Thursday, 15 September 2022

गो गुगली

 *Okay Google,*

 *माझ्या पत्नीला कॉल करा आणि तिला सांगा की, मला घरी यायला उशीर होईल.*

 *आणि रात्रीच्या जेवणासाठी स्पेशल काहीतरी बनवून ठेव*.

" *Google :-*

 *ठीक आहे,*

 *काही वेळानंतर...*

 *Google:-*

 *पुढच्या वेळी तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीशी बोला...एवढं कोण ऐकून घेणार तुमच्या बायकोचं*

 😠😅😂🤣

लिलाव लालबाग राजा चरणी वस्तू

 जय गणेश 🙏

नमस्कार..!

लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सवादरम्यान भाविकांकडून अर्पण करण्यात आलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव ऊद्या गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजल्यापासून रात्रौ ठीक दहा वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या मंडपात आयोजित करण्यात आलेला आहे याची कृपया सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.🙏🙏

परिषद उद्योग

 ही परिषद राज्याच्या विकासाला मार्गदर्शक ठरणार - ललित गांधी*


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर या महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राच्या शतक महोत्सवी शिखर संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उद्योग परिषदेचे आयोजन गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत तळमजला साउथ लॉन्स, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची प्रगती भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आणि मेक इन महाराष्ट्र मध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिषदेमध्ये मुख्य पाहुणे भारत सरकारचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नाम. श्री. नारायण राणे व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री नाम. श्री. उदय सामंत हे भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम क्षेत्राची प्रगती - भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आणि मेक इन महाराष्ट्र मध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यस्तरीय परिषदेत युवा सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाची भूमिका आणि राष्ट्र निर्माण या विषयावर महाराष्ट्र सरकारचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री नाम. श्री. मंगलप्रभात लोढा हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या  राज्यस्तरीय परिषदेमध्ये राज्यातील व्यापार, उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा व मार्गदर्शन होणार असून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी असलेल्या योजनांची माहिती मिळणार असून ही राज्यस्तरीय परिषद राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राला मार्गदर्शक ठरेल अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे. तसेच व्यापारी उद्योजकांनी मोठ्या संख्येने राज्यस्तरीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर ,उपाध्यक्ष तनसुख झांबड, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर व कार्यकारीणी समितीने केले आहे.

भवताल

 या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही?

 ...त्यासाठी भूजलाची ओळख करून घ्यावी लागेल

.

महाराष्ट्रात अशा काही विहिरीझरेनैसर्गिक जलस्रोत आहेत की त्यांचे पाणी कधीच आटले नाहीअगदी १९७२ सारखा भीषण दुष्काळात आणि नंतरच्या दुष्काळांमध्येही ते टिकून होतेयावरून काही जण मानतात की या जलस्रोतांना स्वत:चे पाणी असतेत्यामुळे ते आटत नाहीत... कितीही पाणी उपलसे तरी!


·  पण जमिनीत आपोआप पाणी निर्माण होते का?

·  जमिनीतील पाण्याशी पावसाचा संबंध असतो का?

·  जमिनीतील जलसाठ्यांना पाणी का  कसे लागते?

·  कितीही उपसले तरी त्यांचे कमी होत नाही का?

·  मग असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात.


त्यांची उत्तरे उलगडण्यासाठी भूजल समजून घ्यावे लागेल.

त्यासाठीच,

भवताल शॉर्ट कोर्सेससत्र .


भूजलहडप्पा संस्कृतीदेवराई आणि प्लास्टिक या घटकांची ओळख करून देणारी सेशन्स.

 

मर्यादित प्रवेश; सहभागींना प्रमाणपत्र.

 

नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/ShortCourses2

 

अधिक माहितीसाठी:

९५४५३५०८६२ bhavatal@gmail.com


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


भारतीय संस्कृती

 स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी

- सुधीर मुनगंटीवार

आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 परिषदेचे उद्घाटन

 

          मुंबईदि. 14 : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

            ते पुढे म्हणाले की,  हे माध्यम  दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा की नकारात्मक हे आपल्या हातात आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग उद्योगाने देश उभारणीत आपला वाटा सकारात्मक पद्धतीने उचलावा. आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी असतोत्यामुळे या उद्योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मनोरंजन कर कमी करत या उद्योगाला मदत केली. महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही ठामपणे या उद्योगाच्या पाठी उभे आहोत.

            श्री.मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले कीआज अमेरिकेत लाखो विद्यार्थी संस्कृत शिकत आहेततर जर्मनीमधल्या विद्यापीठांमध्ये भारतशास्त्र (इंडॉलॉजी) अभ्यासक्रमांना प्रचंड मागणी आहे. जगभरात भारताचे आकर्षण वाढले आहे. अशावेळी स्ट्रीमिंग उद्योगाने भारतीय संस्कृती व ज्ञान परंपरा जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे.

            यावेळी हरित नागपालप्रसाद संगमेश्वरनसत्रजीत सेन, शाहबाझ खान आदी उपस्थित होते.

००००




उद्योग सुविधा प्रोत्साहन

 उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहन

देण्यासाठी राज्य शासन तत्पर

उद्योगमंत्री उदय सामंत

‘बॉयलर इंडिया 2022’ चे उद्घाटन

·        16 सप्टेंबरपर्यंत चालणार प्रदर्शन

·        बाष्पके क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांचे कार्यशाळेत मार्गदर्शन

·        प्रदर्शनात दहा देशातील 280 हून अधिक उद्योजकांचा समावेश

·        नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रदर्शनात समावेश

 

            ठाणेदि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिकस्तरावरील ‘बॉयलर इंडिया 2022’ प्रदर्शनचर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत आणि कामगार मंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. राज्यात उद्योगासाठी पूरक वातावरण असून उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईलअसे प्रतिपादन उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.

            वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस ‘बॉयलर इंडिया 2022’ प्रदर्शनचर्चासत्र भरविण्यात आले आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरेआमदार महेश बालदीआमदार रमेश पाटीलकामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघलविभागीय आयुक्त तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकरकामगार आयुक्त सुरेश जाधवबाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकरअदानी पॉवरचे थर्मल हेड चैतन्य प्रसाद साहूथायसन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भाटिया आदी यावेळी उपस्थित होते.

            या प्रदर्शनात जर्मनीस्विझरलँडइंग्लंड या देशांसह दहा देशातील सुमारे 280 उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रेसाहित्य यांची मांडणी येथे आहे. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञानघडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बॉयलर क्षेत्राशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले कीबाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदलया क्षेत्रासंबंधीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. कामगार व उद्योग विभाग एकत्र येऊन उद्योगांना चांगल्या सुविधा देऊ. सध्या असलेल्या व नवीन उद्योगांनाही इतर राज्यांपेक्षा वीज पुरवठाजमीन व इतर प्रोत्साहनपर सुविधा महाराष्ट्र शासन देईल. राज्यात नवनवीन उद्योग येण्यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून वेदांतापेक्षाही मोठा उद्योग राज्यात आणण्यात येईलअसे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

            राज्यातील सर्व प्रकल्पांना इतर राज्यांपेक्षाही चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करत आहे. बॉयलर उद्योग वाढीसाठीही राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण मदत देण्यात येईल. तसेच या क्षेत्रासाठीही प्रोत्साहनपर पॅकेज देण्यासाठीही प्रयत्न करूअसेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभागाचे योगदान – कामगार मंत्री सुरेश खाडे

            कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले कीउद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभाग योगदान देत असून उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची सुलभताकामगारांची सुरक्षितता व कामगार हित या त्रिसूत्रीची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. उद्योग व कामगार विभाग हे एकत्र काम करत आहेत. बॉयलर हा सर्व उद्योगांचा महत्त्वाचा घटक आहे. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊन पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीमध्ये हातभार लागेलयासाठी बाष्पके निर्माते व वापरकर्त्यांनी प्रयत्न करावेत.

            व्यवसाय सुलभीकरण अंतर्गत (ईज ऑफ डुइंग बिझनेस) राज्यातील 392 सेवा ऑनलाईन झाल्या असून त्यापैकी 41 सेवा या कामगार विभागाशी संबंधित आहेत. त्यातही बॉयलर विभागाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. व्यवसाय सुलभीकरणामध्ये कामगार विभागाने मूलभूत व महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याअंतर्गत एक खिडकी योजना राबवून एकाच अर्जावर सर्व परवाने देण्यासाठी पुढाकार घेतला आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी  मंत्री श्री. सामंतश्री. खाडे यांनीही प्रदर्शनस्थळातील विविध स्टॉलना भेटी देऊन माहिती घेतली. प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रदर्शन व चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. श्री. अंतापूरकर यांनी प्रास्ताविकात बाष्पके संचालनालयाची माहिती व चर्चासत्राविषयी माहिती दिली.यावेळी उद्योग प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर बाष्पके उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.




मानधन अंगणवाडी

 अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

              मुंबईदि. 14 : महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

           मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठकीत  महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा  बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनएकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवालउपसचिव वि. रा. ठाकुरमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटीलदिलीप उटाणेआरमाइर इराणीअतुल दिघेराजेश सिंगसंगीता कांबळेदत्ता देशमुख यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीराज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत.अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ तसेच विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील आहे.मानधन वाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे याबाबतीत विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेऊअसेही त्यांनी सांगितले.


Featured post

Lakshvedhi