Saturday, 10 December 2022

राज्यपालांच्या हस्ते सुब्रमण्यम स्वामी यांना पुरस्कार प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते सुब्रमण्यम स्वामी यांना पुरस्कार प्रदान

            मुंबई,दि.१० : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ विचारवंत व संसदपटू सुब्रमण्यम स्वामी यांना 'हिंदुत्वाचे आधारस्तंभ' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे येथे करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संस्थापिका व पत्रकार डॉ वैदेही तमन तसेच संतसमुदाय उपस्थित होता. 

            भारत पूर्वीपासून अध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे मनुष्य जीवनाचे सार्थक आहे, ही येथील संतांची शिकवण राहिली आहे. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांनी साक्षात परमात्म्याचे दर्शन घडवले. त्याप्रमाणे देशातील संत समाज देशाला दिशा दाखवून भारताला पुन्हा एकदा जगद्गुरू करतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. 

            यावेळी उपस्थित संत समाजापैकी सद्गुरू नारायण महाराज, गहिनीनाथ महाराज औसेकर, स्वामी कर्मवीर, स्वामी गिरीशनंद सरस्वती, महंत सीतारामदास निर्मोही गोवर्धन व डॉ उमाकांतानंद सरस्वती महाराज यांना देखील राज्यपालांच्या हस्ते 'हिंदुत्वाचे आधारस्तंभ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सद्गुरू रितेश्वर महाराज यांच्या वैदेही तमन यांनी लिहिलेल्या जीवनचरित्राचे देखील राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

000

सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

 सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख


            मुंबई, दि. १० : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. वैशिष्ट्यपूर्ण आवाज व ठसकेबाज शब्दफेकीमुळे सुलोचनाताईंनी अनेक लावण्या व गीते अजरामर केल्या. त्यांचा स्वर वर्षानुवर्षे लोकांच्या मनात घोळत राहील यात शंका नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे सुपुत्र श्री विजय चव्हाण व इतर कुटुंबियांना कळवतो असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


000

Governor Koshyari condoles demise of Sulochana Chavan


            Governor Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of renowned Lavani singer Smt Sulochana Chavan in Mumbai. In a condolence message to her son Shri Vijay Chavan, Governor Koshyari wrote: "Smt Sulochanatai Chavan was the undisputed Queen of lavani. She infused life in the poetry and immortalized many lavanis on the strength of her unique voice and diction. Her beautiful voice will live on for many more years. I offer my homage to the great singer and convey my condolences to Shri Vijay Chavan and other members of the bereaved family."


000



सकारात्मक पत्रकारिता काळाची गरज : राज्यपाल भगतसिंग कोशियारी

 


सकारात्मक पत्रकारिता काळाची गरज : राज्यपाल भगतसिंग कोशियारी


राजभवनात पार पडले व्हॉइस ऑफ मीडियाच्या वेबसाईटचे लोकार्पण तथा पदग्रहण सोहळा


मुंबई, दि. ७ : सध्याच्या काळात पत्रकारितेचे व्रत कठीण आहे. तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे पत्रकारितेचे काम सध्या झाले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया, वेब पोर्टल आदी माध्यमांचा सदुपयोग आणि उपयोग यातील फरक समजून घेतला पाहिजे सध्याच्या युगात सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता नितांत गरजेची आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी केले. जर बी चांगले असेल तर झाड चांगलं होते आणि झाड चांगलं असेल तर त्याची फळेही चांगले येतात याच दृष्टिकोनातून मीडियाचे काम राज्यभरासाठी आणि देशभरासाठी चांगले आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया'च्या माध्यमातून पत्रकारितेची एक चांगली पिढी तयार होईल, पत्रकारांचा एक नया आगाज यहा से होगा अशा विश्वास देखील यावेळी राज्यपाल महोदयांनी व्यक्त केला


राजभवनातील जलविहार सभागृहात पार पडलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’वेबसाईट उद्घाटन समारंभ तथा पदग्रहण सोहळ्याला संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने व संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


 यावेळी राज्यपालांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये सारिका महोत्रा, आरोग्य सेलचे राष्ट्रीय संचालक दिनेश मुतुला, राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील व उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हरून अ. कादिर खाटीक यांचा समावेश होता.


प्रारंभी श्री पुप्पाला यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या योजनांची माहिती दिली, तर प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी ही संघटना देशभरातील २० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली असल्याचे सांगितले, पत्रकारितेला नवा आयाम देण्याचे काम व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना देशभर करेल असा विश्वास देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला.


सुरुवातीला राज्यपाल महोदयांनी दीप प्रज्वलन केले तसेच राष्ट्रगीताने सुरू झालेला या कार्यक्रमाचा समारोप देखील राष्ट्रगीताने झाला.


प्रसंगी ऋषिकेश जोशी जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले संघटनेच्या कार्यालय सचिव दिव्या पाटील यांनी आभार मानले.


राज्यपालांना भावली शपथ


व्हाट्सअप मीडियाच्या वतीने यावेळी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांना नितीन मुले जपण्याची व राष्ट्रभावना वाढीस लागण्या संदर्भात कार्य करण्याची शपथ देण्यात आली राज्यपाल व शहरी यांना ही शपथ खूपच आवडली त्यांनी ही शपथ केवळ पत्रकारिते पुरती मर्यादित नसून ती समाजातील सर्व घटकांना लागू पडते अशा शब्दात गौरव केला.


पत्रकारांनी मारला राजभवनाला फेरफटका


संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध वृत्तपत्रांचे 150 पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अडीच तास राजभवनाच्या परिसरातील विविध वास्तू व निसर्ग सौंदर्याची पत्रकारांनी पाहणी केली.


 ………………………..


फोटो ओळ: ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वेबसाईट उद्घाटन समारंभ तथा पदग्रहण राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले. संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने व संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील व उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हरून अ. कादिर खाटीक यांचा समावेश होता.




नमस्कार,कृपया सदर बातमी आपण आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी.


दिव्या पाटील


(कार्यलयीन सचिव, व्हाईस ऑफ मिडिया)


९८६७४५४१४४


 ......................................

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यानाचे लोकार्पण रविवार, 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता

 कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला संकुल येथे पाच एकर जागेत उभारण्यात आलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यानाचे लोकार्पण रविवार, 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे.


कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर त्यांच्या प्रयत्नातून हे उद्यान साकारण्यात आले आहे. पर्यटन मंत्री तथा उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या उद्यानात स्केटिंग ट्रॅक, नाना-नानी पार्क, मुलांसाठी मनोरंजन उद्यान, योगा सेंटर या प्रमुख तसेच इतर सेवा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तरी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.


 

New Education Policy(NEP)*.

 *BREAKING JUST IN*

 The cabinet has given green signal to the *New Education Policy(NEP)*. After 34 years, there has been a change in the education policy. The notable features of the new education policy are as follows:

 *5 Years Fundamental*

 1. Nursery @4 Years

 2. Jr KG @5 Years

 3. Sr KG @6 Years

 4. Std 1st @7 Years

 5. Std 2nd @8 Years

 *3 Years Preparatory*

 6. Std 3rd @9 Years

 7. Std 4th @10 Years

 8. Std 5th @11 Years

 *3 Years Middle*

 9. Std 6th @12 ​​Years

 10.Std 7th @13 Years

 11.Std 8th @14 Years

 *4 Years Secondary*

 12.Std 9th @15 Years

 13.Std SSC @16 Years

 14.Std FYJC @17Years

 15.STD SYJC @18 Years

 *Special and important things*:

 * Board will be in 12th class only, MPhil will be closed, college degree of 4 years *

 * 10th board is over, MPhil will also be closed,*

 * Now students up to *5th standard will be taught in mother tongue, local language and national language only.* The rest of the subject, even if it is English, will be taught as a subject.*

  * Now only 12th board exam will have to be given. Whereas earlier it was mandatory to give 10th board exam, which will not happen now.

 * Examination will be held in the semester from 9th to 12th class. Schooling will be taught under the 5+3+3+4 formula.*

 At the same time, the college degree will be of 3 and 4 years. That is, certificate on the first year of graduation, diploma on the second year, degree in the third year.

 *3 year degree is for those students who do not want to take higher education. Whereas students pursuing higher education will have to do a 4-year degree. Students doing 4-year degree will be able to do MA in one year*.

 *Now students will not have to do MPhil. Rather, MA students will now be able to do PhD directly.

 *There will be no board exam in 10th.*

 *Students will be able to do other courses in between. The gross enrollment ratio in higher education will be 50 percent by 2035. At the same time, under the new education policy, if a student wants to do another course in the middle of a course, then he can do the second course by taking a break from the first course for a limited time.

 *Many reforms have also been made in higher education. The reforms include graded academic, administrative and financial autonomy etc. Apart from this, *e-courses will be started in regional languages.* Virtual Labs will be developed. A National Educational Scientific Forum (NETF) will be started. Please tell that there are 45 thousand colleges in the country.

 *There will be same rules for all institutions, government, private, deemed.*https://nvshq.org/article/new-national-education-policy-nep-2020/

Babu समजो इशारो

 


जय मारुती


 

Featured post

Lakshvedhi