Thursday, 8 June 2023

एक रसाळ कथा

 एक रसाळ कथा:                                                           एका मैत्रिणीने जेवायचे आमंत्रण दिले म्हणून मी जेवायला गेलो. मैत्रिणीने पोळ्या, दोन भाज्या, भात, आमटी असा व्यवस्थित स्वयंपाक केला होता. जेवणानंतर एक बाऊल भरून आमरस दिला. तेंव्हा मी तिला म्हणालो की अग आमरस असल्यावर भाज्या करायची गरज नव्हती. आमच्या घरी आमरस असल्यावर भाज्या करीत नाहीत. त्यावर ती म्हणाली की अरे तुझी बायको आळशी आहे. तीला भाज्या करायला नकोत म्हणून ती फक्त आमरसावर भागवते. मी घरी आल्यावर बायकोने कुत्सितपणे विचारले की काय मैत्रिणीने केला की नाही पाहुणचार व्यवस्थित? मी तिला सर्व हकिकत सांगितल्यावर ती म्हणाली की अहो भाज्या केल्या नसत्या तर तुम्ही अजून दोन तीन बाऊलस् आमरस ओरपला असता म्हणून तिने दोन भाज्या केल्या. चिकट मेली!

मी मात्र विचारात पडलो🤔 ही बरोबर की ती बरोबर?😆😂😧

✊कां कुणास ठाऊक....* कांही कळलंच नाही..

 *✊कां कुणास ठाऊक....* 

*🤞कांही कळलंच नाही....*   

👍 *मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी....🤔* 

*कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,*

*कांही कळलंच नाही.*

*काय मिळवलं, काय कमावलं,*

*काय गमावलं,*

*कांही कळलंच नाही.*

*संपलं बालपण,*

*गेलं तारुण्य,*

*केव्हा आलं ज्येष्ठत्व,*

*कांही कळलंच नाही.*

*काल मुलगा होतो,* 

*केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो,* 

*कांही कळलंच नाही.*

*केव्हा 'दादा' चा बाबा*

*नंतर 'बाबा' चा*

*'आबा' होऊन गेलो,*

*कांही कळलंच नाही.*

*कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,*

*कोणी म्हणतं हाती आली काठी,*

*काय खरं आहे,* 

*कांही कळलंच नाही.*

*पहिले आई बापाचं चाललं,*

*मग बायकोचं चाललं,*

*मग चाललं मुलांचं,*

 *मग चाललं सुनेचं,* 

*माझं कधी चाललं*, 

*कांही कळलंच नाही*

*बायको म्हणते,* 

*आता तरी समजून घ्या* , 

*काय समजू,*

*काय नको समजू,* 

*मग इतकी वर्ष समजुतीने*

*कोणा बरोबर घेतली*

*कां कुणास ठाऊक*

*कांही कळलंच नाही.*

*मन म्हणतंय तरुण आहे मी,*

*वय म्हणतंय वेडा आहे मी,*

*या साऱ्या धडपडीत केव्हा* 

*गुडघे झिजून गेले,* 

*कांही कळलंच नाही.*

*झडून गेले केस,* 

*लोंबू लागले गाल,*

*लागला चष्मा,* 

*केव्हा बदलला हा चेहरा* 

*कांही कळलंच नाही.*

*काळ बदलला,*

*मी बदललो*

*बदलली मित्र-मंडळीही*

*किती निघून गेले,* 

*किती राहिले मित्र,*

*कांही कळलंच नाही.*

*कालपर्यंत मौजमस्ती*

*करीत होतो मित्रांसोबत,*

*केव्हा सीनियर सिटिझनचा* 

*शिक्का लागून गेला,* 

*कांही कळलंच नाही.*

*सून, जावई, नातू, पणतू,*

*आनंदीआनंद झाला,* 

*केव्हा हासलं उदास हे*

*जीवन,*

*कांही कळलंच नाही.*

*भरभरून जगून घे जीवा*

*मग नको म्हणूस की,*

*"मला कांही कळलंच नाही.*

*कवी-ना.धो.महानोर*

ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार

 ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवा परिसरातील 610 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

            ठाणे, दि. 7 (जिमाका) : दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

            ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

            “दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.

            यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

            दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्यकारभार करत आहोत. राज्यातील प्राचीन देवस्थानांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गडकोट, किल्ले यांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जेवढा निधी लागे

ल तो देण्यात येईल.

०००००

आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

वारकरी भवनसाठी अतिरिक्त 15 कोटी देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणे, दि. 7 (जिमाका) :- वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा शहरातील बेतवडे येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, वारकरी संप्रदायाचे जितेंद्र महाराज, चेतन महाराज घागरे, बाळकृष्ण महाजन पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, विनायक महाराज, जयेश महाराज भाग्यवंत यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, बेतवडे गावाचे नागरिक उपस्थित होते. वारकरी भवनसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. महानगरपालिकेमार्फत हे भवन उभारण्यात येणार असून यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनाचे काम करत आहे. नागरिकांच्या प्रेमामुळे गेल्या वर्षी मला आषाढी वारीची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. वारकऱ्यांची पंढरी असलेल्या पंढरपूर देवस्थानच्या सुशोभीकरण व इतर कामांसाठी व वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष विकास आराखडा बनविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 83 कोटींचा निधी वर्गही केला आहे. पंढरपूर वारी मार्गावर आरोग्य तपासणी व इतर आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यावर्षीची आषाढी वारी ही मंगलमय, आनंददायी व सुखकारक होईल.

            संत सावळाराम महाराज स्मारकासाठी जागा आणि निधी देण्यात येईल. तसेच आगरी कोळी वारकरी भवनला सावळाराम महाराजांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            पुरातन देवस्थानांचे जतन, संवर्धन व विकास करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य शासनामार्फत घेत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परदेशी गुंवतणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

            खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे, दिवा, कल्याण परिसरात आगरी, कोळी व वारकरी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्यासाठी हे भवन उभारण्यात येत असून आगरी कोळी वारकरी भवन हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाईल. येत्या वर्षभरात हे भव्यदिव्य वारकरी भवन उभे राहिल. या वास्तूत आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडेल. कल्याण येथे संत सावळाराम स्मारकासाठी जागा अंतिम झाली असून लवकरच त्याचे भूमीपूजन होईल.

            यावेळी बेतवडे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्का

र करण्यात आला.

ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार

 ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवा परिसरातील 610 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

            ठाणे, दि. 7 (जिमाका) : दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

            ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

            “दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.

            यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

            दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्यकारभार करत आहोत. राज्यातील प्राचीन देवस्थानांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गडकोट, किल्ले यांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जेवढा निधी लागे

ल तो देण्यात येईल.

०००००

*फँटी लिव्हर*

 *फँटी लिव्हर*

आज आपण फँटी लिव्हर म्हणजे काय ही समस्या का निर्माण होते त्याची कारणे,लक्षणे,प्रकार, काय काळजी घेता येईल,आयुर्वेदिक उपचार, घरगुती उपचार या बदल जाणून घेणार असून या द्वारे या आजारावर परिपूर्ण माहिती घेऊ या.चला तर मंडळी सुरु करुया.

*फँटी लिव्हर म्हणजे काय?*

आपल्या यकृताच्या शमते पेक्षा जास्त कार्बोहैड्रेट्स किंवा फॅट्स किंवा दोन्ही प्रमाणाबाहेर खाल्ल्यास फॅटी लिव्हर (fatty liver) हा आजार होतो. जास्तीचे फॅट्स नॉर्मली पेशीं मध्ये साठवले जातात परंतु एका बिंदू पलीकडे त्या यकृताच्या आत आणि स्वभोवताली जमा होऊ लागतात व ही समस्या उद्भवते आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर सध्याच्या व्यग्र जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे फॅटी लिव्हर. यकृत पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही परिस्थिती उद्भवते.हे सोप्या भाषेत म्हणता येईल.पूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. आता बदललेली आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरचा आहारात समावेश यामुळे तरुणांमध्येही हा आजार बळावल्याचे दिसते.

*फँटी लिव्हर ची कारणे.*

१)लठ्ठपणा, मधुमेह किंवा उच्च २)ट्रायग्लिसरायड्ससारख्या समस्या 

३)आहारात जास्त साखर किंवा स्निग्ध पदार्थ 

४)व्यायामाचा अभाव कमी शारीरिक हलचाली 

५) अंत:स्रावाची कमतरता,

६)आहारात अती तेलकट पदार्थ, जंकफूड, मसालेदार खाणे. 

 विशिष्ट परिस्थिती अथवा कारणे असल्यास फॅटी लिव्हर विकसित होतात.यामुळे यकृताला धोका संभवतो. योग्य वेळी आपल्या यकृतातील वाढत्या चरबीकडे लक्ष दिले नाही, तर गंभीर परिणाम होतात. शक्य तितक्या लवकर उपचार केल्यास निरोगी आयुष्य जगता येते.

*फँटी लिव्हर ची लक्षणे*

१)पोटाचा घेर वाढणे

२) वजन सतत वाढणे

३) यकृताचा आकार वाढणे व सूज येणे

४) मळमळणे

५) भूक न लागणे

६) कामात उत्साह न राहणे. ७)पायांना सूज येणे.

८)सतत थकवा ,निरुत्साह उत्साह नसणे.

९) पोटात उजव्या बाजूला दुखणे.

*हा आजार होऊ नये म्हणून काय कराल.*

१)वजन नियंत्रीत करणे 

२)रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे

३) मद्यपान-धूम्रपान ताबडतोब बंद करणे.

४) कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण.

५)पौष्टिक-संतुलित आहार

६) नियमित व्यायाम रोज ७)४५मिनिटे किमान चालणे.प्राणायाम, योगा करणे.

 ८)आहारात फळे, भाज्या, बीन्स, कोंडायुक्त धान्याचा समावेश. ९)तळलेले पदार्थ आणि जंकफूड वर्ज्य करणे.

१० )आहारतज्ज्ञज्च्या सल्ल्याने आहार 

११)डॉक्टरांच्या/ आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध मनानं घेऊ नये निश्चित काळानुसार फाँलाँप देणे.

         [12/9, 7:52 PM] वैद्य गजानन: 

११)रोजच्या आहारात भरपूर फायबर (चोथा) असलेले अन्न उदा. पालेभाज्या, कोंडा न काढलेली भाकर यांचा आवर्जून समावेश करावा.आहार समतोल असावा. फळभाज्या, पालेभाज्या, कच्च्या कोशिंबिरींचा समावेश असावा. जेवताना शांत, आनंदी मनाने आहार घेतल्यास खाल्लेले अन्न योग्यरित्या पचते.सकाळचा नाश्ता टाळू नये.

 दिवसातून किमान एक-दोन फळे खावीत.

*फँटी लिव्हरचे प्रकार.*

१)स्टेटोसिस- यामध्ये यकृतात चरबी जमा झालेली असते, पण त्यामुळे सूज येत नाही.

२)स्टेरिएपेटायटिस - यामध्ये यकृताला जखम आणि सूज आढळते.

३)लिव्हर सिरोसिस - हा प्रकार अतिशय गंभीर असतो त्यामध्ये यकृताला इजा होण्याची शक्यता अधिक असते व पुढे अनेक जटील आजार कँन्सर वगैरे निर्माण होऊन रूग्ण दगावतो.

*आयुर्वेदिक उपाययोजना.*

१)लिव्ह५२टँब्लेटस दोन दोन सकाळी संध्याकाळी घेणे.

२)आरोग्यवर्धिनी दोन दोन गोळ्या गरमपाण्यात ठेवणे.

३)हेपजाँन फायटो फार्मा दोन गोळ्या जेवणापूर्वी घेत जाणे.

४)सर्वकल्प काँथ रोज घेणे.याने हेपेटायटिसa,b,c,d,e सह लिव्हर सोरायसिस प्रारंभीक स्टेज बरा होतो.

*घरगुती औषध रचना.*

 १)काळीमिरी पावडर,सुंठ,गिलोय,सैधव, चिमूटभर लिंबू पाण्यात घेत जा ग्लासभर घेत जा. रोज सकाळी. रात्री भिजवून सकाळी घेतल्यास पोटाची चरबी, घेर,वजन कमी होते.यात लिंबू अर्धा कपभर पाणी व इतर वस्तू चिमूटभर पावडर स्वरूपात.

२)दररोज सकाळी चिमूटभर ब्राऊन राईस पाण्या सोबत खाणे.

३)चार हिरडे ठेचून दोन कप पाण्यात उकळणे ते पाव कप झाल्यावर ते पाणी पिणे चार पाच जुलाब लागून लिव्हर वरील व प्लीहे वरील सूज झटक्यात उतरते.प्रयोग आठवड्यात करुन एकदा करावा महीन्याने रिपोर्ट चेक करा फरक दिसतो.

४)कार्ल्याचा रस आठ दिवस अर्धा कप घ्या. मी पुर्वी सांगितलेल्या या प्रयोगाने अनेकांचे रिपोर्ट बदललेत हे आपण गृपवर वाचले ही असेल.

५) लसूण: ऍडव्हान्स बायोमेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, लसूण फॅटी लिव्हर रोग असलेल्या शरीरातील वजन व चरबी कमी करण्यास मदत करते.

६) ब्रोकोली: जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, ब्रोकोलीच्या दीर्घकालीन वापरामुळे उंदरांच्या यकृतामध्ये चरबी तयार करणे थांबवण्यास मदत झाली.

७)अक्रोड्स: ओमेगा – 3 फॅटी ऍसिडमध्ये समृध्द असलेले अन्न यकृत आरोग्यासाठी चांगले असतात. एनएएफएलडी (NAFLD – नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हर डिसीज ) असलेल्या लोकांमध्ये अक्रोड खाण्याने लिव्हर फंक्शन टेस्ट सुधारल्याचा अभ्यास केला गेला.

७)रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे.त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते.

 ८)आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण या आवळय़ामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.

 ९)जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. ज्येष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे ज्येष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते रोज चमचाभर सत्व चमचाभर मधात डायबेटीस असलेल्या मंडळींनी करु नये.

१०)गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून चावून खात जा.

११)लसूण पाकळ्या व व्हिटमिन सी १०० मि. ग्रँम रोज घ्या. दोन वेळा लिव्हर व रक्तातील कोलँस्टेराँल सह चरबी कमी करेल.

१२) तीन चमचे इसबगोल रोज रात्री पाण्यात घेतल्यास कोलेस्ट्रोल व एल. डी. एल. कोलेस्ट्रोल दोन महिन्यात साधारण पाच ते आठ टक्के घटते.

१३)प्रोबायोटिक्स शरीरात जमा होणाऱ्या विषाक्त तत्वांना बाहेर काढण्यात मोठी भूमिका निभावतात म्हणून मध, दही, योगर्ट खा बाजारात प्रोबायोटिक युक्त ब्रेडस, दूध व दही सप्लिमेंट्स पण मिळतात. 

१४)भ्रुंगराज व हळद एकत्रित समप्रमाणात चुर्ण घेतल्यास दारु मुळे साचलेले घातक रसायन बाहेर टाकण्यास मदत होते.परिणामस्वरूप लिव्हर मधील दोष कमी होतात.

१५)काळी मिरी व लवंग शरीरातून अँसिडीटीचा प्रभाव कमी करतात नियमित एक चघळून खावी.याने लिव्हर गतीमान होते.

१६)दुधीचा ज्युस नियमितपणे घ्या.

आशा आहे एवढ्या महीनतीने लिहलेली पोस्ट आपणास आवडली असेल.यातील प्रयोग बिनधास्त करा शंभरटक्के चांगले रिझल्ट येतीलच. आवडल्यास नांवासह शेअर करा.या व अधिक माहितीसाठी आयुर्वेद प्रचार या माझ्या पेजला लाईक करा.शेअर करा.व निरामय आयुर्वेद या गृपचे सदस्य व्हा.

वैद्य. गजानन

_

त्वचा रोग शिबे,सुरमा*

 *शिबे,सुरमा*

छोटे छोटे पांढरे डाग छातीवर, मानेवर पाठीवर,गळ्यावर

कारण अशुध्द रक्त. त्वचेवरील मेलांजीन या द्रवाची कमतरता.

उपाययोजना

१)साबण लावू नये शिकेकाई चा वापर करा.तसेच कडुलिंबाच्या पानांना गरमपाण्यात उकळून ते लावावे.

२)रक्त दोषांतक घ्यावे.

३)बावचा तेल डागावर लावावे व कोवळ्या सुर्यकिरणात बसावे.

४)लिंबाचा रस अंगावर चोळावा.

५)सारिवाद्यासव व दोन दोन चमचे समभाग पाण्यात घ्या.

 वैद्य.गजानन

*

Featured post

Lakshvedhi