Wednesday, 17 May 2023

कोणते खाद्य तेल वापरावे ?*

 *कोणते खाद्य तेल वापरावे ?* 

 *उत्तर* - आपण ज्या हवामान व प्रदेशात राहतो तेथे जे पिकवले जाते ते आपल्या शरीराला पोषक ठरते.


उदाहरण:

उत्तरप्रदेश येथे - सरसो ऑइल 

केरळ येथे - कोकोनट

कर्नाटक येथे- सूर्यफूल

महाराष्ट्र येथे - शेंगदाणा


*शेंगदाणा तेल* 

पदार्थांची रुची वाढवते, चटणी, पिठले ,सॅलेड यांना वरतून वापरले तरी तेलातील जीवनसत्व मिळतात. व पचन सुधारते, तळण , फोडणीसाठी चालते, गुड कोलेस्ट्रोल वाढवते.

बॅड कोलेस्ट्रोल कमी करते. स्किन सॉफ्ट होते.

जीवनसत्त्वे - A, E, C, D


*करडई तेल* 

स्वयंपाक घरात फोडणीत, पदार्थ तळण्या करीता चांगले आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाब व हृदय रोग यावर नियंत्रण येते. चरबी कमी करण्यास उपयुक्त.


*सूर्यफूल तेल* 

स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. थोडा उग्र वास येतो. हाडांसाठी चांगले, संधीवात कमी करते, अस्थमा प्रतिबंध होतो, कर्करोगाला प्रतिबंध होतो.. 


*जवस तेल* 

स्वयंपाक घरात पदार्थ करण्यासाठी वापरात नाही. हे तेल चटणीमध्ये किंवा कणिक भिजवताना किंवा चपातीला वरती लावून खावे. हे तेल चवीला उग्र असते. उष्ण व औषधी आहे. यामुळे हार्टब्लॉकेजेस रक्तातील गुठळ्या कमी होतात. स्त्रियांच्या रजोनिवृत्ती नंतर निर्माण होणाऱ्या इस्ट्रोजन संबंधित हार्मोन्सवर गुणकारी आहे. ओमेगा 3 मुळे पेशींची लवचिकता वाढते. या तेलात 6 जीवनसत्त्वे आहेत त्यामुळे, ऑस्टिओपोरासिस, ऑस्टिओआर्थयटीस, अस्थमा, कॅन्सर यामध्ये हे तेल गुणकारी आहे. या तेलाचा वापर योग्य प्रमाणात करावा.


*खोबरेल तेल* 

खोबरेल तेलाचे अनेक उपयोग आहेत.

स्वयंपाकासाठी चांगले आहे.

विशेषतः या तेलात शिरा, पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खूपच चविष्ट होतात. तळण्यासाठी सुध्दा चांगले. *याचे वैशिष्ट हे की* 2 ते 3 वेळेस तळले तरी तेलातील व्हिटॅमिन टिकून राहतात. पोटाचा घेर कमी करून शरीर स्लिम करते. चरबी कमी करणारे आहे. अँटीसेफटिक म्हणून देखील उपयोगी आहे. यामध्ये कापूर, अमृधारा, नीम तेल प्रमाणात टाकल्यास केस काळे व दाट होऊन केसांच्या समस्या दूर होतात. सूर्याच्या कोवळ्या उन्हात वरील मिश्रण लावल्यास कोंडा जातो. शरीरात थंडावा ठेवते.


*तीळ तेल*

तीळ तेल हे शरीर संतुलित करते. स्नेहन करण्यासाठी चांगले.

वरतून खाण्यासाठी चांगले

स्वयंपाकासाठी चालते पण

तळण्यासाठी वापरू नाये. हे तेल मुळात लवकर खराब होत नाही.

हाडे मजबूत करते, रक्तदाब नियंत्रित करते, ब्रेनसाठी चांगले, यामध्ये ओमेगा 6, इ, क, ब6 हे जीवनसत्त्वे आहेत.


*सरसो तेल* 

हे तेल अतिशय उष्ण आहे.

सर्व प्रकारे स्वयंपाकासाठी वापरता. यामध्ये ओमेगा 3 असते , कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, यांना प्रतिबंध होतो.

पचनशक्ती सुधारते, शौचाला साफ होते, प्रतिकार शक्ती वाढवते, 

या तेलाने मसाज केल्यास अंगदुःखी थांबते.


आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे..



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*

 up मेसेज करा_*

*


https://chat.whatsapp.com/Chq4o0qlHlK3NJAuvdEIH2

स्वातंत्र्य सैनिकांचा पालकमंत्र्यांचे हस्ते सत्कार होणार

 स्वातंत्र्य सैनिकांचा पालकमंत्र्यांचे हस्ते सत्कार होणार


मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी ; शासन परिपत्रक जारी


 


            मुंबई, दि. १६. राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक/त्यांच्या जोडीदारांचा प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.


            स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, महाराष्ट्र यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर शासनामार्फत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक व विधवा पत्नी यांचा योग्य तो सन्मान पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात यावा अशी मागणी केली होती. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांचे विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांचा सत्कार करण्याबाबत हे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.


            देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी दिलेल्या वेळेनुसार सर्व (केंद्र व राज्य) स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.


0

जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा.

 जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा.


-मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. १६ : माल वाहतूक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन तळ अपुरे पडतात. सांगली महानगरपालिकेच्या मालकीच्या ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या १७ एकर जागेवर अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारणीसाठी जिल्हाधिकारी सांगली यांनी प्रस्ताव तयार करावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


            आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.


            पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करणे व अनुषंगिक बाबींविषयी परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. या अभ्यास गटाने याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून आपले सरकार या पोर्टलवरही तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहे. तसेच परिवहन आयुक्त कार्यालय, वाहतूक पोलीस विभाग किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दूरध्वनी व ईमेलद्वारे तक्रारीची नोंद करता येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


            ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट यांच्या ट्रक टर्मिनस, जकात नाक्याची जागा इत्यादी मागण्यांबाबत पुढील आठवड्यात नगर विकास विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


            या बैठकीत मालवाहतूक वाहनांची कागदपत्रे तपासणी, वाहन क्षमता तपासणी, बॉर्डर चेक पोस्ट, परिवहन विभागाने मालवाहतूक भाड्याची व्याख्या निश्चित करणे,राष्ट्रीय महामार्गावर विश्रांतीगृह,शौचालय तसेच पार्किंग सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली.


            या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, यांच्यासह विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी, तसेच ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

जमिन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी

 जमिन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई, दि. 16: सामुहिक आणि वैयक्तिक वनहक्क अंतर्गत प्राप्त झालेले वनपट्टे शासकीय किंवा निमशासकीय प्रकल्पासाठी संपादित केल्यानंतर जमिन अधिग्रहण करण्यासाठीची पद्धत आणि अधिग्रहीत जमिनीसाठी द्यावयाचा मोबदला याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज दिले.


            वैयक्तिक वनहक्क धारकांची गाव नमुना नंबर 7/12 च्या धारण धिकार सदरी भोगवटादार वर्ग -2 नोंदी घेणे आणि अन्य विषयांच्या अनुषंगाने गठित अभ्यास समितीची बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.


            एखाद्या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहीत केल्यास त्यांना भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई किंवा मोबदला नेमका किती असावा याचा अभ्यास करण्यात यावा, असे यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            वनहक्क प्राप्त धारकांना बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही यासाठी आवश्यक असणारे परिपत्रक पुन्हा एकदा निर्गमित करण्यात यावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिल्या.


            वनहक्क निश्चित करण्यासाठी कमीत कमी दोन पुरावे सादर करणे आवश्यक असते. हे नेमके दोन पुरावे कोणते असावे याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात याव्या, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केल्या.


            अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारणा नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये वैयक्तिक वनहक्क धारकांची गाव नमुना नंबर 7/12 सदरी भोगवटादार वर्ग-2 (नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनी) अशी नोंद घेणेबाबत महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती 24 मार्च 2023 रोजी नियुक्त करण्यात आली आहे. या अभ्यास समितीची पहिली बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या समितीने सर्व बाबींचा अभ्यास करुन शिफारशींचा अहवाल शासनास सादर करणार आहे.


            भूसंपादन केल्यानंतर मोबदला न मिळणे, शेती कर्ज मिळण्यास होणाऱ्या अडचणी, शासनाच्या इतर शेती विषयक योजनांचा लाभ मिळण्यास येणाऱ्या अडचणी, वनहक्काच्या अनुषंगाने इतर सूचना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


०००

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातकार्यप्रणाली तयार करण्यात येणार

 चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातकार्यप्रणाली तयार करण्यात येणार


 -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            मुंबई, दि. 16: महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळाम चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच चित्रपटगृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचे समन्वय आवश्यक असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली करण्यात येईल.


            आज झालेल्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत जेणेकरुन याविषयाबाबत विस्तृत बैठक 15 जूननंतर घेण्यात येईल असे यावेळी सांगितले. आज अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबतही काही नियमावली तयार करता येईल का याबाबतचा अभ्यासही करण्यात यावा अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.


००००

सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी

 सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी


- मंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 16 : सातारा जिल्ह्यातील तारळी धरण, मोरणा गुरेघर प्रकल्प व उत्तरमांड प्रकल्पाच्या विविध प्रलंबित मंजूर कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


            आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील विविध प्रलंबित कामांसंदर्भात बैठक झाली.


            या बैठकीस सचिव राजेंद्र मोहिते, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे उपस्थित होते.


            मंत्री श्री. देसाई यांनी तारळी धरण प्रकल्पातील 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांच्या मंजूर कामांच्या सद्यस्थितीचा व अन्य प्रलंबित कामांचा आढावा यावेळी घेतला. तारळी धरण प्रकल्पांतर्गत टप्पा क्र.2 अंतर्गत तारळे, बांबवडे, धुमकवाडी, आवर्डे व कोंजवडे या योजना लवकरात लवकर पूर्ण करुन कार्यान्वित कराव्यात. तसेच उपसा सिंचन योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देणार

 कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देणार


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 16 :- कोयना प्रकल्प हा राज्यातील सर्वात जुना प्रकल्प असून हा प्रकल्प मूळ सातारा जिल्ह्यातील आहे. कोयना प्रकल्पास निश्चित असे लाभक्षेत्र नाही. काही कोयना प्रकल्पग्रस्तांना अद्याप काहीही पर्यायी जमीन मिळालेली नाही. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्चस्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देण्यात येणार असल्याचे कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


            आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.


            या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी उपस्थित होते.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले की, राज्याच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे बघितलं जात. या धरणासाठी प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना अद्याप पर्यायी जमीन मिळाली नाही. अशा प्रकल्पग्रस्तांचे पर्यायी जमिनी संदर्भात तातडीने कार्यवाही करावी. कोयना प्रकल्पग्रस्त हा मूळ सातारा जिल्ह्यातील असून त्या जिल्ह्यात मुबलक पर्यायी जमीन उपलब्ध असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या जमीन कोयना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील आहेत. सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन भूसंचायातील जमिनीसाठी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याबाबत राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीकडे शिफारस करावी, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले, जिल्हाधिकारी सातारा यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन भूसंचायातील जमिनी मागणी करण्याबाबत कोयना प्रकल्पग्रस्तांना आवाहन करून या संदर्भात एक आठवड्यात शिबिर आयोजित करून पर्यायी जमीन वाटप करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन करीता अर्ज करताना त्यांच्याकडून कमीत कमी कागदपत्राची मागणी करावी. प्रकल्पग्रस्तांचे संकलन अद्यावत करण्यासाठी आवश्यक माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी व्यक्तिशः लक्ष देऊन पडताळणी करून सातारा जिल्हा कार्यालयास उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi