Thursday, 17 November 2022

हसून काहीतरी बोलत जा,*

 *हसून काहीतरी बोलत जा,*

*हसून काहीतरी टाळत जा!!*

*खूप सा-या अडचणी आहेत,* 

*आपल्या सर्वांनाही,*

*पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!!*

*कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल,*

*म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा*

*आयुष्य खूप सुंदर आहे* 


*एकमेकांना समजून घ्या...*.                   

   🌹 🦚🙏🪷🙏🦚 🌹

कौटुंबिक न्यायालयातील वादाचे खटले हाताळणाऱ्या..., न्यायाधीशांनी दिलेले दहा सल्ले..!

 कौटुंबिक न्यायालयातील वादाचे खटले हाताळणाऱ्या..., न्यायाधीशांनी दिलेले दहा सल्ले..!


१) *तुमच्याबरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका*. 

*उलट, त्यांनी नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर... अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे.*

 *वेगळे घर शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्यामध्ये जितके अंतर असेल... तितके तुमचे नाते चांगले राहील.*

२) *तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे. हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा.* 

*ती तुमची मुलगी किंवा मैत्रीणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका.*

*तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो. पण सुनेचे तसे नसते.* *मुलावर रागवता.. म्हणून सुनेवर रागावला तर... ती कायम लक्षात ठेवते.*

*खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागावू शकते किंवा चुका सुधारू शकते.*

३) *तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणे ..ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे. ती तुमची समस्या नाही, कारण आता ती सज्ञान आहे.*

४) *अगदी तुम्ही एकत्र राहात असला तरी... प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे सांगा.*

 *त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे...!* 

*अशी कामे करू नका. अगदीच सुनेने विनंती केली... आणि ते काम करण्याची तुमची शारीरिक, मानसिक क्षमता असेल तरच... ते काम करा.*

*त्या कामाच्या बदल्यात त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलाच्या कौटुंबिक समस्यांची तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या समस्या ते सोडवतील.*

५) *जेव्हा तुमचा मुलगा आणि सुने दरम्यान वाद, भांडणे चालू असतील.. तेव्हा आपल्याला काहीच दिसत नसल्याची व ऐकू येत नसल्याची भूमिका घ्या.* 

*पती-पत्नीच्या नात्यामध्ये पालकांनी भाग घेऊ नये... असे तरुण दांपत्याला वाटणे स्वाभाविक असते...!* 

६) *तुमची नातवंडे ...ही पूर्णपणे मुलगा आणि त्याच्या पत्नीची असतात.,*

 *त्यांचे संगोपन कसे करायचे?*

 *हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे* 

*त्याचे श्रेय किंवा अपश्रेय त्यांच्या कडेच जाईल.*

७) *तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमची सेवा केली पाहिजे.. व आदर बाळगला पाहिजे...असा नियम नाही.*

*ते तुमच्या मुलाचे कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक असते.* *जेणेकरून त्याच्या पत्नी बरोबरील नाते अधिक चांगले राहील.*

८) *निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे योग्य नियोजन करा, निवृत्तीनंतर मुले सांभाळतील या भरवशावर राहू नका.*

*तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि पुढच्या प्रवासात आणखी नव्या गोष्टी शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवा.*

९) *निवृत्ती नंतरची वर्षे आनंदात घालवणे... हे तुमच्या हिताचे असते.* 

*जे काही कमावले आहे, साठवून ठेवले आहे...त्याचा वापर मृत्यूपूर्वी करणे सगळ्यात चांगले.* 

*आपली संपत्ती आपल्यासाठी शून्य होईल... असे होऊ देऊ नका.*

१०) *नातवंडे ही तुमच्या कुटुंबाचा घटक नसतात.*

*ती त्यांच्या आई वडिलां साठीची अनमोल देणगी असते.*

*हे केवळ तुमच्यासाठी नाही तर..*

 हे *दहा सल्ले तुमचे मित्र, पालक, नातेवाइकांनाही वाचायला द्या.*

*कौटुंबिक_समुपदेशन प्रत्येक आई वडिलांना मार्गदर्शक सुत्रे जज लोकांनी मांडली आहेत...* 

*वास्तव त्यांनी जनतेपुढे मांडले आहे.* व ते *अगदी सत्य आहे.*

 *प्रत्येक कुटुंबाला जगतांना कसे वागायचे? याचे सुंदर मार्गदर्शन विशद केलय!* 

*आजकाल मुलांना सुनांना त्यांचे स्वातंत्र्य हव असत...!*

 आणि *आई वडील नको असतात..!* कारण,

 *जो पर्यन्त पैसा त्यांचे कडुन अपेक्षित असतो... तो पर्यन्त गोडवा असतो.*

 *आई वडील जेव्हा परिस्थिती ने हतबल हो असहाय्य होतात..,* *तेव्हा, मुलांना नकोसे वाटतात.*

 कारण, *त्यांची सेवा करणे, त्यांना .. स्पेशली, सुनांना जड वाटते.. पण हेच तिच्या आई वडिलांना त्रास झाला तर.. तिच्या डोळ्यात पाणी येते... व लगेच त्यांना स्वत: कडे आणायची तयारी ...!* 

*हा दुजाभाव नसावा.*

*आई वडील सासु सासरे हे सारखेच असतात, फरक फक्त दृष्टिकोण कसा? यावर अवलंबून असतो.* 

*जीवनाच्या नौकेत प्रत्येक व्यक्ती ला हा प्रसंग कधीतरी येणारच आहे. म्हणुन.. आहे तोपर्यंत भरभरून जगावे...,* 

*आपण आपल्या साठी जगायला शिकायला पाहिजे... हे जीवन नश्वर आहे.*

 *कधी बोलवण येईल?*

*सांगता येत नाही. एक्झीट कॉल आला की, कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सार काही इथेच सोडुन जाव लागते. खाली हाताने माणुस जन्माला येतो, आणि जातांना पण खाली हातानेच..! मग कसला वृथा अभिमान बाळगायचा?*

 *पैसा ,अडका, शोहरत, जमीन जुमला, उंची कपडे, गाडी, बंगले, संपत्ती हे एक मृगजळाचा भास राहुन जाते...!*

 *अतृप्तपणे सार इथेच सोडुन जावे लागते.. याचा पश्चाताप जरुर होतो. पण शेवटी प्रारब्ध हा कुणालाच चुकले नाही. म्हणुन ……,*

*ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असु द्यावे समाधान...*!


(आपणांस मनापासून ज्यांना पाठवावे असे वाटते...त्या त्या सर्वांना जरूर पाठवावे.)

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार

 ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी

केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार

- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबईदि. १६ : राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० हजार कोटी रूपये मिळणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूलपशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

             शेळी - मेंढीपालन सहकारी संस्थेच्या योजनांच्या अनुषंगाने एनसीडीसीचे सादरीकरण मंत्रालयात आयोजित करण्यात आले होतेत्यावेळी श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ताराष्ट्रीय सहकारी विकास निगमचे महाव्यवस्थापक विनीत नारायण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवालउमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकरपुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे-पाटील म्हणालेराष्ट्रीय सहकारी विकास निगम ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था आहे. ज्या पद्धतीने इतर काही राज्यांनी एनसीडीसीच्या माध्यमातून लाखो ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगाराचे साधन निर्माण करून दिले आहे, त्याच धर्तीवर राज्यामध्ये एनसीडीसी मॉडेल कार्यन्वित करण्यासाठी योजना तयार करावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या १५ प्रक्षेत्रामध्येमहिला बचत गटांचा समावेश करून महिला बचत गटामार्फत विविध स्तरावर कामे कसे करता येईल याचाही विचार प्रस्तावामध्ये करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

            एनसीडीसी मॉडेल संदर्भातील योजना तयार करताना कुठल्याच मर्यादा न ठेवता याचा उपयोग सर्वसामान्यग्रामीण भागातील गरजू व्यक्तीपर्यंत कसे पोहचता येईलयाची आखणी करून स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत पशुसखी/ शेळी सखी यांना संपूर्ण प्रशिक्षण द्यावे. त्यांना कृत्रिम रेतन साहित्यासह प्रशिक्षण देवून ‘शेळी मित्र’ या ॲपमध्ये समाविष्ट करावे. यामध्ये गोट टॅगिंग प्राधान्याने करून शेळी सखी यांना मासिक उत्पन्न सुद्धा कसे मिळू शकते, याचा विचार करून प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिले.

            योजना तयार करताना मेंढीशेळी पालन उद्योग आता वाढत्या कृषी उद्योग समूहाचा कळसाचा पाया कसा ठरू शकेल याचा विचार यामध्ये प्रामुख्याने करण्यात यावा. समाजकल्याण विभागआदिवासी विकास विभागपशुसंवर्धन विभाग यांच्या शेळी-मेंढी वाटपाच्या योजना व प्रामुख्याने सध्याचा केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांचा अभ्यास करून व सध्याच्या चालू आणि नवीन योजनांची सांगड घालून नवीन योजना तयार कराव्यात. राज्य आणि केंद्रातील योजनांचा लाभ हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहचविता येईल याचा अभ्यास करावा, अशा सूचना श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

            मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले कीही योजना यशस्वीपणे राबविल्यास सध्या राज्यात शेळीची संख्या १.२८ कोटी एवढी आहे. पुढील ५ वर्षामध्ये ही संख्या १.२८ कोटीहून १.९१ कोटीच्या पुढे जाण्यास मदत होईल. त्यामुळे १ कोटी ३० लाख अधिक अनुवांशिक गुणवत्ता असलेल्या शेळ्या जन्माला येतील व त्यामुळे ९ हजार कोटी रुपयांची उलाढाल होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.

            शेळीचे दुध हे नवीन उत्पन्नाचे स्रोत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करून सुमारे १० लाख नवीन रोजगार शहरी व ग्रामीण भागामध्ये निर्माण होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000



 


 


रोजगाराच्या नवीन संधींमुळे अर्थव्यवस्थेला हातभार –

 रोजगाराच्या नवीन संधींमुळे अर्थव्यवस्थेला हातभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, तरूणांची संख्या मानव संसाधनात परिवर्तित करून त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. आजही भारतातील तसेच महाराष्ट्रातील 45 टक्के लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला सेवाक्षेत्र व उत्पादन क्षेत्राशी जोडले गेले पाहिजे. त्यामुळे शेती क्षेत्रावरील 20 टक्के रोजगाराचा भार कमी होईल. यामुळे शाश्वत विकासाकडे वाटचाल शक्य होईल.


            कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध विभागांचा अभ्यास करून तरूणांना कौशल्य विषयक प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. केंद्र शासनाने १० लाख शासकीय नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातही शासकीय क्षेत्रात 75 हजार नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.


ग्रामीण भागात 1 हजार कौशल्य विकास केंद्र - मंगलप्रभात लोढा


            कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात उद्योगपूरक वातावरण असल्याने तरुणांना विविध क्षेत्रानुसार कौशल्य देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येत्या वर्षभऱात 1 हजार कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याद्वारे ग्रामीण युवकांना रोजगारासाठी शहरांमध्ये येण्याची गरज राहणार नाही. प्रत्येक सक्षम तरुणाला नोकरी मिळावी या अनुषंगाने कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.


महास्वयंम ॲप शासन-उद्योग क्षेत्रासाठी महत्वाचा दुवा – मनिषा वर्मा

            कौशल्य विकास विभागाच्या वतीने तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विभागामार्फत सुरू करण्यात आलेले ‘महास्वयंम ॲप’ हे शासन व उद्योग क्षेत्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. यासाठी उमेदवार आणि उद्योजकांनी या ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केले.

या कंपन्यांशी झाला सामंजस्य करार

            हिंदू रोजगार डॉट कॉम (5 हजार रोजगार), क्यूसेस कॉर्प लिमिटेड - स्टाफिंग सोल्युशन्स (2 हजार रोजगार), बझवर्कस् बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (1 हजार 500 रोजगार), युवाशक्ति स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (10 हजार रोजगार), सेंच्युरियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट – ग्राम तरंग व्होकेशनल ट्रेनिंग सर्व्हिसेस (2 हजार 500 रोजगार), परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (10 हजार रोजगार), विन्डो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (500 रोजगार), बीएसए कार्पोरेशन लिमिटेड (5 हजार रोजगार), अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (10 हजार रोजगार), सुमित फॅसेलिटी लिमिटेड (4 हजार रोजगार), इनोव्हेशन कम्ज जॉईंटली (500 रोजगार), नेच्युअर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन (5 हजार रोजगार), परम जॉब सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), वंदन हॉस्पिटॅलिटी (5 हजार रोजगार), महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (5 हजार रोजगार), मेट्रिक्स कॅड अकॅडमी (5 हजार रोजगार), शुभम सर्व्हिसेस (1 हजार रोजगार), बीव्हीजी इंडिया लिमिटेड (5 हजार रोजगार), अर्बन कंपनी (500 रोजगार), सॅपीओ अन्यालिटिक प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (2 हजार रोजगार), श्रेमिको प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), फास्ट ट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिस (1 हजार रोजगार), इंप्रेटीव्ही बिझनेस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (3 हजार रोजगार), स्पॉट लाईट कन्सल्टंट (2 हजार रोजगार), मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (500 रोजगार), डीएसटीए एज्युकेशन फाउंडेशन (1 हजार 800 रोजगार), एल के कन्सल्टंटस् (500 रोजगार), वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, एग्रीकल्चर अँड इंडस्ट्री (5 हजार रोजगार), कॅपिटल सिक्युरिटी फोर्स (2 हजार रोजगार), स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स (2 हजार रोजगार), संत शिरोमणी एंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), टीएनएस एंटरप्राईजेस (5 हजार रोजगार), अविघ्न नाईन मीडिया अँड एंटरटेनमेंट (2 हजार रोजगार), इंजिनीयर्स क्रेडल (500 रोजगार), ओम्प्रि बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), स्टेलर सेक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस (2 हजार रोजगार), ओडीई स्पा (500 रोजगार), शार्प एचआरडी सर्विसेस प्राइवेट लिमिटेड (500 रोजगार), युनिकॉर्न इन्फोटेक (2 हजार रोजगार), आउस्टफायर सेफ्टी इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (500 रोजगार), एचआर इव्हेंजेलिस्ट (500 रोजगार), थॉमस रिक्रुटमेंट सोल्युशन (2 हजार रोजगार), श्रीकृपा सर्विसेस प्राइवेट लिमिटेड (2 हजार रोजगार)


०००



 

१लाख २१ हजार युवक, युवतींना उद्योग, कॉर्पोरेट संस्थांमध्ये रोजगारासाठी सामंजस्य करार

 १लाख २१ हजार युवक, युवतींना उद्योग, कॉर्पोरेट

संस्थांमध्ये रोजगारासाठी सामंजस्य करार

उद्योगांनी आता कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा

– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 16 : राज्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आज राज्यातील ४४ नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या करारामार्फत राज्यातील 1 लाख 21 हजार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सामंजस्य करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच उद्योगांनी आता त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ सुलभतेने मिळू शकेल, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

            कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            चालू आर्थिक वर्षात राज्य शासनाने 5 लाख बेरोजगार युवक, युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार मेळाव्यामार्फत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी औद्योगिक आस्थापना, प्लेसमेंट एजन्सी यांच्यासमवेत वेळोवेळी समन्वय साधणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने भविष्यातील रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन होण्यासाठी आज हे सामंजस्य करार करण्यात आले. या कराराद्वारे राज्यातील बेरोजगार युवक, युवतींसाठी आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), मीडिया अँड एन्टरटेनमेंट, बांधकाम, रिटेल, बँकींग, एव्हीएशन इत्यादी विविध क्षेत्रामध्ये दहावी पास, नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. इथे आयटीआयपासून आयआयटीपर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणविषयक सुविधा आहेत. राज्य शासनाने नुकतेच कौशल्य विद्यापीठही सुरु केले आहे. युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कौशल्य विकास विभागाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. उद्योजकांनी या कामात सहभाग घेऊन आज झालेल्या सामंजस्य करारांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावी. सर्वांनी मिळून देशाच्या विकास प्रक्रियेत हातभार लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नोकऱ्या देणारे हात निर्माण करुया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नोकऱ्या घेणाऱ्यांबरोबरच नोकऱ्या देणारे हात देखील निर्माण करावे, असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत. आजच्या कार्यक्रमातून १ लाख २१ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा संकल्प आपण केला आहे. नजिकच्या काळात राज्यात मोठे उद्योग येतील व त्याद्वारे राज्याच्या विकास प्रक्रियेला अजून गती प्राप्त होईल. राज्य शासन त्यादृष्टीने व्यापक काम करत असून प्रधानमंत्र्यांनीही यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात अनेक उद्योगांनी गुंतवणुक सुरु केली आहे. शासनामध्येही भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली असून याद्वारे ७५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.


            

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनस्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनस्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

            मुंबई, दि. 16 :- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्मृतीस्थळावर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार सर्वश्री गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रताप सरनाईक, कालिदास कोळंबकर, माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनालाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनालाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ.

            मुंबई, दि. 16 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या.


            दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ येथे निवड झालेल्या सहा उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. यात आशिष जाधव, हर्षाली धनगर, भरत गांजले, रूपाली साखरे, लक्ष्मण शिंदे आणि विनोद राऊत यांचा समावेश होता.


            अन्न व्यवसाय आणि प्रवासी वाहतूक सुरू केलेल्या 60 उद्योजकांच्या व्यवसायाचा आज शुभारंभ करण्यात आला. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात शोभा भंडारे, उत्कर्ष तारी, रूपाली सालेकर, स्नेहा आव्हाड आणि उमेश सोनवणे यांना वाहनाच्या चाव्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.


            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह 14 जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याची सक्ती होती. राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविली आहे.


            खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने उद्योग विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


००००



Featured post

Lakshvedhi