकडे वाटचाल करतो, असे सांगितले. आचार्य तुलसी यांनी प्रतिपादन केलेल्या अणुव्रतांचा अंगीकार करुन तसेच आचार्य महाप्रज्ञ यांनी सांगितलेल्या प्रेक्षाध्यानाच्या माध्यमातून सद्भावना व नैतिकता वृद्धिंगत होते, असे त्यांनी सांगितले.


            सुरुवातीला तेरापंथ प्रोफेशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल यांनी फोरमच्या राष्ट्रव्यापी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. आचार्य महाश्रमण प्रवास समितीचे प्रमुख मदन तातेड यांनी स्वागतपर भाषण केले.   


0000

जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता

 जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता


                                                     - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


        मुंबई दि.26 : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. 


            आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी, प्रांतांचे गव्हर्नर, कंपन्या, एंजन्सी यांच्यासोबत आपण सविस्तर बैठका केल्या असून जपानच्या काही कंपन्या शिष्टमंडळासह भारतात चर्चेला येऊ इच्छितात.


            नवीन भारताच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास त्यांनी दाखविला आहे. त्यातील मोठा वाटा महाराष्ट्रात यावा, असा आपला प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने एक विशेष चमू आम्ही तयार करणार आहोत. जपानी भाषा बोलता येणारे लोक त्यात असतील. डेटा सेंटर्स ते सेमी कंडक्टर, अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आणण्यात येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 


वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो 11, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जपानची मदत


राज्यात आपण वर्सोवा-विरार सीलिंक तयार करतो आहे, त्यासाठी मदत करण्यास जपान सरकारने सकारात्मकता दाखविली आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळताच त्यादृष्टीने पुढची पाऊले टाकली जातील. मेट्रो 11, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला सुद्धा मदत करण्याची तयारी जपानने दर्शविली आहे.


एनटीटी आणि सोनी यासारख्या व इतर कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. जपानमधील मोठमोठे उद्योग भारतात येऊ इच्छितात. या सर्व उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच जायका, जेट्रो, जेरा यासारख्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळवून राज्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.


मला दिलेली मानद डॉक्टरेट हा महाराष्ट्राचा सन्मान


            चांद्रयान मोहिमेच्या लँडिंगसाठी मराठी बांधव मोठ्या संख्येने जपानमध्ये एकत्रित जमले होते. त्यांच्यासोबत बसून मला हा सोहोळा पाहता आला, याचा मला अतिशय आनंद झाला. जणू भारत तेथे साकारला होता, अशी आठवण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. कोयासन विद्यापीठाने मला मानद डॉक्टरेट दिली, याचा खूप आनंद झाला, हा माझा नाही, तर महाराष्ट्राचा सन्मान आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


0000



 


 


 


Saturday, 26 August 2023

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

 मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन  

- पर्यटन मंत्री गिरीष महाजन

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार फाऊंडेशन

            मुंबई दि२५ :  शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर ‍20 ते 28 जानेवारी  2024 या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

            या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाऊंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असल्याची माहिती मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

            मंत्री श्री. महाजन यांची उद्योगपती श्री. महिंद्रा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीपर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा उपस्थित होत्या.   

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीमुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या फाऊंडेशनमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. फाऊंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील व पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिकस्टेक होल्डर्समुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या सहभागामुळे महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार आहे. 

            राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमहस्तकलाविविध खाद्य संस्कृतीसायकलिंग टूरहार्बर टूरिझम,वॉटर स्पोर्टस्बीच ॲक्टिव्हीटीज आदी साहसी क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात येईल.  यामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणून शॉपिंग मॉलकला दालनेचित्रपटगृहहॉटेलफूड कोर्टसाहसी क्रीडा केंद्रेमनोरंजन केंद्रेगाइडेड सीटी टूरहेरिटेज वॉक, नेचर वॉकफोटोग्राफीयोगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.             राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व स्टेक होल्डर्स यांचा समावेश असलेल्या परिचय सहल (FAM Tour), चित्रपटफॅशन शो इ. उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईलमुंबईतील पर्यटन वृद्धीस चालना मिळून राज्याच्या महसुलात देखील वाढ होईल, असे पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

- पर्यटन मंत्री गिरीष महाजन


उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार फाऊंडेशन


            मुंबई दि, २५ : शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर ‍20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.


            या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाऊंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असल्याची माहिती मंत्री श्री. महाजन यांनी दिली.


            मंत्री श्री. महाजन यांची उद्योगपती श्री. महिंद्रा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा उपस्थित होत्या.   


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या फाऊंडेशनमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. फाऊंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील व पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या सहभागामुळे महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार आहे. 


            राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, विविध खाद्य संस्कृती, सायकलिंग टूर, हार्बर टूरिझम,वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टिव्हीटीज आदी साहसी क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणून शॉपिंग मॉल, कला दालने, चित्रपटगृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाइडेड सीटी टूर, हेरिटेज वॉक, नेचर वॉक, फोटोग्राफी, योगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व स्टेक होल्डर्स यांचा समावेश असलेल्या परिचय सहल (FAM Tour), चित्रपट, फॅशन शो इ. उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


            या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईल, मुंबईतील पर्यटन वृद्धीस चालना मिळून राज्याच्या महसुलात देखील वाढ होईल, असे पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi