Monday, 24 July 2023

निसर्गाचा अद्भुत चमत्कार,*बांमेंबडेश्वर मदिर

 *निसर्गाचा चमत्कार,*


आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने बाहेर काढतील 'हे' ज्यूस !!*

 *आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने बाहेर काढतील 'हे' ज्यूस !!* 


अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते आणि अन्नातून पोषक तत्वे शोषून घेण्यात पचनसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. पचनक्रिया सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोलन, ज्याला मोठे आतडे देखील म्हणतात, हा पचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.


योग्य पचनासाठी मोठ्या आतड्याचेपाणी निरोगी असणे आवश्यक आहे. शरीराचा हा अंतर्गत भाग स्वच्छ ठेवणे आणि रोगांपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या बाहेरील भाग स्वच्छ करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शरीराच्या आतील भागाची स्वच्छता करणे आवश्यक आहे.


मोठ्या आतड्याची स्वच्छता करणे म्हणजे त्यातून टॉक्सिन काढून टाकणे. अनेक संशोधनात हे समोर आले आहे की मोठे आतडे स्वच्छ ठेवल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि कोलन कॅन्सरचा धोकाही कमी होतो. आता प्रश्न पडतो की आतडे स्वच्छ करण्यासाठी काय करावे.


आतडे साफ करणे म्हणजे आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील आणि शरीरही निरोगी राहतील. काही ज्यूसचे सेवन आतडे स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया निरोगी राहते. मोठे आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणते ज्यूस सेवन करावे ते जाणून घेऊया.


*सफरचंद :* 

सफरचंदाचा रस प्यायल्याने आतडे निरोगी राहतील. सफरचंदाचे सेवन आरोग्यासाठी जितके फायदेशीर " आहे, तितकाच त्याचा रस देखील फायदेशीर आहे. सफरचंदाच्या रसाचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. पोटात साचलेली घाण आणि विषद्रव्ये मलमार्गे शरीरातून बाहेर पडतात. सफरचंदाचा रस आतडे डिटॉक्ससाठी खूप फायदेशीर आहे.


*भाज्या :* 

भाज्यांचा रस प्या, आतडे स्वच्छ होतील. आतड्यांच्या आरोग्यासाठी भाज्यांचे रस सेवन करा. भाज्यांच्या ज्यूसमध्ये पालक, टोमॅटो, गाजर, फ्लॉवर, ब्रोकोली आणि कारल्याचा रस घ्या. हे रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि कोलन स्वच्छ करतात. हे रस तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.


*मीठाचे पाणी :* 

पाण्यात सैंधव मीठ मिसळून प्या. सैंधव मीठ मिसळलेले पाणी प्यायल्याने आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात. सैंधव मीठ मिसळलेले पाणी पिण्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात दोन छोटे चमचे सैंधव मीठ मिसळून ते सेवन करा, आतड्यांची स्वच्छता चांगली होईल. हे पाणी हळूहळू सेवन करा.


*लिंबाचा रस :* 

लिंबाचा रस सेवन करा. लिंबाचा रस, व्हिटॅमिन सी समृद्ध, आम्लता दूर करते आणि पचन सुधारते. हा रस पोटात लपलेले हानिकारक बॅक्टेरिया मारते. याचे सेवन केल्याने आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



_*

राष्ट्रीय पालक दीन,

 [ जुलैचा चौथा रविवार "राष्ट्रीय पालक दिन" या निमित्तानं आपण "पालकांचं अर्थात आई-वडिलांचं" स्मरण करून त्यांचं आपल्या जीवनातील स्थान अबाधित ठेवू या 🌹🌹🙏🙏 खरं तर हा मालिकेतील संवाद....पण आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आणि ह्रुदयस्पर्शी 👌👌👍👍 कटू सत्य राजे maharajrn ना सुद्धा ह्या अग्निदियांतून जावे लागले आहे


नाशपतीचे आयुर्वेदिक फायदे*

 *नाशपतीचे आयुर्वेदिक फायदे*


नाशपती हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फळामध्ये खनिजे, जीवनसत्व आणि सेंद्रिय घटक असतात. हे फळ प्राचीन काळापासून एक औषध म्हणून वापरले जात आहे. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन के, फिनोलिक कंपाऊंड, फोलेट, फायबर, तांबे, मॅग्नेशियम आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात. 


▪️ *वजन व पाचक प्रणाली*

वजन कमी करण्यासाठी नाशपती फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर आपल्या शरीरात फायबरची कमतरता असेल तर नाशपती आहारत घेतले पाहिजे.

पाचक प्रणाली नाशपतीचे सेवन केल्याने तुमची पाचक प्रणाली निरोगी राहते. हे पोटाशी संबंधित समस्या देखील दूर करते. यासह अतिसार आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.


▪️ *कर्करोग*

कर्करोग नाशपतींमध्ये अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात जे कर्करोग रोखण्यास मदत करतात. यात ब्रेस्ट सारख्या कर्करोगाचा समावेश आहे. नाशपतीमध्ये हायड्रॉक्सीनोमिक ॲसिड असते. हे पोटाचा कर्करोग रोखण्यास मदत करते.


▪️ *रोग प्रतिकार शक्ती*

 रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी नाशपतीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन-सी असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांमध्येही हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.


▪️ *हृदयासाठी*

हृदयरोगासाठी नाशपतींमध्ये पोटॅशियम असते. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या समस्या कमी करण्यात मदत करते.


▪️ *अशक्तपणा*

अशक्तपणा नाशपतीमध्ये तांबे आणि लोह असते. हे शरीरात हिमोग्लोबिन वाढवते. याद्वारे, शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांसाठी देखील हे चांगले आहे.


▪️ *हाडांसाठी उपयुक्त*

हाडांसाठी नाशपतीमध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि तांबे असतात. यामुळे हाडे मजबूत राहतात. संधिवात देखील फायदेशीर आहे.


▪️ *त्वचाविकार*

त्वचा नाशपातीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेवरील वृद्धत्वाचे परिणाम कमी करते. यामुळे चेहऱ्यावर कमी डाग व सुरकुत्या होतात. हे आपल्या त्वचेसाठी चांगले आहे.


▪️ *मधुमेह*

मधुमेह नाशपतीमध्ये फायबर असते. मधुमेह ग्रस्त लोकांसाठी हे एक चांगले फळ आहे. याव्यतिरिक्त, नाशपतीमध्ये नैसर्गिक साखर असते, जे मधुमेह ग्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे.


*डॉ. प्रमोद ढेरे,*


_

दातांचे आरोग्य.*

 *दातांचे आरोग्य.*



दाताचे दुखणे सगळ्यात वाईट असे आपण नेहमी ऐकतो. दातदुखीमुळे येणारी कळ थेट डोक्यात जाते आणि आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होते. दात खराब होण्याची अनेक कारणे आहेत. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न घासणे यांमुळे दात किडणे, दात दुखणे, दात कमकुवत होऊन पडणे अशा समस्या निर्माण होतात. दातांची निगा राखणे हे दातांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. पण दातांची स्वच्छता ठेवली नाही तर तुमचे संपूर्ण आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास काही गोष्टी पाळणे गरजेचे असते. यामध्ये आहाराला जास्त महत्त्व आहे, दात चांगले ठेवायचे असल्यास काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे. अन्यथा दातांना लागणारी कीड आणि त्यावर करावे लागणारे उपचार यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. पाहूयात कोणते पदार्थ टाळल्यास दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

कोणत्याही प्रकारच्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे तुमच्या आहारात गोडाचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हाला दातांच्या आरोग्याविषयी काळजी असेल तर मिठाई खाण्याचे प्रमाण निश्चितच कमी करायला हवे. सध्या बाजारात साखरविरहीत गोड पदार्थ मिळतात. लोकांनाही हे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात साखर जात नाही आणि दात सुरक्षित आहेत असे वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नसून या साखरविरहीत मिठाईनेही दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे दातांच्या उत्तम आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारची मिठाई टाळणे किंवा अगदी कमी प्रमाणात खाणे हा उत्तम उपाय आहे.

चहा किंवा कॉफी

सध्या आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली काहीशी तणावाची आहे. कामाचा ताण असल्याने किंवा इतरही अनेक कारणांमुळे भारतात चहा किंवा कॉफी घेण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र ही दोन्ही पेये आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्यामुळे दात खराब होतात. चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये टॅनिक अॅसिड असते. दातांवर असणाऱ्या इनॅमल कोटींगसाठी हा घटक घातक असतो. त्यामुळे दातांचा रंग बदलतो. तसेच दातांवर चॉकलेटी रंगाचे डाग दिसू लागतात.

सायट्रीक फळे.

सायट्रीक अॅसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी असणारी फळे दातांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. ही फळे आरोग्यासाठी उपयुक्त असली तरीही दातांसाठी मात्र ती त्रासदायक ठरु शकतात. संत्री, मोसंबी यांसारख्या आंबट फळांचा यामध्ये समावेश होतो. या फळांमुळे दात कमकुवत होऊन पिवळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा फळांचा ज्यूस घेतल्यास जास्त उपयुक्त. या फळांच्या बाबतीत तुम्हाला दातांबरोबरच तुमच्या जीभेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.

लोणची.

भारतीय आहारात लोणच्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खारवलेली विविध प्रकारची लोणची जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी उपयुक्त असली तरीही दातांसाठी मात्र ती नुकसानकारक ठरतात. लोणच्यामध्येही अॅसिडीक घटक असतात जे दातांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. लोणच्यामध्ये असणाऱ्या व्हिनेगरमुळे दातदुखी तसेच दातांची जळजळ होते. याशिवाय दात किडण्याचे एक मुख्य कारण लोणचे ठरु शकते.

प्रमोद पाठक.



Sunday, 23 July 2023

बहुगुणी लाळ,लार,सलायवा*

 *बहुगुणी लाळ,लार,सलायवा*



भगवंताने मानवी शरीरास दिलेली देणगी म्हणजे लाळ या लाळी मुळे अनेक आजार बरे होतात.

 लाळीत मातीत असलेले अठरा गुणधर्म उपस्थित असतात.

 यामुळे अनेक आजार कायमस्वरूपी दुर पळतात. आता कोणकोणते आजार दुर जातात हे पाहू.

१)डोळ्यातून पाणी येणे

२)डोळ्याला ताण येणे.

३)मोतिबिंदू,तिरळेपणा

४)काचबिंदू

५)रांजणववाडी

६)खाज

७)खरुज, नायटा

८)इसब

९)सोरायसिस

१०)त्वचेवरील सफेद डाग

११)कोड,व्हिटँलीगो, चट्टे

१२)जुन्या वाहत्या जखमा

१३)गँग्रीन

१४)चेहऱ्यावर असलेले वांग, डाग,पिंपल्स, फोड,

१५)भाजलेले डाग 

१६)भगेंद्र,फिशर

१७)मुळव्याध

इत्यादी अनेक रोग सतत लाळ लावल्यास बरे होतात. आता अनेकांना हा प्रश्न पडेल ही लाळ एवढी आणणार कुठून कशी घ्यायची तर यासाठी काही नियम आहेत.रात्री झोपताना भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात आवश्यक लाळ तयार होते.फक्त झोपण्यापूर्वी दंतमंजन करून झोपल्यास चांगले गुणधर्म असलेली ही लाळ मिळेल. पण आपलीच लाळ आपण वापरावी.दुसऱ्या साठी ते विष आहे हे मात्र पक्के लक्षात ठेवा व उठल्या उठल्या करदर्शन झाल्यावर लाळ बाधित जागी लावा फरक पहा.आणि ती लावून वगैरे झाली की प्रथम गुळण्या करून ती लाळ पोटात घ्या. म्हणजे पोटातील अनेक आजार ही दुर होतील.पोस्ट आवडल्यास शेअर करा.

गजानन



लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन






 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन


            मुंबई, दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.  


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.


            'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. ते तत्त्वचिंतक, पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या परखड लेखन आणि वाणीने ब्रिटिश सत्तेला हादरे बसले. भारतातील सामाजिक - शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध स्तरांवरील ऐक्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. अशा या भारत मातेच्या सुपुत्राला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,' असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे. 


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्तउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


            मुंबई, दि.23 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

        नवी दिल्ली दि. 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.


कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


0000

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्तविधान भवनात अभिवादन


मुंबई, दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव श्री.विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


0000


 


 

Featured post

Lakshvedhi