Thursday, 15 September 2022

मानधन अंगणवाडी

 अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

              मुंबईदि. 14 : महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

           मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठकीत  महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा  बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनएकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवालउपसचिव वि. रा. ठाकुरमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटीलदिलीप उटाणेआरमाइर इराणीअतुल दिघेराजेश सिंगसंगीता कांबळेदत्ता देशमुख यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीराज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत.अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ तसेच विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील आहे.मानधन वाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे याबाबतीत विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेऊअसेही त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi