राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान
--मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि 11 : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविधक्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपलेमोठे योगदान देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महिला दिनानिमित्त विश्वास फाउंडेशन यांनी आयोजित महिलासक्षमीकरण मेळावा चाहडे (पालघर) येथे संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांना संबोधित केले.
यावेळी आमदार रवींद्र फाटक (दूरदृश्य प्रणाली ), पद्मश्री राहीबाई
उपेरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेबपाटील, विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी तसेच वरिष्ठ अधिकारीव नागरिक उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा महिलांनी गाजविलेल्याशौर्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे यांनी समाजासाठी योगदान देताना संघर्ष केला आहे त्यांच्यासंघर्षातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय
स्वावलंबन, क्षेत्रामध्ये महिलांसाठी कायदे करण्यात येणार असूनसर्वसमावेशक आदर्श असे महिला धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार आहे.
मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येतआहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रंगाच्या कार्डधारक मुलींना याचाफायदा होणार आहे. मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, पहिल्या वर्गामध्येप्रवेश घेतल्यावर 4 हजार रुपये, इयत्ता सहावी मध्ये 6 हजार रुपये, 11 वीमध्ये प्रवेश घेतल्या नंतर 8 हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर75 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पूर्वी नोकरी करणाऱ्या महिलांना 10 हजार रुपये व्यवसाय करभरावा लागत होता. या कराची व्याप्ती वाढवून 25 हजार रुपये करण्यात आलीआहे. त्यामुळे 25 हजार उत्पन्न असणाऱ्या महिलांना व्यवसाय कर भरावा
लागणार नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये 50 % सवलत महिलांनादेण्यात आली आहे. महिला बचत गटासाठी ई - बिझनेस प्लॅटफॉर्म तयार करण्यातआला असून विशेष जलद गती न्यायालयांना पदाची मान्यता देण्यात आली आहे.यासाठी राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभरराबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 4 कोटी 50 लाख महिलांची आरोग्यतपासणी करण्यात आली आहे. . ‘ महिला आयोग आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी 11 जिल्ह्यामध्ये जन सुनावणी पूर्णकरण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापनकरण्यात आले असून ठाणे जिल्ह्यामध्ये 60 हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात
आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment