*फँटी लिव्हर*
आज आपण फँटी लिव्हर म्हणजे काय ही समस्या का निर्माण होते त्याची कारणे,लक्षणे,प्रकार, काय काळजी घेता येईल,आयुर्वेदिक उपचार, घरगुती उपचार या बदल जाणून घेणार असून या द्वारे या आजारावर परिपूर्ण माहिती घेऊ या.चला तर मंडळी सुरु करुया.
*फँटी लिव्हर म्हणजे काय?*
आपल्या यकृताच्या शमते पेक्षा जास्त कार्बोहैड्रेट्स किंवा फॅट्स किंवा दोन्ही प्रमाणाबाहेर खाल्ल्यास फॅटी लिव्हर (fatty liver) हा आजार होतो. जास्तीचे फॅट्स नॉर्मली पेशीं मध्ये साठवले जातात परंतु एका बिंदू पलीकडे त्या यकृताच्या आत आणि स्वभोवताली जमा होऊ लागतात व ही समस्या उद्भवते आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर सध्याच्या व्यग्र जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे फॅटी लिव्हर. यकृत पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही परिस्थिती उद्भवते.हे सोप्या भाषेत म्हणता येईल.पूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. आता बदललेली आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरचा आहारात समावेश यामुळे तरुणांमध्येही हा आजार बळावल्याचे दिसते.
*फँटी लिव्हर ची कारणे.*
१)लठ्ठपणा, मधुमेह किंवा उच्च २)ट्रायग्लिसरायड्ससारख्या समस्या
३)आहारात जास्त साखर किंवा स्निग्ध पदार्थ
४)व्यायामाचा अभाव कमी शारीरिक हलचाली
५) अंत:स्रावाची कमतरता,
६)आहारात अती तेलकट पदार्थ, जंकफूड, मसालेदार खाणे.
विशिष्ट परिस्थिती अथवा कारणे असल्यास फॅटी लिव्हर विकसित होतात.यामुळे यकृताला धोका संभवतो. योग्य वेळी आपल्या यकृतातील वाढत्या चरबीकडे लक्ष दिले नाही, तर गंभीर परिणाम होतात. शक्य तितक्या लवकर उपचार केल्यास निरोगी आयुष्य जगता येते.
*फँटी लिव्हर ची लक्षणे*
१)पोटाचा घेर वाढणे
२) वजन सतत वाढणे
३) यकृताचा आकार वाढणे व सूज येणे
४) मळमळणे
५) भूक न लागणे
६) कामात उत्साह न राहणे. ७)पायांना सूज येणे.
८)सतत थकवा ,निरुत्साह उत्साह नसणे.
९) पोटात उजव्या बाजूला दुखणे.
*हा आजार होऊ नये म्हणून काय कराल.*
१)वजन नियंत्रीत करणे
२)रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे
३) मद्यपान-धूम्रपान ताबडतोब बंद करणे.
४) कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण.
५)पौष्टिक-संतुलित आहार
६) नियमित व्यायाम रोज ७)४५मिनिटे किमान चालणे.प्राणायाम, योगा करणे.
८)आहारात फळे, भाज्या, बीन्स, कोंडायुक्त धान्याचा समावेश. ९)तळलेले पदार्थ आणि जंकफूड वर्ज्य करणे.
१० )आहारतज्ज्ञज्च्या सल्ल्याने आहार
११)डॉक्टरांच्या/ आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध मनानं घेऊ नये निश्चित काळानुसार फाँलाँप देणे.
[12/9, 7:52 PM] वैद्य गजानन:
११)रोजच्या आहारात भरपूर फायबर (चोथा) असलेले अन्न उदा. पालेभाज्या, कोंडा न काढलेली भाकर यांचा आवर्जून समावेश करावा.आहार समतोल असावा. फळभाज्या, पालेभाज्या, कच्च्या कोशिंबिरींचा समावेश असावा. जेवताना शांत, आनंदी मनाने आहार घेतल्यास खाल्लेले अन्न योग्यरित्या पचते.सकाळचा नाश्ता टाळू नये.
दिवसातून किमान एक-दोन फळे खावीत.
*फँटी लिव्हरचे प्रकार.*
१)स्टेटोसिस- यामध्ये यकृतात चरबी जमा झालेली असते, पण त्यामुळे सूज येत नाही.
२)स्टेरिएपेटायटिस - यामध्ये यकृताला जखम आणि सूज आढळते.
३)लिव्हर सिरोसिस - हा प्रकार अतिशय गंभीर असतो त्यामध्ये यकृताला इजा होण्याची शक्यता अधिक असते व पुढे अनेक जटील आजार कँन्सर वगैरे निर्माण होऊन रूग्ण दगावतो.
*आयुर्वेदिक उपाययोजना.*
१)लिव्ह५२टँब्लेटस दोन दोन सकाळी संध्याकाळी घेणे.
२)आरोग्यवर्धिनी दोन दोन गोळ्या गरमपाण्यात ठेवणे.
३)हेपजाँन फायटो फार्मा दोन गोळ्या जेवणापूर्वी घेत जाणे.
४)सर्वकल्प काँथ रोज घेणे.याने हेपेटायटिसa,b,c,d,e सह लिव्हर सोरायसिस प्रारंभीक स्टेज बरा होतो.
*घरगुती औषध रचना.*
१)काळीमिरी पावडर,सुंठ,गिलोय,सैधव, चिमूटभर लिंबू पाण्यात घेत जा ग्लासभर घेत जा. रोज सकाळी. रात्री भिजवून सकाळी घेतल्यास पोटाची चरबी, घेर,वजन कमी होते.यात लिंबू अर्धा कपभर पाणी व इतर वस्तू चिमूटभर पावडर स्वरूपात.
२)दररोज सकाळी चिमूटभर ब्राऊन राईस पाण्या सोबत खाणे.
३)चार हिरडे ठेचून दोन कप पाण्यात उकळणे ते पाव कप झाल्यावर ते पाणी पिणे चार पाच जुलाब लागून लिव्हर वरील व प्लीहे वरील सूज झटक्यात उतरते.प्रयोग आठवड्यात करुन एकदा करावा महीन्याने रिपोर्ट चेक करा फरक दिसतो.
४)कार्ल्याचा रस आठ दिवस अर्धा कप घ्या. मी पुर्वी सांगितलेल्या या प्रयोगाने अनेकांचे रिपोर्ट बदललेत हे आपण गृपवर वाचले ही असेल.
५) लसूण: ऍडव्हान्स बायोमेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, लसूण फॅटी लिव्हर रोग असलेल्या शरीरातील वजन व चरबी कमी करण्यास मदत करते.
६) ब्रोकोली: जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, ब्रोकोलीच्या दीर्घकालीन वापरामुळे उंदरांच्या यकृतामध्ये चरबी तयार करणे थांबवण्यास मदत झाली.
७)अक्रोड्स: ओमेगा – 3 फॅटी ऍसिडमध्ये समृध्द असलेले अन्न यकृत आरोग्यासाठी चांगले असतात. एनएएफएलडी (NAFLD – नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हर डिसीज ) असलेल्या लोकांमध्ये अक्रोड खाण्याने लिव्हर फंक्शन टेस्ट सुधारल्याचा अभ्यास केला गेला.
७)रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे.त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते.
८)आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण या आवळय़ामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.
९)जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. ज्येष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे ज्येष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते रोज चमचाभर सत्व चमचाभर मधात डायबेटीस असलेल्या मंडळींनी करु नये.
१०)गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून चावून खात जा.
११)लसूण पाकळ्या व व्हिटमिन सी १०० मि. ग्रँम रोज घ्या. दोन वेळा लिव्हर व रक्तातील कोलँस्टेराँल सह चरबी कमी करेल.
१२) तीन चमचे इसबगोल रोज रात्री पाण्यात घेतल्यास कोलेस्ट्रोल व एल. डी. एल. कोलेस्ट्रोल दोन महिन्यात साधारण पाच ते आठ टक्के घटते.
१३)प्रोबायोटिक्स शरीरात जमा होणाऱ्या विषाक्त तत्वांना बाहेर काढण्यात मोठी भूमिका निभावतात म्हणून मध, दही, योगर्ट खा बाजारात प्रोबायोटिक युक्त ब्रेडस, दूध व दही सप्लिमेंट्स पण मिळतात.
१४)भ्रुंगराज व हळद एकत्रित समप्रमाणात चुर्ण घेतल्यास दारु मुळे साचलेले घातक रसायन बाहेर टाकण्यास मदत होते.परिणामस्वरूप लिव्हर मधील दोष कमी होतात.
१५)काळी मिरी व लवंग शरीरातून अँसिडीटीचा प्रभाव कमी करतात नियमित एक चघळून खावी.याने लिव्हर गतीमान होते.
१६)दुधीचा ज्युस नियमितपणे घ्या.
आशा आहे एवढ्या महीनतीने लिहलेली पोस्ट आपणास आवडली असेल.यातील प्रयोग बिनधास्त करा शंभरटक्के चांगले रिझल्ट येतीलच. आवडल्यास नांवासह शेअर करा.या व अधिक माहितीसाठी आयुर्वेद प्रचार या माझ्या पेजला लाईक करा.शेअर करा.व निरामय आयुर्वेद या गृपचे सदस्य व्हा.
वैद्य. गजानन
_
No comments:
Post a Comment