सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 23 October 2022
एसटी’ महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट
एसटी’ महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही श्री. चन्ने यांनी सांगितले.
छटपुजेनिमित्त जुहू व सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने बंद
छटपुजेनिमित्त जुहू व सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने बंद
मुंबई, दि. 19 : मुंबईतील जुहू येथील समुद्र किनारी दरवर्षी छटपूजा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी छटपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जुहू व सांताक्रुज पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्यविक्री करणारे दुकाने दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ पासून दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत (११.३० तास) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जुहू व सांताक्रूझ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व अबकारी परवानाधारकांनी आणि सर्व प्रकारची मद्यविक्री अनुज्ञप्ती धारक दुकानांनी या कालावधीत कोणतेही व्यवहार करू नयेत. या कालावधीत व्यवहार सुरू असल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यासह अनुज्ञप्ती वा परवाना रद्द करण्याची कारवाई देखील केली जाईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.
===
(क्र. मुउजि/प्रमाक/वा/००९)
लोकाभिमुख उपक्रमांद्वारे
लोकाभिमुख उपक्रमांद्वारे मुंबईचा कायापालट करणार
- जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन.
मुंबई, दि. 19- मुंबईत पर्यटनाला मोठा वाव आहे. या अनुषंगाने मुंबईचा पर्यटनदृष्ट्या विकास करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून मुंबईचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मुंबई जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आढावा बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत 2022-23 मधील विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुंबईत पर्यटन विकास आणि त्याअनुषंगाने रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. महालक्ष्मी, मुंबादेवी, सिद्धीविनायक, बाणगंगा, हाजिअली अशा अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या परिसरात भाविक पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यांच्या सोयीसाठी प्रार्थना सभागृह, वाहनतळ, परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करणे, फोर्ट परिसरात ‘टुरिझम स्ट्रीट’ची संकल्पना राबविणे, वरळीतील इमारती, समुद्र किनारा, किल्ला परिसराचे लाईटनिंगद्वारे सुशोभिकरण करणे आदी बाबींना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली.
शहरातील कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. मासेमारी कशी करतात हे जाणून घेण्याबरोबरच मच्छिमारांची जीवनशैली सर्वांना समजावी यादृष्टीने शहरातील कोळीवाडे, ससून डॉक, भाऊचा धक्का आदी परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करून त्यांचाही पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले. ताजे मासे विकल्यानंतर शिल्लक माशांपासून विविध पदार्थ तयार करण्याजोगी रोजगार निर्मिती होईल असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. यासाठी सोलार ड्रायर, शीतपेट्यांचा वापर करून महिलांसाठी स्वच्छतेचे प्रशिक्षण देऊन कौशल्यआधारित रोजगार उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
श्री. केसरकर म्हणाले, मुंबईतील झोपडपट्टी भागात बदल घडवून नागरिकांचे जीवनमान उंचावयाचे आहे. त्यांचे आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे, याअनुषंगाने फिरते रूग्णालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. यासाठी सामान्य तपासणीसह एक्सरे, दात, डोळे, महिलांसाठी कॅन्सर आदी तपासण्या होतील अशी फिरती व्हॅन सुरू करावी असे निर्देश त्यांनी दिले.
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाडी हा शाळेचाच भाग होणार आहे. त्यादृष्टीने अंगणवाडी विकासासाठी उपक्रम राबवावा. भिक्षेकरी मुक्त मुंबई उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक संस्था, पोलीस, महानगरपालिका यांच्यासह नागरिकांचा सहभाग घ्यावा. बालकामगार, बाल भिक्षेकरी यांना शाळेत सामावून नवीन आयुष्य जगता येईल असे उपक्रम प्राधान्याने राबवावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. दुर्लक्षित महिला आणि बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर मुंबईत वृद्धाश्रमासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधावा, विद्यार्थी आणि वाचकांसाठी रिडींग रूम्स, कामगार मैदानाचा दर्जेदार पद्धतीने विकास करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ
Pl share very useful info.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत
प्रोत्साहनपर लाभ योजनेचा गुरुवारी शुभारंभ
मुंबई, दि. 19 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ गुरुवार दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित राहणार आहेत.
सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण
सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017 - 18, सन 2018 - 19 आणि सन 2019 - 20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या प्रकियेला सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. दि. 20 रोजीच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. सावे म्हणाले.
या योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत :-
1. कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
2. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
3. सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी देखील या योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस देखील प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.
योजनेची कार्यपद्धती :-
1. या योजनेंतर्गत योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
2. या प्राप्त याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.
3. पात्र लाभार्थींच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह संबंधीत बँकेस तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येतील.
4. सदर यादीमधील संबंधीत शेतकऱ्यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
5. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.
कर्जमुक्ती योजनेसाठी निकषात न बसणाऱ्या व्यक्ती :-
1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
2. महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.
3. केंद्र सरकार व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारापेक्षा अधिक असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
4. राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस. टी. महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
5. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
6. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
7. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
०००
Saturday, 22 October 2022
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार
मुंबई, दि. २२: महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या दरम्यान बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) या अभ्यासक्रमा साठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बिझनेस आणि रिटेलचे आवश्यक ज्ञान आणि उद्योगाचा अनुभव मिळेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. लॉरेन्स फर्नांडिस, गौतम जैन, मीनाक्षी चुडामणी यांच्यासह रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या रिटेल लर्निंगच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रारंभ ऑगस्ट 2022 मध्ये झाला. विद्यापीठाने रोजगाराभिमुख कार्यक्रमांसाठी उद्योगाशी भागीदारी सुरू केली आहे. आता सुरू होत असलेल्या रिटेल उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकत असतानाच कमावण्याची आणि अनुभव मिळविण्याची संधी मिळेल. हा कोर्स स्टोअरच्या विद्यमान विक्री कर्मचार्यांसाठी देखील असेल. तीन वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांना सहाय्यक स्टोअर व्यवस्थापकांच्या प्रोफाइलमध्ये किरकोळ विक्री उद्योग क्षेत्रात संधी मिळेल. इयत्ता 12 वी पूर्ण केलेल्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा, अॅडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्रामचा पर्याय असेल. हा कोर्स पदवीधरांना किरकोळ विक्री उद्योगासंदर्भात (रिटेल इंडस्ट्री) आवश्यक कौशल्ये प्रदान करेल.
विद्यापीठाने नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, न्यू व्हेंचर मॅनेजमेंट मधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ उद्योगाशी संलग्न आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) ही भारतीय किरकोळ विक्रेत्यांची संस्था आहे. भारतातील आधुनिक रिटेल उद्योगाच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी ही संस्था सर्व भाग
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...





