*उन्हाळा आणि आयुर्वेद भाग 1*
उन्हाळ्यातील पिण्याचे पाणी🌊
'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा... जिसमे मिलाऊ उसके जैसा...!' ही म्हण सर्वांनाच ठाऊक आहे.
उन्हाळ्यात या पाण्याची अधिकच गरज भासते. बाहेर उन्हाचा तडाखा वाढायला लागला कि फ्रिज मधील एकदम थंडगार पाणी अगदी पोटभर पिण्याची इच्छा तुम्हा आम्हा सर्वांनाच होते. पण हे कितपत बरोबर आहे याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.
उन्हाळ्यात पाणी पिण्याचे काही नियम असतात का? तर हो!
असेच काही सर्व सामान्य नियम आपण खाली पाहणार आहोत.
✅️उन्हाळ्यात शरीरातील उष्णता, कोरडेपणा वाढतो, सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे शरीराला इतर ऋतुंच्या तुलनेत या दिवसात जास्त पाण्याची गरज भासते.
✅️थंड पाणी:- उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत नैसर्गिक रित्या थंड झालेले पाणी हे तृप्तीकर, आल्हाददायक असते. यात प्रामुख्याने माठातील पाणी हे नैसर्गिक रित्या थंड झालेले असून शरीरातील उष्णता, आग होणे, थकवा, चक्कर, भोवळ, उलटी व त्यानंतर जाणवणारी मळमळ, अस्वस्थता, वारंवार लागणारी तहान इ. स्वरूपाचे आजार कमी करणारे आहे.
( फ्रिज मध्ये कृत्रिम रित्या थंड केलेले पाणी हे आरोग्यास योग्य नाही. असे पाणी अधिक प्रमाणात पिले गेल्याने भूक कमी होऊन अपचनासारखे आजार वर डोके काढू शकतात. )
डॉ.गणेश रोडे
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment