Wednesday, 22 June 2022

जळू पावसाळ्यातील


 गुपचूप रक्त शोषणाऱ्या इवल्याश्या जळूची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३४)

 

पावसाळ्यात जंगलातील पालापाचोळ्यात उभे राहिलात तर तुमच्या पायांना जळवा नक्कीच चिकटतीलपाचगणीमहाबळेश्वरला तर डांबरी स्त्यावरही त्या उलट्या खिळ्यासारखा उभ्या असलेल्या आढळतातनवाणी पाय पडला तर त्या लगेच पायाला चिकटतातजळूबद्दल भीती वाटत असली तरी परिसंस्थेत आणि अन्नसाखळीतही तिची महत्त्वाची भूमिका आहेपण आता औद्योगिकरणशहरीकरण वाढत असल्याने त्यांची संख्या कमी होत आहे... अशा या इवल्याश्या जळूची ही गोष्ट!

 

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Monsoon-Leech-Story

 

भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या वतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही ३४ वी गोष्ट.

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.




भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Tuesday, 21 June 2022

मराठी ची गोडी

 आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी 


आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना

कामकाजासाठी समन्वयक / उपसमन्वयक यांची नेमणूक

            मुंबई, दि. 16 : परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास / संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी मंचा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कामासाठी समन्वयक / उपसमन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आदेश राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनी काढले आहेत.

            परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास / संस्थेच्या परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याद्वारे संवाद वाढून परदेशात मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल.

        त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

            भारत समन्वयक पदी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभिषेक सूर्यवंशी (अमेरिका), निवेदिता पानवलकर (अमेरिका), शोभा घुले (ऑस्ट्रेलिया), अमित वाईकर (थायलंड), निरंजन गाडगीळ (जपान), राहुल उरुणकर (केनिया), दीपक शिंदे (चीन), सचिन गांजापूरकर (सिंगापूर), मनोज कुलकर्णी (हाँगकाँग), शिल्पा गडमडे-मुळे (जर्मनी), गणेश गिते (आर्यलंड), अमोल सावरकर (स्विर्झलंड), प्रवीण कांबळे (युनायटेड किंगडम), मेघना वर्तक (दुबई), दयानंद देशपांडे (न्यूझिलंड), शैलेश असोंदेकर (सौदी अरेबिया), प्रशांत गिरबाने (भारत) यांची उपसमन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे.

                        परदेशात स्थायिक झालेले मराठी भाषक तेथे मराठी भाषेच्या संदर्भात विविध उपक्रम, कार्यक्रम करीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. जगातील अनेक देशांतील मराठी भाषकांसाठी उपक्रम राबविण्याची तरतूद राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेमध्ये आहे. या संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९ मध्ये अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, कलम क्र. १३ मध्ये अन्य राज्यांत व परदेशात असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे आणि कलम क्र. १६ मध्ये स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गानी संस्थेचा राखीव निधी वाढविणे या उद्दिष्टांचा समावेश आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

                        राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९, १३ व १६ मध्ये नमूद केल्यानुसार, अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, अन्य राज्यांत व परदेशांत असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे, स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गानी संस्थेचा राखीव निधी वाढवणे या उद्दिष्टांना निश्चित दिशा देण्यासाठी, परदेशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी कार्य करणाच्या व्यक्ती, संस्था यांच्या कार्याची शासनस्तरावर दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

        राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक / उपसमन्वयक यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या :

            विविध देशातील अनिवासी मराठी भाषक, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, मंडळे यांचा परस्परांबरोबर संपर्क घडवणे, तसेच विविध देशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार, जतन व संवर्धन यासाठी होणारे उपक्रम, कार्यक्रम याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला सादर करणे.

            जगभरातील विविध मराठी मंडळांची सूची तयार करणे, उपलब्ध सूचीत आवश्यक ते बदल करून सूची अद्ययावत करणे व त्याबाबतची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला पाठविणे. संचालक, राज्य मराठी विकास संस्था व परदेशातील विविध महाराष्ट्र मंडळांचे प्रतिनिधी यांमधील

            दुवा/समन्वयक या नात्याने त्यांच्या कार्याची माहिती परस्परांना पुरवणे. तसेच मराठी साहित्य, देवनागरी लिपी या संबंधातील कार्यक्रमांचे वृत्तांकन मिळवून त्यांचे दुवे राज्य मराठी विकास संस्थेपर्यंत पोहोचविणे. राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेत नमूद केलेल्या कलम क्र. ९ व १३ मध्ये नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संस्थेशी चर्चा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. तसेच, कलम क्र. १६ मध्ये नमूद केल्यानुसार, संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी परदेशातील सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे. परदेशात शिकणारे मराठी व अमराठी भारतीय तसेच परदेशी विद्यार्थी यांना राज्य मराठी विकास संस्थेबरोबर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या विविध उपक्रमांमध्येराज्य मराठी विकास संस्थेबरोबर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे. जगभरातील समाजमाध्यमांमध्ये मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील अहवाल प्राप्त करून व त्यांचा अभ्यास करून समाजमाध्यमांद्वारे मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासंदर्भात उपक्रमांचे नियोजन करणे. मराठी भाषा-साहित्य या संदर्भात जगभरातील विविध नियतकालिकांमधून संशोधनपर लेख लिहिण्यासाठी परदेशस्थ शिक्षणसंस्थांमधील मराठी तसेच अमराठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. जगातील विविध देशात वास्तव्य करणाऱ्या तेथील मराठी भाषक, संस्था यांच्याकडून मराठी भाषेचा प्रचार प्रसार, संवर्धन व विकास यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, क्षणचित्रे, दृकश्राव्य चित्रफिती राज्य मराठी विकास संस्थेकडे पाठवणे.अशा जबाबदाऱ्या समन्वयक / उपसमन्वयक पदासाठी निश्चीत करण्यात आल्या आहेत.


00


प्रवीण भुरके/उपसंपादक/00

Purskar

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण जुलैमध्ये

- मंत्री विजय वडेट्टीवार

पुढील वर्षापासून या पुरस्कारांसाठी प्रत्येक महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड 

 

            मुंबईदि. १६ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक, समाज सेवक व्यक्ती तसेच संस्थांना 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षांपासून सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाणार असल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            दि. ८ जून २०१६ रोजी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्यानुसार २०१६ - १७, २०१७ - १८२०१८ - १९२०१९ - २०२०२० -२१२०२१- २२ या सहाही वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.

            २०१६-१७ प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद, २०१७-१८ श्री. अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता. अहमदपूर, जिल्हा लातूर२०१८-१९ श्री. विठ्ठल ताकबिडे, नांदेड, २०१९ - २० श्री. उमाकांत गुरूनाथ शेटे पुणेसंस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस ता. पुर्णाजिल्हा परभणी२०२० -२१ श्री. रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूरसंस्था म्हणून तीर्थक्षेत्र आदी मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जिल्हा सातारा२०२१-२२ डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के, नवी मुंबई, संस्था म्हणून सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग, बसवेश्वर नगर, नांदेड या पुरस्कार विजेत्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

            संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१/- हजार रोख व व्यक्तीला २५/- हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ पुरस्कार म्हणून दिले जातील.

             पुरस्कार वितरणास या क्षेत्रात कार्य करणारे कलावंतसाहित्यिकसमाज प्रबोधनकारसमाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.

******

संध्या गरवारे/विसंअ/

- मंत्री विजय वडेट्टीवार

पुढील वर्षापासून या पुरस्कारांसाठी प्रत्येक महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड .

            मुंबई, दि. १६ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक, समाज सेवक व्यक्ती तसेच संस्थांना 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षांपासून सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाणार असल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            दि. ८ जून २०१६ रोजी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्यानुसार २०१६ - १७, २०१७ - १८, २०१८ - १९, २०१९ - २०, २०२० -२१, २०२१- २२ या सहाही वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.

            २०१६-१७ प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद, २०१७-१८ श्री. अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता. अहमदपूर, जिल्हा लातूर, २०१८-१९ श्री. विठ्ठल ताकबिडे, नांदेड, २०१९ - २० श्री. उमाकांत गुरूनाथ शेटे पुणे, संस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस ता. पुर्णा, जिल्हा परभणी, २०२० -२१ श्री. रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूर, संस्था म्हणून तीर्थक्षेत्र आदी मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जिल्हा सातारा, २०२१-२२ डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के, नवी मुंबई, संस्था म्हणून सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग, बसवेश्वर नगर, नांदेड या पुरस्कार विजेत्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

            संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१/- हजार रोख व व्यक्तीला २५/- हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ पुरस्कार म्हणून दिले जातील.

             पुरस्कार वितरणास या क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.

*****

आदर्श पोरांचा


होकरासान

 विवाहित पुरुषांनी घरात नेहमी , *"होकारासन"* केल्यास मनस्वास्थ्य उत्तम राहते.

हे करताना तोंड बंद ठेवून मान वरखाली करायची असते !


योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼

बालमजूर

 बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठीसर्वांचा सहभाग आवश्यक

-.                                                   सुशीबेन शाह

            मुंबई, दि. 20 : बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी संस्थांबरोबरच प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान या प्रक्रियेत आवश्यक असून नागरिकांचा सहभागही आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

          जिल्हाधिकारी मुंबई शहर, महिला व बालविकास अधिकारी मुंबई शहर आणि कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन सप्ताह सांगता समारोहाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केले होते.

            या कार्यक्रमास कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त शिरीन लोखंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ज्ञानेश्वर पाताळे, शिक्षण उपनिरिक्षक, रंजना राव, प्रथम संस्थेच्या संचालक फरिदा लांबे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निलिमा चव्हाण, कामगार उपायुक्त निलांबरी भोसले, महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.


          सुशीबेन शाह म्हणाल्या, आपण एखाद्या शहरात बाल मजुरी विरोधी कारवाया करतो परंतू तीच मुले अन्य राज्यात किंवा जिल्हयात काम करताना आढळतात. त्यामुळे याबाबत कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे. बाल मजुरी प्रश्नाबाबत प्रभावी जनजागृतीसह, बालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. येत्या वर्षभरात आपण बालमजुर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न लवकरच साकार करू, असा विश्वास सुशीबेन शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

             दहावी व बारावी परीक्षेत राज्यातील बालगृहातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे. परंतु यानंतर या मुलांचे पुढे काय होते. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बालमजूरी मुले का करतात त्यांच्या पालकांशी त्या मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. यासाठी बालकांच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, असेही सुशीबेन शाह यावेळी म्हणाल्या.

          सचिव ज्ञानेश्वर पाताळे म्हणाले, बाल कामगार मुलांना शिक्षणाकडे वळविले पाहिजे. अशासकीय संस्थांची यासाठी मदत घ्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेशीर सहाय्य व सल्ला देण्यात येईल.

          अपर आयुक्त शिरीन लोखंडे म्हणाल्या, बाल कामगार विरोधी दिन सप्ताह आपण साजरा केला, याचे फलित आपण लोकांपर्यंत पोहोचलो. आपण या मुलांशी बोलले पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.

            यावेळी बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी , अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

            दि. 12 जून ते 20 जून या कालावधीत बाल कामगार विरोधी दिन सप्ताह राबविण्यात आला, या सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाच्या विधी सल्लागार सविता ठोसर यांनी केले तर आभारआय.जे.एम. संस्थेच्या क्लेफा परमार यांनी मानले.

गजर संविधानाचा

 यंदा आषाढी वारी पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर;

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम.

            पुणे, दि. 20 :- कोविड विषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली 'ज्ञानोबा-तुकोबांची' पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदी वरून पंढरी कडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळयात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषा बरोबरच संविधानाचा देखील गजर करण्यात येणार आहे.

            पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असून दि. 21 जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर भजन - कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करत 10 जुलै रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.

अशी असेल संविधान दिंडी :

            दि. 21 जून रोजी आळंदी येथील चऱ्होली फाटा येथे दुपारी 3 वा. या दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            दि. 22 रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामास येईल, या दरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील.

            दि. 23 (गुरुवार) रोजी पालखी मुक्काम स्थळाजवळ नाना पेठ येथे ‘संविधान जलसा’ हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट कलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शहा, निलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

            दि. 24 जून रोजी पासून ते दि. 10 जुलै पर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम संपूर्ण वेळ राबवले जाणार आहेत.

            दि. 24 जून ते 10 जुलै पालखी सोहळा व संविधान दिंडी पालखीच्या ठरलेल्या मुक्काम मार्गावर मार्गक्रमण करत जाईल व पालखी दरम्यान पायी दिंडीत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वरील उपक्रम राबविण्याचे नियोजन बार्टी मार्फत करण्यात आले असून या संविधान दिंडीचा 10 जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.


संवैधानिक मूल्यांचा गजर - धनंजय मुंडे

            महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देहू-आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संमिलीत होतात. देशाचे संविधान देखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मूलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक हे जबाबदार असावेत, या उद्देशाने लाखो भाविकांच्या 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे. 

            पालखीच्या या संपूर्ण प्रवासात हरिनाम घोषासह संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


 

Featured post

Lakshvedhi