Sunday, 12 March 2023

राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान



 राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान

              --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            पालघर दि 11 : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविधक्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपलेमोठे योगदान देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            महिला दिनानिमित्त विश्वास फाउंडेशन यांनी आयोजित महिलासक्षमीकरण मेळावा चाहडे (पालघर) येथे संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांना संबोधित केले.

यावेळी आमदार रवींद्र फाटक (दूरदृश्य प्रणाली ), पद्मश्री राहीबाई

उपेरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेबपाटील, विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी तसेच वरिष्ठ अधिकारीव नागरिक उपस्थित होते.


            भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा महिलांनी गाजविलेल्याशौर्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे यांनी समाजासाठी योगदान देताना संघर्ष केला आहे त्यांच्यासंघर्षातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय

स्वावलंबन, क्षेत्रामध्ये महिलांसाठी कायदे करण्यात येणार असूनसर्वसमावेशक आदर्श असे महिला धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार आहे.


             मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येतआहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रंगाच्या कार्डधारक मुलींना याचाफायदा होणार आहे. मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, पहिल्या वर्गामध्येप्रवेश घेतल्यावर 4 हजार रुपये, इयत्ता सहावी मध्ये 6 हजार रुपये, 11 वीमध्ये प्रवेश घेतल्या नंतर 8 हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर75 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            पूर्वी नोकरी करणाऱ्या महिलांना 10 हजार रुपये व्यवसाय करभरावा लागत होता. या कराची व्याप्ती वाढवून 25 हजार रुपये करण्यात आलीआहे. त्यामुळे 25 हजार उत्पन्न असणाऱ्या महिलांना व्यवसाय कर भरावा

लागणार नाही.


            राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये 50 % सवलत महिलांनादेण्यात आली आहे. महिला बचत गटासाठी ई - बिझनेस प्लॅटफॉर्म तयार करण्यातआला असून विशेष जलद गती न्यायालयांना पदाची मान्यता देण्यात आली आहे.यासाठी राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले


            ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभरराबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 4 कोटी 50 लाख महिलांची आरोग्यतपासणी करण्यात आली आहे.         . ‘                                                                              महिला आयोग आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी 11 जिल्ह्यामध्ये जन सुनावणी पूर्णकरण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापनकरण्यात आले असून ठाणे जिल्ह्यामध्ये 60 हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात

आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


शिवजयंती

 

सानिका चौरे 

Saturday, 11 March 2023

फिशटॅन्क

 #कथा

#फिशटॅन्क

©स्वप्ना...

        सावी दारातून आत शिरली,... खरंतर शिरतानाच दरवाज्याजवळ असलेल्या सुंदर रांगोळीवरून घराचा अंदाज तिने बांधला होता,...तिला दार उघडल्यापासून लेले काकु तिला बसण्यासाठी जागा करत होत्या,..वर्तमानपत्र,पुस्तकं कुठे कागदी फुलं करतानाच सामान तर कुठे रंग ,ब्रश,..ठिक आहे असू द्या असू द्या म्हणत सावी अवघडून बसली,..छान चकाकत्या तांब्याच्या छोट्या पिपातून तांब्याच्याच लक्ख ग्लासात त्यांनी सावीला पाणी दिलं,छान गार वाळ्याचा मंद सुगंध असलेलं,..सावीला एकदम छान वाटलं,..खरंतर लेले काकु जरा आगळ्या वेगळ्या म्हणूनच जास्त प्रसिद्ध होत्या त्यांचे लेख,चित्र, बागकाम ह्यावर फार चर्चा ऐकून होती सावी,..म्हणून तर आज नेमका नवऱ्याच्या फिश शॉप मध्ये लेले काकूंचा फोन आला,.." फिशटॅन्क मधले दोन फिश गेले सोडून लगेच फिश पाठवा,.."नवऱ्याला संधी मिळाली तूच जा आणि भेट जरा काकुला मग सावीला वाटलं जरा भेटून तरी येऊ ह्या लेले काकुला,.. सगळे म्हणतात एवढी दुःख पेलली तरी एकटी बाई अगदी फ्रेश असते,.. बघू तरी कश्या जगतात ह्या एकट्या,..?सावी विचारात होती तेवढ्यात काकु म्हणाल्या,."चहा घेता,..?स्पेशल चुलीवरचा पण आहे सांगा आवडतो का?नाहीतर गॅसवर करते किंवा सरबत तुम्ही म्हणाल ते करू,.."काकूंच्या ह्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल पण सावी ऐकून होती,..घरातुन विन्मुख त्या कोणाला पाठवत नाहीत,..पण चुलीचा चहा सावीला गम्मत वाटली,..ती पटकन म्हणाली,"अय्या चूल पण आहे,..काकु हसुन म्हणाल्या,"तू पहिल्यांदाच अली आहेस घरी,..ये दाखवते तुला माझं गाव,..."खरंतर सावीने नवऱ्याकडून आणि दुकानातल्या नोकर मुलांकडून ऐकलं होतं आणि कॉलनीत देखील बऱ्याच जणांकडून ऐकून होत्या,..पण कोपऱ्यात घर आणि आपली नोकरी त्यामुळे कधी भेटीचा योग आला नव्हता पण आज सगळं जुळून आलं खरतर मध्ये आपलं बाळ पोटात गेल्यावर आपण जेंव्हा रडून वेड व्हायला आलो तेंव्हा नवरोबा म्हंटले होते," हिला लेले काकुंकडे घेऊन जावं,..दुःख कसं स्वीकारायच ते शिकवायला,.."पण जमलंच नाही तेंव्हा,... आपल्यालाही उत्सुकता होतीच भेटण्याची ,..

      तेवढ्यात काकूंचा आवाज आला,.."स्वयंपाकघरातुन इकडे ये ग बागेत,.."सावी स्वयंपाक घरात शिरली,..कोपऱ्यात पाटा वरवंटा होता,..तांब्या पितळेची भांडी काहीसं जून आणि काहीसं नवं असं सगळं होतं,.. ती मागे गेली,..सोनचफ्याचा सुगंध दरवळत होता सावी बाजेवर बसली,..काकूंनी आधण ठेवलं होत,..मातीच्या कुल्लड मध्ये त्यांनी तो खरपूस चहा गळाला,..एक सुंदर अनुभूती सावीला आली,..उत्सुकतेने सावीने विचारलं,.. "काकु आधुनिकतेते हे जून सुद्धा जपलं आहे तुम्ही,..,"काकु हसल्या म्हणाल्या,.."सगळं चकाचक नवीन करून टाकू असं मिस्टर म्हणाले आणि मी विरोध केला,..हे जून ज्यात माझी सासू,अजेसासू जगली तसं 100 टक्के आपण नाही जगू शकणार पण त्यातलं जमेल ते जपलं,..त्यामुळे आयुष्यातलं एकाकीपण जगायला मदत झाली,..आपलीच संस्कृती सोबत आहे म्हंटल्यावर जगणं सोपं झालं,..तुळशीनी मिळणार ऑक्सिजन काय किंवा तांब्याच्या भांड्यातील खनिजे काय ह्यांनी शारीरिक तर नीट ठेवलय पण मनाचं स्वस्थही जपलं आहे ना माझं,..मी एकटी असले तरी ह्या जुन्या नव्याच्या पसाऱ्यात रमून जाते,..मी एकटेपणातून स्वतःला रमवायला शिकले ग,..उगाच मरमर करत स्वच्छता नाही करत तर वेळ छान घालवण्यासाठी ह्या पितळेच्या डब्यातील एक डबा रोज घासते,.. जसा जसा तो लख्ख होतो तसं तस मन पण उजळत माझं,..ही बाग चैतन्याचे धुमारे देते जगण्याला,..हि चूल जळण शिकवते शेवटी राखच होणार हे सत्य सांगते,..ह्यातलं लाकूड सुद्धा सांगत ग निसर्गातल निसर्गातच जाणार,..ह्या अनुभवातून मानसिक खम्बीर झाले ग,..चल हॉलमध्ये बसू म्हणत दोघी तिथे आल्या,..

        लॅपटॉप पासून सगळं हाताळत होत्या काकु,..कोपऱ्यातील फिशटॅन्क तर फारच सुंदर होता,..नितळ पाणी मागच्या वॉलपेपरने ते निळशार आणि शांत दिसत होतं,..सुंदर दगड,..आणि त्यात उत्साहाने फिरणारे मासे,..तिने पटकन आणलेले मासे त्यात सोडले,..क्षणात ते फिशटॅन्क मध्ये सुळसुळ पोहायला लागले,..ती परत मागे जाऊन बसली,..काकु तेवढ्यात ओंजळभर चाफ्याची फुलं घेऊन आल्या,..ती फुलं सावीच्या ओंजळीत देत म्हणाल्या,"निसर्गाने खुप दिलंय ग,..घेता आलं पाहिजे आता हे मासेच बघ ना,....माझा नवरा,मुलगी,मुलगा कार अपघातात गेले आणि वाटलं आता सगळं संपलं,... पण त्यानंतरच्या दिवसात एकटी ह्या फिशटॅन्क कडे बघायचे एक दिवस एक मासा मेला,.. तो त्यातून काढून टाकला तरी बाकीच्या माश्यांची ती आनंदी लय कायम होती,.. बस त्या क्षणी कळलं निसर्ग सांगतोय आपल्याला,..आपली लय जपायची माणसं जेवढं आयुष्य तेवढंच जगतात आपलं कदाचित जास्त असेल पण मग ते काय वेड होऊन इतरांवर ओझं होऊन जगायचं का,..?कारण बऱ्याच नातेवाईकांना वाटलं आता हिला सांभाळाव लागेल कि काय,.. ?माहेरचे काय आणि सासरचे काय अस्वस्थ झाले होते,..पण ह्या माश्यांची शिकवण मनात कोरल्या गेली,..म्हणून ह्या फिशटॅन्कवर माझा फार जीव आहे ग,...आता हे नवीन मासेच बघ ना किती सहजतेने नव्या परिस्थितीला सामोरे जाऊन एकरूप झालेत ना जगण्यात,.... सावीला वाटलं एवढं फिशटॅंकच दुकान आपल्या नवऱ्याचं,..कितीतरीं वेळा आपण हे बघतो,..पण आज लेले काकूंनी नव्याने बघायला शिकवलं,..त्या माश्यांची आणि लेले काकूंची जगण्याची आंनदी लय घेऊन सावी बाहेर पडली,..(repost)

       वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 098228 75780 ह्या no वर msg करा,..असेच blogs वाचण्यासाठी swapna blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद,..


©स्वप्ना अभिजीत मुळे(मायी)औरंगाबाद.

होळी संस्कृती

 

कुंभाळे,म्हसला, रायगड 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार

 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित

प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार                                                   


- शंभुराज देसाई


          मुंबई, दि. 10 :- “पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये केले. या प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या भूखंडाचे भूमापन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीकार्ड देण्यासंदर्भात अडचणी आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करुन प्रॉपर्टीकार्ड देण्यात येतील,” असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


          याबाबत विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


     मंत्री श्री. देसाई म्हणाले, “प्राधिकरणासाठी संपादित झालेले क्षेत्र हे प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यामुळे नगर भूमापन चौकशी वेळीचे मिळकत पत्रिकांवरती (प्रॉपर्टीकार्ड) मूळ धारक पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. यात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा व इतर प्रयोजनाच्या भूखंडाचा ले-आऊट मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 8 हजार 300 भूखंडांचे 99 वर्षाच्या भाडेपट्याने नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे.याबाबत संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन ही सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येईल,” असेही मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.



परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी लवकरच बैठक घेणार

 परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास व

संवर्धनासाठी लवकरच बैठक घेणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 10 : परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य धनंजय मुंडे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती.


            केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यासाठी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात आला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी उत्तरात सांगितले आहे.


००००

गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक

 ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक


इतर शाळांनीही प्रेरणा घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 10- ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकामध्ये राज्यातील शिक्षक आणि शाळांमधील नावीन्यपूर्ण यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. या यशकथांमधून इतर शिक्षक आणि शाळांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक आणि शाळांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.


            मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गुरूवारी 'गुणी शिक्षक, गुणवंत शाळा' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            शाळा म्हणजे बालकांच्या सर्वागीण विकासाचे ठिकाण असते, शाळेच्या वर्गात देशाचे भविष्य घडते. ग्रामीण, दुर्गम विद्यार्थी घडविण्याचे गुरूजनांचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. शिक्षकांचा खडतर वाटेवरील हा आशादायक प्रवास सर्वांसमोर यावा, तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.


            राज्यातील ६५,६३९ शासकीय शाळांमधील हजारो शिक्षक उत्तम शैक्षणिक कामगिरी करीत आहेत. मात्र, प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई उपनगरातील एक मनपा शाळा आणि उर्वरित ३४ जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे एकूण ३५ लेख या पुस्तकात संकलित केले आहेत.


शाळेतूनच आपले मूल गुणवंत होऊन बाहेर पडेल, या विश्वासाने पालक आपले मूल शिक्षकांच्या हाती सोपवतात. पालकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिक्षकही सातत्याने प्रयत्न करतात. त्यांची ही धडपड म्हणजेच गुणवत्तेकडे वाटचाल करणारा त्यांचा खडतर प्रवास आहे. हा प्रवास शिक्षकांनी आपल्याच शब्दात या लेखांमध्ये मांडला आहे.


*मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचाही सहभाग- कैलास पगारे*


            प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या या उपक्रमांप्रमाणेच असे असंख्य नावीन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शाळांमध्ये सुरू आहेत. यामुळे शासकीय शाळांना चांगला लोकसहभागही मिळत आहे. गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण यातून अपेक्षित आहे. 'निपुण महाराष्ट्र' उपक्रमातूनही असंख्य माता गट स्थापन करून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा सहभाग आम्ही वाढवीत आहोत, असे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. शाळेत गुणवत्तेचा मळा फुलविण्यासाठी हे लेख सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त व प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi