Sunday, 25 September 2022

विचारमग्न करणारा लेख.

 खरोखर विचारमग्न करणारा लेख.

आपल्या मुलांनी स्पर्धेत कसं टिकून रहावं फक्त याचाच विचार करणाऱ्या पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा लेख. जरूर वाचा. 


दैनिक सकाळ संपादकीय : *🎯 मुलांना गृहपाठ हवा कि नको?*

इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका तीन-साडेतीन वर्षाच्या मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिण्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. या तीन वर्षाच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजार झाली होती. जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्ये सुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोन कॉल मुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या. प्रश्न हा नाही कि त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटर बरोबर बोलता कसे आले तर प्रश्न हा आहे कि त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असते हे कसे समजले? आणि ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?

या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात.....!!!  

  

ब्रिटनमध्ये मुलं तीन वर्षाचे झाले कि त्याला शाळेत प्रवेश मिळतो, आई वडील दोन्ही नोकरीलाअसतील तर सहा तास रोज मुलं शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात ना ABCD शिकवतात ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते. फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही तर आपलय रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, इलेकट्रीशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते, त्या बालमनांना त्या दिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आई वडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून अधिक अधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले. यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेक्यानिकपासून ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टर पर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. आम्ही कुठेय....? हा प्रश्न आम्हाला पडतो का? 


मुलांवर ओझे अपेक्षांचे 

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा चर्चा करत राहिलोय पण या बालमानच्या मनावरील ओझ्याचे काय? फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाटाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? याला पालकपण जबाबदार नाहीत का? माझ्या मुलाला शाळेत गेले कि आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत, मुलाना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत, याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे, असा सगळा अट्टाहास का? ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहरीत पोहले पाहिजे रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या वयात इतरांचे मुलं मुलांसारखे स्टेजवर नाचवत, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंग मध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताचा इंग्लिशच्या कलासला पण जबरदस्तीने बसवतोय. आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळया जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा उद्या चित्रकलेचा परवा कॉम्पुटरचा असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत. त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही. सात वर्षाचे मुलं सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाटाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय. आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्वकाही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याचा मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 


स्पर्धांची गरज आहे का? 

मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?    गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो? तो आई वडिलांबरोबर आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यपकाला त्याचे का टेन्शन येते? ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात मुलं इतर शाळेच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोंकाना विचारून खात्री करून घेतायत कि खरेच आज गृहपाठ नाही ना. 

आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? खरेच  या बालमानांना एव्हढ्याश्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? माझे मुलं सर्वच विषयात सर्वच खेळता सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा या कोवळ्या बालमानांना जीवघेणी स्पर्धेत ढकलत आहेत. अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी नाहीतर भविष्यात फक्त पुस्तकाच्या पानावरच ऍम्बुलन्सचे चित्र पाहिलेल्या आणि घरात लॅपटॉपवर कोडिंगचा गृहपाठ करत बसलेल्या चार-पाच वर्षाच्या एका कोवळ्या जिवाच्या अभागी मातेने घरातील चकचकीत फरसीवरून पाय घसरून जीव गमावलेला असेल.     

    

*🖊डॉ. नानासाहेब थोरात*

वरिष्ठ शास्त्रज्ञ 

मेडिकल सायन्स डिव्हिजन 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड


व्हॉट्स ॲप वरुन जसं आहे तसं कॉपी पेस्ट

सर्च मोहीम


 

जय हो


वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ‘

 नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प

चालविण्यास महाप्रित’ उत्सुक

 

            नाशिकदि.२४नाशिक शहरासाठी ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याची महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कंपनीने दर्शविली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचे वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आणि खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर’ चालविण्यास महाप्रित उत्सुक असल्याचे महाप्रितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी यांनी सांगितले.

            महाप्रितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी नाशिक मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. 

            मनपाचा वॉटर ट्रिटमेंट आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प संपूर्णपणे सोलर तंत्रज्ञानावर विकसित करून त्यातून ऊर्जा बचत होईलअसे श्री. श्रीमाळी यांनी यावेळी सांगितले. महाप्रित’ केंद्र सरकारच्या भागीदारीत ऊर्जा बचतसौर ऊर्जा प्रकल्पइलेक्ट्रिक वाहने व चार्जिंग स्टेशन प्रकल्पप्रदूषण नियंत्रण अशा विविध प्रकल्पांमध्ये कार्यरत असून नाशिक येथे ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

            आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपाचे दोन प्रकल्प महाप्रितमार्फत चालविण्यासाठी सहमती दर्शवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. योजनांमध्ये मनपाला जास्तीतजास्त निधी मिळावाअशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            बैठकीला महाप्रितचे कार्यकारी संचालक रविंद्र चव्हाणमहाव्यवस्थापक उमाकांत धामणकरप्र. अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबेउपायुक्त मनोज घोडे-पाटील आदी उपस्थित होते.

00000

       

जागतिक पर्यटन दिन

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि.23 ते 29 सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रम


            मुंबईदि.२४ : जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकारमहाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य पुनर्विचारात्मक पर्यटन’ (Rethinking Tourism) हे घोषित करण्यात आले आहे.

          या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईलजो विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

            एमटीडीसीच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयेसर्व पर्यटक निवासेउपहारगृहेबोट क्लब्समाहिती केंद्रेकलाग्राम इ. ठिकाणी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत दि.23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये नजिकच्या नामवंत सामाजिकआर्थिकशैक्षणिक संस्थामहाविद्यालयेशाळापुरातत्व विभाग आदींच्या सर्वसमावेशक योगदानातून हा पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे.

            पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळबस स्थानकरेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये या दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपरिक खेळाचे आयोजन असेल. सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिद्ध असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असून त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना वास्तव्यास आलेल्या अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजिकच्या सुरक्षित - पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेकजंगल ट्रेलनॅचरल वॉक इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.

            पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा, व्याख्यानमालाकलेतून प्रबोधन आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

            महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या निर्देशानुसार आणि महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली 'पर्यटन सप्ताह’ हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आयोजित होत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेलया दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजनछोट्या मॅरथॉनगायन व वादनाचे कार्यक्रमग्रामीण भागांचे दर्शनशालेय मुलांसाठी विविध उपक्रमजबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती  येथे  पदभ्रमंती  असे  उपक्रम  राबविण्यात  येणार  आहेत. या  निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे एमटीडीसीविनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विद्यमाने मायक्रोप्लास्टिक प्लॉगिंग (Microplastic Plogging)  या नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच 27 सप्टेंबर 2022 रोजी सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

            पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियानसमुद्रकिनारा सफाईहस्तकलागडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावातसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

00000


लंपिपशुधन आजार

 राज्यातील 21,948 बाधित पशूधनापैकी 8056 पशूधन उपचाराने झाले बरे

 

            मुंबईदि. 24 : राज्यामध्ये दि. 24 सप्टेंबर 2022 अखेर 30  जिल्ह्यांमधील 1757 गावांमध्ये फक्त 21,948 जनावरांमध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. यापैकी 8056 पशूधन उपचाराने बरे झालेले असल्याची माहिती पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. उर्वरीत बाधित पशूधनावर उपचार सुरु आहेत.

            राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 81.61 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 1757 गावातील 36.60 लक्ष पशूधन आणि परिघाबाहेरील 10.70 लक्ष पशूधन अशा एकूण 47.30 लक्ष पशूधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशूधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवूद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असूनत्यासाठी देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्व 4850 पशूवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

 

            लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकसेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशूवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासिता छात्र यांना प्रती लसमात्रा रु. 3/- प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहेत. सर्व खासगी पशूवैद्यकीय व्यावसायिकांनीसेवादात्यांनी तसेच पशूसंवर्धन विभागातील तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत असूनयासाठी त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. शासकीय पशूवैद्यकांनी तसेच खाजगी पशूवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत, अशा सूचनाही श्री सिंह यांनी दिल्या.


Saturday, 24 September 2022

वयोश्री योजनेच्या लाभ जेष्ठ नागरिक

 वयोश्री योजनेच्या लाभातून कोणीही वंचित राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 4 कोटींचे साहित्य वाटप

 

नागपूर दि. 24 : ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून वयोश्री योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय,  दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग यांच्यामार्फत आज नागपूर येथे दक्षिण - पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघाकरिता राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग सहायता योजना अंतर्गत साहित्य वाटप शिबीर घेण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वयोश्री योजनेतील प्रातिनिधीक साहित्य वाटप केले. कार्यक्रमासाठी दीक्षाभूमी परिसरातील काच्छीपुरा येथील पीकेव्ही मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

भारतीय कृत्रिम अंग निर्माण मंडळ (एलिम्को) कानपूर, नागपूर महानगरपालिका नागपूर, सीआरसी नागपूर यांच्यामार्फत कृत्रिम अवयव, चष्मा, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, वॉकींग स्टीक अशा अनेक पूरक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. आज एका दिवशी 4 कोटी किंमतीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. याच ठिकाणी वृद्धांसाठी तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदार प्रवीण दटके, पारिणय फुके, मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दातृत्वाच्या भूमिकेतून वयोश्री सारखी अत्यंत महत्त्वाची योजना ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी तयार केली आहे. वरिष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात सहजपणे जीवन जगता यावे, यासाठी या साहित्याची गरज असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय कल्पकतेने नागपूर शहरासाठी या योजनेची वितरण यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे दक्षिण - पश्चिम, पश्चिम नागपूर मतदार संघातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. ज्यांना आता साहित्य मिळाले नसेल त्यांना पुढच्या वेळी नक्की साहित्य मिळेल, असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य वितरित करण्यात येत असून त्याचा दर्जा दीर्घकाळ टिकेल. 

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, ज्येष्ठांची सेवा ही ईश्वरीय सेवा असून रंजल्या - गांजल्यांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपुरात जेष्ठ नागरिकांसाठी सुंदर बाग - बगीचे, विरंगुळा केंद्र यासोबतच जागतिक दर्जाचे दिव्यांग पार्क उभारण्यात येईल. अनुसूचित जाती व आदिवासी समुदायात मोठ्या प्रमाणात सिकलसेल रुग्ण आढळतात. अशा रुग्णांना 'बोन मॅरो ' ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अर्ध्या किमतीत उपचार उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या शिबीरात नागपूर शहर व जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना - 2021 आणि दिव्यांग सहायता योजनेतून दक्षिण - पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील 3 हजार 950 लाभार्थ्यांना 4 कोटी रुपयांच्या सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये दिव्यांग सहायता योजनेचे 372 आणि वयोश्रीचे 3 हजार 578 लाभार्थी आहे. त्यांना 30 हजार 520 उपकरणे नि:शुल्क दिली गेली.

0000

   

Featured post

Lakshvedhi