Friday, 18 November 2022

अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवासचे निर्माण व्हावे

 अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवासचे निर्माण व्हावे

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

            मुंबई दि. 17 : उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.


            कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत श्रीराम जन्मस्थळी दर्शनासाठी भाविक फार मोठ्या संख्येने जात असतात. त्यांच्या निवासासाठी या मंदिराजवळ भक्तनिवासाची/अतिथी सदनाची उभारणी महाराष्ट्र सरकारने केल्यास, सर्वांच्यादृष्टीने ते अत्यंत सोयीचे होईल. त्यादृष्टीने आपण यासंदर्भात पुढाकार घेऊन उत्तरप्रदेश सरकारकडे भूखंडाची मागणी करावी. तेथे हे भक्तनिवास/अतिथी सदन भाविकांच्या सोयीसाठी उभारले जावे, समस्त श्रीराम भक्तांच्यावतीने ही विनंती आपणाकडे करीत आहे, असे ॲड. नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.


            महाराष्ट्रातून अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे भक्त निवास उभारले जावे, ज्यामुळे सर्व भाविकांना निवास व अन्य सुविधा उपलब्ध करुन देता येतील. कृपया यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने व्हावी, अशी अपेक्षा पत्रात त्यांनी व्यक्त केली आहे.


००००



मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर

 मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कस्तुरबा रुग्णालयात जाऊन केली रुग्ण- नातेवाईकांची विचारपूस, आरोग्य यंत्रणेकडून घेतला आढावा.

            मुंबई, दि. 17 :- मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग यांनी व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

            मुंबई शहरातील गोवर प्रादुर्भावामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याठिकाणी त्यांनी महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली.

            या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपचारांबाबत आणि अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

            त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण न झाल्यामुळे बालकांमध्ये प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. याबाबत महापालिकेची आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने तातडीची उपाययोजना म्हणून एका मोहिमेत सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केले आहे. लसीकरणापासून दूर राहिलेल्या बालकांना लस देण्याबाबत संबंधित सर्वच क्षेत्रात जाणीवजागृती करण्यात येत आहे. तेथील लोकप्रतिनिधींपासून महत्वाच्या आणि प्रमुख अशा व्यक्तींशी संपर्क साधण्यात येत आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे बालकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. बालकांना चांगले उपचार मिळावेत, यासाठीही निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व परिस्थितीवर आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सतर्कपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही दिल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

0000



नवरा आणि नारळ

 ❄️ 😁 नवरा आणि नारळ 😁❄️

                            पु.ल.देशपांडे. 


नवरा आणि नारळ 

कसे निघतील ते नशीबच जाणे 

असं आजी म्हणायची. 

बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. 

दोन्हीही कसेही निघाले तरी 

'पदरी पडले, पवित्र झाले'. 

दोघांनाही देवघरात स्थान, 

दोघेही पुज्य….. .

 

पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर 

मद्रासीअण्णाच्या गादीवर 

नारळ रचून ठेवलेले असायचे. 

हल्ली ऑन लाईन साईटवर 

सगळ्या किमतीचे नवरे 

असेच रचून ठेवलेले असतात.…… 


नारळ म्हटलं कि मला धडधडतं . 

चांगला ओळखायचा कसा ?

मी उगाचच कानाजवळ नेऊन 

हलवून वगैरे बघत असे.… 


अण्णाला कळायचं हे गि-हाईक  

नवीन आहे. तो आपली 

जाड पितळी आंगठी दोन तीन 

नारळावर टांग टांग वाजवून 

हातात एक नारळ द्यायचा. 


ये, लो ! म्हणायचा. 

मी विचारायचो 'खवट' निकलेगा तो ? 

तो म्हणायचा 'तुम्हारा नसीब !!'

 

आजी म्हणायची नारळ गोड निघाला 

तर दडपे पोहे, सोलकढी व 

खोब-याच्या वड्या आणि 

काय काय !


खवट निघाला तर पाण्यात उकळून 

वर तरंगणारं कच्च तेल 

बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं. 

कापलं, भाजलं, ओठ फुटले, 

टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, 

थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं, 

उत्तम घरगुती औषध. 

किती उपयोगी ..

किती बहुगुणी !! 


थोडक्यात काय, 

नवरा काय ? नारळ काय ? 

गोड निघाला तर नशीब, 

खवट निघाला तर उपयोगी, 

हे कोकणी तत्त्वज्ञान. 

ह्याला जीवन ऐसे नांव !!


- पु ल देशपांडे


ता. क. ,,: 

या मध्ये नवरा या ठिकाणी बायको लिहून ही वाचू शकता.सारखाच आनंद मिळेल!

स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी मुंबईसाठी प्रयत्नशील

 स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी मुंबईसाठी प्रयत्नशील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धारावी पुनर्विकासालाही गती देणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण.

            मुंबई, दि. 17 : - मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावे असे धोरण आहे. यात धारावीचा पुनर्विकास हा महत्त्वाचा असून, येत्या काही काळात जगाचे लक्ष वेधून घेईल अशी वसाहत प्रत्यक्षात येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईतील प्रत्येक गरजूला वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, असे होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            राज्यातील ग्रामीण भागातही मुंबईतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

            मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजने अंतर्गत कार्यान्वित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

            याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

            धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील काळा किल्ला येथील दवाखान्याचे प्रत्यक्ष तसेच अन्य ठिकाणच्या ५१ दवाखान्यांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांनुसार आमच्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून योजना राबवित आहोत. त्यांच्या प्रेरणेतून आपला दवाखाना योजना राबविण्यात येत आहे याचे मोठे समाधान आहे. या योजनेमुळे नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा मोफत, व सोईच्या वेळेनुसार सहज उपलब्ध होतील. नागरिकांचा औषध उपचारावर खिशातून होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल.

            योजनेत कमीतकमी जागेत पोर्टा केबिनमध्ये दवाखाने सुरू केल्यामुळे तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

            माझ्याकडे काही काळ आरोग्य खात्याची जबाबदारी होती. त्यावेळी ठाणे परिसरात "बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" योजना सुरू केली होती. मुंबई महापालिकेने ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला याचे समाधान आहे. यामुळे मुंबईत रोजीरोटीसाठी येणारे कुणीही वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास त्यापायी वंचित राहणार नाही. मुंबई महापालिकेने कोविड काळात सर्व यंत्रणांची एकजुट करुन या अनपेक्षित संकटावर यशस्वीपणे मात केली होती. त्यासाठी महापालिकेसह, सिडको, म्हाडा, एमएआरडीसी यासारख्या यंत्रणाही सरसावून पुढे आल्या होत्या."

            धारावी सारख्या परिसरात ही सुविधा सुरू होत आहे. यात या परिसरात १५ दवाखाने असतील, याबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, धारावी ही आशियातील वैशिष्ट्यपूर्ण वसाहत आहे. हा परिसर मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने न्याहाळला आहे. याठिकाणी राहणाऱ्यांचंही हक्काच्या घराचं स्वप्न असेल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुनर्विकासासाठी विकासक शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पुनर्विकासानंतरही ही वसाहत जगाचे लक्ष वेधून घेईल. मुंबईतील शिक्षण, आरोग्य , रस्ते अशा गोष्टींच्या विकासावर भर देत आहोत. मुंबई स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे."

            मुंबईतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यातील अन्य भागांतही आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विस्तार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

            सुरवातीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. मंत्री श्री. केसरकर, श्री. लोढा तसेच खासदार श्री. शेवाळे यांची समयोचित भाषणे झाली. आयुक्त तथा प्रशासक श्री. चहल यांनी प्रास्ताविक केले.

पहिल्या टप्प्यात ५२ ठिकाणी आणि पुढे २२७ ठिकाणी सुरु होणार दवाखाने

दवाखान्यांमध्ये वैद्यकीय तपासण्यांसह औषधोपचार व १४७ चाचण्यांची सुविधा

            योजनेत आताच्या काही दवाखान्यांमध्ये दुस-या सत्रात आणि मोकळ्या जागेत पोर्टा केबिनमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या पहिल्या टप्प्यात ५२ दवाखाने सुरु करण्यात येत आहेत. तर साधारणपणे पुढील सहा महिन्यात २० पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर यासह १४९ ठिकाणी दवाखाने सुरु  करण्यात येणार आहे. या योजनेत २२७ ठिकाणी आरोग्य व वैद्यकीय सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

            या दवाखान्यात मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार व किरकोळ जखमांवर मलमपट्टी, तसेच १४७ प्रकारच्या रक्त चाचणी मोफत पुरवण्यात येणार आहेत याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, इत्यादी चाचण्या करिता पॅनल वरील डायग्नॉस्टीक केंद्राद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात करण्यात येतील.

            प्राथमिक आरोग्य सेवा मोफत व सोयीच्या वेळेनुसार सहज उपलब्ध होईल. नागरिकांचा औषध उपचारावर खिशातून होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. योजनेत साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येमागे १ दवाखाना, याप्रमाणे पोर्टा केबिन मधील दवाखाने हे सकाळी ७ ते दुपारी २, त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० या कालावधी दरम्यान कार्यरत असणार आहेत. तर उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरु करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरु करण्यात येत आहेत. 

            उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून विशेषज्ञांच्या सेवा या दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत देण्यात येत आहे. दवाखान्यांची दर्जोन्नती करून (कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञ आदी) विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत देण्यात येणार आहे.

            दवाखान्यांमधून टॅब पद्धतीने व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येईल. दवाखान्याचे कामकाज हे विना कागद पद्धतीने (पेपरलेस) असणार असून त्यामुळे हे दवाखाने पर्यावरणपूरक असणार आहेत.

००००

बाबा, आयुष्यात असं काहीतरी करा!

 बाबा, आयुष्यात असं काहीतरी करा!


‘त्या’ व्यक्तिला मी काल पहिलयांदाच भेटलो. पत्रकारिता, कॉपी रायटिंग, मार्केटिंग, सेल्स अशा विविध आघाड्यांवर काम केलंय. कविताही करतात. गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या न्यूज चॅनेलसाठी कार्यरत आहेत. बऱ्याच गप्पा झाल्या. ‘भवताल’ची सुरूवात-वाटचाल, सध्याचे उपक्रम, वेगळ्या काही गोष्टींचं नियोजन…! गप्पा इतक्या रंगल्या की पाऊणेक तासाची मिटिंग दोन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. शेवटी दोघांनाही पुढचे नियोजन असल्याने थांबावे लागले. जाताना त्यांना ‘भवताल’चा या दिवाळीचा ‘सडे-पठारे विशेषांक’ दिला.

आज दुपारी त्यांचा मेसज आला- ‘कालचा अप्रतिम प्रसंग शेअर करतो.’ लगोलग फोनही आला. ते सांगत होते. ‘भवताल’चा अंक घरी नेला, मुलाकडे दिला. तो पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये बी.कॉम्.च्या दुसऱ्या वर्षाला आहे. शाळेचं शिक्षण बिशप्समध्ये झालंय. स्वतंत्र विचारांचा आहे. त्याने ‘भवताल’चा अंक काही वेळ चाळला आणि म्हणाला, ‘बाबा, आयुष्यात हे असं काहीतरी करा!’

त्यांना ती प्रतिक्रिया महत्त्वाची वाटली. त्यांना राहवले नाही आणि त्यांनी ती लगेचच कळवली. त्यांच्यासाठी ती महत्त्वाची आहेच, पण ‘भवताल’साठी किती मोलाची आहे हे वेगळे सांगायला नको!


- अभिजित घोरपडे


(दिवाळीच्या काळात आपला संवाद कमी झाला होता. त्याची सुरुवात करूया या पोस्टपासून!)


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


शिर्डी हॉस्पिटल.मोफत सर्व सुविधा

 Pl share to शेअर मोफत  आरोग्य विषयक सुविधा सुसज्ज हॉस्पिटल शिर्डी साईनाथ.


जिवन गाणे गात राहावे

 






Featured post

Lakshvedhi