*राग!!!*
इतकी चिडचिड झालीये ना!
काय डोकं फिरलंय माझं!!
मी तर अशी भडकले होते!
डोकं आउट झालंय!!
अंगाचा नुसता तिळपापड झालाय माझ्या!
राग आलाय मला!
अशी किती किती वाक्य आपण दिवसातून, आठवड्यातून, महिन्यातून कितीदा म्हणतो...आठवतंय का? तुमच्या पैकी किती तरी जणं आत्ता या क्षणी सुद्धा कोणाचातरी, कशाचा तरी राग आला म्हणुन शांत व्हायला, distraction साठी whatsapp वर आले असतील! आहेत का असे कोणी? आता हे वाचून हसू येत असेल ना? राग हा तर येतोच.. न बोलवता येणारा हक्काचा पाहुणा आहे हो तो. कधी रोज रोज येतो, कधी क्वचितच येतो...तुम्हाला, मला कोणालाही तो कधीही येऊ शकतो! अगदी तान्हूल्या बाळाला पण रागानी लाल बुंद होत टाहो फोडताना पाहिलंय की आपण! बरं रागाची काहीही कारणं असु शकतात. कोणी मनासारखे वागत नाही म्हणून आपण चिडतो, कोणी टोमणे मारतं म्हणून आपण चिडतो, कधी हट्ट पूर्ण नाही झाला तर चिडतो, कधी कधी ego hurt झाला तरीही चिडतो,पुण्याच्या रस्त्यात गाडी चालवताना तर हमखास चिडतो... भूक लागली म्हणून ही चिडणारे लोक मी बघितलेत. माझा लेक त्यातला एक! कधी समोरचा माणूस इतका बिनडोक कसा, या प्रश्नाने पण राग येतो! वयानुसार, वेळेनुसार, स्वभावानुसार ह्या कारणात थोडाफार फेरफार होतो! कोणी व्यक्ति तापट स्वभावाची...अश्या लोकांना जरा काही मनाविरुद्ध झालं की गेलीच कळ मस्तकात! कोणी आतल्या गाठीचे...राग आल्या क्षणी तो व्यक्त न करता आतल्या आत तो marinate करत ठेवतात आणि वेळ आली की तो राग मस्त गरमागरम बाहेर काढतात! काही लोक short-tempered...माझ्या सारखे...राग येतो ही पटकन, तो express ही होतो पटकन आणि निवळतो ही पटकन! काही लोक hot-tempered...चिडले की काही खरं नसतं समोरच्याचं.
रागाला जसा स्वभाव असतो ना, तस रागाचं वय ही असतं हां! म्हणजे बघा, baby राग वेगळा, रडून गोंधळ घालणारा, बोलत नाही पण दिसतो मात्रं लाल बुंद, toddler राग सगळ्यात cute. खेळणारा,खेळवणारा, खेळणं तुटलं म्हणून येणारा, खेळणं ऐकत नाही म्हणून पण येणारा! Childhood राग थोडा चिडणारा, थोडा चिडवणारा, कधी मारामारी करणारा, तर कधी फटके खायला लावणारा! या रागाचा climax पण बहुतेक अश्रू रूपात होतो! Teenage रागाचं रूप भयानक, hormones नी ओथंबलेलं, सद्सद्विवेक बुद्धी अजिबात नसणारा,सतत सोबत चालणारा, कधी पटकन आयुष्याचं वाटोळं करणारा! मग मात्रं हळूहळू राग पण mature व्हायला लागतो. यायचा बंद होत नाही, पण control मध्ये मात्र यायला लागतो.
पण ह्या सगळ्याला exception असणारे, राग न येणारे महाभाग ही आहेत बरेच. मला त्यांचा फार फार हेवा वाटतो. किती सुखी असतात अहो हे लोक! किती energy save होते यांची रोज! अगदी जवळचं उदाहरण द्यायचं तर आमचे पप्पा, माझे सासरे. 15 वर्षात मी त्यांना चिडताना एकदाही बघितलं नाहीये. आपल्या मेंदू मध्ये वेगवेगळ्या feelings साठी वेगवेगळे compartments असावेत, पण आमच्या पप्पांच्या मेंदूत राग compartment fit करायला बहूतेक देव विसरला असावा . त्यामुळे ते जगातल्या सगळ्यात सुखी माणसांपैकी एक आहेत हे निर्विवाद सत्य आहे. घरात कितीही क्लेश होऊ द्या, कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, कोणीही काहीही म्हणू द्या... आमचे पप्पा चक्क सगळं सोडून मस्त वामकुक्षी घेऊ शकतात! आम्ही चिडलो बोललो भांडलो, त्यांना काहीही देणंघेणं नसतं. राग येतच नाही कसा त्यांना? मला पडलेलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं कोडं आहे ते. इकडे मी उगाच छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसवे फुगवे सहन करते, कधी स्वतःचे, कधी समोरच्याचे. त्यात मी किती emotions, time आणि energy invest (का waste?) करत असते, स्वतःचं B.P. वाढवून घेत असते, serrotonin कमी करून घेत असते! असं जर पप्पां सारख स्थितप्रज्ञ राहता आलं, तर किती extra energy आणि वेळ असेल नाही? त्यामुळे आता माझा तरी life goal आहे की life मधे राग नियंत्रण मोहीम राबवायची! अगदी पूर्ण नाही, पण 80% जरी राग कमी करता आला, तर life will be so much more beautiful! हे राग नियंत्रण म्हणजे राग कंट्रोल करणे नाही बरं का! तर राग येऊच द्यायचा नाही. Prevention is better ना cure पेक्षा, म्हणून! त्यासाठी मी एक stepwise प्रोसेस design करावी असं म्हणतेय. ती केली की मग त्याची trial घेईन. जर ते सफल संपूर्ण झालं, तर सांगेनच तुम्हा सर्वांना!
तोपर्यंत लक्षात ठेवा "Anger is one letter short of Danger!" त्यामूळे शांत रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा!
©GG
No comments:
Post a Comment