Saturday, 12 November 2022

जिंदगी

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारा जिल्हा दौऱ्यासाठी आगमन,



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारा जिल्हा दौऱ्यासाठी आगमन,

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारा जिल्हा दौऱ्यासाठी आगमन,

विमानतळावर स्वागत.

            नागपूर, दि. १२ : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्याकरीता व भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज १२ नोव्हेंबर रोजी नागपूर विमानतळावर ११.३० वाजता आगमन झाले. लगेच ते हेलिकॉप्टरने भंडारा कडे रवाना झाले. 


            शनिवारी सकाळी त्यांचे विशेष विमानाने नागपूर येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत होते. विमानतळावर आज नागपूर विमानतळावर खासदार कृपाल तुमाणे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विमानतळाबाहेर येत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले.


        मुख्यमंत्री भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द जलपर्यटन तथा प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी १ नंतर शहरातील विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. 


            दुपारी २.१५ ला खातरोड रेल्वे मैदान, माधवनगर येथे जाहीर सभेस संबोधीत करतील. दुपारी ४ वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील. ४.३० मुंबईकडे प्रयाण करतील.

000



बाप चा बाप

 


नॅशनल ॲवॉर्डसाठी प्रस्ताव सादर करावे

 नॅशनल ॲवॉर्डसाठी प्रस्ताव सादर करावे

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 11 : नागरिकांमध्ये मतदानाबाबत शिक्षण आणि जाणिव जागृती करण्यासाठी काम करणाऱ्या माध्यम संस्थांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी माध्यम संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.


            चार गटांसाठी हे पुरस्कार आहेत. प्रिंट मिडिया, टेलिव्हिजन, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) सोशल मीडियासाठी हे पुरस्कार आहेत. प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजेच दि. 25 जानेवारी रोजी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.


पुरस्काराची निवड मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची गुणवत्ता, उपाययोजनांची वारंवारता, उपाययोजनांचा मतदारांवर झालेला परिणाम, निवडणुकीच्या सुलभतेबाबतची प्रसिद्धी आणि इतर अनुषंगिक उपाययोजना या मुद्यावर निवड केली जाईल, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी यांनी यावेळी दिली.


            पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठीच्या अटी आणि नियम याबाबतची माहिती भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. यासाठी अर्ज श्री. लव कुश यादव, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली-110001, या पत्त्यावर, media-division@eci.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.011-23052033 यावर संपर्क साधावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


0000

माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार

 माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार

                                -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


          मुंबई दि. 11 : “माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी. पात्र माजी सैनिकांना एक वर्षाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण द्यावे”, असे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

          शिक्षण विभागातील माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांच्या समस्या व शिक्षक भरतीमध्ये माजी व शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागण्यांबाबत आज जवाहरलाल बालभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.

          मंत्री केसरकर म्हणाले की, माजी सैनिकांचे सैन्यातील कामाचे स्वरूप पाहता; ते शारीरिक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊ शकतील. त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणांतर्गत पात्र सैनिकांना शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक पदी सामावून घेण्याची प्रक्रिया राबवावी. शासकीय सैनिकी शाळेप्रमाणे खाजगी सैनिक शाळेतही अभ्यासक्रम व प्रशासकीय व्यवस्था कार्यरत असावी यासाठी सैनिक स्कूल समितीमध्ये फेरबदल करून शासकीय अधिका-यांचा समावेश असलेली समिती त्वरीत गठीत करावी.

          सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीने मागणी केल्याप्रमाणे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) परिक्षेसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार तसेच, शिक्षण सेवक व विस्तार अधिकारी यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

          या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त शिवाजी मांढरे, सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी खासदार व आमदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत, सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीचे सचिव अमर माने, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्य अध्यक्ष बाजीराव देशमुख आणि उपाध्यक्ष (मंत्रालयीन विभाग) उमाकांत भुजबळ, समिती सदस्य फ्लेचर पटेल आदी उपस्थित होते.

                                                                      ०००



महापरिनिर्वाण

 महापरिनिर्वाण दिनानिमित्तअनुयायांसाठी चोखपणे सुविधा द्याव्यात. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्मारकाचेकाम वर्षभरात पूर्ण करावे

                                    - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  

            मुंबई, दि.११ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी  येणाऱ्या लाखो अनुयायींना यंदाही सोयी-सुविधा देताना सर्व  यंत्रणांनी कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची खबरदारी घ्यावी. इंदू मिल येथील  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  ६ डिसेंबर  रोजी  चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी मैदान येथे शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई  उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव गृह (विशेष) संजय सक्सेना, प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन नानोटियामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासमुंबई महापालिकेचे  आयुक्त इक्बाल सिंह चहल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीपोलीस महासंचालक (प्रशिक्षण) संजय कुमार, मुंबई शहरचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मध्य रेल्वेचे अपर प्रबंधक अमरेन्द्र सिंह, अपर मंडल रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे शीत मरू, मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त अमरेश कुमारसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे  महासंचालक धम्मज्योती गजभिये, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मार्गदर्शक भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी, रवि गरूड,महेंद्र साळवे, मयुर कांबळे, रमेश जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

           उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चैत्यभूमीवर कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात अनुयायी येतील. त्यामुळे  वाढणारी संख्या लक्षात घेवून मुंबई महापालिकेने चांगले नियोजन केले आहे. यापूर्वी  या विषयाच्या अनुषंगाने नियोजनाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कामामध्ये त्रुटी राहू नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे ही चांगली गोष्ट आहे. मुंबई महापालिका, गृह, एसटी, सामाजिक न्याय विभाग या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने स्वच्छता करावी. त्याचबरोबर या परिसरात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखावी. ज्या ठिकाणाहून एसटीने अनुयायी चैत्यभूमीकडे येणार आहेत अशा एसटीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादनपर फलक लावावा. भारतरत्न                 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  साहित्य वाजवी दरात उपलब्ध होण्यासाठी स्टॉल लावण्यात यावा जेणेकरून एक विचारांचा शिधा आपल्याला या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवता येईल.

       उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यावर्षी प्रमुख पाहुण्यांसाठी चैत्यभूमी येथे दर्शनासाठी  एक ठराविक वेळ ठेवण्यात यावा जेणेकरून अनुयायांना चैत्यभूमी येथे दर्शन घेताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अनुयांयासाठी वॉटरप्रूफ मंडप, रांगेतील अनुयायांना बिस्कीटे आणि पाणी वाटपाचा निर्णय देखील चांगला आहे. अनुयायांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी पूर्वतयारी चांगल्या प्रकारे करावी. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करावे, सामाजिक न्याय विभाग व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी सर्व मान्यता  लवकरात लवकर घ्याव्यात. पुढच्या वर्षी याच दिवशी इंदू मिल सर्वांसाठी खुली करण्यात येवू शकेल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक नियोजन समितीचे रमेश जाधव यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाने करावयाच्या कामाबाबत विविध सूचना बैठकीत केल्या.

माझा गोठा, स्वच्छ गोठा"अभियान प्रभावीपणे राबवावे.

 पशुधनाच्या सुरक्षेसाठी राज्यात "माझा गोठा, स्वच्छ गोठा"अभियान प्रभावीपणे राबवावे.

                                           - राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 11 : लम्पीसारख्या संसर्गजन्य रोगापासून पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यात "माझा गोठा, स्वच्छ गोठा" अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.    


मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाविषयी मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सह सचिव मानिक गुट्टे, सह आयुक्त डॉ. डी.डी.परकाळे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, "माझा गोठा, स्वच्छ गोठा" अभियान हे एक क्रांतिकारक अभियान असून एक चळवळ उभी करावी. हे अभियान महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने राबवावे. गोठा स्वच्छ ठेवल्यास लम्पी तसेच इतर संसर्गजन्य रोगांपासून भविष्यातही पशुधन सुरक्षित राहू शकेल. लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात.


राज्यात लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना जबाबदारी सोपवावी. रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबींवर गांभीर्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना देखील मंत्री श्री. विखे- पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


रोग नियंत्रणासाठी जिल्ह्याला आणखी एक कोटी रुपये


रोग नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यात आणखी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. औषधी, लसमात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्यांचे गोवंशीय पशुधन मृत्यूमुखी पडले आहे त्या पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. मदतीपासून वंचित असलेल्या पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिले.


000

Featured post

Lakshvedhi