Sunday, 23 July 2023

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन






 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन


            मुंबई, दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.  


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.


            'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. ते तत्त्वचिंतक, पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या परखड लेखन आणि वाणीने ब्रिटिश सत्तेला हादरे बसले. भारतातील सामाजिक - शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध स्तरांवरील ऐक्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. अशा या भारत मातेच्या सुपुत्राला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,' असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे. 


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्तउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


            मुंबई, दि.23 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

        नवी दिल्ली दि. 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.


कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


0000

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्तविधान भवनात अभिवादन


मुंबई, दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव श्री.विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


0000


 


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi