Thursday, 25 August 2022

दिलखुलास


'दिलखुलासकार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक

वीरेंद्र तिवारी यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शुक्रवार दि. 26 ऑगस्ट आणि शनिवार दि. 27 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            ठाणे खाडीला नुकताच रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या घोषणेमुळे ठाणे खाडीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी वनविभागाने कशाप्रकारे प्रयत्न केले आणि हा दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदेकांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्वकांदळवनाचे व्यवस्थापनसंरक्षण व संवर्धन कशाप्रकारे केले जात आहे तसेच कांदळवन प्रतिष्ठानच्या कामगिरीविषयीची सविस्तर माहिती श्री. तिवारी यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi