Wednesday, 26 July 2023

साखरझोपेवर आवर घालून सकाळी उठायचंय? १००% यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स…!*

 साखरझोपेवर आवर घालून सकाळी उठायचंय? १००% यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स…!*




सकाळी सकाळी साखरझोपेतून जागे होणे म्हणजे एक मुश्कील काम. पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी छान गाढ झोप लागलेली असताना उठून कामाला लागणं जीवावर येतं.


पण, लवकर नाही उठलं तर, पुढची सगळी कामं रेंगाळत राहतात आणि मग कामं पेंडिंग राहिली की ताण वाढतो.


लवकर उठण्याचे फायदेही खूप असतात. सकाळी लवकर उठण्याने ताण कमी होतो, उत्साह वाढतो, व्यायामासाठी वेळ देता येतो, ज्यामुळे आरोग्याला देखील फायदा होतो.


लहानपणापासून घरातील वडिलधाऱ्या मंडळींकडून आपण हे ऐकत आलोय की, सकाळी लवकर उठल्याने आयुष्यात सफलता मिळते. विद्यार्थांसाठी तर सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय फार फायद्याची ठरू शकते.


तुम्हालाही सकाळी लवकर उठण्याची सवय लाऊन घ्यायची आहे का? मग त्यासाठी वाचा या काही खास टिप्स ज्यामुळे लवकर उठणं तुम्हाला अजिबात त्रासदायक वाटणार नाही.


https://chat.whatsapp.com/I3OvJibJtIxKNxiaGd8Mxs




१. झटपट बदल करू नका




सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची म्हणून उठण्याच्या सवयीत झटपट बदल करू नका.


तुम्हाला जर सकाळी ९ ला उठण्याची सवय असेल आणि एक दिवस अचानक तुम्ही ५ वाजता उठलात तर, हा अचानक झालेला हा बदल तुमचे शरीर पटकन स्वीकारणार नाही.


म्हणून बदल हळूहळू करा.


म्हणजे उद्या ९ ऐवजी ८.३० ला उठा. त्यानंतर हळूहळू ही वेळ रोज कमीकमी करत न्या.




२. निश्चित वेळापत्रक करा




सकाळी लवकर उठण्यासाठी एक निश्चित वेळापत्रक बनवा. वेळापत्रक नसेल तर, लवकर उठून आपण काय करणार, असे म्हणत आपण लवकर उठण्याचे टाळत राहतो.


सगळी कामे वेळेवर पूर्ण करण्याची सवय लावून घेतली तरच, लवकर उठण्याची सवय लागेल.




३. दिवसाची सुरुवात आनंदाने करा


https://chat.whatsapp.com/I3OvJibJtIxKNxiaGd8Mxs


सकाळी लवकर उठून काही चांगले, क्रिएटिव्ह काम केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहील. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला काहीआवडतं काम करायला मिळणार असेल तर, लवकर उठायचा कंटाळा येत नाही.


ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यातील उत्सुकता टिकून राहील आणि दिवसभर तुमची कार्यक्षमता टिकून राहील.




४. सुट्टीच्या दिवशीही लवकर उठा.




सुट्टीच्या दिवशीही उठण्याचे शेड्युल बदलू नका. दररोज आपले रुटीन ठरलेले असते, पण सुट्टीच्या दिवशी आपण दिवसभर काय करणार आहोत, ते ठरवलेलं नसतं.


आठवडाभर सकाळची धावपळ सुरु असते. पण, सुट्टीचा दिवस आपण निवांत घालवतो. असे न करता, त्या दिवशी सकाळच्या वेळेत एखादा छंद वर्ग लावा. मित्रांसोबत ट्रेकींगचे प्लॅन करा.


सुट्टीच्या दिवशी सकाळचा वेळ अशा गोष्टी करा ज्या तुम्ही इतर वेळ कधीच करत नाही.


जो वेळ निवांत, लोळण्यात घालवायचा त्या दिवशी कामाचे प्लॅनिंग करणे विचित्र वाटेल पण, आठवड्यातून एकही दिवस सकाळी लवकर उठण्याचे टाळू नका.




५. सकाळच्या वेळच्या तुमच्या कामाचे योग्य नियोजन करा.




सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय काय करणार आहात याचे नियोजन आदल्या रात्रीच करून ठेवा.


सकाळी उठल्यानंतर तुम्ही आधी ब्रश करणार की, दाढी? व्यायाम करण्यासाठी कोणती कपडे घालणार? चहा घेणार की, कॉफी?


तुमचे नियोजन यशस्वी झाले तर, लवकर उठण्यासोबतच तुमच्या सर्व गोष्टींना एक निश्चित शिस्त लागेल.


दररोजचे तुमचे रुटीन काय असणार आहे ते लिहून ठेवा. उद्या कोणती कपडे घालायची हे देखील आजच ठरवून ठेवा. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि उठल्यानंतर सर्व गोष्टी तुमच्यासाठी तयार असतात, तेंव्हा सकाळी लवकर उठणे फारच छान वाटते.




६. चांगली झोप घ्या




शरीर तंदुरुस्त असेल तर, तुमच्या झोपण्याच्या सवयी आणि उर्जा यावर चांगला परिणाम होतो.




७. अलार्म स्नूज करू नका




सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्म लावतच असाल. पण, अलार्म झाल्यावर जर तुम्ही तो स्नूज करून पुन्हा झोपत असाल तर, तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागणार नाही. त्याऐवजी दोन अलार्म लावा. दोन अलार्म मध्ये दहा मिनिटांचे अंतर ठेवा.


एक अलार्म जो लवकर होईल तो तुमच्या जवळ ठेवा आणि दुसरा तुमच्या बेडपासून थोडा दूरवर ठेवा.


पहिला अलार्म बंद करून तुम्ही झोपी गेलात तरी, दुसरा अलार्म झाल्यावर तुम्हाला उठावेच लागेल.


परंतु, एकदा अलार्म बंद केला तर, तुमच्या मनाला अलार्मकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागेल.




८. वेळ पाळा




झोपेची वेळ पाळायची त्याप्रमाणेच उठण्याची वेळ देखील पाळा. तुमच्या शरीराला झोपेच्या पॅटर्नची सवय झालेली असते. नेहमीच्या वेळी उठता तेंव्हा तुमच्या शरीराचे एक निश्चित वेळापत्रक तयार झालेले असते.


तुमचा अलार्म वाजण्याआधीच तुमचे शरीर उठण्यासाठी तयार झालेले असते. यामुळे काही दिवसांनी तुम्हाला लवकर उठण्यासाठी अलार्मची गरज देखील लागणार नाही.




९. सकाळी जाग आल्यानंतर जागे कसे राहाल?




सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेणे आणि ती टिकवून ठेवणे अवघड असते. शरीराचे वेळापत्रक बदलणे सोपी गोष्ट नाही.


जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा नव्या वेळेशी जुळवून घेण्यास शरीर तयार नसते. म्हणून उठल्या उठल्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.


घरातून लवकर बाहेर पडून, फिरायला गेल्याचे थंड हवेचा स्पर्श अनुभवल्याने आळस निघून जाईल आणि तुम्हाला फ्रेश वाटू वाटेल.




१०. सकाळी लवकर का उठणार आहात?




“लवकर उठल्याने मूड फ्रेश राहतो आणि लवकर उठणारे लोक अधिकाधिक कार्यक्षम असतात,” म्हणून मलाही लवकर उठायचे आहे, हे काही फार चांगलं कारण आहे असे नाही.


लवकर उठण्याचा निश्चय केला असेल तर, लवकर उठून तुम्ही काय करणार आहात?


सकाळी उठण्याची सवय लावून घेणे फार अवघड गोष्ट आहे, त्यासाठी त्यामागचं काही ठोस कारण, तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे.


लवकर उठल्यानंतर तुम्हाला जो थोडा अधिकच वेळ मिळणार आहे, त्याच तुम्ही कसा उपयोग करणार आहात?


– हे जर तुम्ही ठरवल नसेल तर, लवकर उठून तुमचा काही फायदा होणार नाही.




११. एखादा पाळीव प्राणी बाळगा




दिलेली वेळ पाळण्याची चांगली सवय लावून घेणे आवश्यक आहे.


तुम्ही एखादं मांजर पाळले आणि तिला जर, सकाळी ६.०० वाजता खाऊ घालण्याची सवय लावली, तर सकाळी ५.५५ वाजता तुम्ही तिचा खाऊ बनवत असाल याची ती काळजी घेईलच.


तिला खाऊ घालण्याच्या काळजी पोटी तुम्हीही लवकर उठून कामाला लागाल.




१२. मानसिक तयारी ठेवा




लवकर उठण्याचे कोणते फायदे असतात हे सांगणारे व्हिडीओज ऐकत रहा. लवकर उठण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींबद्दल वाचत राहा.


दिवसभराचा दिनक्रम लिहिण्याचा फायदा काय असतो, हे सतत स्वतःला सांगत रहा.


अलार्म वगैरे लावून तुम्ही लवकर उठाल देखील पण, मानसिक तयारी केली नसेल तर मात्र, सगळा दिवस आळसात आणि

 कंटाळवाणा जाऊ शकतो.


तर मंडळी, या गोष्टी लक्षात ठेवा – स्वतःच्या दिवसावर नियंत्रण मिळवा आणि – यशस्वी व्हा…!




*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*


ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;

 ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;


राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार


- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती


            मुंबई, दि. 25 :- राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या.


            पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, या अधिवेशनात (जुलै, 2023) एकूण 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळासमोर मांडण्यात आल्या. यापैकी 13 हजार 91 कोटी 21 लाख रुपयाच्या मागण्या या अनिवार्य, 25 हजार 611 कोटी 38 लाख रुपयांच्या मागण्या या कार्यक्रमांतर्गत आणि 2 हजार 540 कोटी 62 लाख रुपयांच्या मागण्या या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत. 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या स्थूल पुरवणी मागण्या दिसत असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 35 हजार 883 कोटी 31 लाख एवढाच असल्याचे त्यांनी सांगितले.


पुरवणी मागणीतील महत्वाच्या तरतुदी


 जलजीवन मिशन-सर्वसाधारण घटक व गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण व सहाय्यिकृत बाबींकरिता राज्य हिस्सा म्हणून 5 हजार 856 कोटी रुपये,


 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थींना राज्याच्या ‘नमो शेतकरी’ महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी 4 हजार कोटी रुपये,


 अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची थकबाकी व चौथा अनुज्ञेय हप्ता देण्यासाठी 3 हजार 563 कोटी 16 लाख रुपये,


 मेट्रो रेल्वे प्रकल्प मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्यासाठी 2 हजार 100 कोटी रुपये,


 लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपये,


 केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांकरिता राज्य हिस्सा 1 हजार 415 कोटी रुपये,


 पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान देण्यासाठी 1 हजार 398 कोटी 50 लाख रुपये,


 केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेसाठी 1 हजार 200 कोटी रुपये,


 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता 1 हजार 100 कोटी रुपये,


 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतमूल्य व अर्थसहाय्याकरिता 1 हजार कोटी रुपये,


 महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 1 हजार कोटी रुपये,


 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणीसाठी बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा 969 कोटी रुपये,


 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा 939 कोटी रुपये,


 केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन योजना (राज्य हिस्सा) 800 कोटी रुपये,


 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपदान, अंशराशीकरण आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते अदा करण्यासाठी 789 कोटी 41 लाख रुपये,


 केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी 798 कोटी 1 लाख रुपये,


 संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता 600 कोटी रुपये,


 लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान 550 कोटी रुपये,


 पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करुन देण्यासाठी 549 कोटी 54 लाख रुपये,


 केंद्रिय आधारभूत किंमत योजनेखालील तूट भरुन काढण्यासाठी 523 कोटी 23 लाख रुपये यांचा समावेश आहे.


००००



 



राज्यात बर्ड फ्लूच्या H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही

 राज्यात बर्ड फ्लूच्या H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही


— अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे


            मुंबई, दि. 25 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोगाचा प्रादुर्भाव नाही, असे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


            अंडी व कुक्कुटमांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


             केंद्र सरकारच्या बर्ड फ्लूच्या कृती आराखड्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून बर्ड फ्लू सर्वेक्षणाकरिता नमुने प्रामुख्याने परसातील कुक्कुट पक्षी, व्यापारीतत्वावर पाळण्यात येणारे पक्षी, पक्षांचे बाजार, स्थलांतरित पक्षांचे मार्ग, पाणवठ्याच्या जागा जिथे स्थलांतरित पक्षी पाणी पिण्यासाठी एकत्रित येतात, प्राणीसंग्रहालये, जंगल या ठिकाणांहून पक्ष्यांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. गेल्यावर्षी राज्यामध्ये एकूण २३,३९३ इतके नमुने यादृच्छिक (Randorm) पद्धतीने गोळा करून त्याची तपासणी केलेली आहे, ज्यामध्ये एकाही पक्ष्याचे नमुने H5N1 विषाणूसाठी होकारार्थी आढळून आलेले नाहीत.


            बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचनेनुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येतात.


            राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्षांमध्ये मरतूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरतूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तत्काळ जवळच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ यावर त्वरित दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.


            प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमाच्या कलम ४(५) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तूस्थितीची माहिती जवळच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती जवळच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे.


००००

Tuesday, 25 July 2023

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू

 राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


          मुंबई दि. 25 : राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.


          राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.


          मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षण अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणीच्या (टेट) आयोजनाबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी 22 फेब्रुवारी, 2023 ते 3 मार्च,2023 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.


          यानुसार जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली व विषयांची माहिती पोर्टलवर भरून पदभरती करण्याचा कार्यक्रम असा आहे, जाहिरात देण्याचा कालावधी 15/08/2023 ते 31/08/2023,उमेदवारांना जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम देणे. 01/09/2023 ते 15/09/2023, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. 10/10/2023, मुलाखतीशिवाय पदभरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे. दि. 11/10/2023 ते दि. 21/10/2023, पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन जिल्हास्तरावर करणे. दि. 21/10/2023 ते 24/10/2023 असे आहे.


          तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना 7 जुलै 2023 रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.


          या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.



बार्टीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेनुकसान होणार नाही

 बार्टीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेनुकसान होणार नाही


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 25 : बार्टीमध्ये विविध प्रशिक्षण देण्यासाठी संस्था निवडीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवड करण्यात येते. मात्र, सध्या संस्थांच्या निवडीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले, विद्यार्थी हित जोपासण्यासाठी संस्था निवड प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण राबविण्याकरिता वित्त विभागाची वित्तीय नियमावली व उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि.१ डिसेंबर २०१६ रोजीच्या खरेदी धोरणानुसार व केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संस्था निवडीकरीता ई-निविदा प्रक्रिया शासनाचे धोरण आहे. सद्य:स्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.


            तरीही या विषयासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, विद्यार्थांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


             यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, जयंत पाटील, अॅड.अनिल परब, महादेव जानकर, जयंत पाटील, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण करणार

 वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण करणार


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई दि. 25 : वाळूज ते कमळापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रस्त्याच्या दुरूस्तीचे प्रलंबित काम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.


          वाळूज ते कमळापूर येथील रस्ता दुरुस्तीच्या कामासंदर्भात सदस्य सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.


          मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, वाळूज ते कमळापूर या 4 कि.मी. लांबीपैकी 3 कि.मी. लांबीतील रस्ता दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीत आहे. या कामाला निधीही मंजूर आहे. या रस्त्यावर 1 कि.मी. लांबीत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व बांधीव गटाराचे मंजूर काम सद्यस्थितीत प्रगतीत असून या रस्त्याचे सर्व काम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले असून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.


          या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री विक्रम काळे, गोपीचंद पडळकर, जयंत पाटील, महादेव जानकर आदींनी सहभाग घेतला. 


0000

अंजनगाव सूर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचेकाम लवकरच पूर्ण करणार

 अंजनगाव सूर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचेकाम लवकरच पूर्ण करणार


- मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 25 : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


              अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी उपस्थित केला होता. 


              मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम विहित वेळेत पूर्ण केले नसल्याने संबंधित कंत्राटदारांवर १ जानेवारी २०२३ पासून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि अंजनगाव सूर्जी शहरास सुरळीत पाणीपुरवठा होईल.


0

Featured post

Lakshvedhi