Friday, 26 August 2022

अधिवेशन लोकहिताचे निर्णय

 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय

नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 25 : नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            कोविड निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. 9 दिवसांमध्ये 6 दिवसाचे कामकाज झाले. माझ्या दृष्टीने हे अधिवेशन खूप यशस्वी ठरले असे मुख्यमंत्र्यांनी सांगून या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे म्हटले आहे

            पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्यात आली.

            या अधिवेशनात एकूण 10 विधेयके मंजूर करण्यात आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

• भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव

• नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव.

• औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधान मंडळाचा ठराव.

• या अधिवेशनात विविध विभागांच्या 25 हजार 826.72 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीला मंजूरी देण्यात आली.

• थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.

• राज्यात “एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.

o सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार. एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत

o पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर.

o शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा.

• आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.

• मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार. तीन वर्षात काम पूर्ण करणार.

• धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.

• गिरणी कामगारांना 50 हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.

• मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.

• बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.

• बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.

• मेट्रो मार्ग 5 चा विस्तार करण्यात येणार आहे.

• महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के व कक्षेबाहेरील 50 टक्के पदभरती करणार.

• राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.

• 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.

• शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.

• मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार.

• हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार.

• हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर

• आश्रमशाळांसाठी 600 कोटींची तरतूद.

• राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.

• कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी शासन भरणार

• वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य

• राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.

• रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.

• पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.

• स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.

• खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प.

S T प्रवास सवलत, जेष्ठ करिता


 

सुप्रभात






 

जेष्ठ नागरिक सवलत विशेष

 ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. २५ : देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            विधीमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

            राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ झाला. याप्रसंगी श्रीमती आनंदी गुरव, रमेश खाडे, विजय औंधे, बाबाजी चिपळूणकर, चंद्रमोहन परब यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत प्रवास सवलत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

            या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे,असे व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले.

            सवलत योजनेची वैशिष्ट्ये : वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.

            ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.

0000


 


 




धोरण

 विधानपरिषद :

रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार

- शिक्षणमंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 25 : राज्यातील रात्रशाळांबाबत सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

            राज्यातील रात्रशाळांकरिता सर्वांकष धोरण निश्चित करण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकाच्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक असे धोरण ठरवून, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यात येईल. तसेच या शाळांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

            दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसमावेशक धोरणात विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्याप्रमाणे धोरण आखण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

              या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर ,कपिल पाटील यांनी सहभाग घेतला.

00000

रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा.

विधिमंडळ सभागृहात अभिनंदन

            मुंबई, दि. 25 :- मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को, रशिया या संस्थेच्या प्रांगणात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन करण्यात आले.

            2020 हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यांचा रशियात अर्धाकृती पुतळा बसविणे ही बाब देशाची शान व मान वाढणारी आहे. त्यामुळे विधानपरिषद आणि विधानसभेत या संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.

            हा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत करण्या

साथ हामरा विकास तुम्हारा

 *भूलथापांना बळी पडून कोठेही आपले पैसे गुंतवू नका, आधीच विचार करा

-----------------------

मैत्रेय... धनादेश Bounce, मालकाला अटक !

😫

पियरलेस... पत्ताच नाही !

😵

कल्पवृक्ष... अचानक बंद पडलं ! ४०० कोटी बुडले

😲

Venus life ... मालिक तुरुंगात  लौक रस्त्यावर, सगळे बुडाले !

🙄

Per Day Cash... नुसत्या थापा !

😖

संचयनी... लोकांचे पैसे बुडाले..!

😢

KBC... मालक पैसे घेऊन सिंगापूरला फरार !?

😭

रायसोनी मल्टीस्टेट ... १२ संचालक तुरुंगात सोसायटी बंद खातेदार बुडाले! तशा अनेक मल्टीस्टेट सोसायटी बुडण्याच्या मार्गावर.. 

😥

Imu egg yojna. पैसे घेऊन मालक फरार !

😳

Japan Life गादी... पैसे गेले अन् गादीवर झोपच नाही लागली !!

🙄

पर्लस्... भांगू पळाला.. एजंट लपून बसले. गुंतवणूकदार हवालदिल !

😧

Swadeshi... माणसे नाही भेटली !

😰

RCM... दुकानं बंद पडली !

😲

Netsurf... होते काही तरी ??

😖

Noni... बळजबरी लोकांना आजारी म्हणायचे !

😫

Pan Card Clubs... धनादेश BOUNCE ? मालक स्वर्गवासी गेले. एकुण एक गुंतवणूकदार बुडाले.

😖

समृद्ध जीवन... FRAUD मुळे मालकाला अटक ! हजारो करोड बुडाले. 

😢

सहारा  investment... मालक ४ वर्षे तुरुंगात. लोक स्मशानात.* 

😧

सिट्रस- व्टिंकल... गोयेंका गायब, कंपन्याची नावे बदलून लुटालुट सुरुच आता बंद पडले, पैसे गेले सर्व गेले इत्यादी इत्यादी !*

😳😳😳

*मूर्ख बनवणारे हजारो आपणच,*

*मूर्ख बनणारे लाखो आपणच,*

*कमी श्रमात अधिक पैसे कमविण्याचा*शॉर्ट-कट मार्ग हवाय ना सगळ्यांना,*

*म्हणुन वेगवेगळ्या नावाने दरवर्षी येणाऱ्या मार्केटींग कंपन्या  यांची खुप मोठी यादी*आहे मित्रांनो !*


*ही सर्व धोखाधडी चालू असते, चालूच राहणार नवीन-नवीन नावाने.. नवीन बनावट चेहऱ्याने...!!*

*पुर्वीच्या प्लांटेशन कंपन्या प्रमाणे आता कॉईनच्या नावे हजारो कंपन्या आल्या आहेत.*

*रोज कोणीतरी कॉईन काढतो बघता बघता  ४८ तासात त्या कॉईनचा दर डबल होतो. अवघ्या २ दिवसात झाले तुमचे पैसै डबल..*

*बिचाऱ्या सरकारी बँका 11 वर्षे घेतात दुप्पट द्यायला पोस्ट विभाग 12 वर्षे घेते.. इथे मात्र केवळ 2/3 वर्षात तुमचे पैसै दुप्पट ...*अरे थोडं तरी डोकं चालवा. आपला घामाचा पैसा कुठेही गुंतवून आपली फसवणूक करुन घेऊ नका.*

*त्यासाठी  सुरक्षित  खात्रीशीर नावे*

     एलआयसी,केअर insurance *

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷contact vaishali bhagat 9834271672,9876824365 साथ हामारा विकास तुम्हारा

Thursday, 25 August 2022

दिलखुलास


'दिलखुलासकार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक

वीरेंद्र तिवारी यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शुक्रवार दि. 26 ऑगस्ट आणि शनिवार दि. 27 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            ठाणे खाडीला नुकताच रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या घोषणेमुळे ठाणे खाडीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी वनविभागाने कशाप्रकारे प्रयत्न केले आणि हा दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदेकांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्वकांदळवनाचे व्यवस्थापनसंरक्षण व संवर्धन कशाप्रकारे केले जात आहे तसेच कांदळवन प्रतिष्ठानच्या कामगिरीविषयीची सविस्तर माहिती श्री. तिवारी यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

Featured post

Lakshvedhi