Friday, 24 June 2022

राष्ट्रपती

 *द्रौपदी मुर्मू*

   *ही कहाणी आहे एका शिक्षिकेची,ही कहाणी आहे एका झुंजार आदिवासी महिलेची,ही कहाणी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची,ही कहाणी आहे एका अध्यात्मिक प्रवासाची,ही कहाणी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची,ही कहाणी आहे द्रौपदी मुर्मू*.

    *काल पर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे.राष्ट्रपतीपदाची त्यांची ऊमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते* *.*एका आदिवासी,गरीब,सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची ऊमेदवारी मिळते,हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे.भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या ऊमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे*.*विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्म यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे.घराणेशाही,अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी ही द्रौपदी मुर्मू यांची आहे.*

   *ओरीसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला.१९७९ साली त्या पदवीधर झाल्या.ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या.पुढे त्या शिक्षक झाल्या.नेगरसेवक झाल्या.आमदार झाल्या.मंत्री झाल्या.राज्यपाल झाल्या.आणि आता हवाराष्ट्रपतीदाच्या ऊमेदवार.घराणेशाही नाही,संपत्ती नाही,वारसा नाही.सारेच कसे थक्क कणारे आहे.त्यांच्या पतीचे नाव शाम चरण मुर्मू आहे*

    *आजही त्या मयुरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात.६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.दलित,आदीवासी,लहान मुले यांच्या ऊत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली.कोणीही कोलमडले असते.त्याही कोलमडल्या.पण पुन्हा ऊभ्या राहिल्या.ताठ ऊभ्या राहिल्या.त्यांना दोन मुले व एक मुलगी.२००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला.हा धक्का त्यांना सहन झाला नाही.त्या डिप्रेशन मध्ये गेल्या.जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले.खचुन गेल्या.याचवेळी त्या प्रजापिता ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या.त्या अध्यात्माला शरण गेल्या.त्या पुन्हा ऊभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला.त्याच महिन्यात आई गेली,कर्तबगार भाऊही गेला.चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली.आणि २०१४ साली पती शाम चरण मुर्मूही गेले.त्या एकाकी झाल्या.नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला.*

    *परतुं अध्यात्म त्यांच्या सोबत होते.त्यांनी दलित,आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.स्वतःचे दुःख जगाच्या दुखात मिसळून टाकले.पुन्हा ताठपणे ऊभ्या राहिल्या.२०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले.लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला.२०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या.*

     *२० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता.आणि २१ जून भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली.त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही.त्या नेहमी प्रमाणे शिवमंदीरात गेल्या.स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले.मंदीरातील कर्मचाऱ्याबरोबर सुखसंवाद केला.मयुरभंजमध्ये जल्लोष झाला.द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर,१९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील.एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल.हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे!*

जय महाराष्ट्र


   👔 

🙏🙏🙏जय महाराष्ट्र..

कोणी म्हणतोय भाजप जिंकला,

कोणी म्हणतोय शिवसेना हरली,

कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,

कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,

कोणी म्हणतोय मनसेची वाट

लावली... पणलक्षातठेवा

 इथे फक्त    "जिंकलाय" आणि पुढे गेलाय तो            गुजराथी, मारवाडी,भैया,  मद्रासी,सिंधी,पंजाबी,

  आणिहरलाय आणि फक्त     तो   माझा    "महाराष्ट्र".        आणिमझ्या महाराष्ट्रातील "मराठी माणूस"...

आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल ...

महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही    मुंबईची आणि पुण्याची स्थिति...

  💎हिरा मार्केट - गुजराती‬

   👔 कपडा मार्केट - ‪मारवाडी‬ आणि गुजराती

 🚪लकडा मार्केट - मुस्लिम‬

 📈 शेयर मार्केट - गुजराती, मारवाद. स्टील मार्केट - मारवाडी आणि गुजराती

🏢🏢 हाॅटेल लाईन - ‪‎शेट्टी‬, आणि पय्याडे

🍷🍻 वाईन मार्केट- शेट्टी, ‪‎पंजाबी‬

🐬🐟 मच्छी मार्केट - मुस्लिम, उत्तर भारतीय ..

‪‎मराठी‬ माणुस ??❓???? आहे कुठे ?   वडापावच्या गाडीवर.. !!

हसण्यावर घेऊ नका ‪

'लाज‬'' वाटण्या सारखी गोष्ट आहे.

Share करा प्रत्येक मराठी माणसापर्यत पोहोचवा हे

कटु सत्य .......

रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले ... 🏠🏡 🏢🏢

तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ......!!!

🙏🙏🙏जय महाराष्ट्र..

हवा मे उडनेवला बुलडोझर

 


वैदिक

 


Kal जुना

 *काळ जुना होता*

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे

आज कपड्यांचे भंडार आहेत,

तरीही जास्तीतजास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*, रहदारीची साधने कमी होती.

तरीही कुटुंबातील लोक

भेटतं असत

आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.

अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.

आजची मुलगी ही

शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*, लोकं

गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे

आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

खेळण्यांचा तुटवडा होता.

तरी शेजारची मुलं

एकत्र खेळायचे.

आज खूप खेळणी आहेत,

मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा

भाकरी दिली जायची

आज शेजारीच मुलंही

भुकेली झोपी जातात

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

शेजारच्या व आपल्या घरी

नातेवाईक भरले असायचे

आता परिचय विचारला तर

आज मला शेजारचे नावही माहीत नाही.

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*

🙏😔🙏

सारथी

 सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सपंन्न

विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत योग्य चौकशी करण्याची

व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

            पुणे, दि. 23 : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश देण्याकरीता सामाईक प्रवेश परीक्षा १९ जून २०२२ रोजी घेण्यात आली. परीक्षेबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.


            सारथीच्यावतीने नियुक्त संस्थेमार्फत एमपीएससी-२०२३ करीता ‘सारथी एमपीएससी सीईटी २०२२’ पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद व अमरावती येथील २७ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी ७ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी लोणी काळभोर येथील एका परीक्षा केंद्रावर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या.

            एमआयटी व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी काळभोर पुणे या परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे, संगणकाची स्क्रीन वारंवार हँग होत असल्यामुळे त्याच दिवशी दुपारी या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत काळजी घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000



शाळाबाह्य बालक झीरो dropout

 शाळाबाह्य बालकांसाठी 5 ते 20 जुलै दरम्यान मिशन झिरो ड्रॉपआऊट

 

            मुंबईदि. 23 :- शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट’ व्यापक स्वरूपात राबविण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

            बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणेबालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.

            राज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूलग्रामविकासनगरविकाससामाजिक न्याय व विशेष सहाय्यमहिला व बालविकासकामगार विभागआदिवासी विकासअल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ राबविण्यात येणार आहे.

मिशन झिरो ड्रॉपआऊट ची कार्यपद्धती

            मिशन झिरो ड्रॉपआऊट मध्ये बालकांचा शोध घेताना ग्रामपंचायत/ नगरपरिषद/ महानगरपालिकातील जन्म मृत्यू अभिलेख्यामधील नोंदीकुटुंब सर्वेक्षणतात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहितीशाळाबाह्यअनियमित बालके यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कार्यवाही करण्यात येईल. ही मोहीम वस्तीवाडीगाववार्ड या स्तरावर पूर्ण करण्यात येईल. तरशिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक)/ जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास)बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व नागरी) यांच्याकडून गाव. केंद्रबीटविभाग व शाळा स्तरानुसार नियोजन करण्यात येईल.

            या अभियानात एकही शाळाबाह्य/ स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावीअसे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असून यासाठी राज्यजिल्हा आणि तालुकास्तरावर विविध नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.


Featured post

Lakshvedhi