Sunday, 12 March 2023

जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना

 जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना


                - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 11 : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ
देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे.
समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे
गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.

            राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज
यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी
रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा
रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच
राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि
उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा
आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी
मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून
त्यांचे अभिनंदन केले.

जैन समाजाची आचार्य पदवी ही एक तपश्चर्या


      - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य
ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे
लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांशांनाआशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे सुरू राहणारे आहे, अशी भावनाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राष्ट्रसंत
नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटीत करून पुढेनेत आहेत. ते धर्मासोबतच लोकांना राष्ट्रभक्तीचीही शिकवण देत आहेत.
समाजातील सर्व लोकांना योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत
नयपद्मसागरजी यांच्याकडून मिळेल असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस,
पालकमंत्री श्री.लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे
विमोचन करण्यात आले.



- - - - - 000 - - - - --




कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याकरिताशिक्षण विभागाचा अमेझॉन सोबत करार

 कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याकरिताशिक्षण विभागाचा अमेझॉन सोबत करार.

            मुंबई, दि. 11 - कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना

भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचाशालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिपफोर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याउपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचेप्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्यप्रकल्प संचालक कैलास पगारे आदी यावेळी उपस्थित होते.


            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून समस्या सोडविण्याचीक्षमता विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

              या अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा तयार करणे आणिएकात्मिक अभ्यासक्रम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

            पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद या नऊ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात येतअसून एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. भविष्यात रोजगार

मिळविण्यासाठीच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रमउपयुक्त ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान



 राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान

              --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            पालघर दि 11 : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविधक्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपलेमोठे योगदान देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            महिला दिनानिमित्त विश्वास फाउंडेशन यांनी आयोजित महिलासक्षमीकरण मेळावा चाहडे (पालघर) येथे संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांना संबोधित केले.

यावेळी आमदार रवींद्र फाटक (दूरदृश्य प्रणाली ), पद्मश्री राहीबाई

उपेरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेबपाटील, विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी तसेच वरिष्ठ अधिकारीव नागरिक उपस्थित होते.


            भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा महिलांनी गाजविलेल्याशौर्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे यांनी समाजासाठी योगदान देताना संघर्ष केला आहे त्यांच्यासंघर्षातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय

स्वावलंबन, क्षेत्रामध्ये महिलांसाठी कायदे करण्यात येणार असूनसर्वसमावेशक आदर्श असे महिला धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार आहे.


             मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येतआहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रंगाच्या कार्डधारक मुलींना याचाफायदा होणार आहे. मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, पहिल्या वर्गामध्येप्रवेश घेतल्यावर 4 हजार रुपये, इयत्ता सहावी मध्ये 6 हजार रुपये, 11 वीमध्ये प्रवेश घेतल्या नंतर 8 हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर75 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            पूर्वी नोकरी करणाऱ्या महिलांना 10 हजार रुपये व्यवसाय करभरावा लागत होता. या कराची व्याप्ती वाढवून 25 हजार रुपये करण्यात आलीआहे. त्यामुळे 25 हजार उत्पन्न असणाऱ्या महिलांना व्यवसाय कर भरावा

लागणार नाही.


            राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये 50 % सवलत महिलांनादेण्यात आली आहे. महिला बचत गटासाठी ई - बिझनेस प्लॅटफॉर्म तयार करण्यातआला असून विशेष जलद गती न्यायालयांना पदाची मान्यता देण्यात आली आहे.यासाठी राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले


            ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभरराबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 4 कोटी 50 लाख महिलांची आरोग्यतपासणी करण्यात आली आहे.         . ‘                                                                              महिला आयोग आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी 11 जिल्ह्यामध्ये जन सुनावणी पूर्णकरण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापनकरण्यात आले असून ठाणे जिल्ह्यामध्ये 60 हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात

आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


शिवजयंती

 

सानिका चौरे 

Saturday, 11 March 2023

फिशटॅन्क

 #कथा

#फिशटॅन्क

©स्वप्ना...

        सावी दारातून आत शिरली,... खरंतर शिरतानाच दरवाज्याजवळ असलेल्या सुंदर रांगोळीवरून घराचा अंदाज तिने बांधला होता,...तिला दार उघडल्यापासून लेले काकु तिला बसण्यासाठी जागा करत होत्या,..वर्तमानपत्र,पुस्तकं कुठे कागदी फुलं करतानाच सामान तर कुठे रंग ,ब्रश,..ठिक आहे असू द्या असू द्या म्हणत सावी अवघडून बसली,..छान चकाकत्या तांब्याच्या छोट्या पिपातून तांब्याच्याच लक्ख ग्लासात त्यांनी सावीला पाणी दिलं,छान गार वाळ्याचा मंद सुगंध असलेलं,..सावीला एकदम छान वाटलं,..खरंतर लेले काकु जरा आगळ्या वेगळ्या म्हणूनच जास्त प्रसिद्ध होत्या त्यांचे लेख,चित्र, बागकाम ह्यावर फार चर्चा ऐकून होती सावी,..म्हणून तर आज नेमका नवऱ्याच्या फिश शॉप मध्ये लेले काकूंचा फोन आला,.." फिशटॅन्क मधले दोन फिश गेले सोडून लगेच फिश पाठवा,.."नवऱ्याला संधी मिळाली तूच जा आणि भेट जरा काकुला मग सावीला वाटलं जरा भेटून तरी येऊ ह्या लेले काकुला,.. सगळे म्हणतात एवढी दुःख पेलली तरी एकटी बाई अगदी फ्रेश असते,.. बघू तरी कश्या जगतात ह्या एकट्या,..?सावी विचारात होती तेवढ्यात काकु म्हणाल्या,."चहा घेता,..?स्पेशल चुलीवरचा पण आहे सांगा आवडतो का?नाहीतर गॅसवर करते किंवा सरबत तुम्ही म्हणाल ते करू,.."काकूंच्या ह्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल पण सावी ऐकून होती,..घरातुन विन्मुख त्या कोणाला पाठवत नाहीत,..पण चुलीचा चहा सावीला गम्मत वाटली,..ती पटकन म्हणाली,"अय्या चूल पण आहे,..काकु हसुन म्हणाल्या,"तू पहिल्यांदाच अली आहेस घरी,..ये दाखवते तुला माझं गाव,..."खरंतर सावीने नवऱ्याकडून आणि दुकानातल्या नोकर मुलांकडून ऐकलं होतं आणि कॉलनीत देखील बऱ्याच जणांकडून ऐकून होत्या,..पण कोपऱ्यात घर आणि आपली नोकरी त्यामुळे कधी भेटीचा योग आला नव्हता पण आज सगळं जुळून आलं खरतर मध्ये आपलं बाळ पोटात गेल्यावर आपण जेंव्हा रडून वेड व्हायला आलो तेंव्हा नवरोबा म्हंटले होते," हिला लेले काकुंकडे घेऊन जावं,..दुःख कसं स्वीकारायच ते शिकवायला,.."पण जमलंच नाही तेंव्हा,... आपल्यालाही उत्सुकता होतीच भेटण्याची ,..

      तेवढ्यात काकूंचा आवाज आला,.."स्वयंपाकघरातुन इकडे ये ग बागेत,.."सावी स्वयंपाक घरात शिरली,..कोपऱ्यात पाटा वरवंटा होता,..तांब्या पितळेची भांडी काहीसं जून आणि काहीसं नवं असं सगळं होतं,.. ती मागे गेली,..सोनचफ्याचा सुगंध दरवळत होता सावी बाजेवर बसली,..काकूंनी आधण ठेवलं होत,..मातीच्या कुल्लड मध्ये त्यांनी तो खरपूस चहा गळाला,..एक सुंदर अनुभूती सावीला आली,..उत्सुकतेने सावीने विचारलं,.. "काकु आधुनिकतेते हे जून सुद्धा जपलं आहे तुम्ही,..,"काकु हसल्या म्हणाल्या,.."सगळं चकाचक नवीन करून टाकू असं मिस्टर म्हणाले आणि मी विरोध केला,..हे जून ज्यात माझी सासू,अजेसासू जगली तसं 100 टक्के आपण नाही जगू शकणार पण त्यातलं जमेल ते जपलं,..त्यामुळे आयुष्यातलं एकाकीपण जगायला मदत झाली,..आपलीच संस्कृती सोबत आहे म्हंटल्यावर जगणं सोपं झालं,..तुळशीनी मिळणार ऑक्सिजन काय किंवा तांब्याच्या भांड्यातील खनिजे काय ह्यांनी शारीरिक तर नीट ठेवलय पण मनाचं स्वस्थही जपलं आहे ना माझं,..मी एकटी असले तरी ह्या जुन्या नव्याच्या पसाऱ्यात रमून जाते,..मी एकटेपणातून स्वतःला रमवायला शिकले ग,..उगाच मरमर करत स्वच्छता नाही करत तर वेळ छान घालवण्यासाठी ह्या पितळेच्या डब्यातील एक डबा रोज घासते,.. जसा जसा तो लख्ख होतो तसं तस मन पण उजळत माझं,..ही बाग चैतन्याचे धुमारे देते जगण्याला,..हि चूल जळण शिकवते शेवटी राखच होणार हे सत्य सांगते,..ह्यातलं लाकूड सुद्धा सांगत ग निसर्गातल निसर्गातच जाणार,..ह्या अनुभवातून मानसिक खम्बीर झाले ग,..चल हॉलमध्ये बसू म्हणत दोघी तिथे आल्या,..

        लॅपटॉप पासून सगळं हाताळत होत्या काकु,..कोपऱ्यातील फिशटॅन्क तर फारच सुंदर होता,..नितळ पाणी मागच्या वॉलपेपरने ते निळशार आणि शांत दिसत होतं,..सुंदर दगड,..आणि त्यात उत्साहाने फिरणारे मासे,..तिने पटकन आणलेले मासे त्यात सोडले,..क्षणात ते फिशटॅन्क मध्ये सुळसुळ पोहायला लागले,..ती परत मागे जाऊन बसली,..काकु तेवढ्यात ओंजळभर चाफ्याची फुलं घेऊन आल्या,..ती फुलं सावीच्या ओंजळीत देत म्हणाल्या,"निसर्गाने खुप दिलंय ग,..घेता आलं पाहिजे आता हे मासेच बघ ना,....माझा नवरा,मुलगी,मुलगा कार अपघातात गेले आणि वाटलं आता सगळं संपलं,... पण त्यानंतरच्या दिवसात एकटी ह्या फिशटॅन्क कडे बघायचे एक दिवस एक मासा मेला,.. तो त्यातून काढून टाकला तरी बाकीच्या माश्यांची ती आनंदी लय कायम होती,.. बस त्या क्षणी कळलं निसर्ग सांगतोय आपल्याला,..आपली लय जपायची माणसं जेवढं आयुष्य तेवढंच जगतात आपलं कदाचित जास्त असेल पण मग ते काय वेड होऊन इतरांवर ओझं होऊन जगायचं का,..?कारण बऱ्याच नातेवाईकांना वाटलं आता हिला सांभाळाव लागेल कि काय,.. ?माहेरचे काय आणि सासरचे काय अस्वस्थ झाले होते,..पण ह्या माश्यांची शिकवण मनात कोरल्या गेली,..म्हणून ह्या फिशटॅन्कवर माझा फार जीव आहे ग,...आता हे नवीन मासेच बघ ना किती सहजतेने नव्या परिस्थितीला सामोरे जाऊन एकरूप झालेत ना जगण्यात,.... सावीला वाटलं एवढं फिशटॅंकच दुकान आपल्या नवऱ्याचं,..कितीतरीं वेळा आपण हे बघतो,..पण आज लेले काकूंनी नव्याने बघायला शिकवलं,..त्या माश्यांची आणि लेले काकूंची जगण्याची आंनदी लय घेऊन सावी बाहेर पडली,..(repost)

       वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 098228 75780 ह्या no वर msg करा,..असेच blogs वाचण्यासाठी swapna blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद,..


©स्वप्ना अभिजीत मुळे(मायी)औरंगाबाद.

होळी संस्कृती

 

कुंभाळे,म्हसला, रायगड 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार

 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित

प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार                                                   


- शंभुराज देसाई


          मुंबई, दि. 10 :- “पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये केले. या प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या भूखंडाचे भूमापन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीकार्ड देण्यासंदर्भात अडचणी आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करुन प्रॉपर्टीकार्ड देण्यात येतील,” असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


          याबाबत विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


     मंत्री श्री. देसाई म्हणाले, “प्राधिकरणासाठी संपादित झालेले क्षेत्र हे प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यामुळे नगर भूमापन चौकशी वेळीचे मिळकत पत्रिकांवरती (प्रॉपर्टीकार्ड) मूळ धारक पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. यात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा व इतर प्रयोजनाच्या भूखंडाचा ले-आऊट मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 8 हजार 300 भूखंडांचे 99 वर्षाच्या भाडेपट्याने नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे.याबाबत संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन ही सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येईल,” असेही मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.



Featured post

Lakshvedhi