एक रसाळ कथा: एका मैत्रिणीने जेवायचे आमंत्रण दिले म्हणून मी जेवायला गेलो. मैत्रिणीने पोळ्या, दोन भाज्या, भात, आमटी असा व्यवस्थित स्वयंपाक केला होता. जेवणानंतर एक बाऊल भरून आमरस दिला. तेंव्हा मी तिला म्हणालो की अग आमरस असल्यावर भाज्या करायची गरज नव्हती. आमच्या घरी आमरस असल्यावर भाज्या करीत नाहीत. त्यावर ती म्हणाली की अरे तुझी बायको आळशी आहे. तीला भाज्या करायला नकोत म्हणून ती फक्त आमरसावर भागवते. मी घरी आल्यावर बायकोने कुत्सितपणे विचारले की काय मैत्रिणीने केला की नाही पाहुणचार व्यवस्थित? मी तिला सर्व हकिकत सांगितल्यावर ती म्हणाली की अहो भाज्या केल्या नसत्या तर तुम्ही अजून दोन तीन बाऊलस् आमरस ओरपला असता म्हणून तिने दोन भाज्या केल्या. चिकट मेली!
मी मात्र विचारात पडलो🤔 ही बरोबर की ती बरोबर?😆😂😧
No comments:
Post a Comment