Sunday, 23 October 2022

छटपुजेनिमित्त जुहू व सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने बंद

 छटपुजेनिमित्त जुहू व सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने बंद

 

            मुंबईदि. 19 : मुंबईतील जुहू येथील समुद्र किनारी दरवर्षी छटपूजा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी छटपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जुहू व सांताक्रुज पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्यविक्री करणारे दुकाने दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ पासून दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत (११.३० तास) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

             जुहू व सांताक्रूझ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व अबकारी परवानाधारकांनी आणि सर्व प्रकारची मद्यविक्री अनुज्ञप्ती धारक दुकानांनी या कालावधीत कोणतेही व्यवहार करू नयेत. या कालावधीत व्यवहार सुरू असल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यासह अनुज्ञप्ती वा परवाना रद्द करण्याची कारवाई देखील केली जाईलअसेही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.

===

 (क्र. मुउजि/प्रमाक/वा/००९)

 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi