बाबा, आयुष्यात असं काहीतरी करा!
‘त्या’ व्यक्तिला मी काल पहिलयांदाच भेटलो. पत्रकारिता, कॉपी रायटिंग, मार्केटिंग, सेल्स अशा विविध आघाड्यांवर काम केलंय. कविताही करतात. गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या न्यूज चॅनेलसाठी कार्यरत आहेत. बऱ्याच गप्पा झाल्या. ‘भवताल’ची सुरूवात-वाटचाल, सध्याचे उपक्रम, वेगळ्या काही गोष्टींचं नियोजन…! गप्पा इतक्या रंगल्या की पाऊणेक तासाची मिटिंग दोन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. शेवटी दोघांनाही पुढचे नियोजन असल्याने थांबावे लागले. जाताना त्यांना ‘भवताल’चा या दिवाळीचा ‘सडे-पठारे विशेषांक’ दिला.
आज दुपारी त्यांचा मेसज आला- ‘कालचा अप्रतिम प्रसंग शेअर करतो.’ लगोलग फोनही आला. ते सांगत होते. ‘भवताल’चा अंक घरी नेला, मुलाकडे दिला. तो पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये बी.कॉम्.च्या दुसऱ्या वर्षाला आहे. शाळेचं शिक्षण बिशप्समध्ये झालंय. स्वतंत्र विचारांचा आहे. त्याने ‘भवताल’चा अंक काही वेळ चाळला आणि म्हणाला, ‘बाबा, आयुष्यात हे असं काहीतरी करा!’
त्यांना ती प्रतिक्रिया महत्त्वाची वाटली. त्यांना राहवले नाही आणि त्यांनी ती लगेचच कळवली. त्यांच्यासाठी ती महत्त्वाची आहेच, पण ‘भवताल’साठी किती मोलाची आहे हे वेगळे सांगायला नको!
- अभिजित घोरपडे
(दिवाळीच्या काळात आपला संवाद कमी झाला होता. त्याची सुरुवात करूया या पोस्टपासून!)
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment