Tuesday, 18 April 2023

उन्हाळ्यातील पिण्याचे पाणी🌊

 *उन्हाळा आणि आयुर्वेद भाग 1*

उन्हाळ्यातील पिण्याचे पाणी🌊


'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा... जिसमे मिलाऊ उसके जैसा...!' ही म्हण सर्वांनाच ठाऊक आहे.

उन्हाळ्यात या पाण्याची अधिकच  गरज भासते. बाहेर उन्हाचा तडाखा वाढायला लागला कि फ्रिज मधील एकदम थंडगार पाणी अगदी पोटभर पिण्याची इच्छा तुम्हा आम्हा सर्वांनाच होते. पण हे कितपत बरोबर आहे याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.

 

उन्हाळ्यात पाणी पिण्याचे काही नियम असतात का? तर हो!

असेच काही सर्व सामान्य नियम आपण खाली पाहणार आहोत.


✅️उन्हाळ्यात शरीरातील उष्णता, कोरडेपणा वाढतो, सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे शरीराला इतर ऋतुंच्या तुलनेत या दिवसात जास्त पाण्याची गरज भासते.


✅️थंड पाणी:- उन्हाळ्यात म्हणजेच  ग्रीष्म ऋतूत नैसर्गिक रित्या थंड झालेले पाणी हे तृप्तीकर, आल्हाददायक असते. यात प्रामुख्याने माठातील पाणी हे नैसर्गिक रित्या थंड झालेले असून शरीरातील उष्णता, आग होणे, थकवा, चक्कर, भोवळ, उलटी व त्यानंतर जाणवणारी मळमळ, अस्वस्थता, वारंवार लागणारी तहान इ. स्वरूपाचे आजार कमी करणारे आहे.

( फ्रिज मध्ये कृत्रिम रित्या थंड केलेले पाणी हे आरोग्यास योग्य नाही. असे पाणी अधिक प्रमाणात पिले गेल्याने भूक कमी होऊन अपचनासारखे आजार वर डोके काढू शकतात. )


डॉ.गणेश रोडे



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



⭕️आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल*

 प्रतिकारशक्ती


आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल .


काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.


तुळस

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर  तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून  खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.

तूप

कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.

आवळा-लिंबू

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे. 


आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा,  कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. 


पाणी

आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी  आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो. 


नाचणी सत्वं.

दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.

नाचणीची भाकरी खावी .


बीट


दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे  वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा. 


दूध-हळद


 


रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये. 


लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून,  वाटून   ते दूध द्यायला हवं.  दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात. 


 


 दही आणि ताक


 


रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात  ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा  संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं.  मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.


  


गुळाचा खडा आणि खडीसाखर.


 


घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.


लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी. 


  

*⭕️

सावधान* उष्माघात

 *सावधान*


काल 11 लोक उन लागून मेले.

हे वाचा, सर्वांना सांगा.शेअर करा.सर्वांना सांगा.हे आपण केले नाही व आपले लोक खराब झाले तर आपण दोषी.


यंदा उन्हाळा कडक आहे.

तापमान नेहमी पेक्षा  5 अंशांनी जास्त राहील.


3 गोष्टी जाणा.

1.उन्हाचा त्रास असा टाळा.

तहान लागणार नाही एवढे पाणी सतत प्या.सर्वांना पाजा.


कपडे असे घाला.

सभ्य पण कमीत कमी. 

एकच थर.

ढिले. जाळी दार हवेशीर होजियरी पांढरे सर्वोत्तम. 

टोप्या, रुमाल वापरा.

सर्वांना  सांगा.आता शेअर करा. 

नवशिशुंना सर्वाधिक त्रास होतो.

ते पिवळे दिसतात. 

त्यांना कपड्यात गुंडाळू नका. 

उघडे ठेवा.

सारखे आईचे दूध पाजा.


2.ताप आला तर .

खालील पैकी एक पण खूण मिळाली तर  हा

उन्हाचा ताप आहे. 


1)  आजाराच्या तापात तळहात तळपाय गार असतात. उन्हाच्या तापात ते गरम असतात.

2) दोन बोटात गाल धरा.एक तोंडाच्या आत.

एक चामडीवर.

तोंडाच्या आतल्या बोटपेक्षा बाहेरच्या चामडीच्या बोटाला जास्त गर्मी लागली तर ताप उन्हाचा आहे.

3) गळ्याला हात लावा. घामाने आपला गळा ओलसर लागतो.उन्हाचा ताप असेल तर घाम नसतो. गळ्याची चामडी कोरडी लागते.

4) तहान लागते.

5) लघवी कमी होते. पिवळी होते. तिला वास येतो.

6. इतर काही त्रास नाही.


3.उपाय : वारंवार  डोक्यावरून आंघोळ करा.

कुलर, एसी पंखा लावा.

गार खोलीत जा.

तहान लागणार नाही, व सुसू खूप होईल  एवढे पाणी प्या. पातळ वस्तू प्या.


सर्वांना सांगा.

आपण सांगितले नाही व कुणाला त्रास झाला तर आपण दोषी


Monday, 17 April 2023

Vushu असोसिएशन, स्टेट competition


राग! औषध काय

 *राग!!!*


इतकी चिडचिड झालीये ना!

काय डोकं फिरलंय माझं!!

मी तर अशी भडकले होते!

डोकं आउट झालंय!!

अंगाचा नुसता तिळपापड झालाय माझ्या!

राग आलाय मला! 


अशी किती किती वाक्य आपण दिवसातून, आठवड्यातून, महिन्यातून कितीदा म्हणतो...आठवतंय का? तुमच्या पैकी किती तरी जणं आत्ता या क्षणी सुद्धा कोणाचातरी, कशाचा तरी राग आला म्हणुन शांत व्हायला, distraction साठी whatsapp वर आले असतील! आहेत का असे कोणी? आता हे वाचून हसू येत असेल ना? राग हा तर येतोच.. न बोलवता येणारा हक्काचा पाहुणा आहे हो तो. कधी रोज रोज येतो, कधी क्वचितच येतो...तुम्हाला, मला कोणालाही तो कधीही येऊ शकतो! अगदी तान्हूल्या बाळाला पण रागानी लाल बुंद होत टाहो फोडताना पाहिलंय की आपण! बरं रागाची काहीही कारणं असु शकतात. कोणी मनासारखे वागत नाही म्हणून आपण चिडतो, कोणी टोमणे मारतं म्हणून आपण चिडतो,  कधी हट्ट पूर्ण नाही झाला तर चिडतो, कधी कधी ego hurt झाला तरीही चिडतो,पुण्याच्या रस्त्यात गाडी चालवताना तर हमखास चिडतो... भूक लागली म्हणून ही चिडणारे लोक मी बघितलेत. माझा लेक त्यातला एक! कधी समोरचा माणूस इतका बिनडोक कसा, या प्रश्नाने पण राग येतो! वयानुसार, वेळेनुसार, स्वभावानुसार ह्या कारणात थोडाफार फेरफार होतो! कोणी व्यक्ति तापट स्वभावाची...अश्या लोकांना जरा काही मनाविरुद्ध झालं की गेलीच कळ मस्तकात! कोणी आतल्या गाठीचे...राग आल्या क्षणी तो व्यक्त न करता आतल्या आत तो marinate करत ठेवतात आणि वेळ आली की तो राग मस्त गरमागरम बाहेर काढतात! काही लोक short-tempered...माझ्या सारखे...राग येतो ही पटकन, तो express ही होतो पटकन आणि निवळतो ही पटकन! काही लोक hot-tempered...चिडले की काही खरं नसतं समोरच्याचं. 


रागाला जसा स्वभाव असतो ना, तस रागाचं वय ही असतं हां! म्हणजे बघा, baby राग वेगळा, रडून गोंधळ घालणारा, बोलत नाही पण दिसतो मात्रं लाल बुंद, toddler राग सगळ्यात cute. खेळणारा,खेळवणारा, खेळणं तुटलं म्हणून येणारा, खेळणं ऐकत नाही म्हणून पण येणारा! Childhood राग थोडा चिडणारा, थोडा चिडवणारा, कधी मारामारी करणारा, तर कधी फटके खायला लावणारा! या रागाचा climax पण बहुतेक अश्रू रूपात होतो! Teenage रागाचं रूप भयानक, hormones नी ओथंबलेलं, सद्सद्विवेक बुद्धी अजिबात नसणारा,सतत सोबत चालणारा, कधी पटकन आयुष्याचं वाटोळं करणारा! मग मात्रं हळूहळू राग पण mature व्हायला लागतो. यायचा बंद होत नाही, पण control मध्ये मात्र यायला लागतो. 


पण ह्या सगळ्याला exception असणारे, राग न येणारे महाभाग ही आहेत बरेच.  मला त्यांचा फार फार हेवा वाटतो. किती सुखी असतात अहो हे लोक! किती energy save होते यांची रोज! अगदी जवळचं उदाहरण द्यायचं तर आमचे पप्पा, माझे सासरे. 15 वर्षात मी त्यांना चिडताना एकदाही बघितलं नाहीये. आपल्या मेंदू मध्ये वेगवेगळ्या feelings साठी वेगवेगळे compartments असावेत, पण आमच्या पप्पांच्या मेंदूत राग compartment fit करायला बहूतेक देव विसरला असावा . त्यामुळे ते जगातल्या सगळ्यात सुखी माणसांपैकी एक आहेत हे निर्विवाद सत्य आहे. घरात कितीही क्लेश होऊ द्या, कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, कोणीही काहीही म्हणू द्या... आमचे पप्पा चक्क सगळं सोडून मस्त वामकुक्षी घेऊ शकतात! आम्ही चिडलो बोललो भांडलो, त्यांना काहीही देणंघेणं नसतं. राग येतच नाही कसा त्यांना? मला पडलेलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं कोडं आहे ते. इकडे मी उगाच छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसवे फुगवे सहन करते, कधी स्वतःचे, कधी समोरच्याचे. त्यात मी किती emotions, time आणि energy invest (का waste?) करत असते,  स्वतःचं B.P. वाढवून घेत असते, serrotonin कमी करून घेत असते! असं जर पप्पां सारख स्थितप्रज्ञ राहता आलं, तर किती extra energy आणि वेळ असेल नाही? त्यामुळे आता माझा तरी life goal आहे की life मधे राग नियंत्रण मोहीम राबवायची! अगदी पूर्ण नाही, पण 80% जरी राग कमी करता आला, तर life will be so much more beautiful! हे राग नियंत्रण म्हणजे राग कंट्रोल करणे नाही बरं का! तर राग येऊच द्यायचा नाही. Prevention is better ना cure पेक्षा, म्हणून! त्यासाठी मी एक stepwise प्रोसेस design करावी असं म्हणतेय. ती केली की मग त्याची trial घेईन. जर ते सफल संपूर्ण झालं, तर सांगेनच तुम्हा सर्वांना! 


तोपर्यंत लक्षात ठेवा "Anger is one letter short of Danger!" त्यामूळे शांत रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा! 


©GG

मेड फॉर इच अदर"*

 *"मेड फॉर इच अदर"*

आपोआप होत नाहीत.

होत जातात. 💞💞


         

कागदावर जुळलेली पत्रिका

आणि

काळजावर जुळलेली पत्रिका यात  अंतर राहतं.


लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.


वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?


सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.


सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.


निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं

नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?. त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.


*अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.*


कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा..  या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.


लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं.


तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे' पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं...

जाब विचारू शकतो आपण?


किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची

आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं - असं स्वप्न आहे!'

पण

प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं.

प्रवासाची आवड कसली?

- कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब... वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर

उत्तर म्हणून फक्त जांभया देतो.

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर...


मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.


तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली.


अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.


पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना

सांगितलंच जात नाहीये;


नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.


आणि मग करा काय??


आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.


धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?-

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी

देऊन मगच संसार मांडायला हवा.


आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या

व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..


ती तृप्तपदी होण्यासाठी हा सर्व ऊपद्व्याप.

हेच संसाराचं खरं मर्म आहे.


आपल्याला ऊदंड वैवाहिक आनंदी आयुष्य लाभो हीच प्रार्थना


संकलक

 *प्रा. माधव सावळे*

Best of Luck👍🏻


┉❀꧁꧂❀┉*

    *‼️🌹शुभ दिवस 🌹‼️*

 🍃🍂🌷🙏🌷🍂🍃

*┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉*

*┊*  *┊*  *┊*  *┊*

*┊*  *┊*  *┊*       🍃

*┊*  *┊*       🍃     ❤️

*┊*       🍃      💚

🍃     🤍

🧡

अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!*

 * अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!* 


भोपळा ही अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. बहुतेक लोक भोपळा खातात. परंतु त्याच्या बिया फेकून देतात. पण असे केल्याने तुम्ही अनेक प्रकारचे आरोग्य फायदेही काढून टाकता. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने सर्वांनाच फायदा होतो,

परंतु पुरुषांना याचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.

◼️भोपळ्याच्या बियांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, कर्करोग, पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

◼️या बियांमध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रोटीन, ऊर्जा, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स,  सोडियम, थायामिन, फोलेट, फॉस्फरस इत्यादी असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या निर्माण होण्यापासून बचाव होतो.


*भोपळ्याच्या बियांचे फायदे -*

◼️भोपळ्याच्या बिया त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात.

◼️यामध्ये फायबर असल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी होते.

◼️पोटात जंत होण्याची समस्या टाळते.

◼️शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही.

◼️भोपळ्याच्या बिया मेंदूला निरोगी ठेवतात.

◼️युरिन इन्फेक्शन, युरिनरी इन्कॉन्टीनन्स, यूटीआय यासारख्या समस्या दूर करते.

◼️रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया खा.

◼️यामध्ये असलेले काही घटक उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.

◼️पचनशक्ती, हाडांना बळ देते.

◼️मूत्राशयात स्टोन होऊ देत नाही.

◼️हे हृदयासाठी आरोग्यदायी आहे.

◼️झोप न येण्याची समस्या दूर होते.


*पुरुषांसाठी भोपळ्याच्या बियांचे फायदे*


◼️प्रोस्टेटचे आरोग्य राखण्यासाठी पुरुषांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रोस्टेट ही एक प्रकारची ग्रंथी आहे, जी वीर्य निर्माण करण्यास मदत करते. पुरुषांमध्ये वाढत्या वयाबरोबर प्रोस्टेटचा आकारही वाढतो. मात्र त्याचा आकार जास्त वाढू नये अन्यथा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बियांचे सेवन करून ही ग्रंथी निरोगी ठेवता येते.


◼️ज्यांना अशक्तपणा जाणवतो, त्यांनी भोपळ्याच्या बिया नक्की खाव्या. भोपळ्याच्या बिया खाल्याने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरपूर राहाते. यासाठी भोपळ्याच्या बिया भाजून स्नॅक्समध्ये खाऊ शकता. याच्या वापराने तुमची प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया दोन्ही मजबूत राहतात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️

Featured post

Lakshvedhi