Friday, 24 June 2022

Kal जुना

 *काळ जुना होता*

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे

आज कपड्यांचे भंडार आहेत,

तरीही जास्तीतजास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*, रहदारीची साधने कमी होती.

तरीही कुटुंबातील लोक

भेटतं असत

आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.

अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.

आजची मुलगी ही

शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*, लोकं

गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे

आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

खेळण्यांचा तुटवडा होता.

तरी शेजारची मुलं

एकत्र खेळायचे.

आज खूप खेळणी आहेत,

मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा

भाकरी दिली जायची

आज शेजारीच मुलंही

भुकेली झोपी जातात

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

शेजारच्या व आपल्या घरी

नातेवाईक भरले असायचे

आता परिचय विचारला तर

आज मला शेजारचे नावही माहीत नाही.

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*

🙏😔🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi