Wednesday, 16 March 2022

 कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करणार

- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

              मुंबई, दि. 15 :- महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते.सध्या परिस्थिती बिकट असली तरी शेतकऱ्यांचा विचार करून खंडित केलेल्या कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय विधानसभेत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घोषित केला. 

              कृषी वीज जोडणी संदर्भात विधानसभा सदस्य नाना पटोले, कुणाल पाटील, प्रकाश सोळंके, आमदार कल्याणकर यांनी तसेच अन्य सदस्यांनी हे मुद्दे उपस्थित केले.

            ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले,शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.पुढील 3 महिने या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच थकबाकीपोटी कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. परंतु महावितरण कंपनीस आर्थिक अडचणीतून दिलासा देण्याच्या दृष्टीने सर्व ग्राहकांना थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे अशी माहितीही ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली.

          ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, महावितरण कंपनी ही शासनाच्या मालकीची कंपनी आहे. महावितरण कंपनीव्दारे राज्यातील सुमारे 3 कोटी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. वीज ग्राहकाकडून वीज देयकापोटी प्राप्त होणारा महसूल तसेच शासनाकडून मिळणारे अनुदान हेच महावितरणचे आर्थिक स्त्रोत आहेत. महावितरण कंपनीकडे घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे मार्च 2021 अखेर रु.7,568 कोटी इतकी थकबाकी होती. शहरी व ग्रामीण स्वराज्य संस्था यांच्याकडील पथदिवे व पाणीपुरवठा योजना यांची थकबाकी जानेवारी 2022 अखेर रु.9,011 कोटी इतकी झाली आहे. याशिवाय शासकीय कार्यालयाकडून वीज देयकांपोटी रु.207 कोटी थकीत आहेत. महावितरणद्वारे कायमस्वरुपी खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांकडे रु.6,423 कोटी थकीत आहेत. कृषीपंप ग्राहकांकडे डिसेंबर 2020 अखेरची थकबाकी 44 हजार 920 रूपये कोटी इतकी झाली आहे हे पाहता महावितरणच्या विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे सुमारे रु.64,000 कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे असेही ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

            ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, महावितरण कंपनीने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांना हप्त्याने थकबाकी भरण्याची सुविधा दिलेली आहे. वसुलीसाठी पाठपुरावा करणे, ठिकठिकाणी वीज बिल दुरुस्तीसाठी शिबिरे आयोजित करणे अशा विविध उपाययोजना करताना जे दरमहा नियमित बिल भरतात त्यांना २ टक्के रिबेट दिले आहे. या उपाययोजनांमुळे जानेवारी 2022 अखेर चालू देयकांच्या वसुली व्यतिरिक्त थकबाकी वसुल करुन घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांची थकबाकी कमी होऊन आता रु.5,452 कोटी इतकी झाली आहे. याशिवाय कायमस्वरुपी खंडीत असणाऱ्या ग्राहकांकडील थकबाकी रु.6,423 कोटी वसुलीकरिता “विलासराव देशमुख अभय योजना” महावितरण कंपनीद्वारे नुकतीच जाहीर केली आहे.

            ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले,कृषीपंप ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी ऊर्जा विभागाने “कृषीपंप वीज जोडणी धोरण -2020” जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत सन 2024 पर्यंत थकबाकीची रक्कम कृषी ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा उपलब्ध असून मुळ मुद्दल, व्याज व दंड यामध्ये सवलत जाहीर केली आहे. या धोरणाच्या माध्यमातून रू.15 हजार 97 कोटी इतकी रक्कम निर्लेखनाद्वारे व व्याज दंड यामध्ये सूट देवून थकबाकीची सुधारित रक्कम रू.30 हजार 731 कोटी इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. याकरिता कृषी ग्राहकाने योजनेत सहभाग घेवून सप्टेंबर, 2020 नंतरची चालू बिले भरणे आवश्यक आहे.या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रसार माध्यमातून योजनेची प्रसिद्धी, लोकप्रतिनिधींना सहकार्याचे आवाहन, वीज बिल दुरुस्ती मेळावे इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महावितरणने कृषी वीज ग्राहकांकडून वीज बिल वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. या धोरणाअंतर्गत फक्त रू.2 हजार 378 कोटी रकमेचा भरणा कृषी ग्राहकांनी महावितरणकडे केला आहे. या धोरणातील तरतूदीनुसार चालू वीजदेयके कृषी ग्राहकांनी न भरल्याने नाईलाजास्तव काही कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करावा लागला.

           ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, महावितरण कंपनीकडे सद्यस्थितीत असणारे रू.47,034 कोटी इतके बँकांचे कर्ज, सुमारे रू.20,268 कोटी वीजपुरवठादार कंपन्यांची देणी यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक झालेली आहे. या पार्श्वभुमीवर महावितरण कंपनीस त्वरीत आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा यांची थकीत विज देयके व प्रलंबितअनुदानापोटी रुपये 8500 त्वरित महावितरण कंपनीस वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणद्वारा वीज बिलाच्या थकीत रक्कमेची परतफेड ही ६ मासिक हप्त्यांऐवजी १२ मासिक हप्त्यात करण्याची लवचिकता देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कृषी ग्राहकांना दिवसा वीज देण्यासंबंधी तांत्रिक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीस 1 महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना देण्यात येतील. ज्या वेळेस जानेवारी 2020 मध्ये खाते आले तेव्हा मार्च 2014 मध्ये 14 हजार 154 कोटी ती 2020 अखेर 59 हजार 149 कोटींवर गेली. मागच्या सरकारने वीज बिले दिली नाही स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री यांनीही वीज बिल दिले नसल्याचे सांगितले. टाळेबंदीत अखंड वीज पुरवठा केला. रस्त्यावर काम करताना आमचे विद्युत सैनिक शहीद झाले.अनेक अडचणी आल्या तरी राज्यात भारनियमन होवू दिले नाही.


*****



 





 फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी रोहयो आणि फलोत्पादन

विभागाचा घेतला आढावा

हळद संशोधन व प्रक्रिया धोरणाविषयी चर्चा.

            मुंबई, दि. 15 : हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालावर फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्याशी चर्चा करून सविस्तर आढावा घेतला.

            मंत्रालयात रोहयो आणि फलोत्पादन विभागाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

             शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात श्री.भुमरे यांनी समस्या जाणून घेतल्या. श्री.भुमरे म्हणाले, सर्व शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता बँकांशी पत्रव्यवहार करण्यात येईल. यावेळी शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या राज्यस्तरीय समितीने फलोत्पादन मंत्री भुमरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

             हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी संशोधन व प्रक्रिया धोरणावर सविस्तर चर्चा केली.

00000



 जेवढा राग भर उन्हात गाडी पंक्चर झाल्यावर नाही येत, तेवढा राग

४० रुपयाचं कलिंगडं🍉 पांढरं निघाल्यावर येतो...😠😠

आणि त्याहुन जास्त येतो जेव्हा बायको म्हणते

*"कळत नाही तर आणता कशाला?*

😖😖

*उन्हाळ्याच्या शुभेच्छा*

😅😅 😜😜

 *३६५ दिवस✈️हार्टफुलनेस गोष्टीं बरोबर🌍*

❤️ *गोष्ट - १५६ *❤️

*नात्यांची वीण कशावर पोसली जाते?*

*नात्यांची वीण*

एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."

मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”

दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.

थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.

एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."

आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?

मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.

काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"

तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.

पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."

सत्य हे आहे की या जगात, खर्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.

ज्या अदृश्य धाग्याने नाते विणले जाते त्याचे पोषण, हे प्रेम आणि विश्वासावर होत असते.

"नात्यात निर्माण झालेल्या थोड्याशा दुराव्यामुळे, कोणाचीही साथ सोडू नका... नाहीतर लोकांना आपलेसे करण्यात आयुष्य खर्ची करावे लागते."                 

*सत्य अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे इतरांमधे प्रेम निर्माण होईल.*

*दाजी*

*Heartfulness Meditation* 💌

*मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक

Tuesday, 15 March 2022

 एकाच मोजणी रजिस्टर नंबरचे दोन दस्तऐवज;

प्रकरणाची तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देणार

- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

            मुंबई, दि. 15 : राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये गट नंबर ३१४/१ आणि ३१४/३ मध्ये बांधकाम सुरु असून संबंधित विकासकाने सादर केलेल्या दस्तऐवजात फेरफार असल्याचे तथ्य आढळून आले आहे. एकाच मोजणी रजिस्टर नंबरचे दोन दस्तऐवज संबंधितांनी नगरपरिषदेला दिले असून ही गंभीर बाब असल्याने या प्रकरणाची तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जातील, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभेत दिलीप मोहिते-पाटील, ॲड.अशोक पवार, डॉ. किरण लहामटे या सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले की, राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये गट नंबर ३१४/१ आणि ३१४/३ मध्ये बांधकाम सुरु असून त्याच्या १२०० चौरस मीटर क्षेत्रफळाची मोजणी २०१३ मध्ये करण्यात आली होती. या मोजणीची नक्कल २०१६ ला भूमी अभिलेखकडून मिळवली त्यात २४०० चौरस मीटर क्षेत्रफळाची नोंदणी केलेली आहे. या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून अहवालानंतर कठोर कारवाई करण्यात येईल. या विकासकाला नगरपरिषदेने दिलेली बांधकाम परवानगी रद्द केली असून या आदेशाला विकासकाने न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. चुकीच्या नक्कल, सनद देखील रद्द केल्या असून त्याविरोधात संबंधित विकासक न्यायालयात गेला आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.

            खोटे दस्तऐवज तयार करुन एकाच क्रमांकाचे दोन दस्तऐवज नगरपालिकेला देणे ही गंभीर बाब असून भूमि अभिलेख उपसंचालकांना हे तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात अधिकची कागदपत्रे निदर्शनास आली तर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातील, असेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.

 राष्ट्रीय सेवा योजनेसाठी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची तरतूद

- एनएसएस राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू

· उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला यश.

            मुंबई,दि. 15 : राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय सेवा योजनेसाठी 7 कोटी रुपयांची तरतूद केली असून यामुळे राज्यातील सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी वाढीव निधीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी वाढीव तरतूद केली असल्याची माहिती, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू यांनी दिली.

            श्री. प्रभू म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेसाठीच्या निधीतही वाढ केली आहे. ही बाब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत लक्षात आणून दिली. तसेच आपणही निधी वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी कोणताही विलंब न करता अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे श्री. प्रभू यांनी आभार मानले आहेत.

            राज्य आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पूर्वी नियमित कार्यक्रमासाठी 250 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 400 रुपये मिळणार आहेत. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी 450 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 700 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती श्री. प्रभू यांनी दिली.

 🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

                    *🔸उपदेशामृत.🔸*

*एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून "जय जय रघुवीर समर्थ।" असा आवाज दिला.*

*त्या वेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली,*

*स्त्री : महाराज, काही उपदेश द्या.*

*समर्थ : आज नाही; उद्या देतो.*

*दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला.*

 *त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खीरीचा वाडगा घेऊन बाहेर आली.*

 *समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलुत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली.*

*ती समर्थांना म्हणाली,*

*स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.*

*समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.*

*स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते.*

*समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ?*

*स्त्री : हो महाराज.*

*समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही.*

*"जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल."*

*तेव्हाच खर्‍या सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल...!!!*

🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

Featured post

Lakshvedhi