Wednesday, 17 May 2023

सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी

 सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी


- मंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 16 : सातारा जिल्ह्यातील तारळी धरण, मोरणा गुरेघर प्रकल्प व उत्तरमांड प्रकल्पाच्या विविध प्रलंबित मंजूर कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


            आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील विविध प्रलंबित कामांसंदर्भात बैठक झाली.


            या बैठकीस सचिव राजेंद्र मोहिते, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे उपस्थित होते.


            मंत्री श्री. देसाई यांनी तारळी धरण प्रकल्पातील 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांच्या मंजूर कामांच्या सद्यस्थितीचा व अन्य प्रलंबित कामांचा आढावा यावेळी घेतला. तारळी धरण प्रकल्पांतर्गत टप्पा क्र.2 अंतर्गत तारळे, बांबवडे, धुमकवाडी, आवर्डे व कोंजवडे या योजना लवकरात लवकर पूर्ण करुन कार्यान्वित कराव्यात. तसेच उपसा सिंचन योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi